अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

Submitted by मी-भास्कर on 31 July, 2012 - 03:36

अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

राजकारणात उतरल्यावर तर कुस्ती अशा विविध १०० अगडबंब सुमोंशी आहे हे नक्की.
Anna and corruption.jpg

आदरणीय अण्णा,
सादर दंडवत.
एक समर्थक या नात्याने हे पत्र.
कोणत्याही सत्तेला एक व्यवस्था चालवावी लागते. लोकशाही मार्गाने सत्ताप्रदान हा सर्वात उत्तम मार्ग मानला जातो. सत्तेचा कल कॆंद्रीकरणाकडेच असतो. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि अनिर्बंध सत्ता संपूर्ण भ्रष्ट करते. सत्तेतील माणसे भ्रष्ट होण्यापासून रोखण्यासाठी चांगली घटना, कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असते. आपल्या लोकशाही-व्यवस्थेत मुख्य सत्ता सत्तारूढ पक्षाकडे एकवटली आहे. विरोधी पक्ष स्वच्छ, जागरूक व प्रबळ असेल तर तो सत्तेवर अंकुश ठेवू शकतो. आपल्या इथे या सर्वांचे तीन तेरा वाजल्याने एक फार अवघड लढाई आपल्याला या वयात हाती घ्यावी लागली आहे.
भ्रष्ट व्यवस्थेत ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा अती बलिष्ट वर्गाशी हा संघर्ष आहे. यांच्याच आश्रयाला असलेला वर्गही प्रचंड संख्येने आहे. ही ताकदच संसदेत कोण जाणार हे ठरवते. याच व्यवस्थेने सर्वसामान्यांनाही इच्छा असो वा नसो भ्रष्टाचाराची सवय लावली आहे. किंबहुना असे म्हणता येईल की जवळपास प्रत्येक जण ( खर्‍या अर्थाने भ्रष्ट नसला तरी ) कोणत्या ना कोणत्या कारणाने भ्रष्ट ठरविला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कोणत्याही पाठिराख्याला ’भ्रष्टाचारी’ म्हणून ’अंदर’ करून बदनाम करणे सत्तेला सहज शक्य आहे. त्यामुळे शक्तीच्या दृष्टीने ही अगदी विषम लढाईआहे.
अंतीमतः पुरेशा संख्याबळाने तुमचे समर्थक संसदेत असल्याशिवाय भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी आवश्यक ते बदल होऊच शकत नाहीत. पाठीशी असणारे संख्याबळ जास्तीत जास्त वाढवणे हेच फक्त तुमच्या हाती आहे. सरतेशेवटी विरोधकांना निवडणुकीत पराभूत करून चळवळीच्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी संख्याबळ हवेच. तुमची ही शक्ती वाढूच नये याची पूर्ण खबरदारी तुमचे विरोधक घेताहेत आणि आपण त्यांच्या सापळ्यात नकळत अडकता असे आम्हाला वाटते.
तुमच्या मागे अल्पसंख्य व दलीत नाहीत असे आरोप केले की तुमची टीम इमेज क्रिएशनच्या मागे आपली शक्ती वाया घालविते. तुमच्या मागे संघ आहे म्हटले की तो कसा नाही हे सांगण्यासाठी आटापिटा केला जातो. आता उद्या तुमच्यात आदिवासी कोठे आहेत असे म्हटले की पुन्हा शक्तिव्यय. हे सर्व करतांना आपला शक्तीव्यय तर होतोच पण संख्याबळही वाढत नाही, असे आपल्याला वाटत नाही का? अगदी ताजे उदाहरण रामदेवबाबा आणी मोदी भेटीचे आहे. तुमचे विरोधक या भेटीबाबत आक्षेप घेऊन जुनेच 'डिव्हाईड अँड काँकर' चे तंत्र वापरत आहेत. उद्या कोणी आदिवासी नेता तुम्हाला पाठींबा द्यायला आला तर ते त्याला माओवादीही ठरवतील आणि तुमची देशद्रोह्यांशी हातमिळवणी आहे असे म्हणतील. मग पुन्हा शक्तिव्यय! असे असूनही आपण त्याच त्या सापळ्यात का अडकतां?
या ठिकाणी चर्चिलचे एक वाक्य आठवते. लढाईची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी जाहीर केले की "हिटलरचा संपूर्ण पाडाव करण्यासाठी मी सैतानाची मदत घेण्यासही मागेपुढे पाहाणार नाही."
इतक्या टोकाचे जरी नाही तरी -
" भ्रष्टाचाराच्या लढाईत प्रामाणिकपणे साथ देणार्‍या कोणाही भारतीयाची मी मदत घेईन." असे ठणकावून सांगण्यात आपल्याला काय अडचण आहे?
आणिबाणीविरुद्ध लढतांना जयप्रकाशांनी हेच केले होते आणि म्हणून ते जिंकले. त्यामुळे
' दिल्ली तो अभि बहोत दूर है| ' हेच खरे!

16 September, 2012
अण्णा नवी टिम निवडून आंदोलन सुरू करणार असल्याचे वाचले.
या नव्या टीमच्या आंदोलनाचा मागोवा घ्यायचा आहे खालील धाग्यावर :
http://www.maayboli.com/node/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे हाती घेतलेला मूळ मुद्दा अडगळीत जाऊन पडणार याचे वाईट वाटते.

>>
भास्कर तुम्हाला वाईट वाटून काय उपयोग? त्यांना वाटले पाहिजे ना? आणि त्यांना जर आत्मविश्वास असेल की या नव्या निवडलेल्या मार्गाने यश मिळणार आहे तर तुम्हालाही निराश होण्याचे कारण नाही.
खरे सांगू का, भ्रष्टाचार या मुद्द्यावर या देशात जनमत संघटित होणे फार कठीण म्हनण्यापेक्षा नजीकच्या भविष्यात तरी अशक्यच आहे. हा मुद्दा कधीही या देशातल्या जनतेने टॉप प्रायॉरिटीचा मानलेला नाही. त्याचे उत्तर इथल्या समाजरचनेच्या व्यामिश्रतेतही आहे. ह्या मुद्द्यावर जर लोकांनी मते दिली असती तर आपल्या हुशार राजकारण्यानी तोच नसता का उचलला ? मग त्यांनी अपरिहार्यता म्हणून स्वच्छ प्रशासन नसते का दिले? जेपी, गुजराती विद्यार्थी आंदोलन (नवनिर्माण) भ्रष्टाचारच्या विरोधातली आंदोलने का विरून गेली? जेपींचे आंदोलन ज्या बिहारी जनतेने उचलून धरले होते तिथेच भ्रष्ताचाराचा कळस गाठणारी सरकारे त्याच जनतेने कशी निवडून दिली याचा 'सामजिक अभ्यास ' आपण करणार आहोत की नाही? की केवळ भावनेच्या हिंदोळ्यावर खाली वर होणार आहोत? लालूप्रसाद यादव हे विद्यार्थी नेते असतानाजेपींचे कडवे समर्थक होते हे सत्य आपण पचवू शकतो काय?
जिथे जगण्याचा संघर्ष हेच जीवन ध्येय आहे आणि अस्तित्वाचा प्रश्नच मुख्य आहे तिथे मूल्याधारित राजकारण हे जरा आदर्शवादीच होतेय. मुळात सामाजिक अंतर्विरोध एवढा प्रचंड आहे की 'एकाचे अन्न ते दुसर्‍याचे विष आणि एकाचे विष ते दुसर्‍यचे अन्न' अशी स्थिती झाल्याने वाईट गोष्टीसाठीही लोक संघटित होतात. आणि राजकारण हे 'डोक्यातील कंटेन्ट' पेक्षा 'डोक्यांच्या संख्येवर' आधारित व्यवस्था असल्याने काही साध्य करताना यातील संघटनात्मक अडचणी लक्षात घेणे आवश्यक आहे...

स्वातंत्र्यपूर्व कालात गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस या व अशा उच्चशिक्षीत पुढारी यानी आकर्षक व हाय प्रोफाईल करीअर्स सोडून देशासाठी, इप्सितासाठी वाहून घेतले. आता मूल्यव्यवस्था वेगळी असल्याने देशाबाहेरच खरे करीअर आहे इथपर्यन्त आपण येऊन ठेपलो आहोत...

आणिबाणीविरुद्ध लढतांना जयप्रकाशांनी हेच केले होते आणि म्हणून ते जिंकले.
>>>
जयप्रकाश जिंकले नाहीत , काही लोकांनी त्यांचा वापर करून ते 'काही लोक' जिंकले. जेपी कुठे सत्तेत होते? या काही लोकांनी पुढे काय केले ? जेपींना जिवंतपणीच 'मारले' . सैद्धांतिकदृष्ट्या आणि प्रत्यक्षातही. अगदी जेपी जिवन्त असताना 'वारल्याची' बातमी संसदेत घोषित ही केली. Angry

या वेळी प्रथमच टीम अण्णा उपोषणाला बसलेली..थोड्याच दिवसांनी अण्णा पण बसले..काही दिवसांनी अण्णांची सोडून इतर सर्व सदस्यांची तब्येत बिघडली..तरीपण " मै बलिदान कर रहा हू" अशी वाक्ये फेकत केजरीवाल बोलतच राहीले..तब्येत अजून खालावली..पण अण्णांची ठणठणीतच होती..तरीसुध्दा अचानक अण्णांवर दबाव आणून टीम अण्णां ने उपोषण बंद करायला लावले......का? या वेळी त्यांना स्वत: च्या आरोग्याची जास्त काळजी होती..आंदोलन उपोषणाला तर फक्त लोकलज्जे खातिर बसलेले....हीच लोक जेव्हा अण्णा एकटे उपोषण करीत होते..तेव्हा ट्वीटर, फेसबूक, मिडीआ प्रेस सगळी कडे प्रचार करून उपोषण बंद होऊ नये सतत चालू राहण्यासाठी प्रयत्न करत होते... 13 व्या दिवशी सुध्दा हा केजरीवाल ओरडत होता..उपोषण बंद होणार नाही.....
.
मग आता का अचानक बंद केले..?
काँग्रेस जनतेला नको आहे..परंतु तिला पर्याय सुध्दा उपलब्ध नाही आहे...जे इतर पक्ष सत्तेवर येतात ते काहीच ठोस करु शकले नाहीत त्यामुळे काँग्रेस ला परत सत्ता मिळते..त्यामुळे होते असे की इतर पक्ष लोकांच्या नजरेतुन उतरतात आणि सत्ता परत एकवटली जाते...याचा दोष इतर पक्षावर जातो.. जनता दलाचे आलेले व्ही पी सिंग यांचे त्यांनी मंडल आयोग चे भुत मानगुटीवर जे बसवले ते आजतागायत आहे... त्यानंतर आलेले भाजप सरकार ते आलेलेच मुख्य "राम मंदीर" च्या मुद्द्यावर..परंतु नेमका तोच मुद्दा सोइस्कर विसरली..विदेश निती अयशस्वी ठरली त्यामुळे आर्थिक निर्बंध आले..अर्थव्यवस्था निट उभी राहिली नाही.. त्यातल्यात्यात जे काही चांगली कामे करणार होती त्यात नेमके घटकदलांचाच विरोध होता..त्यामुळे

मग आता का अचानक बंद केले..?

>>>>
का म्हणजे सशक्त लोकपाल आला पाहिजे म्हणून....:)
खरे म्हणजे लोकपालाच्या मुद्द्याने जोर धरल्याबरोबर बेदी, केजरीवाल, आणि प्रशान्तभूषण यांना लोकपाल बनण्याची स्वप्ने पडू लागली. केजरीवाल, बेदी, हे ऑल इंडिया सर्विसेसमधले लोक असल्याने व प्रशान्तभूषण व चिरंजीव हे विधिज्ञ असल्याने आपणच त्या पदाला लायक आहोत या मतलबी भ्रमाने त्याना पछाडले होते. (टीमने केलेल्या मसुद्यात लोकपाल निवड समितीत मॅगसेसे पुरस्कार विजेते लोक असावेत अशी मुळात तरतूदच होती. बेदी व केजरीवाल तसे आहेत). अण्णा लोकपाल होऊ शकत नाहीत हे उघडच आहोत मग अण्णानंतर आपण असावे म्हणून या मंडळीनी 'वेळीच' टायमिंग साधून आंदोलनात प्रवेश केला. रामदेव,अग्निवेश, रविशंकर वगैरे 'क्राऊड अ‍ॅडिक्ट' मंडळी 'तेवढेच ज्ञानप्रकाशात' म्हणून घुसलीच... एरव्ही यांच्या घरातील कुटुम्बीय देखील यांच्या मागे नसतील. Happy
या वेळी यांना उपोषण सोडण्याची विनंती करणे दूरच पण लिम्बूपाणी द्यायला देखील कोणी मिळेना म्हणून व्ही के सिंह नावाची नवी नौटंकी शोधण्यात आली.
बाकी अनुपम खेर यांनी वाचून दाखवलेल्या पत्राचा 'फुलटॉस' ज्याने टाकला त्याला मानलं पाहिजे . 'विकेट' मिळण्याचा केवढा जबरदस्त आत्मविश्वास असला पाहिजे त्याचा. हे नक्कीच काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या धूर्त आणि कावेबाज डोक्याचे काम असणार आहे.
यात टीम अण्णापेक्षा जबरी गोची भाजपची झाली आहे. इतरत्र मतविभागणी तर होइलच पण भाजपशासित राज्यात तर अण्णापक्षाला थेट लढत द्यावी लागेल. अण्णा तर येडिरियुअपाचे प्रचारात वाभाडे काढणार. मेधा पाटकर गुजरात मध्ये प्रचारसभा घेणार का?
अपार्ट फ्रॉम जोक, एकटे अण्णा जर जन्तरमन्तर्वर उपोषणाला (पहिल्यांदा) बसले असते तर महाराष्ट्रातले बरेच लोक (अण्णांशी मतभेद असनारेही) दिल्लीला जाऊन मोठ्या संख्येने उपोष्णात सामील झाले असते...पण या लोकांनी अण्णांना हायजॅक केले....

सध्या तरी एक अनरजिस्टर्ड , अनरेकग्नाईज्ड पक्षाचा जन्म झाला आहे ज्याचे अध्यक्ष अण्णा असणार नाहीत. ते फक्त 'सांगेन गोष्टी युक्तीच्या चार' अशा 'जयप्रकाश नारायणीय' अथवा एस एम जोशीय अवतारात असतील. पुढे सगळी इतिहासाची पुनरावृत्ती....!!! Sad

भारतातले सर्वाधिक शहाणे आणि बुद्धीमान, कुशल लोक एका व्यासपीथावर एकत्र यावेत हा एक कपिलाषष्ठी योग जुळून आलेला आहे. देशाचे भवितव्य आता उज्ज्वल आहे. शायरन मिळाला. शाय + रन.

रेव्यु | 2 August, 2012 - 22:30
अण्णा भारतिय सैन्यातून पळून आलेली व्यक्ती आहे.
<<<

Uhoh

बेफिकीर , नाही , ही गोष्ट खरी नाही. अण्णा जीप ड्रायव्हर होते आणि त्यांची सेवा व्यवस्थित पूर्ण करून आलेत. हे दिग्विजयसिंहांचे संशोधन असावे Happy

शेळी ताई , जो लोकपाल (जो दारासिंगासारखा सशक्त पाहिजे मात्र :)) आणेल त्याला पाठिम्बा हे अण्णांचे सूत्र आहे.(आणि होणारा लोकपाल मीच असावा असे टीमचे सूत्र आहे कारण मी(च )स्वच्छ आणि सुविद्यही आहे...) काँग्रेसने टीमचा मसुदा जसाच्या तसा मान्य केला तर अण्णा काँग्रेसमध्ये नक्कीच जातील. मग 'सशक्त लोकपाल' या ड्राम्याच्या दुसर्‍या अंकात ' कोण होणार लोकपाल' या रहस्यमय अंकास प्रारम्भ होणार. काँग्रेस दिग्विजय सिंगास लोकपाल बनवणार.(त्यापूर्वी दिग्गिराजाच्या एन्जीओ च्या माध्यमातून त्याना मॅगसेसे पुरस्कार मिळण्याची 'वेवस्था' करणार)..
तिसर्‍या अंकात 'हेचि फल काय मम तपाला?' असा प्रश्न स्वतःला, अण्णांना विचारीत टीम अण्णाचे सुविद्य सदस्य 'दिग्विजय पुरेसे सशक्त नसून कॉंग्रेसचे बाहुले आहेत 'असा 'इश्यू' करून काँग्रेस मधून बाहेर पडणार... हाकानाका?

मी अमेठीतून अण्णांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवायचा विचार करतोय. माझ्या सभेला अण्णांचे भाषण व्हावे ही इच्छा आहे.

क्या था मेरे पास ? कुच नहि था. स्टेशन पे मईने विवेकानंदजी कि किताब पढी और निच्चय किया. क्या निच्चय किया ? शादी नहि करना. बच्चे पैदा नहि करना. ये था निच्चय. २५ साल का वय था. तभि डिसाइड किया. ये जीवन देश के नाम. देश के नाम कर दिया. ये जीवन देश के नाम कर दिया. कुच नहि है मेरे पास. एक देऊळ है. उधर ही सोता हूं. एक रुपया भी मेरे खाते मे नहि. फॅमिलि नहि बनायि. लेकिन, आज कितनि बडि फॅमिलि है. ये जनता, ये गर्दी ये सब मेरि फॅमिलि है. आप लोगा मेरे फॅमिलि हय.

इस सरकारने धोका किया. आज नववा दिन है लेकिन कोइभि पूचनेको भी नहि आया ( अण्णाजी, इलेक्शन कँपेन है ). माफ करना. उपोषण कि आदत लगी है, तो भाषन करनेको उठता हुं तो लगता है उपोषण का भाषण करना.

तो मई किधर था ?
लाशे देखि . ये लाशे. मै दुश्मन के साथ लढा. आज सरकार के साथ लडना. किस लिये लडना ? लोकपाल लाना. इलेक्शन के बाद सरकार के खिलाफ वही जंतर मंतर पे धरना देना. उपोषण करना. हम आनेवाले सरकार को मुदत देंगे. उसके बाद एक नहि सुनेंगे. जेल भरना. आप लोग जेल मे जाव. ( अण्णाजी.. इलेक्शन इलेक्शन )

हा हां. काँग्रेसको मत नहि देना. अच्चा आदमी देखके मत देना ( अन्नाजी मै आपका आदमी हूं. मुझे वोट देनेको बोलो. ) किरन को मत देना. पहले उसको चेक करना. ऐसे नहि देना. लोकपाल मंजूर है क्या ? पूचो. मंजूर है तो मत देना.

मेरे साथ बोलो... जय हिंद !
इन्कलाब.............
लोकपाल .................

( अण्णाजी, मईने पाय के उपर कुल्हाडि मारि )

लोकहो,

थोडं विषयांतर करतो. अण्णांचा पक्षस्थापनेचा प्रयोग कितपत सफल होईल ते काळच सांगेल. मात्र सध्या अण्णांच्या मार्गास एक पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे नरेंद्र मोदींचा मार्ग. पैसा खाणार नाही आणि पैसा खाऊही देणार नाही असा खाक्या ठेवणारे मोदी कुशल संघटकही आहेत.

अर्थात त्यांनी गुजरातेत लोकपाल न नेमण्यामागील कारण उघड आहे. मात्र भ्रष्टाचार वेगळ्या प्रकारे हाताळता येतो हे मला सांगायचे आहे. म्हणून हा संदेशप्रपंच.

आ.न.,
-गा.पै.

शेळी,

>> काय विनोद आहे! त्याला पाडणे शक्य असते तर त्या स्वच्छ माणसालाच निवडून नसते का
>> आणले लोकानी??

चमचे उमेदवार उभे करून प्रतिस्पर्ध्याची मते फोडण्याचा खेळ चालतो, तसाच प्रकार करायचा. म्हणजे चमचे उमेदवार उभे करायचे असं म्हणत नाहीये मी. तर भ्रष्ट उमेदवारांची अंडीपिल्ली बाहेर काढून मते फोडायची. भीतीने का होईना उमेदवार जनतेस उत्तरदायी होतील.

आ.न.,
-गा.पै.

गुजरात चा मासळी घोटाळा विसरले..? साधी चौकशी सुध्दा करण्याची परवानगी दिली नाही... ठाम पुरावे देउन...
.
गुजरात मधे सुध्दा प्रचंड भ्रष्टाचार आहे..
जावून बघावे.. ज्यांना पुरावा बघण्याचे आहे...
.

.उदयन.

नक्की मासळी घोटाळा आहे का? नर्मदाखोर्‍यातील प्रकल्पग्रस्तांना सहाय्यार्थ विनानिविदा कंत्राटे देण्यात आली. निविदाप्रक्रियेस न्याय्य कारणार्थ फाटा दिला म्हणजे भ्रष्टाचार होत नाही.

ज्या इसहाक मरादियाने न्यायालयात खटला दाखल केला त्या खटल्यात पुरुषोत्तम सोलंकी हे मंत्री प्रतिवादी नव्हते. त्याच्या याचिकेमागे केवळ सरकारचा (विनानिविदा कंत्राटे देण्याचा) निर्णय फिरवण्याचा हेतू होता. या खटल्याचा निकाल मरादियाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे गुजरात सरकारला कंत्राटांचा निविदा मागवून लिलाव करावा लागेल. या खटल्यात मंत्रीमहोदयांवर न्यायाधीशांकडून काहीही टिप्पणी झाली नाही.

असं असतांना राज्यपाल कमला यांनी कशाच्या आधारावर सोळंकी यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटला भरायची टूम काढली? हे करतांना घटनात्मक तरतूद काय आहे ते बघायला नको? राज्यपालाला राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही.

आ.न.,
-गा.पै.

राज्यपालाला राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही.


>>>
धन्य आहे गामा तुमची ! मोदी समर्थनाने तुम्हाला एवढे आंधळे केले असेल असे वाटले नव्हते. अहो राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.(constitutional head). त्यांच्या वतीने मंत्रीमंडल कारभार पाहते.राज्य शासनाच्या प्रत्येक जी आर (शासन निर्णय) च्या शेवटी एक ओळ असते राज्यपाल यांच्या नावाने व वतीने' हे म्हनजे छत्रपतींनी पेशव्यांच्या कारभारात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही असे म्हणण्यासारखे आहे.

>>@शेन्डे नक्ष्त्र , तुम्हाला अण्णांच्या गावाचे नावही नीट माहीत नाही यावरून तुम्हाला त्यांची आणि त्यांच्या अहंकाराची नीट कल्पना नसावी.
<<
गावाचे नाव हा काही चर्चेचा कळीचा मुद्दा नाही. शिवाय गावाची नावे बदलतातही. तेव्हा उगाच नसते फाटे फोडू नका.

>>शिवाय तुम्ही फार पूर्वी त्या गावी गेला होतात. तेव्हाचे अण्णा आणि आताचे अण्णा यातला फरक तुम्हाला माहीत नसावा.
<<
आपण कधीच त्यांच्या गावाला गेला नाहीत आणि आपण स्वतःला त्यातले जाणकार समजता ना? मग मीही समजतो.

अण्णा हजारे हे पुरुषोत्तम आहेत असे कुणी म्हणत नाहीच. पण जे काही नेते आज मिरवत आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर अण्णा सत्पुरुषच आहेत.
सगळ्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवलाच पाहिजे असे नाही. अण्णांनी कायदा हातात घेतला असेल तर त्याविरुद्ध कारवाई करायला सरकार उपलब्ध आहे, नव्हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसल आहे.

अण्णांनी इतक्या उच्चपदस्थांना दुखावलेले आहे की खरोखर काही बेकायदा त्यांच्य हातून घडले असेल तर त्यांना तुरुंगात डांबायला विलंब होणार नाही. पण तसे काही सापडत नसल्यामुळे असल्या चिखलफेकी होताना दिसत आहेत.
बाकी आपला शिंदळीचा अभ्यास बघून धन्य झालो!

<<
त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आता पक्ष स्थापन होऊन 'दूध भैया देतो आणि पाणी नळाला येते' हे आणि एवढेच माहीत असलेली टीम आता देश चालव्णार आहेत. बीटी कॉटन आणि बीटी वांगी शेतकर्‍याला फायदेशीर की तोट्याची यावर प्रशान्त भूषण , बेदी म्याडमची मते ऐकणे ज्ञानात भर टाकणारी निश्चितच असेल नाही?
<<

दूध भैय्या देतो आणि पाणी नळाला येते हे आपणासही माहित आहे हे वाचून आनंद झाला!
आजकालच्या काळात जिथे शहरातील लोकसंख्या ज्या गतीने वाढते आहे ते बघता ह्या मूलभूत गरजा वितरित करण्याचे तंत्र हे सुधारणे आवश्यक आहे. नाहीतर पुढे उत्पात् होणार. गाईच्या सडातून दूध काढून ते चरवीत भरल्यावर काम संपले, पाऊस पडून विहीर भरल्यावर काम संपले असे मानायचे दिवस आता गेले. आणि हे ओळखणारे नेते आणि मतदार आता हवे आहेत.

अहो, क्लाऊड क्म्प्युटींग हे वीज पडल्यास गडबडेल असे मानणारे आपले तण्त्रज्ञान सचीव आहेत, जलविद्युत ज्या पाण्यावर चालते त्या पाण्यावर पिके येत नाहीत असे म्हणणारे कृषीमंत्री आपल्याला लाभले आहेत, म्हशीचे दूध काढायची स्पर्धा ठेवू आणि जो जिंकेल तो पंतप्रधान असे रेल्वे मिनिस्टर आपल्याला लाभले आहेत. म्याडमची थुन्की झेलण्याच्या एकमेव खेळात तरबेज असणारे आपले क्रीडा मंत्री होते, मयत झालेल्या माणसाला दयेचा अर्ज मंजूर करणार्‍या राष्ट्रपतीबाई आपल्या नशिबी होत्या.

मग थोडे वेगळेही करुन बघू , काय म्हणता?

बाळू जोशी,

घटनेच्या १६३ व्या कलमात स्पष्ट दिलंय :

163. (1) There shall be a Council of Ministers with the
Chief Minister at the head to aid and advise the Governor
in the exercise of his functions, except in so far as he is
by or under this Constitution required to exercise his
functions or any of them in his discretion.

To act on own's discretion अर्थात स्वमताने कार्यवाही करण्यासाठी घटनात्मक कारण लागतं. वरील प्रकरणात ते दिसत नाही.

आ.न.,
-गा.पै.

शेळी | 4 August, 2012 - 13:58
>>जर स्वच्छ लोकांना निवडवून आणता येत नसेल तर अस्वच्छ लोकांना पाडायला काय हरकत आहे?

काय विनोद आहे! त्याला पाडणे शक्य असते तर त्या स्वच्छ माणसालाच निवडून नसते का आणले लोकानी??
<<
जर स्वच्छ लोकांना निवडवून आणता येत नसेल तर अस्वच्छ लोकांना पाडणे ही गोष्ट अशक्य नसावी.
बसपाचे कांशीराम (कदाचित मायावती असतील) म्हणाले होते," एकेकाळी आम्ही अस्तित्व दाखविण्याकरता निवडणुका लढवत होतो, नंतर आम्हि नको असलेल्याला पाडण्याकरता निवडणुका लढवू लागलो आणि आता आम्हि जिंकण्याकरता निवडणुका लढवतो."

शेळीने हा विनोद बसपाकडून समजाऊन घ्यावा.

अण्णांनी निवडणुकीत न उतरता भ्रष्टाचाराच्या एकमेव मुद्द्यावर (कारण राज्यकर्ते कोणीहि येवोत , भ्रश्ताचाराविरुद्ध कमिअदीक तीव्रतेची लढाई चालूच ठेवावी लागेल.) त्यातल्या त्यात उत्तम उमेदवार निवडून आणता येण्याइतकी ताकद नसेल तर सर्वात वाइट उमेदवार पडेल अशी रणनीति ठरवावी. राजकीय पक्ष उभा करण्याच्या भानगडीत पडू नये असे मला वाटते.

टीम अण्णांनी निवडणुक लढवणे त्यांचा हक्क आहे पण शहरातल्या उच्च शिक्षीत लोकांच्या सोसायट्यांना निवडणूक काळात रन्ग द्यायला लागतो अथवा सोसायट्यातले रस्ते स्वखर्चाने बनवून द्यायला लागतात्.त्यासाठी पैसे कुठून आणणार? त्याची आगाऊ खात्री मतदाराना द्यावी लागते.(त्यासाठी माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे असे प्रतिज्ञापत्र निवदणूक आयोगाला द्यावे लागते :)) आणि झोपडीत व खेड्यात पैसे , दारू मटण पुरवावे लागते त्याची काय सोय केली आहे? शिवाय प्रचारकांना गाड्या? बेदी म्याडम दूरचा प्रवास विमानाने व स्थानिक प्रवास इनोव्हाने करतात त्याची व्यवस्था?

टीमाण्णा बर्खास्त झाली आहे. रंगमंचावर योगेन्द्र यादव हे नवीन पात्र दाखल झाले आहे. एकूण पक्ष कार्यालय दिल्लीतच ठेवणे सोइस्कर ठरेल असे दिसते...

@बाळू जोशी. | 6 August, 2012 - 13:26
>>टीमाण्णा बर्खास्त झाली आहे. रंगमंचावर योगेन्द्र यादव हे नवीन पात्र दाखल झाले आहे. एकूण पक्ष कार्यालय दिल्लीतच ठेवणे सोइस्कर ठरेल असे दिसते...

योगेन्द्र यादव हे राजकिय विश्लेशक म्हणून माहीत आहेत. पण 'व्यवस्था परिवर्तन' हे जे नव्या पक्शाचे उद्दिष्ट म्हणुन सांगितले गेले त्यासाठी त्यांनि कांही योगदान केले आहे का हे माहित नाहि.

सर्वांना हव्या असलेल्या आंदोलनाची हाताळणी अप्रगल्भतेने आणि अहंकाराने केली गेल्याने आता पुन्हा सामान्यांसाठी आंदोलन उभे राहणार नाही. आंदोलनाचे नियोजनकर्ते पडद्याआड होते. अण्णा हा या आंदोलनाचा चेहरा होता. या चेह-याला माध्यमांद्वारे युएसपी म्हणून समोर ठेवण्यात आले. गेल्या वर्षी महाराष्ट्राबाहेर अण्णांना कुणीही ओळखत नव्हते. अण्णांच्या वाट्याला आलेली प्रसिद्धी गंगेच्या शुद्धीकरणासाठी तीन महिने अन्नत्याग करून देह ठेवणा-या एका योगीच्या वाट्याला आली नाही किंवा गेली अकरा वर्षे उपोषण करणा-या आसामातील महिला कार्यकर्तीच्याही वाट्याला आली नाही.

ज्यांनी अण्णांच्या आंदोलनाच्या मागचे नियोजन ओळखले ते सावध झाले. प.पू. च्या ऐवजी महात्मा गांधींची मोठी तसबीर, स्वातंत्र्याची गाणी याद्वारे वातावरण तयार केलं गेलं. नेटवर्किंग साईटस आणि २४ तास लाईव्ह द्वारे प्रेशर बनवलं गेलं. पण मुळात ग्रास रूट च्या लेव्हलला आंदोलन लोकांपर्यंत पोहोचलं होतं का ? देशव्यापी संघटन या आंदोलनाकडे होतं का ? कार्यकर्ते होते का ?

शॉर्टकट वापरून जमलेली गर्दी कुठल्याही कामाची नसते हे अण्णांना हितचिंतक सांगत होते, पण गर्दी पाहून टीम अण्णांची काय अवस्था झाली, माईकचा ताबा आपल्याकडेच राहण्यासाठी कशी स्पर्धा सुरु झाली हे देशाने पाहीले. तीच तीच भाषणं आणि तीच ती कॅसेट ! एककलमी मुद्दा ! आणि आम्ही म्हणतो तसाच लोकपाल आणा नाहीतर तुम्ही चोर. हळूहळू सहानुभूतू कमी झाली. मुंबईला फज्जा उडाला. पुन्हा जंतरमंतरवर लोक फिरकले नाहीत आणि या आंदोलनाचा दुर्दैवी शेवट झाला. एक किलो वजन उचलण्याची क्षमता असलेल्या पैलवानाला स्टेरॉईडस देऊन एकदा शंभर किलो वजन उचलायला लावता येईल पण पुन्हा तो प्रयत्न केला तर त्या पैलवानाचुआ शरीराचीच हानी होणार ! आंदोलनाचं तेच झालं. दर वेळी माध्यमांची स्टेरॉईडस काम करत नाहीत. ग्रासरूटला आंदोलन नसल्याने ते फसलं. जनतेचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याने आणि एकतर्फी संवादाने ते फसलं. अहंकार, अविश्वास आदी विकारांचा उद्रेक झाल्यानेही ते फसलं.

पोस्टमार्टेम काय आता होत राहील. पुन्हा कुणावर विश्वास टाकता येणार नाही हा साइड इफेक्ट मात्र आहे.

>>मुळात ग्रास रूट च्या लेव्हलला आंदोलन लोकांपर्यंत पोहोचलं होतं का ? देशव्यापी संघटन या आंदोलनाकडे होतं का ? कार्यकर्ते होते का ? <<
ते पोचण्याची आणि संघटन तयार होण्याची क्षमता असणारा हा मुद्दा होता.
खर तर भ्रष्टाचार आणि त्याविरुद्ध आंदोलन या दोन्ही बाबींइतके सेक्युलर या जगात दुसरे काही नसेल.
पण भ्रष्टाचारातच ज्यांचे हितसंबंध आहेत त्यांनी फार कुशलतेने ते बुडवले. पण काहीच हाती लागले नाही असे आहे का?

मल वाटते कि या देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी संगणक फार मोलाची भूमिका बजावू शकेल.
आज ग्रामदूत/विविधा केन्द्रांमुळे गावपातळी वरील अनेक कामे विना लाच मार्गी लागतात.
आण्णांनी टोल बूथ वर संगणकाद्वारे पारदर्शकता आणण्याचा आग्रह धरला आहेच.
सर्व सरकारी कामकाज ईंटरनेट द्वारे व्हावी असा आग्रह हवा.
सरकारी मिटींग ऑनलाईन होतील्,सर्व कचेर्यांमध्ये वेब कॅम बसवावे.
सर्व निविदा /नियुक्त्या ईंटरनेट्च्या माध्यमातून व्हाव्या.ऑनलाईन परिक्षा व्हाव्या.
या उपायांनी भ्रष्टाचारास निश्चीत आळा बसेल.व सरकारी खर्चात कपात होईल. नवीन रोजगार उपलब्ध होतिल.

>>मल वाटते कि या देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी संगणक फार मोलाची भूमिका बजावू शकेल <<
सहमत. पण तेवढेच पुरेसे नाहि. शिवाय भ्रश्टाचारी वृत्तीचे लोक त्यातून्ही मार्ग काढतच राहातील. त्यामुळे हा प्रश्न एकदा हाती घेतला आणि मग त्यावर कायम स्वरुपी तोडगा एकदाचा निघाला असे होणे शक्य नाहि. सतत जाकरूक राहून हातालण्याचा विषय आहे हा. जनलोकपालाव्यतिरिक्त इतरहि मार्गांचा विचार होणे आवश्यक आहे. अण्णा त्यावरही विचार करतील अशि आशा करूयात. माहितीच्या अधिकारातून प्रबोधन, न्यायालयीन लढाई व निवडणुकाम्मधील जनजागरण असे पर्यायी मार्ग वापरले जात आहेतच.
ते तसे चालू राहतिल असे वाटते.

Pages