“ पुणे ते पानिपत ” भाग ९ : ताजमहाल - एक अप्रतिम कलाकृती

Submitted by सारन्ग on 27 July, 2012 - 11:37

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194

“ पुणे ते पानिपत ” भाग ८ - http://www.maayboli.com/node/36408

आजचा प्रवास : आग्रा – मथुरा – दिल्ली

आज ताजमहाल बघून मथुरा बघून दिल्लीला पोहचायच असल्याने सकाळी सगळेजण लवकरच उठलो. परत एकदा सकाळची धावाधाव, पळापळ, गुरुजींचा पाणी शिंपडणे कार्यक्रम असे सगळे प्रकार उरकल्यावर सकाळी सव्वा सहाच्या सुमारास मी गाडी गरम करायला पहिली किक मारली. इतक्या सकाळी उठूनही ताजमहाल गाठायला ८ वाजलेच. ताजमहालकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक बाण असल्यामुळे तशी काही अडचण आली नाही. वाटेत एक उड्डाणपूल लागला. गाडी वरून न्यायची का खालून जायचे यावर स्वागतचे आणि माझं काही एकमत झालं नाही. अर्थात गाडी मीच चालवत असल्यामुळे मी थेट गाडी उड्डाणपुलावरून घातली. पुढे गेल्यावर लगेचचं मला माझ्या चुकीची जाणीव झाली. अस आमच्यात बरेचं वेळा व्हायचं. मग दुसऱ्याला, कशाला शहाणपणा करायचा? मी सांगत होतो ना? असे टोमणे असायचेच. रस्ता बरोबर असेल तर मात्र अळी मिळी गुप चिळी. 

ताजमहालच्या बाहेर पोहचल्यावर गाडी पार्क करायला काही जागा मिळेना. रस्त्यावर गाडी पार्क करायला काही मन धजेना. जवळच बघितलं तर एक सी आर एफ ची एक चौकी होती. गाडी थेट आतमध्ये घुसवली. लागलीच तिथल्या रखवालदाराने हटकले. त्याला मग आम्ही इतक्या लांबून आलोय, गाडीवर ताजमहाल बघायला आलोय सांगितले. रखवालदाराने सगळे ऐकून घेतल्यावर साहेब गाडी थोडीशी बाहेर लावा, मी तुमच्या दोन्ही गाड्यांवर लक्ष ठेवतो. काही काळजी करू नका. हे त्याचे शब्द ऐकल्यानंतर आम्ही दोन्ही गाड्या चौकीच्या बाहेरच्याच बाजूला पार्क करून, आमचा मोर्चा जवळच्याच एका चहा टपरीकडे वळवला. थंडी चांगलीच होती. मग सगळ्यांनी २-२ कप चहा मारला.

आणि आम्ही ताजमहाल बघायला निघालो. आत मध्ये फक्त कॅमेरा, मोबाईल, पाण्याची बाटली घेऊन जाता येते. सॅक घेऊन जाता येत नसल्याने, आम्ही आमच्या सॅक बाहेरच्या लॉकर मध्ये ठेवल्या आणि ताजमहालामध्ये प्रवेश केला. तिकिटाच्या खिडकीवर बऱ्यापैकी गर्दी होती. देशी- विदेशी नागरिकांसाठी, तसेच महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी रांग असते. सगळ्यांनी तिकिटे काढल्यावर २ हिंदी आणि २ इंग्रजी मधील माहिती सांगणारी यंत्र घेतली. प्रत्येकानी आपापले यंत्र कानाला लावले आणि सगळेजण ताजमहाल बघायला आत शिरलो. मोहिमेतील बरेचं जण ताजमहाल बघायला आले होते.

ताजमहालाविषयी थोडेसे :

ताजमहाल अर्थात महालांचा मुकुट. हि एक पांढऱ्या शुभ संगमरवरामधील कबर. मुघल सम्राट शाहजहानने त्याची तिसरी बायको मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधला. ताजमहाल जगभर भारतामधील मुस्लीम कलेचा दागिना म्हणून ओळखला जातो. ताजमहाल हा मुघल वास्तुविशारद शास्त्राचा एक सुरेख नमुना आहे. ज्यामध्ये पर्शियन, तुर्किश आणि भारतीय वास्तुकलेचा देखील समावेश आहे. ताजमहालचे बांधकाम साधारण १६३२ च्या सुमारास सुरु होऊन १६५३ च्या सुमारास संपले. ज्यामध्ये हजारो कारागिरांनी आपला सहभाग दिला. ताजमहालाल १९८३ मध्ये युनेस्को ने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. ताजमहाल हि जगामधील सर्वोत्कृष्ट मानवनिर्मित कलाकृती म्हणून गौरवला गेला आहे. ताजमहाल हा इतर संगमरवरी इमारतींप्रमाणे चौकोनी आकारात न बनवता त्याचा पांढराशुभ्र घुमट संगमरवराने बनवण्यात आला आहे. मध्य स्थानी बनलेला मकबरा स्वतःच्या वास्तुश्रेष्ठतेच्या सौंदर्याचा परिचय देतो. ताजमहाल इमारत समूहाची विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे कि हा समूह पूर्णपणे सममितीय आहे. ह्याचे बांधकाम १६४८ च्या आसपास पूर्ण झाले. सभोवाताच्या इमारती आणि बगीचे याच्या ५ वर्षांनंतर पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहौरीला याचा प्रमुख वास्तुविशारद मानतात.

9DSCN3195.JPG

१६३१ मध्ये शहाजहानची तिसरी बायको तिच्या चौदाव्या बाळंतपणात ( गौहरा बेगम – त्याच्या मुलीचं नाव ) बऱ्हाणपूर येथील शाही किल्ल्यामध्ये मरण पावली तेव्हा अतोनात दुःख झाल्याने शहाजहानने तिच्यासाठी १६३२ मध्ये ताजमहालाचे बांधकाम सुरु केले असे म्हणतात.

ताजमहालचा केंद्रबिंदू आहे, एक मकबरा. हि एक सममितीय इमारत आहे, ज्यामध्ये एक अतिविशाल वक्राकार प्रवेशद्वार आहे. या इमारतीच्या वरती एक घुमट बांधण्यात आला आहे. बाकीच्या इमारतींसारखे याचे बांधकाम मुघल शैलीचे आहे अये म्हणतात.

याचा मूळ आधार एक विशाल बहु-कक्षीय संरचना आहे. प्रधान कक्ष घनाकृती असे त्याची प्रत्येक बाजू ५५ मी आहे. त्याच्या प्रत्येक बाजूला विशाल वक्राकार प्रवेशद्वार आहे. याच्या अशा प्रकारच्या संरचनेमुळे तुम्ही कोणत्याही बाजूने ताजमहाल बघितल्यास तो सारखाच भासतो. याच्या चारही बाजूच्या चार कोपरयांमध्ये मनोरे उभारलेले आहेत. मुख्य इमारतीच्या चारही भागांमध्ये एका वरती एक अशा प्रकारे २-२ वक्राकृती प्रवेशद्वारासारखे बांधकाम केलेले आहे. खर म्हणायचं झाल तर इमारतीला आठ बाजू आहेत, पण कोपऱ्याच्या ४ बाजू बाकीच्या चार बाजूंच्या तुलनेत छोटा असल्याने इमारतीला चौरसाकृती म्हणणे उचित वाटते.
आत मध्ये असलेल्या शाहजहान आणि मुमताज महल यांच्या कबरी खोट्या असून, खऱ्या कबरी खालच्या थरावर आहेत.

घुमट :
इमारतीच्या वरच्या भागात असलेला घुमट इमारतीचा सगळ्यात सुरेख भाग आहे. याची उंची ३५ मी असून( हि उंची इमारतीच्या लांबी इतकीच आहे), हा ७ मी दंडाकृती भागावर उभा आहे. घुमटाच्या आकारामुळे त्याला कांदाकृती अथवा पेरू सारखा आकार असलेला घुमट म्हटले जाते. याचे शिखर कमलाकृती आकाराने अलंकृत केले गेले आहे.

छत्री :
मुख्य घुमटाच्या चारही बाजूला कोपरयांमध्ये चार छोट्या घुमट असलेल्या छत्र्या आहेत. छत्र्यांचे घुमट हे मुख्य घुमटाच्या आकाराचीच प्रतिकृती आहे फक्त मापाचा फरक. यांचा आधार स्तंभ छतावरील अंतर्गत प्रकाश रचनेच्या व्यवस्थेच्या हेतूने उघडे ठेवण्यात आले आहेत. संगमरवराचे उंच मनोरे, जे कि मुख्य इमारतीच्या भिंतींच्या बाजूंवर उभारलेले आहेत, घुमटाची शोभा अजूनच वाढवतात. मुख्य घुमटाबरोबर छत्र्यांवर तसेच मनोरयांवर असलेले कमळाचे नक्षीकाम शिखराला शोभा देते. घुमट तसेच छत्र्यांवर हिंदू वास्तुकलेचा प्रमुख घटक कलश विराजमान आहे.

कलश:
मुख्य घुमटावर कलश आहे. हा कलश १८ व्या शतकापर्यंत सोन्याचा होता. आता तो कांस्य या धातूचा बनवलेला आहे. अर्थात हा कलश हिंदू मंदिरांच्या कळसावर आढळून येतो. या कळसाला लागूनच खालील बाजूला चंद्राची कोर आहे, जिची दोन्ही टोके स्वर्गाकडे इशारा करतात असे मानले जाते. चंद्र कोर आणि कलश मिळून भगवान शंकराचे चिन्ह त्रिशूळ, याच्यासारखा हा आकार दिसतो.
9DSCN3317.JPGमनोरे :
मुख्य इमारतीच्या चारही कोपऱ्यांवर चार मोठाले मनोरे उभारलेले आहेत. यांची उंची ४० मी. आहे. हे मनोरे ताजमहालाची सममितीय प्रवृत्ती दर्शवतात. प्रत्येक मनोरा २-२ सज्जांच्या सहाय्याने ३ समान भागात विभागला गेला आहे. मनोऱ्याच्या सगळ्यात वरती जो सज्जा आहे, त्याच्या वरती देखील मुख्य इमारतीवर आहे त्या सारखीच छत्री बनवलेली आहे. यांवर देखील कमळाच्या आकाराचे नक्षीकाम आणि कलश देखील आहेत. जर का तुम्ही लक्ष देऊन बघितले, तर तुमच्या असे लक्षात येईल कि हे चारही मनोरे किंचितसे बाहेरच्या बाजूला झुकले आहेत. यामागचे कारण असे कि, जरी पुढे-मागे हे पडले तरी ते मुख्य इमारतीला कोणताही धोका पोहचवणार नाहीत.
9DSCN3255.JPGप्रवेशद्वारावरील नक्षीकाम:

ताजमहालाच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे मुघल वास्तुकलेचे एक सुंदर उदाहरण आहे. जस जसा पृष्ठभाग बदलतो त्याचं प्रमाणात नक्षीकाम देखील बदलत जाते, हे नक्षीकाम वेगवेगळे रंग, प्लास्टर आणि रत्ने वापरून केले गेले होते. येथे लिहिली गेलेली लिपी हि फ्लोरिड थुलुठ लिपी आहे. येथे लिहिलेली आयतें, फारसी लेखक अमानत खां ( प्रत्यक्षात याचे नाव अब्द उल हक होते, पण शहाजहानने याच्या कामगिरीवर खुश होऊन याला “अमानत खां” हि पदवी दिली) याने कुरानामधून सुचवलेली आहेत. हे लेखन जैस्प‍र (काळे संगमरवर / दगडाचा एक प्रकार ), शुभ्र संगमरवरामध्ये जडवून करण्यात आले आहे. या संगमरवरावर करण्यात आलेले कार्य नाजूक आणि सुंदर तर आहेच त्याचं बरोबर महान देखील आहे. येथे विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे, येथे उंची लक्षात घेऊन लेखन करण्यात आलेले आहे. उंच ठिकाणी, त्याचं प्रमाणात लेखन करण्यात आलेले आहे. जेणेकरून खालून बघताना डोळ्यांना त्रास होणार नाही. पूर्ण क्षेत्रावर, अलंकारिक हेतूने कुरानामधील आयतें लिहिण्यात आलेली आहेत.
येथे खालील आयतें लिहिलेली आहेत:
सूरा 91 - सूर्य,
सूरा 112 - विश्वास की शुद्धता,
सूरा 89 - उषा,
सूरा 93 - प्रातः प्रकाश,
सूरा 95 - अंजीर,
सूरा 94 - सांत्वना,
सूरा 36 - या सिन,
सूरा 81 - फोल्डिंग अप,
सूरा 82 - टूट कर बिखरना,
सूरा 84 - टुकडे़ होना,
सूरा 98 - साक्ष्य,
सूरा 67 - रियासत,
सूरा 48 - विजय,
सूरा 77 - वो जो आगे भेजे गए
सूरा 39 - भीड़
जसे आपण ताजमहालामध्ये प्रवेश करतो खालील लेख दृष्टीस पडतो:
“ हे आत्मा ! तू ईश्वर के पास विश्राम कर । ईश्वर के पास शांति के साथ रहे तथा उसकी परम शांति तुझ पर बरसे ”
9DSCN3220.JPG
अतिशय सुंदर अशा रीतीने स्तंभांवर, मनोरयांवर, मशिदींवर, घुमटावर त्याचं बरोबर मुख्य इमारतीच्या काही भागांवर संगमारवरामध्ये सुंदर अशी कलाकुसर करण्यात आली आहे. यामध्ये विविध पानाफुलांचे आकार समाविष्ट करण्यात आले आहेत. वेगवेगळे दगड एकमेकांमध्ये जडवून हि कलाकुसर करण्यात आली आहे. या शैलीला “हैरिंगबोन शैली” असे म्हणतात. या कलाकुसरीवर हात फिरवला असता त्या कलाकृतीच्या उच्च प्रतीची कल्पना येते. ज्या प्रकारे फुलं आणि इतर प्रकारची वेलबुट्टी काढण्यात आली आहे त्या शैलीला “बास रिलीफ शैली” म्हणतात. पिवळा, काळा संगमरवर तसेच हरिताश्म दगड एकमेकांमध्ये अतिशय सुंदर रित्या बसवून त्यांना व्यवस्थित पॉलिश करण्यात आले आहे. त्यांना योग्य प्रकारे घासून चकचकीत आणि तुळतुळीत बनवण्यात आले आहे.

9DSCN3244.JPGताजमहालाचे अंतरंग :
ताजमहालाचा आतील कक्ष हा पूर्णपणे वेगळा आहे, यात कुठेही पारंपारिक नक्षीकाम अथवा कलाकुसर आढळत नाही. या मध्ये बहुमुल्य रत्ने आणि खडे जडवले होते असे म्हणतात. साध्या फक्त वेगवेगळ्या प्रकारचे खडे येथे पाहायला मिळतात. आत मधील खोली अष्टाकृती असून, खोलीची रचना अशा प्रकारे केलेली आहे कि आठ हि बाजूंनी खोलीमध्ये प्रवेश करता येतो. साध्या मात्र दक्षिण दिशेकडील बगीचाकडे तोंड असलेले द्वार वापरात आहे. आतील भिंती २५ मी उंच असून एका आभासी घुमटाने झाकल्या गेल्या आहेत. आतील घुमट हे सूर्याच्या चिन्हाने सजवलेले आहे. आठ महिरपी कमानी खोलीला सुशोभित करतात. प्रत्येक बाजूंमध्ये, भिंतीमध्ये एक एक महिरप आहे. चार केंद्रीय महिरपी सज्जा बनवतात. प्रत्येक सज्जाच्या बाहेरची खिडकी संगमरवराच्या जाळीने झाकलेली आहे. सज्जांमध्ये असलेल्या खिडक्यांशिवाय, छतावरील असलेल्या छत्र्यांच्या तावादानांमधून देखील प्रकाश आतमध्ये येतो. आतमधील प्रत्येक भिंत लेखन केलेल्या फलकांनी सजवलेली आहे. कबरी आठ संगमरवरांच्या जाळीने बंदिस्त केलेल्या आहेत. प्रत्येक जाली हे कलाकुसरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बाकीचा भाग मूल्यवान खड्यांनी तसेच फुले, फळे यांच्या आकारांनी सुशोभित केला गेला आहे. मुस्लीम परंपरेनुसार कबरींवर कालासुसार करण्यास मनाई आहे, त्यामुळे मुमताज आणि शाहजहानचे शव, प्रत्यक्षात दिसणाऱ्या कबरीच्या खाली भागात, साधेपणाने दफन करण्यात आले आहे. त्यांचे चेहरे उजव्या अर्थात मक्केच्या बाजूला आहेत. मुमताजची कबर बरोबर मध्यभागी स्थित आहे. जिचा आकार आयताकार असून लांबी २.५ मी असून रुंदी १.५ मी आहे. कबर अर्थातच मूल्यवान खड्यांनी आणि रत्नांनी जडवलेली आहे. येथे लिहिण्यात आलेला लेख मुमताजची प्रशंसा करतो आणि ओळख करून देतो. शःजाहांची कबर, मुमताजच्या कबरीच्या दक्षिणेला आहे. पूर्ण क्षेत्रामध्ये असममिती असलेले हे एकमात्र बांधकाम दिसते. असे म्हणतात कि हि असममिती यामुळे दिसते कारण शाहजहानची कबर येथे बनणे अपेक्षित नव्हते. हि कबर मुमताजच्या कबरीपेक्षा मोठी आहे. परंतु बाकी सर्व कलाकारी मिम्ताजाच्या कबरेसारखीच आहे. तळघरात असलेल्या मुमताजच्या खऱ्या कबरीवर अल्लाची ९९ नावे कोरलेली आहेत. ज्यांमधील काही आहेत, “ हे नीतिवान, हे भव्य, हे राजस, हे अपूर्व, हे अनंत, हे तेजस्वी,.....आणि बरच काही.” तर शाहजहानच्या खऱ्या कबरीवर “ याने हिजरी १०७६ साली रजब महिन्याच्या २६ व्या दिवशी या जगातून अनंताकडे जाणारा प्रवास केला” असे लिहिले आहे.

बगीचा:
हे क्षेत्र सुमारे ३०० चौरस मीटर असून, हे चार बाग किंवा मुघल बाग म्हणून ओळखले जाते. या बागेमध्ये एक पथ बनवलेला आहे, हा पाठ या बागेला १६ एकसमान भागांमध्ये विभागतो. बागेच्या मध्यभागी, थोड्याशा उंचीवर असलेल्या तलावामध्ये ताजमहालाचे प्रतिबिंब पडते. बाकी ठिकाणी बागेमध्ये एका रांगेत झाडे आहेत तर प्रवेशद्वारापासून मुख्य कक्षापर्यंत कारंजी आहेत. ह्या वरच्या भागात असलेल्या तलावाला “हौद अल कवथार “ म्हणतात, जो कि मोहम्मदने वाचन दिलेल्या अक्षय उर्जस्त्रोताला दर्शवतो. हि बाग फारसी बागांपासून प्रेरणा घेऊन बनवलेली आहे, या प्रकारच्या बागांची पहिला मुघल सम्राट बाबर याने भारताला ओळख करून दिली. हि बाग स्वर्गातून वाहणाऱ्या चार नद्यांकडे आणि स्वर्गातील बागेकडे (फिरदौस) कडे इशारा करते. हा शब्द फारसी मधील “पारिदाइजा़” या शब्दापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ भिंतींनी रक्षण केलेली बाग असा होतो. मुघलकालीन इस्लामी पाठ्यांमध्ये, फारसी रहस्यावादामध्ये या बागेला एक परिपूर्ण बाग म्हणून ओळखले जात असे. यामध्ये केंद्रस्थानी असलेल्या पर्वताच्या जलस्त्रोतांमधून ४ नद्या चार दिशेला वाहत असत आणि बागेला उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशा विभागत.
9DSCN3274.JPG

अधिकतर मुघल बागा या आयताकृती बनलेल्या असून, त्यांच्या केंद्रस्थानी मकबरा बनलेला असे. ताजमहालाची हि असामान्यता (???) मानली जाते कि येथे मुख्य इमारत बागेच्या शेवटच्या टोकाला आहे. यमुना नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माहताब (चंद्र प्रकाशी ) बाग उर्फ चांदनी बागेच्या शोधानंतर , भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने असा निष्कर्ष काढला कि यमुना नदी पण याच बागेचा हिस्सा होती आणि तिला पण स्वर्गामधील नद्यांच्या मध्ये स्थान दिले गेले हवे होते. बागेचे बांधकाम, संगमरवराच्या पायवाटा, कारंजी इत्यादी गोष्टी काश्मीरमधील शालीमार बागेशी मिळत्या जुळत्या आहेत, म्हणून या दोन्ही बागांचा वास्तुकार एकच असावा असा कयास आहे.

अली मर्दान, सांगतो कि सुरवातीला बागेमध्ये गुलाब, नर्गिस अशी विविध प्रकारची फुल झाडे तसेच फळझाडे होती, पण मुघल साम्राज्याच्या ऱ्हासानंतर बागेची देखरेख कमी झाली. जेव्हा इंग्रजांचे राज्य आले तेव्हा त्यांनी लंडनच्या बागांप्रमाणे या बागांमध्येही हिरवळ (lawn) लावली.

ताजमहालाचे प्रवेशद्वार :
ताजमहालची इमारत हि नदीची बाजू सोडली तर इतर तीनही बाजूंनी लाल विटांच्या भिंतींनी बंदिस्त आहे. या भिंतींच्या बाहेरच्या बाजूला कितीतरी इमारती (मकबरे) उभे आहेत. ज्यांमध्ये शाहजहानच्या अन्य बायकांची कबर आहे. यांमधील एक इमारत मुमताजच्या प्रिय दासी साठी देखील बनवण्यात आली होती. या इमारती देखील लाल दगडांनी बनवलेल्या आहेत व त्याकाळातील मुघल शैलीचे प्रतिक आहेत. भिंतीना लागूनच जो बगीचा आहे, त्यामध्ये आपल्याकडे गावाकडे जशी घराला ओसरी असते, त्याप्रकारे बांधकाम आहे. अर्थात हि शैली हिंदू मंदिरांची आहे पण नंतर मशिदींमध्ये सुद्धा हि वापरली गेली असे म्हटले जाते.
9DSCN3118.JPG
भिंतींच्या मध्ये मध्ये छत्र्यांसारख्या दिसणारया इमारती आहेत, ज्या त्यावेळेस पहारा देण्यासाठी वापरल्या जात असतं. परंतु आता तिथे संग्रहालय आहे.

मुख्य दरवाजा:
मुख्य दरवाजा हा देखील एखाद्या स्मारकासारखा आहे. हा सुद्धा लाल दगड आणि संगमरवाराचा वापर करून बांधण्यात आला आहे. हे सुरवातीच्या मुघल राज्यकर्त्यांच स्मारक आहे. याचा देखील महिरपी दरवाजा ताजमहालाच्या महिरपी दरवाजासाराखाच आहे. यावर देखील लेखन करून कलाकारी करण्यात आली आहे. येथे देखील “बास रिलीफ” आणि “पीट्रा ड्यूरा” हि शैली वापरून नक्षीकाम करण्यात आले आहे. येथील छतावर आणि भिंतीवर बाकी इमारतींसारख्या भूमितीय रचना बनवलेल्या आहेत.
9DSCN3134.JPG9DSCN3169.JPGताजमहालामधील मशीद :
ताजमहालाच्या मुख्य इमारतीच्या दोन्ही बाजूला लाल दगडांनी बनवलेल्या दोन विशाल इमारती आहेत. ज्यांची तोंडे ताजमहालाकडे आहेत. यांच्या मागील बाजू पूर्व आणि पश्चिम भिंतीना चिकटलेल्या आहेत. दोन्ही इमारती एकमेकींचे प्रतिबिंब आहेत. पश्चिम बाजूची इमारत मशीद आहे तर पूर्वेच्या इमारतीला “जवाब” (उत्तर) म्हणतात.
9DSCN3192.JPG

जवाब इमारतीचा प्राथमिक उद्देश वास्तुकलेच संतुलन हा होता आणि हि इमारत पाहुण्यांच्या राहण्यासाठी वापरली जात असे.
9DSCN3280.JPG

या दोन्ही इमारतींमधील फरक असा कि मशिदीमध्ये एक महिरप कमी असून, या मशिदीमध्ये मक्केच्या दिशेला एक कक्ष बनवण्यात आला आहे. जवाब इमारतीमध्ये जमिनीवर भूमितीय नमुने बनवण्यात आले असून, मुख्य मशिदिमध्ये नमाजासाठी काळे संगमरवर बसवण्यात आले आहे. हि मशीद शाहजहानच्या बाकीच्या निर्माण केलेल्या मशिदिसारखीच आहे. खासकरून जहाँनुमा मशीद आणि दिल्लीची जामा मशीद. त्याकाळच्या मशिदींमध्ये एका कक्षावर ३ घुमट असत. या मशिदी पवित्र स्थानाला ३ भागात विभागात असत. मधील कक्ष हा मुख्य कक्ष असे आणि त्याच्या दोन्ही बाजूला २ छोटे कक्ष असत. या बाजूच्या इमारती १६४३ मध्ये पूर्ण झाल्या.
9DSCN3313.JPGनिर्माण :
ताजमहाल आग्र्याच्या दक्षिणेला एका छोट्या पठारावर बनवला गेला, याच्या बदल्यात शाहजहानने जयपूरचे महाराजा जयसिंग यांना आग्र शहरामध्ये एक मोठा महाल दिला होता. जवळपास ३ एकर क्षेत्र खोदले गेले आणि त्याच्यामध्ये कचरा वगैरे भरून त्याला नदीच्या सपाटीपासून ५० मी उंच बनवले गेले. ज्यायोगे पुराच्या पाण्यापासून बांधकामाचा बचाव व्हावा. इमारतीच्या क्षेत्रामध्ये विहिरी खोदून, त्यांमध्ये विटा-दगड भरण्यात आले आणि अशा प्रकारे इमारतीचा पाया घालण्यात आला. नेहमीप्रमाणे बांबू वगैरे लावून आराखडा न बनवता, इमारतीच्याच उंचीचा एक भव्य कक्ष बनवण्यात आला. हा कक्ष येवढा मोठा होता कि अभियांत्रिकी तज्ञांच्या म्हणण्यानुसार तो हटवण्यात काही वर्षे खर्ची झाली असती. शेवटी शाहजहानाने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये दवंडी पिटवली कि एका दिवसात कोणीही, कितीही विटा घेऊन जाऊ शकतो. आणि याचा परिणाम असा झाला कि तो भव्य विटांचा सांगाडा एका दिवसातच साफ केला गेला. ( अर्थात हि माहिती “अतिशोयोक्ती” या प्रकारात मोडणारी वाटते.) सर्व बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि संगमरवर नियोजित जागी पोहचवण्यासाठी एक १५ किमी लांबीचा रस्ता तयार केला गेला होता. २० ते ३० बैलांनी ओढली जाणारी एक बैलगाडी तयार करण्यात आली होती व तिच्या सहाय्याने मोठमोठे शिलाखंड आणले जाट. एका मोठ्या कप्पीच्या सहाय्याने ते शिलाखंड नियोजित जागी पोहचवले जात असत. नदीचे पाणी आणण्यासाठी रहाट तयार करण्यात आले होते. यांचा उपयोग करून हे पाणी एका मोठ्या तलावामध्ये साठवण्यात येत असे. या तलावामधून हे पाणी ३ छोट्या टाक्यांमध्ये जात असे व तेथून नळ्याद्वारा नियोजित जागी जात असे.
9DSCN3247.JPG

आधारस्तंभ आणि मुक्य इमारतीला बनण्यास १२ वर्षे लागली. उरलेल्या इमारती त्यानंतर १० वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आल्या. यांमध्ये पहिल्यांदा मनोरे मग मशीद आणि सर्वात शेवटी मुख्य प्रवेश द्वार बनवण्यात आले. हा सर्व समूह वेगवेगळ्या भागांमध्ये बनला म्हणून ताजमहालाच्या कालावधीबाबत संदिग्धता आहे. उदाहरणार्थ मुख्य बांधकाम १६४३ साली पूर्ण झाले पण त्यानंतरही इमारती बनतच राहिल्या त्यामुळे याच्या निर्माणासाठी एकूण किती खर्च झाला या बाबतीत देखील भिन्नता आहे. तरीही त्यावेळेनुसार हे मूल्य ३.२० कोटी रुपये असावे असे म्हणतात. अर्थात ते वर्तमानात “अमूल्य” या शब्दातच मोजावे लागेल.

9DSCN3320.JPG

ताजमहालचे बांधकाम करण्यासाठी संपूर्ण भारतामधून आणि आशियामधून साहित्य मागवले होते. १००० पेक्षा जास्त हत्ती याचे साहित्य वाहून नेण्याच्या कामामध्ये वापरण्यात आले होते. खाली साहित्य आणि ते कुठून मागवले दिले आहे.
पांढरा संगमरवर – राजस्थान
जैस्पर – पंजाब
हरिताश्म अथवा जेड चे स्फटिक ( jade and crystal) - चीन
फीरोजा़ (turquoise) - तिबेट
Lapis lazuli, बहुतेक पाचू, हा निळ्या रंगाचा असतो – अफगाणिस्तान
नीलम (sapphire) - श्रीलंका
इंद्रगोप (carnelian) – अरब देश
अशा प्रकारे सगळी मिळून २८ प्रकारचे वेगवेगळे खडे आणि रत्न संगमरवरामध्ये जडवली गेली होती.
ताजमहालचे बांधकामासाठी वास्तुविशारदांचा एक गट स्थापन करण्यात आला होता. अब्द उल करीम, मामुर खान, मक्रमत खान आणि उस्ताद अहमद लाहौरी हे ते वास्तुविशारद होत. यांमधील उस्ताद अहमद लाहौरी हे मुख्य वास्तुविशारद होते.
उत्तर भारतामधून जवळपास २०,००० मजूर यासाठी राबत होते. बुखारा वरून शिल्पकार आले होते, सिरीया आणि इराण वरून लेखन करणारे, दक्षिण भारतामधून नक्षीकाम करणारे कारागीर, बलुचिस्तान मधून दगड कापणारे आणि गुळगुळीत करणारे कारागीर आले होते. कमळ बनवणारे, कलश कोरणारे इत्यादी प्रकारचे सत्तावीस कारागीर होते.
9DSCN3292.JPG9DSCN3294.JPG9DSCN3295.JPG9DSCN3308.JPG

ताजमहालच्या बांधकामामध्ये बांधकाम तज्ञ म्हणून खालील लोकांचा विशेष उल्लेख येतो.:
ओट्टोमन (तुर्किश) साम्राज्यामधील इस्माईल आफंदी ( खान ) – तुर्किश वास्तुविशारद, मिख्य घुमटाचा वास्तुविशारद.
उस्ताद इसा आणि इसा मुहम्मद एफेंदी - हे दोघेही इराणचे होते आणि कोचा मिमार सिनान आगा द्वारा प्रशिक्षित केले गेले होते. यांनी मुख्य वास्तूच्या आराखड्यामध्ये मोलाची भूमिका बजावली असे म्हटले जाते, पण याला पुरावे फार कमी आहेत.
बेनारुस, इराण वरून 'पुरु' ला पर्यवेक्षण वास्तुकार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
का़जि़म खान, लाहोरचा रहिवासी : याने सुवर्ण कलश बनवला.
चिरंजी लाल, दिल्लीचा दगडांना पैलू पडणारा - मुख्य त्रीमितीकार आणि नक्षीकार
अमानत खान हा शिराज, इराणचा राहणारा - मुख्य सुलेखन करणारा, याचे नाव मुख्य प्रवेशद्वाराच्या लेखनानंतर लिहिले आहे.
मुहम्मद हनीफ – हा दगडांवर कारागिरी करणाऱ्या मजुरांवर लक्ष ठेवत असे.
मीर अब्दुल करीम आणि मुक्क्रिमत खान : दोघेही शिराज, इराण चे – हे दोघे दररोजचा आर्थिक व्यवहार बघत असत.

यमुना काठ :
9DSCN3343.JPGइतिहास:
ताजमहाल पूर्ण झाल्यानंतर लगेचच शाहजहानच्या मुलाने, औरंगजेबाने त्याला आग्र्याच्या लाल किल्ल्यात नजरकैदेत ठेवले.
१८५७ च्या उठवामध्ये इंग्रजी अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवली. यात जडवलेले मूल्यवान खडे आणि रत्ने, भिंतींमधून खोदून काढण्यात आली. १९ व्या शतकाच्या शेवटी ब्रिटीश वहॉइसरॉय कर्जनने साफसफाई करण्यास सुरवात केली. हि साफसफाई १९०८ मध्ये पूर्ण झाली. त्याने मुख्य कक्षाच्या आतमध्ये, कैरो येथील एका मशिदीमध्ये आहे तसा, एक मोठा दिवा लावला. याचवेळेस येथील बागांना ब्रिटीश शैलीमध्ये बदलण्यात आले. १९४२ मध्ये मुख्य इमारतीच्या बाजूला बांबूंचा सांगाडा बनवून एक सुरक्षा कवच तयार केले होते. हे अर्थात जर्मन आणि जपानच्या हवाई दलाची दिशाभूल करण्यासाठी केले होते. परत तसेच कवच १९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये, स्फोटक घेऊन जाणाऱ्या पायलट लोकांची दिशाभूल करण्यासाठी बनवण्यात आले होते.
सध्या ताजमहालास धोका यमुना नदीच्या प्रदूषणामुळे, तसेच आम्ल वर्षा, जी मथुरा ओईल रिफायनरी च्या धुरामुळे होत आहे. मथुरा ओईल रिफायनरीला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तीव्र विरोध केला आहे. १९८३ मध्ये ताजमहालाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
9DSCN3311.JPGपर्यटन :
ताजमहालाला दरवर्षी २० ते ४० लाख पर्यटक भेट देतात, यांमध्ये विदेशी नागरिकांचे प्रमाण सुमारे २ लाख इतके आहे. बहुसंख्य पर्यटक हे ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये भेट देतात. ताजमहालाच्या भागात प्रदुषण करणाऱ्या वाहनांना बंदी आहे. पर्यटक पार्किग परिसरापासून चालत अथवा विजेवर चालणाऱ्या वाहनांनी आतमध्ये जाऊ शकतात. प्रदूषणामुळे ताजमहाल पिवळा पडत चालला आहे. ताजमहालच्या दक्षिणेला असणाऱ्या वस्तीस ताज्गांज म्हणतात. यास वस्तीस मुमताज गंज असे देखील म्हटले जात असे. पूर्वीच्या काळी दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी हि वस्ती वसवली गेली होती. आधुनिक जगाच्या सात आश्चर्यांमध्ये ताजमहालाचा पहिला क्रमांक लागतो. विश्वव्यापी झालेल्या मतदानामध्ये ताजमहालाला १० कोटी मते मिळाली होती. सुरक्षा कारणांमुळे ताजमहालाच्या आतमध्ये फक्त पाण्याची पारदर्शक बाटली, छोटा विडीओ कॅमेरा, स्थिर कॅमेरा, मोबाइल फोन आणि महिलांसाठी छोटी पर्स या पाचच गोष्टी नेण्यास परवानगी आहे.
ताजमहाल सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत, शुक्रवार सोडून बघण्यासाठी उघडा असतो. शुक्रवारी फक्त मशीद नमाजासाठी १२ ते २ अशी उघडी असते. पौर्णिमेच्या रात्री आणि २ दिवस अगोदर आणि नंतर ताजमहाल रात्री बघण्यासाठी उघडा असतो. (शुक्रवार आणि रमजानचा महिना वगळता)
9DSCN3346.JPG9DSCN3349.JPGताजमहालावरून बनवण्यात आलेल्या काही इमारती :
बीबी का मकबरा, संभाजीनगर
ताजमहाल, बांगलादेश
ट्रंफ ताजमहाल, अटलांटिक सिटी, अमेरिका
ट्रिपोली श्राईन मंदिर, मिल्वौकी, विस्कॉन्सिन

काही रंजक बाबी :
या इमारतीचे निर्माण कायमच प्रशंसेचा आणि आश्चर्याचा विषय राहिला आहे. याविषयी धर्म, संस्कृती बरोबर देशांच्या सीमा ओलांडून देखील लोकांनी वैयक्तिक आणि भावनात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ताजमहालाच्या काही रंजक गोष्टी खालील प्रमाणे :
असे म्हणतात कि शाहजहानची अशी इच्छा होती कि यमुनेच्या पैलतीरी दुसरा या ताजमहालासारखाच पण काळा ताजमहाल उभारला जावा, ज्यामध्ये त्याची कबर असेल. हे अनुमान १६६५ मध्ये आग्रा फिरण्यासाठी आलेल्या, युरोपीय पर्यटक जीन बैप्टिस्ट टैवर्नियर याने सांगितल्यानुसार आहे. त्याने असे लिहिले होते कि कला ताजमहाल बनवण्याच्या अगोदरच शाहजहानला कैद करण्यात आले. यमुनेच्या पलीकडच्या तीरावर , माहताब बागेमध्ये जेव्हा काळे संगमरवराचे शिलाखंड आढळून आले त्यावेळेस या गोष्टीला पुष्टी मिळाली. पण १९९० साली झालेल्या उत्खननात असे आढळून आले कि ते शुभ्र संगमरवरच होते जे कि काळाच्या ओघात काळे पडले. मग प्रश्न असा येतो कि हे संगमरवर जर काळाच्या ओघात काळे पडले तर ताजमहाल काळा का नाही पडला? २००६ मध्ये पुरातत्व खात्याने जेव्हा माहताब बागेमध्ये केंद्रीय सरोवराची पुनर्स्थापना केली त्यावेळेस असे दिसून आले कि, त्या सरोवरामध्ये सध्याच्या ताजमहालचे स्वच्छ प्रतिबिंब बघितले जाऊ शकते. यावरून शाहजहानचा हेतू स्पष्ट होतो.
असे म्हणतात कि शाहजहान ने ताजमहाल बनवणाऱ्या कारागिरांचे हात तोडले होते अथवा त्यांना मारले होते. परंतु यासाठी काहीच पुरावा उपलब्ध नाही. काही जण असे देखील म्हणतात कि त्यांच्याकडून असे देखील लिहून घेण्यात आले होते कि ते यासारखी दुसरी इमारत बनवणार नाहीत. पण अशा प्रकारच्या गोष्टी अनेक प्रसिद्ध इमारतींच्या बाबतीत आढळतात.
भारताचा १८३० मध्ये गवर्नर जनरल असलेल्या विल्यम बैन्टिक बद्दल असे म्हणतात कि त्याने ताजमहालाला उद्वस्त करून त्याचे संगमरवर विकण्याची योजना बनवली होती. पण बैन्टिकचा चरित्रकार जॉन रसौली लिहितो कि जेव्हा विल्यम बैन्टिकने आग्र्याच्या किल्ल्यामध्ये असलेले उरलेले संगमरवर विकायला काढले त्यावेळेस अशी अफवा उठली.
एक अंधश्रद्धा अशी देखील आहे कि शिखराच्या कळसाच्या सावलीला मारले असता पाऊस येतो. आज देखील येथील अधिकाऱ्यांना शिखराच्या कळसाच्या सावलीच्या ठिकाणी तुटलेल्या बांगड्यांचे तुकडे सापडतात.
असे देखील म्हणतात कि पावसाच्या काळात वरच्या घुमटामधून पाण्याचे थेंब कबरीवर पडत राहतात आणि आजपर्यंत हा दोष मोठमोठाले अभियंते शोधू शकले नाहीत. काही म्हणतात असे होते कारण ताजमहालची निर्मिती करणारे कारागीर हिंदू होते आणि त्यांना शाहजहान त्यांचे हात तोडणार याची अगोदरच कल्पना होती म्हणून त्यांनी इमारतीच्या बांधकामामध्ये हा दोष जाणूनबुजून ठेवला. तर काही म्हणतात कि पूर्वी येथे शंकराचे मंदिर होते आणि शंकराच्या पिंडीच्या अभिषेकासाठी हि योजना करण्यात आली होती. तर काही म्हणतात हि अफवा रविंद्रनाथ टागोरांच्या "एक अश्रु मोती ... समय के गाल पर" या काव्यपंक्ती मुळे उठली. खरे खोटे देवच जाणे !
२००० साली इतिहासकार पुरुषोत्तम नागेश ओक यांनी दाखल केलेला अर्ज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला. त्यात त्यांनी म्हटले होते कि एका हिंदू राजाने ताजमहाल बनवला होता. श्री ओक यांनी अनेक पुराव्यांसह हा दावा केला होता कि ताजमहालाची मूळ इमारत आणि त्याच बरोबर देशातील अनेक इमारती ज्या मुस्लिम शासकांनी बनवल्या आहेत असे म्हणतात, पण खर सांगायचं तर या इमारती त्यांच्या अगोदरच्या कालावधीपासून अस्तित्वात होत्या. या इमारती हिंदू राजांनी निर्माण केल्या होत्या आणि त्यांचा मूळ उगम हा हिंदू आहे. जर नागेश ओक यांचे पुरावे वाचले तर आपल्याला सुद्धा या गोष्टींची सत्यता पटते. कधी कधी अस वाटत कि काळाच्या पडद्याआड गेलेला एखादा अद्भूत पुरावा सापडावा जो कि भारताचा सर्व इतिहास हलवून ठेवेल आणि ज्याच्या त्याच्या निर्मात्याला त्याच श्रेय जाईल. अर्थातच आपण या गोष्टी विसरून चालणार नाही कि जिथे समूहच्या समूह धर्मांतरित झाले तेथे या मुक्या इमारतींची काय कथा.

इतिहासकार पुरुषोत्तम नागेश ओक यांनी त्यांच्या Tajmahal is a Hindu Temple Palace या पुस्तकामध्ये १०० पेक्षा जास्त मुद्दे मांडले त्यातील काही मुद्दे असे :
नाव :
१. शाहजहान तसेच औरंगजेबाच्या कारकीर्दीमध्ये कधीच कुठल्या शासकीय दस्ताऐवजांमध्ये ताजमहालाचा उल्लेख आलेला नाही. ताजमहालाला ताज ए महल समझने हास्यास्पद आहे.
२. ताजमहालाच्या शेवटी येणारा महल हा शब्द मुस्लिम नाहीये, अफगणिस्तान पासून अल्जेरिया पर्यंत, कोणत्याही मुस्लिम देशामध्ये एक देखील अशी इमारत दाखवून द्यावी कि जिच्या शेवटी महल हा शब्द येतो.
३. असे म्हणतात कि मुमताज महल येथे दफन केली गेली म्हणून ताजमहाल हे नाव पडले, हि गोष्ट कमीत कमी २ गोष्टींच्या तर्कामध्ये बसत नाही. पहिली हि कि त्याच्या बायकोचे नाव मुमताज महल नव्हतेच, नाव होते मुमताज उल जमानी आणि दुसरी गोष्ट अशी कि मुमताज मधील मुम हटवून तेथे ताज लावणे याला काही अर्थच उरत नाही.
४. जर का स्त्रीच नाव मुमताज असेल तर Taj च्या जागेवर Taz असे असावयास हवे.
५. शाहजहानच्या काळामध्ये युरोपातून आलेल्या पर्यटकांनी ताजमहालाचा उल्लेख 'ताज-ए-महल' असा केला आहे. जे कि शिव मंदिराचे पारंपारिक नाव तेजोमहालयशी मिळते जुळते आहे. युरोपीय लोकांचे उच्चार लक्षात घेता हे म्हणणे जास्त लाक्षत्त येईल.याच्या विरुद्ध औरंगाजेबने आणि शाहजहानने मोठ्या युक्तीने याचा पवित्र मकबरा असा उल्लेख केला आहे.
६. मकबरयाला कबरगाह म्हणतात महल नाही. यावरून असे लक्षात येते कि हुमायुँ, अकबर, मुमताज़ , एतमातुद्दौला आणि सफ़दरजंग यांसारख्या लोकांना हिंदूंच्या पवित्र मंदिरांमध्ये अथवा महालांमध्ये दफन करण्यात आले आहे.
७. आणि जर ताज या शब्दाचा अर्थ कब्रस्तान असा असेल तर त्याच्या बरोबर महल शब्द जोडण्याचा काही तर्कच लागत नाही.
८. ताजमहल हा शब्दप्रयोग मुघल दरबारात कधीच करण्यात येत नव्हता त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ शोधण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. “ताज” आणि “महल” हे दोन्ही मूळ संस्कृत शब्द आहेत.
मंदिर परंपरा
९. ताजमहाल हा शब्द शिव मंदिर दर्शवणाऱ्या तेजोमहालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. या मंदिरामध्ये अग्रेश्वर या शिवाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती.
१०. संगमरवराच्या पायऱ्या चढून जायच्या अगोदर पादत्राणे काढायची परंपरा शाहजहानच्या काळाच्या अगोदरपासून आहे, जेव्हा ताज एक शिवमंदिर होते. जर ताज एक मकबरा म्हणून बांधला गेला असता तर हि परंपरा रूढ झाली नसती कारण मकबरयामध्ये प्रवेश करताना पादत्राणे काढणे अनिवार्य नसते.
११. बघणाऱ्यांना जाणवले असेल कि कबर असलेल्या ठिकाणीचं फक्र पांढऱ्या संगमरवराचा वापर केला गेला आहे, जेव्हा कि बाहेर लता वेली यांनी सजवलेले नक्षीकाम आहे, यावरून हे सिद्ध होते कि मुमताजची कबर जिथे आहे तोच कक्ष शिव मंदिराचा गाभारा आहे.
१२. संगमरवराच्या जाळ्यांवर १०८ कलश कोरलेले आहेत. आणि १०८ हा आकडा फक्त हिंदू धर्मातच शुभ मानला जातो.
१३. ताजमहालची देखरेख करणारे आणि दुरुस्ती करणाऱ्या लोकांमध्ये असे लोक देखील आहेत कि ज्यांनी प्राचीन पवित्र शिव लिंग आणि मूर्तीना संगमरवराच्या कबारीखाली असलेल्या लाल दगडांच्या कक्षामध्ये, जो कि आता बंद करण्यात आला आहे, बघितले आहे.
१४. भारतामध्ये १२ ज्योतिर्लिंगे आहेत. असे निदर्शनास येते कि ताजमहाल त्यांमधील एक आहे जे नागनाथेश्वर या नावाने ओळखले जात असे. त्याला हे नाव दिले गेले होते कारण त्याला नागाने वेढा घातल्यासारखे बनवले गेले होते. जेव्हा शाहजहानने यावर कब्जा केला तेव्हा याची पवित्रता नष्ट झाली.
१५. वास्तुकलेच्या विश्वकर्मा वास्तुशास्त्र नावाच्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये 'तेज-लिंग' चे वर्णन येते. ताजमहालामध्ये 'तेज-लिंग' होते म्हणूनच त्याचे नाव तेजोमहालय पडले होते.
१६. श्रावण महिन्यात आग्र्यामधील लोक ५ शिव मंदिरांमध्ये जाऊन शंकराचे दर्शन करत असत. आता फक्त बालकेश्वर, पृथ्वीनाथ, मनकामेश्वर आणि राजराजेश्वर हीच मंदिरे उरली आहेत. तेव्हा हे स्पष्ट होते कि ५वे मंदिर हे तेजोमहालय मंदिर होते.
१७. आग्रा हि जाट लोकांची नगरी आहे. जाट लोक शंकराला तेजाजी या नावाने ओळखतात. The Illustrated Weekly of India, २८ जून १९७१ च्या जाट विशेषांकानुसार जाट लोकांमध्ये तेजा मंदिर असे. कित्येक शिवलिंगामध्ये तेजलिंग असे. ज्याचे जाट लोक उपासक होते. यावरून असे दिसून येते कि ताजमहाल भगवान शिवाचे निवासस्थान तेजोमहालय होता.
काही दस्तऐवज :
१८. बादशाहनामा, जे कि शाहजहानच्या दरबारातील गोष्टींचा आढावा घेणारे पुस्तक आहे त्यातसुद्धा ( पृष्ठ ४०३, भाग १ ला ) असे स्वीकारले गेले आहे कि मुमताजला दफन करण्यासाठी शाहजहानणे जयपूरचे महाराज जयसिंग यांच्याकडून एक विशाल घुमट असलेली विशाल इमारत विकत घेतली होती, जी इमारत राजा मानसिंग भवन म्हणून ओळखली जात असे.
१९. औरंगजेबाने स्वतःच्या बापाला लिहिलेल्या चिठ्ठीचा 'आदाब-ए-आलमगिरी', 'यादगारनामा' आणि 'मुरुक्का-ए-अकब़राबादी' (१९३१ मध्ये सैद अहमद द्वारा संपादित पृष्ठ ४३, भाग २) या ३ महत्वाच्या ऐतिहासिक पुस्तकांमध्ये उल्लेख येतो. यामध्ये औरंगाजेबने स्वतः लिहिले आहे कि मुमताजला ज्या सात माजले असणाऱ्या लोकप्रिय स्थानावर दफन करण्यात आले आहे तेथील इमारती इतक्या जुन्या झाल्या आहेत कि त्यामधून पाणी गळत आहे. घुमटाच्या उत्तर दिशेला भेग पडली आहे. यासाठी औरंगजेबाने स्वतःच्या खर्चानी इमारतींची डागडुजी करायचे फर्मान काढले होते व शाहजहानला भविष्यात येथील विस्तारपूर्वक डागडुजी करण्याबाबत सुचवले. यावरून असे दिसून येते कि शाहजहानच्या वेळेसच ताज प्रांगण एवढे जुने झाले होते कि त्याच्या डागडुजीची गरज होती.
२०. जयपूरचे महाराजा यांनी त्यांच्या दैनदिनी मध्ये १८ डिसेंबर १६३३ मध्ये शाहजहानने ताज भवन समूह मागितल्याच्या (२ गोष्टीना नवीन क्रमांक आर १७६ आणि १७७ ) विषयाबाबत असे लिहिले आहे कि गोष्ट जयपूरच्या त्या वेळच्या शासकासाठी अतिशय निंदनीय होती आणि तिला कधीच स्वीकारले गेले नाही.

असे बरेच मुद्दे आहेत, सर्व इथे सांगणे योग्य नाही आणि या लेखाचा तो हेतूही नाही. पण ताजमहाल हि एक अप्रतिम कलाकृती आहे आणि ती बघण्यासाठी खूप लांबून लांबून लोक इथे येत असतात, आता ती प्रेमाचे प्रतिक आहे का नाही? ती कुणी बांधली ? असे बरेच प्रश्न आहेत. पण ज्या कुण्या लोकांनी ती बनवण्यात मोलाचा वाटा उचलला, त्या सगळ्यांना मात्र मानाचा मुजरा. प्रत्येक भारतीयाने मात्र ती आयुष्यात एकदा का होईना जरूर बघावी.

साधारण १२ वाजता ताजमहाल सोडला. चिक्कार फोटो काढले. चला अजून एक जगातील सात आश्चर्यापैकी अजून एक बघून झाले, आता पुढील कधी बघावयास मिळते कुणास ठाऊक ? हा विचार करत करतच बाहेर आलो. गाडी कडे बघितले तर २ बकऱ्या गाडीला लावलेला हार खाण्यात मश्गुल होत्या. आता फक्त हाराचा दोराचं शिल्लक राहिला होता त्यामुळे त्यांना हुसकावण्यात देखील काही हशील नव्हते. गाडी काढताना ज्याच्या दुकानासमोर गाड्या लावल्या होत्या त्याने चक्क २५० रु. मागितले. आणि वर गाडीला २-२ हेल्मेट आहेत वगैरे सांगू लागला. मी त्याच्याशी वाद न घालता सरळ सी आर एफ ची चौकी गाठली आणि तिथल्या एकाला घेऊन आलो. त्याला बघताच मात्र याने ४० रु. दोन्ही गाड्या सोडल्या. परत जाता जाता लाल किल्ल्याचे बाहेरून दर्शन झाले.
आणि शेवटी एकदाच्या आमच्या दोन्ही गाड्या श्री कृष्ण जन्म भूमीच्या दिशेने निघाल्या. मोहीम कुठे आहे याचा काही पत्ताच नव्हता, फक्त आज काहीही झाल तरी दिल्ली गाठायची होती.

पुढील भाग :

“ पुणे ते पानिपत ” भाग १० : http://www.maayboli.com/node/38586

“ पुणे ते पानिपत ” भाग ११ : http://www.maayboli.com/node/38694

“ पुणे ते पानिपत ” भाग १२ : http://www.maayboli.com/node/38842

“ पुणे ते पानिपत ” भाग १३: http://www.maayboli.com/node/46062

“ पुणे ते पानिपत ” भाग १४: http://www.maayboli.com/node/51134

“ पुणे ते पानिपत ” भाग १५: http://www.maayboli.com/node/51149

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताज........ वाह ताज ......

ताज........ वाह ताज ......

सर्व प्र चि व वर्णन अतिशय आवडले............. मनापासून धन्यवाद.......

प्रत्येक भारतीयाने ताजमहाल आयुष्यात एकदा का होईना जरूर बघावा.

१००% अनुमोदन !!

प्रचंड अभ्यास, सुंदर प्रची, चांगला लेख !!!

इतक्या चांगल्या सुंदर लेखाचे शीर्षक नक्कीच खटकले. ते केवळ "पुणे ते पानिपत भाग ९ ~ ताजमहाल" इतकेच असायला हवे होते.

सारंगराव...जगातील एका अत्यंत देखण्या वास्तुच्या तितक्याच देखणेपणाने केलेल्या वृत्तांताला तुम्ही ते 'पु.ना.ओक' चे सुप्रीम कोर्टाने फाईल करून टाकलेले प्रकरण कशासाठी जोडले हे समजले नाही. तुम्ही आम्ही सारे भारतीय लोकशाही आणि संविधान सप्रमाण मानतो. मग ज्या संविधानाद्वारे प्रस्थापित झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने जर कै.ओक यांचा 'ताज की तेजो ?' हा अर्ज फेटाळून लावून तो विषय बंद केला असेल तर त्यावर परत चर्चा करण्यात काय हंशील ? याच कै.ओकांनी ताजमहालाप्रमाणेच ख्रिश्चनांची "व्हॅटिकन सिटी" ही खरेतर भारतीय 'वाटीका' असून ते स्थळ हिंदूधर्मीयांचे पवित्र ठिकाण आहे असेही लिहिले आहे. पटते तुम्हाला ? मक्का मदिनेच्या 'काबा' बद्दलही तसेच त्यांचे मत. विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून त्यानी जे लिहिले ते वाचावे आणि सोडून द्यावे.

तुम्हाला 'ताजमहाल' भावला....जो माझ्यासारख्या लाखो करोडोना भावला आहे. त्यामुळे तो कुणी बांधला वा त्याचे श्रेय कुणाला गेले पाहिजे याबाबत जर इतिहासकारांत एकमत असेल वा नसेल त्याच्याशी एक 'वास्तुशिल्प प्रेमी' म्हणून आपणास काही कर्तव्य असायचे काही कारण नाही. तुम्हाला काल ताजमहाल भावला आज कुतुबमिनार भावेल तर परवा पणजीतील सेंट झेव्हिअर फ्रान्सिस चर्चचे बांधकामही भावू शकते. इथे तुम्ही वा मी हिंदु आहोत याचा कसलाही संबंध येत नाही. उद्या कुणी कुतुबमिनार आणि पणजीतील चर्च ही मुळातील हिंदूंनी बांधलेली शिल्पे आहेत असे म्हटले तर तसा उल्लेख आपण त्या इमारतीच्या देखणेपणाबद्दल लिहिलेल्या लेखात केला तर ते तुम्हालाही खटकेल.

असो.
अशोक पाटील

धन्यवाद मंदार....

सीनिअर असल्याने वयाच्या आणि भटकंतीच्या अनुभवाने मला हे नक्की माहीत झाले आहे की लेखातील मूळ गाभ्याशी फटकून असू शकणार्‍या अन्य विषयाची एखादी सुतळीही त्या धाग्याच्या देखणेपणाला फास लावू शकते. सारंग यांची मोहिम जबरदस्त यात वादच नाही, अभ्यासही चांगला आहेच, शिवाय ताजमहालच्या तर ते प्रेमातच पडल्याचे स्पष्ट जाणवते. मग अशावेळी अनावश्यक वादाचे कारले इतक्या चवदार ताटात का आणले असावे ? असाच विचार तुमच्यामाझ्यासारख्या वाचकांच्या मनी येत राहतो.

अशोक पाटील

इतक्या चांगल्या सुंदर लेखाचे शीर्षक नक्कीच खटकले. ते केवळ "पुणे ते पानिपत भाग ९ ~ ताजमहाल" इतकेच असायला हवे होते.

नुस्ते तितके लिहून कसे चालेल? मुसलमानानी शिव मंदीर हिरावले हा शोध त्याना कसा लिहिता आला असता? तो ताज बघणे, त्याचे फोटो वगैरे मिनित्त्य. धार्मिक आक्र्मण हाच सगळ्या लेखाचा मुख्य हेतु.

असले कितीक धागे बंद पडले.

पुना ओकांची केस सुप्रीम कोर्टाने फेटाळून बंद केली, हे मात्र याना नेमके ठाऊक नसते.

बकामुक -- मला नाही वाटत सारंग हा प्रचारकी आहे. तो एक महाविद्यालय विद्यार्थी आहे. ह्या वयात अशा सर्व गोष्टी आवाडतात्.मला पण आवडायच्या (तेजोमहाल, गर्व से कहो हम हिंदु है, इ..) जस वय वाढत गेले बाकिचे जग बघीतले की हे कमी होते. असो... जास्त विषयांतर नको.

जर का स्त्रीच नाव मुमताज असेल तर Taj च्या जागेवर Taz असे असावयास हवे.

स्पेलिंग इंग्रजानी केले. शहाजानला इंग्रजी येत नव्हते. Proud कुणीतरी स्पेलिंग चुकीचे केले तर त्याला त्याने काय करावे?

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
पाटील साहेब तुम्ही लिहिलेला शब्द न शब्द पटला, म्हणून शीर्षक बदलत आहे. ओक यांचे ताजमहालाबद्दलचे मुद्दे सोडले तर दुसरे मला देखील माहिती नव्हते.
चुकीबद्दल सर्वांची मनापासून माफी मागतो.

बघतोस काय मुजरा कर >>>>>>> तुमचं तर कौतुक कराव तेवढ थोडंच आहे. मायबोलीवर तुम्ही येऊन साधा आठवडा उलटला नसतानाही, तुम्ही जी प्रतिक्रिया दिली त्याला तोडच नाही राव.
ओकांची केस सुप्रीम कोर्टाने फेटाळून बंद केली, हे मात्र याना नेमके ठाऊक नसते. >>>>> खोट कशाला बोलू, मला माहित आहे कि ती केस कोर्टाने बंद केली आहे म्हणून.
नुस्ते तितके लिहून कसे चालेल? मुसलमानानी शिव मंदीर हिरावले हा शोध त्याना कसा लिहिता आला असता? तो ताज बघणे, त्याचे फोटो वगैरे मिनित्त्य. धार्मिक आक्र्मण हाच सगळ्या लेखाचा मुख्य हेतु.
अगदी अगदी ,,, भलतेच मनकवडे दिसता राव.
मागील भागांमध्ये आम्ही मशिदीमध्ये जाऊन नमाज पडला, गुरुद्वारात जाऊन माथा टेकला वगैरे उल्लेख आले असताना ,,,,,,,,,अरे माफ करा ते तुम्हाला कसे माहित असेल,तुम्ही तर फक्त आठवडाभराचे सदस्य
असो एक गोष्ट मात्र मला माहितेय " Don't argue with ......."

तुमचं तर कौतुक कराव तेवढ थोडंच आहे. मायबोलीवर तुम्ही येऊन साधा आठवडा उलटला नसतानाही, तुम्ही जी प्रतिक्रिया दिली त्याला तोडच नाही राव.

Proud

मायबोलीवरचा जुना आय डी हा जुनाच असतो.

पण नवा आय डी हा नवाच असतो असे नाही.

समजले का?

Biggrin

सारंगजींचे अतिशय सुंदर लेखाबद्दल आणी तितक्याच छान छायाचित्राबद्दल अभिनंदन. शीर्षक बदलल्याबद्दल अभिनंदन++. अशोकजी, आपली मते संयतपणे व्यक्त करायची आपली पद्धत मला नेहेमीच आवडते.

मंदारडी, अनुमोदन. १९९२ मध्ये अगदी तावातावाने डोक्याला भगवी पट्टी बांधून अयोध्येला जाऊन आलेला एक मुलगा माहित आहे. नंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आणी आपल्याबरोबर इतर तीसेक माणसांना रोजगार दिला. दोनेक वर्षापूर्वी हायकोर्टाचा निकाल येणार होता तेव्हा याला टेंशन, निकालाचे नाही तर दंगा झाला तर व्यवसायावर परिणाम होईल का याचे.

सारंगजीं खूप सुरेख लेख तसेच छायाचित्राबद्दल अभिनंदन त्याच बरोबर लेखाचे शीर्षक बदलल्याबद्दल अधिक अभिनंदन.

अशोकजी, आपली मते संयतपणे व्यक्त करायाची आपली पद्धत मला नेहेमीच आवडते + १००

सारंग यानी सर्वांच्या मताचा आदर राखीत शीर्षकामध्ये योग्य ते बदल केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

सर्वश्री विजय कुलकर्णी, मंदार, आदिविझ आणि ब.का.मु.क. ~ तुम्हीही तितक्याच आपुलकीने या तशा हळव्या म्हटल्या जाणार्‍या विषयावर आपले विचार मांडून श्री.सारंग याना भविष्यातील त्यांच्या लेखनप्रवासासाठी एक प्रकारे सुयोग्य असे मार्गदर्शनच केले आहे.

अशोक पाटील

नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरीवर एक तासाची उत्तम फिल्म आहे ताज महाल वर. संदर्भासाठी जरूर बघा.

ताजमहाल नव्हे तेजोमहल या विषयावर पु ना. ओक यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. अतिशय स्पष्ट आणि परखड असल्यामुळे त्यांनी अनेकांची नाराजी ओढवुन घेतली.

सध्या इंग्लड मधील स्थाईक श्री गोडबोले ही मोहीम पुढे चालवत आहेत.

पु ना ओक हे सुभाषचंद्र बोसांचे सहकारी होते. ( महानायक च्या परिशिष्ठात याचा उल्लेख आहे )

मी एकदा त्यांना भेटायला औंध पुणे इथे गेलो होतो ( साल १९९० ) तेव्हा एक गुजराथी व्यापारी खुप सारी मिठाई घेऊन त्यांना भेटायला आला होता. त्याच्याशी बोललो तेव्हा पु. ना. ओक यांचा इतिहासाचा अभ्यास काय दर्जाचा होता याची खात्री झाली.

गुजराथेत या व्यापार्‍याने एक इमारत बांधली. त्याचे काही मजले बाजुच्या मशिदीपेक्षा उंच झाले होते. मशिद ही पुराणवास्तु असुन बाजुच्या उंच इमारतीमुळे मशिदिचे सौंदर्य कमी होते सबब वरील काही मजले पाडावते असा दावा मुस्लिमांनी केला.

तो व्यापारी पु ना ओकांची किर्ती ऐकुन त्यांना भेटायला आला. पु ना ओक त्याच्या सोबत गुजराथेत गेले व मशिदीचे बाहेरुन परिक्षण करुन सदर मशिद ही मशिद नसुन मंदिर असल्याचा परिदावा त्यांनी केला.

घाबरुन मुसलमानांनी त्यांचा मुळ दावा मागे घेतला या करता ती मिठाई होती.

आंबा लिला सुध्दा काढु की.

विषयाला धरुन लिहल तरी सुध्दा झोंबत का ? गेट वेल सुन !

अभिव्यक्ती का काय ते म्हणतात तुमच्या सारख्यांच्या भाषेत त्याची चाड ठेवा.

पुना ओकांची केस सुप्रीम कोर्टाने फेटाळून बंद केली आहे वर मी वाचलय याचा अर्थ पु. ना. ओकांच नाव घ्यायला सुप्रीम कोर्टाने बंदिहुकुम जाहिर केलेला नाही.

मी लिहीलेल्या घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे.

सारंग लेख वाचायला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्ष्मस्व.
प्रत्येकानी पहावी अशी वास्तु म्हणुन नक्की ताजकडे पाहावं.
एक नक्की नमुद करता येईल की तुमच्या या मोहीमेत संपुर्ण उत्तरेकडील वाडे मंदीर यांची स्थानीक्/खाजगी/सरकार पातळीवर होणारी देखभाल ही खरोखरच् पाहाण्यासारखी असते.
याबाबत महाराष्ट्रात मात्र नक्की उदासीन परीस्थीती आहे .
बाकी इतिहास आणि भुतकाळाची सांगड घालतच आपण राहाणार आणि वर्तमानातल्या या स्थळानांकधी न्याय मिळणार हा खरा विषय बाजुलाच राहाणार

एक नक्की नमुद करता येईल की तुमच्या या मोहीमेत संपुर्ण उत्तरेकडील वाडे मंदीर यांची स्थानीक्/खाजगी/सरकार पातळीवर होणारी देखभाल ही खरोखरच् पाहाण्यासारखी असते.
याबाबत महाराष्ट्रात मात्र नक्की उदासीन परीस्थीती आहे >>>>> खरं आहे घारू आण्णा तुमचं
शिंदे छत्री म्हणा, ताजमहाल घ्या, लाल किल्ला, अक्षरधाम , सुवर्ण मंदिर, ग्वाल्हेर, झाशीचा किल्ला घ्या हे सर्व नक्कीच महारष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांपैकी चांगल्या अवस्थेत आहेत. अर्थात धौलपूर किल्ला वगैरे अपवाद आहेत नाही अस नाही, पण एकंदरीत तिकडं जास्त चांगली देखभाल आहे हेच खर.
इंद्रानी टाकलेला उदयपुर पण बघा. राजस्थानमध्ये पण त्यांनी किल्ले चांगले जपले आहेत.
बहुतेक आपल्याकडे किल्ले जास्त आहेत म्हणून सरकारला त्याची कदर नसावी.
आपण आपल्या पातळीवर त्यांचे संवर्धन करायचा प्रयत्न करू , एवढेच काय ते आपण करून शकतो. Sad