निरोप.. २

Submitted by Nilu on 29 July, 2012 - 00:53

जाणारा रेंगाळला की,
अस्वस्थता वाढतेच...
त्रास देउनही ..
त्या जाणार्‍याला पुन्हा राहण्याची इच्छा..

डोळ्यांची खुणवा खुणव,
हातांची चाळवा चाळव,
फिर-फिरून किचनमधे जाणारी नजर,
आणि नेमक्या वेळी "थांबताय ना आज"... निग्रही विचारणा

जाणार्‍याला, हवं तसच,
नवाआग्रह,
नवी मेजवानी....

किचनचा मात्र -
तोच त्रागा,
खाल्लेल्या ताटांवरचं स्वामित्व...
उठून-उठून दिलेली तंबाखू,चूना,
काही थकलेले प्रयास,
काही शिणलेले श्वास,
उंबर्‍याबाहेर गेल्याचे आभास...!

पण म्हणून,

पाहूणे टळतात थोडेच?

-------------------------------------------------------------
मूळ कविता ? http://www.maayboli.com/node/36745

Group content visibility: 
Public - accessible to all site users