मालकांना सोसवेना रात्रपाळी

Submitted by कौतुक शिरोडकर on 31 July, 2012 - 02:53

(मूळ गझल ज्यांची आहे त्यांनी मनावर घेऊ नये. या विडंबनाचा कोणत्याही हजर व्हा ब्लॉक आयडीशी कोणताही संबंध नाही. कोणी ओढून ताणून लावल्यास त्याला तोच जबाबदार. कुणाला यात भर घालायची असेल तर सुस्वागतम. कृपया, यातले शेर आवडले नाही म्हणून ते बदलून देऊ नयेत. आम्हाला आमच्या काव्यप्रतिभेचा फाजिल अभिमान आहे.)

आयडींनो जा निजा, अन या सकाळी...
मालकांना सोसवेना रात्रपाळी !

सोबतीने अ‍ॅडमिन घेवून जा ना...
आयड्यू छळतात जे तीन्ही-त्रिकाळी !

सौम्यश्या देवू कशा शिव्या तयाना
पातळी त्यांची असे जर शीवराळी ?

भांडण्यामध्येच सारा बाफ वाही
रोज पण त्याच्यातही दिसते नव्हाळी

'थांबला तो संपला' नसते असेही..
ये नवे मुद्दे उगाळून देत हाळी

दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी..
ब्लॉक तोही जो नव्या लेखा उगाळी

आयडीनी जा करा ते तोंड काळे
ही असे गल्लीच माझी, 'माय' आळी

एक जाता काय त्याचे ? घ्या नव्याने
वेगळ्या नावे.. पुन्हा तू.. बडव थाळी

ब्रीद माझे एक आहे.. टाक काड्या
लाव आगी... को अहम ? कोणास जाळी ?

काय मजला सांग पडले ? कोण माळी ?
मीच सटवी... वाटते ते लिहिन भाळी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages