गेल्या आठवड्यात जिप्सीचा फोन आला पुरंदरला कसे जायचे विचारायला. तेव्हा माझा वेगळाच प्लॅन ठरत होता. पण ऐन वेळी बरेच बदल झाले आणि सरते शेवटी पुरंदरला जाण्याचा योग आला. वाटेत एकेठिकाणी मस्त चमचमीत मिसळ चापली आणि धुंद पावसाळी वातावरणात थेट गडावर गाड्या दामटल्या.
जिप्सीबरोबर जाण्याचा माझा हेतू होता त्याच्याकडून काही फोटोग्राफी टिप्स घेणे...पण का कोण झाले मी त्याची फोटोग्राफीची तंद्री मोडूच शकलो नाही. आख्ख्या ट्रेकमध्ये मी त्याला विचारलेला एकमेव प्रश्न म्हणजे...व्हाईट बॅलेन्स कुठला ठेवला आहेस रे एवढाच होता....:)
त्यात अजून गंमत म्हणजे गडावर फिरताना दिपक सांगत होता अरे मी इथला जो फोटो पाहिला ना तो असा खालून घेतला होता आणि त्यात समोर वज्रगड दिसत होता. त्यानंतर अजूनही दोन तीन फोटोंचे वर्णन केले. हे सगळे ऐकताना असे वाटत होते हे फोटो आपणपण कुठेतरी पाहिलेत. नंतर अधिक विचार केला असता लक्षात आले की हे आपणच काढलेत
दिपकला म्हणलो अरे तु हे पावसाळ्यातला पुरंदरबद्दल बोलतोयस का...तर म्हणे हो...च्यामारी
http://www.maayboli.com/node/18684
हीच ती लिंक
या काकू त्यांचे फोटो काढताना जाम अस्वस्थ झाल्या होत्या. त्यामुळे आणखी काही अँगल घेता आला नाही.
प्रचि ५
आपला उडीबाबा ट्रेकला आला असता तर मस्तच झाले असते. पण त्याच्याच तालमीत तयार झालेला मायबोलीकर दिपकने त्याची उणीव भासू दिली नाही.
प्रचि ७
आधुनिक गनीमाचा लढवय्या मुरारबाजींना वेढा
प्रचि ९
थोडा फोटोग्राफीचा प्रयत्न
प्रचि १७
जिप्स्याला सांभाळून नेताना गणेश आणि दिपक. या गणेशचे मला फार कौतुक वाटले. बहाद्दराचा पहिलाच ट्रेक होता आणि तो चप्पल घालून आला होता. ज्या निसरड्या वाटेवरून आम्ही एक्शन ट्रेकींगचे शूज घालून सांभाळून चालत होतो तिकडेदेखील हा बिनधास्त वावरत होता. कुठे दमला नाही की थकला नाही. निर्विवादपणे भटक्याची सारी लक्षणे त्यात आहेत.
प्रचि १८
(No subject)
आशु, मस्त रे फोटो आणि वर्णन
आशु, मस्त रे फोटो आणि वर्णन
पुन्हा सगळ आठवलं.
त्या चिखलाच्या वाटेवर खरंच जाम घसरायला होत होते ना
जल्ला, मला वाट्ले फोटोंवर
जल्ला, मला वाट्ले फोटोंवर काही कॉमेंट करशील....कुठे चुकत असेल तर कान धरा गुरुजी
कान धरा गुरुजी>>>>अरे कान
कान धरा गुरुजी>>>>अरे कान कशाला धरायचे. उलट तुमचा अमुल्य वेळ आम्हास दिल्याबद्दल धन्यवादच.
११ व्वा फोटो लईच भारी ! २३वा
११ व्वा फोटो लईच भारी !
२३वा पण !
मस्तच रे चँप !
उलट तुमचा अमुल्य वेळ आम्हास
उलट तुमचा अमुल्य वेळ आम्हास दिल्याबद्दल धन्यवादच
हे तु उपहासाने नाय ना बोलत...च्यायला
मस्त आहेत रे फोटु. चिखलातुन
मस्त आहेत रे फोटु.
चिखलातुन चालताना जिप्स्याच पोश्चर माझ्यासारखच दिसतय. मी तर खाली बसुन दोघानी मला ओढा म्हणुन ल्हाणपणीचा खेळ खेळला असता.
तुम्हाला ते गाव दिसल नाही का रे खालच ज्यात एक मोठा देवळाचा कळस आहे?
बहुतेक धुक्याने दिसल नसेल..
मस्त
मस्त
चिखलातुन चालताना जिप्स्याच
चिखलातुन चालताना जिप्स्याच पोश्चर माझ्यासारखच दिसतय.>>>>झक्या, वार्यामुळे माझा विंडशीटर फुगलाय रे...:फिदी:
मस्त फोटो ( अवांतर
मस्त फोटो
( अवांतर :गडावरील भूभू ला बघून उगाचच ' वाघ्याची ' आठवण आली )
झक्या, वार्यामुळे माझा
झक्या, वार्यामुळे माझा विंडशीटर फुगलाय रे>>
मला जाडी नाही तुझी उडालेली घाबरगुंडी म्हणायचच रे.
मलाही असच कोणी ना कोणी संभाळुन नेत, आणत म्हणुन मी जातो ट्रेकला.
छान प्रकाशचित्रे..! आणि
छान प्रकाशचित्रे..! आणि माहीती.
प्रकाशचित्र क्र. २२ तर एकदम जबरदस्त.
फोटो क्रमांक २२ मला प्रचंड
फोटो क्रमांक २२ मला प्रचंड आवडला.
बाकी फोटोही सुंदर आलेत.
पुरंदर म्हटला की त्याचे फोटो
पुरंदर म्हटला की त्याचे फोटो कितीही वेळा तेवढ्याच ओढीने आवडीने पाहू शकतो.....
लहानपणी किती वेळा गडावर गेलोय त्याची मोजदादच नाही - सध्या मात्र अशा फोटोंवरच तहान भागवावी लागतेय.....
सर्व प्र चि अप्रतिमच रे.....
सर्व ऋतूत वेगवेगळ्या सौंदर्याने नटलेला दिसतो हा - आणि ते बघताना भान हरपून जाते......
मस्त आशु... त्या कुत्र्याचा
मस्त आशु...
त्या कुत्र्याचा फोटु भारी आलाय ..
सही ! १९, २१, २२ खासच आवडले.
सही !
१९, २१, २२ खासच आवडले.
मस्त फोटो आशूचॅंप. काही काही
मस्त फोटो आशूचॅंप. काही काही खूपच आवडले.
प्रचि एक्क नंबर! बर्याच
प्रचि एक्क नंबर!
बर्याच दिवसांनी आशुचँप भटकंती वर्णन घेऊन अवतरले आहेत.. त्यामुळे आमच्यासाठी आशुचँपची पुनर्भेट!
धन्यवाद सर्वांना तुम्हाला ते
धन्यवाद सर्वांना
तुम्हाला ते गाव दिसल नाही का रे खालच ज्यात एक मोठा देवळाचा कळस आहे?
बहुतेक धुक्याने दिसल नसेल..
हो बहुदा
झक्या, वार्यामुळे माझा विंडशीटर फुगलाय रे
सर्व ऋतूत वेगवेगळ्या सौंदर्याने नटलेला दिसतो हा - आणि ते बघताना भान हरपून जाते......
अगदी अगदी
बर्याच दिवसांनी आशुचँप भटकंती वर्णन घेऊन अवतरले आहेत.. त्यामुळे आमच्यासाठी आशुचँपची पुनर्भेट!
"प्रचंड लाजलेला बाहुला"
मस्तच रे चँप !
मस्तच रे चँप !
प्र.ची. मस्त आलेत, सुंदर !
प्र.ची. मस्त आलेत, सुंदर !
छान फोटो. आशू, तूझा मसाई मारा
छान फोटो.
आशू, तूझा मसाई मारा ला जायला प्लान होता ना ? मी आता केनयात नाही, पण फोटोची वाट बघतोय.
आशु... सगळे फोटो मस्तच... ६,
आशु... सगळे फोटो मस्तच... ६, १५,१९ आणि २१ खुप आवडले...
मस्तच आहेत फोटो! अवांतर :
मस्तच आहेत फोटो!
अवांतर : माझी एक मैत्रीण अलिकडेच श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे सोबत बरेच किल्ले बघुन आली. बाबासाहेब स्वतः सगळी माहिती सांगतात त्या त्या ठिकाणची! बाबासाहेबांचे वय पहाता हा उपक्रम फारच कौतुकास्पद वाटतो! माबोकरांपैकी कुणी गेले आहे का त्यांच्याबरोबर? दिवाळीत अजुन एक अशी भ्रमंती आहे! ही पर्वणी चुकवू नका! पुण्यातली संस्था ही दुर्गभ्रमंती आयोजित करते.
वा अप्रतिम प्रचि प्रचि १३
वा अप्रतिम प्रचि
प्रचि १३ खासच, आता असे वुतांत येतच राहुदेत
तुम्हाला ते गाव दिसल नाही का
तुम्हाला ते गाव दिसल नाही का रे खालच ज्यात एक मोठा देवळाचा कळस आहे?
बहुतेक धुक्याने दिसल नसेल..........नाही दिसले..
बाकी वर्णन आणि फोटो मस्त
आशू, तूझा मसाई मारा ला जायला
आशू, तूझा मसाई मारा ला जायला प्लान होता ना ?
नाय वो...माझा तेवढा बजेटच नाही....तुम्ही परत कधी गेलात तर मग मला बोलवा...मी येईन...
धन्यवाद दिपक, वत्सला, ईनमीन तीन आणि स्मितू
सही प्र. चि.!!
सही प्र. चि.!!