मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by रूनी पॉटर on 30 July, 2012 - 21:55

मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
धन्यवाद.

यंदाचे संयोजक मंडळ खालील प्रमाणे निवडले आहे.
तोषवी, _मधुरा_, शुगोल, स्नेहश्री, युगंधर, चिन्मय_कामत, जाई.साहित्ययात्री
सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जय गणेश!

गणेशोत्सवाची चर्चा सुरु झाली Happy अरे व्वा!

मागच्यावर्षी संयोजनात भाग घेऊन खुप मजा आली Happy खुप काहि गोष्टी नव्याने कळल्या... नव्याने शिकायला मिळाल्या Happy इतर संयोजकांबरोबर एक टीम म्हणुन एकत्र काम करताना कधी वादविवादही झाले..मैत्रीचे संवादही झाले.. सगळ्यांचे ध्येय एकच होते ते म्हणजे गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला पाहिजे Happy त्यामुळे सगळ्यांनी अगदी मान मोडुन, मन लाऊन, झटुन काम केले. अडीअडचणीला संयोजकांनी मायबोली कुटूंबातिल ज्यांना कुणाला हाक मारली त्यांनी लगेच मदत केली Happy संयोजकही जगाच्या तीन कोपर्‍यातुन आलेले असल्यामुळे वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या वेळा/टाइमझोन्स सांभाळुन सगळ्यांनी आपापली जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली आणि उत्सव दणक्यात साजरा केला Happy

नव्या सदस्यांनी नक्कीच संयोजनात भाग घ्यावा. मार्गदर्शन करायला आम्ही आहोतच Happy

माझ्याकडुन काहि मदत लागल्यास हक्काने सांगा Happy एखाद्या स्पर्धेचे परिक्षक व्हायला आवडेल Happy

एक सुचना... संयोजकांमधे एखादा ग्राफिक डिझायनर/आर्टीस्ट असावा... खुप उपयोग होतो Happy

गणेशोत्सवासाठी खुप सार्‍या शुभेच्छा!!! Happy दरवर्षीप्रमाणे यंदाही दणक्यात झाला पाहिजे उत्सव Happy

जय गणेश!

अरे वा, आला आला गणेशोत्सव आला!

लाजो + १. एक वर्षं झालंही! Happy

एक सुचना... संयोजकांमधे एखादा ग्राफिक डिझायनर/आर्टीस्ट असावा... खुप उपयोग होतो >>> अगदी अगदी. लाजो + १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० ........

मला काम करायला आवडेल. परंतू मी पूर्वी संयोजन टीममध्ये काम केले असल्याने नवीन लोकांना संधी द्यायची असल्यास काहीच हरकत नाही! Happy

माझ्याकडे घरी नेट नाहिये आणि हापिसातुन सर्व गोष्टी अ‍ॅक्सेस होतीलच ह्याची खात्रीही नाहिये.
त्यामुळे मी नेहमी वाचक मोड मधेच असतो.

बघु पुढच्या वर्षी जमवतो.

अरे वा, गणपतीबाप्पाची चाहूल लागली.
संयोजनात काम करायला आवडलं असतं. पण माझ्या कामाच्या वेळा आणि स्वरूप खूपच बेभरवशाचे आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट कमिट करायला भिती वाटते.
संयोजकांना शुभेच्छा Happy
उपक्रमांमध्ये भाग घेण्याचं मात्र नक्की.

माझ्याघरी नेट आहे. संयोजनात काम करायला पण आवडेल. पण काम नक्की किती आणि काय स्वरुपाचं असेल याचा अंदाज मला येत नाहिये. (जरी रुनी पॉटर यांनी प्रस्तावनेत दिलं असलं तरी मला अंदाज येत नाहिये.) मायबोलीवरचा गणेशोत्सव किती दिवस असतो?

मला काम करायला आवडेल. या प्रकारच्या कामाबाबत पाटी एकदम कोरी आहे. घरी नेट आहे. दिवसाचे ३-४ तास द्यायची तयारी आहे. जरा जास्त शिकवणी लागेल. गेली २ वर्षं मायबोलीनी खूप आनंद दिला आहे. नुसतेच धन्यवाद देण्यापेक्षा मदत करुन कृतज्ञता व्यक्त करता आली तर खूप आवडेल.

मला काम करायला आवडेल. या प्रकारच्या कामाबाबत पाटी एकदम कोरी आहे. घरी नेट आहे. दिवसाचे ३-४ तास द्यायची तयारी आहे. जरा जास्त शिकवणी लागेल. गेली २ वर्षं मायबोलीनी खूप आनंद दिला आहे. नुसतेच धन्यवाद देण्यापेक्षा मदत करुन कृतज्ञता व्यक्त करता आली तर खूप आवडेल. >> +१

मुख्य गणपतीच्या दिवसांमध्ये काम असेल का? विचारलं कारण मला गणपतीच्या पहिल्या ४ दिवसात काम करणं शक्य होणार नाही.

मला काम करायला आवडेल. या प्रकारच्या कामाबाबत पाटी एकदम कोरी आहे. घरी नेट आहे. दिवसाचे ३-४ तास द्यायची तयारी आहे. जरा जास्त शिकवणी लागेल. गेली २ वर्षं मायबोलीनी खूप आनंद दिला आहे. नुसतेच धन्यवाद देण्यापेक्षा मदत करुन कृतज्ञता व्यक्त करता आली तर खूप आवडेल. >> +१

माझ्या कडे पण घरी नेट आहे. त्यामुळे नकीच वेळ देता येइल.
गणपती बाप्पा आणी मायबोली साठी इतक तर नक्की करु शकते..

काम करण्यास उत्सुक असलेल्या सर्वांस :
सुरवातीला काम कमी असतं पण जसजसा उत्सव जवळ येतो तसा वेळ जास्त द्यावा लागू शकतो. पण पूर्ण टिमवर्क योग्य असेल, तर अगदी सहज करता येतं. उत्सवाच्या वेळी बराच वेळ द्यावा लागतो. खरंतर नंतर आपणच इतके इन्व्हॉल्व होतो की वेळ किती दिला इ. गोष्टीच गौण ठरतात. एक झिंगच चढते म्हणा ना!

सर्व नविन मायबोलीकरांनी एकदा तरी घ्यावाच असा अनुभव आहे हा. मायबोली काय चीज आहे हे अगदी जवळून बघायला मिळतं. जगभरातल्या मंडळींकरता ऑनलाईन गणेशोत्सव आयोजित करण्याचा अनुभव मिळणार आहे, संधी सोडू नका. Happy

नमस्कार, ववि संयोजनाचा अनुभव सुंदर आणि वेगळाच आहे. यावेळी हा ही अनुभव घ्यायला आवडेल. घरी नेट आहे. ऑफीसमध्ये ही आहे. पण वेळ जास्ती करुन भारतीय वेळेप्रमाणे रात्री १०.०० नंतर देउ शकेन. काही करता येईल का.

मला काम करायला आवडेल. या प्रकारच्या कामाबाबत पाटी एकदम कोरी आहे. घरी नेट आहे. दिवसाचे ३-४ तास द्यायची तयारी आहे. जरा जास्त शिकवणी लागेल. गेली २ वर्षं मायबोलीनी खूप आनंद दिला आहे. नुसतेच धन्यवाद देण्यापेक्षा मदत करुन कृतज्ञता व्यक्त करता आली तर खूप आवडेल. >> +१

माझ्या कडे पण घरी व ऑफीसमध्ये नेट आहे. त्यामुळे नकीच वेळ देता येइल.>> +१
गणपती बाप्पा आणी मायबोली साठी इतक तर नक्की करु शकते.. >>+१

सुरवातीला काम कमी असतं पण जसजसा उत्सव जवळ येतो तसा वेळ जास्त द्यावा लागू शकतो. पण पूर्ण टिमवर्क योग्य असेल, तर अगदी सहज करता येतं. उत्सवाच्या वेळी बराच वेळ द्यावा लागतो. खरंतर नंतर आपणच इतके इन्व्हॉल्व होतो की वेळ किती दिला इ. गोष्टीच गौण ठरतात. एक झिंगच चढते म्हणा ना!<<< ++१००

उत्सवाच्या आधी आणि उत्सवाच्या १० दिवसात तर वेळ द्यावा लागतोच पण १० दिवस संपल्यानंतरही थोडा वेळ द्यावा लागतो...

संयोजक म्हणुन काम करत असताना सदैव डोक्यात संयोजन आणि उत्सव याबद्दलच विचार चालु असायचे Happy घरच्या मंडळींनी पण सांभाळुन घेतले आणि जमेल तशी मदत केली.. म्हणजे मी कामात असताना लेकीला सांभाळणे, घरातली आवरा आवरी... इ इ त्यामुळे संयोजनाची जबाबदारी उचलायच्या आधी घरच्यांनाही आधी विश्वासात घेतल्यास उत्तम... आपलेच काम सोपे होते आणि बिनदिक्कत,सहज, बीना टेन्शन इन्वॉल्व्ह होता येते.. Happy

यंदाचे संयोजक मंडळ खालील प्रमाणे निवडले आहे.
आशुतोष०७११ (मुख्य संयोजक), स्नेहश्री, तोषवी, _मधुरा_. शुगोल, nilams, मिनू.
सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

Pages