सावधान मायबोलीकरांनो !

Submitted by कवठीचाफा on 18 September, 2008 - 13:52

यात कुणालाही दुखावण्याचा अपमान करण्याचा हेतु नाही. एक कल्पना सुचली म्हणुन ती स्क्रीन वर टाईपली. ( कागदावर उतरवतात तशी ) जर कुणी दुखावलेच तर त्यांनी उदार मनाने क्षमा करुन टाकावी.

**********************
तसं रात्रीअपरात्री एकटं रहाणं मला काही नवीन किंवा खास नाही. मी काही इतका भित्रा भागुबाई नाही की एकटा असलो की दारं खिडक्या घट्ट लाउन घेउन गपचुप बिळात शिरलेल्या उंदरासारख रहावं. उलट अश्या निवांत वेळी रात्री गच्चीत चांदण्या पहात मस्त वेळ जातो. आणि नसतिल चांदण्या, जश्या आज नाहीयेत, तर वर दिसणार्‍या आभाळाच्या पोकळीत तंद्री लाउन बसायचे. एक दोन कप कॉफ़ी असली की झालं.
आज तर चक्क अमावास्या होती आजुबाजुची घरं दिसत सुध्दा नव्हती. आणि गच्चीत बसल्या बसल्या कधीतरी चुकुन डुलकी लागली. मधेच कधीतरी जाग आली ती सुध्दा थंडी वाजायला लागल्यामुळे. कदाचीत मध्यरात्र उलटून गेली असावी. आजुबाजुची शांतता दाट काळोखात बुडाली होती. वातावरणातली थंडी सोडली तर त्यात काहीतरी वेगळेपण जाणवत होते. नेमके काय? ते मात्र कळत नव्हते. मी विचारात पडलो आत्ता यात अनैसर्गीक का वाटतेय? हा काळोख ही शांतता येस्सSSSS ही शांतता, रात्र कीतीही दाट असली तरी शांतता नसते इतकी . कीमान रातकीडे तरी किरकीरायला हवेत? मी इझीचेअर मधुन उठून गच्चीच्या कठड्यापर्यंत गेलो. आणि कुणितरी हळू आवाजात कुजबुजल्या प्रमाणे बोलत असल्याचे ऐकले. पहील्यांदा तरी चोर असल्याचा संशय येउन मी लाईट लावणार इतक्यात तिथे आणखी आवाज आले जसे गर्दीतुन येतात तसे. आता आमच्या घराच्या आजुबाजुला गर्दी करण्या इतपत जागाच नाही त्यामुळे मला ते जरा चमत्कारीक वाटले म्हणुन मी लाईट न लावता तिथे चाललेले बोलणे कान देउन ऐकु लागलो. आणि थोड्याच वेळात लाईट न लावल्याचा मला आनंद झाला. माझ्या घराच्या मागच्या इवल्याशा आवारात चक्क भुतांचे संमेलन भरले होते. हो चक्क खर्‍या खुर्‍या भुतांचे संमेलन कदाचीत पावसाळी आधिवेशनही असावे. नक्की काय होते ते निट ऐकल्याशीवाय कळले नसतेच.
"ऐका, आपल्या समस्त भूत जमातीवर काही लोक अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत. इंटरनेटवर मायबोली नावाच्या वेबसाईटवरील बरेच लोक आपले अस्तित्व नाकारत आहेत. एखादा आय.डी. आपल्याबद्दल निरनिराळ्या कथा लिहून पुन्हा वर आपले अस्तित्व म्हणजे अंधश्रध्दा आहे असे म्हणत आहे. त्याला विरोध करायचे टाकुन बाकी आय.ड़ी. त्याला दुजोरा देत आहेत. प्रश्न आपल्या अस्मितेचा आहे अस्तित्वाचा आहे. मी आज इथुन त्यांना सांगतो आहे की या पुढे, या नंतर जर त्यांनी एका जरी भूताच्या अस्तित्वाला अमान्य केले तर त्यांचे सगळे घर दार भूतांनी भरुन टाकल्याशीवाय रहाणार नाही. आणि मला पोकळ धमक्या द्यायची सवय नाही. अरे रात्रीचे भटकतो म्हणुन काय डरपोकची औलाद समजु नये यांनी." प्रचंड टाळ्यांमधे आपले भाषण सुरु ठेवत तो म्हणाला. मला तरी त्याचे भाषण चोरलेले वाटले.
" तरी या आय.ड़ीं. साठी काहीतरी ठोस कारवाई करण्याची आजच्या रात्री गरज पडली आहे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांना आवाहन करत आहे की तुम्ही यातल्या शक्य तितक्या आय.ड़ीं. कडे जाउन त्यांना आपल्या अस्तित्वाने घाबरवून सोडावे. सध्या पुरता इतका इशारा पुरे तरीही नाही ऐकलेच तर त्यांना झपाटून टाकायचीही आपली तयारी आहे."
या नंतर गर्दीत जरा कुजबुज झाली आणि त्या भूतनेत्याच्या योजनेला फ़क्त एका सुधारणेसह पाठींबा मिळाला. सुधारणा अशी की `चाफ़्फ़ा', या आयड़ी. कडे कुणालाही पाठवण्यात येउ नये'
" माझ्या मित्रांनो आपण असे एखाद्या आयड़ी. ला घाबरुन चालणार नाही. आणि असे काय आहे त्या आयड़ी. कडे ज्याला तुम्ही इतके घाबरत आहात? कुणी संन्याशाचा वरदहस्त आहे का? " भूतनेता आव्हानात्मक स्वरात म्हणाला.
" तसे नाही पण त्याला भूतांचा संग्रह करायचा छंद दिसतोय. आत्ताच त्याने आपला `राखणदार' या अल्पसंख्यांका ला पळवले आहे नशीबाने वेळेवर पोहचून आपल्या एका शूर कार्यकर्त्याने त्याच्या शेवटच्या दोन ओळीत त्याची सुटका केली."
"ठीक आहे, त्याला आपण जरा बाजुला ठेउ पण बाकी त्या वेबसाईटच्या आय.ड़ी. ना घाबरवण्यासाठी आपले कार्यकर्ते आजच रवाना झाले पाहीजेत. मला माहीत आहे की त्यांच्या पेक्षा आपली संख्या कमी आहे त्यामुळे हे कार्य आपण तुकड्या तुकड्याने करुया. "
या नंतर त्यांच्यात बरीच चर्चा झाली. माझे नाव घेतल्या पासुन मी त्यांचे बोलणे नाहीतरी कान टवकारुनच ऐकत होतो. पण आता त्यांच्या एकत्रीत कुजबुजीमुळे मला निट असे काहीच ऐकु येईना ! इतक्यात त्यांची कुजबुज संपली आणि त्यांचा भूतनेता आपंण त्याला भूतनाथ म्हणुया म्हणाला.
" ठीक आहे, आपला निर्णय झालेला आहे आपण रॅंडमली सिलेक्ट करुन जे आय.ड़ी. ठरवलेत त्यांच्या कडे ठरवून दिलेल्या क्वालिफ़ीकेशनची भूते आजच रवाना होतील आणि शक्य तितक्या प्रकारे त्या त्या आयड़ी. ना घाबरवुन पुन्हा पुढच्या आमावास्येला आपण इथेच भेटू तेंव्हा ते आपापले रिपोर्ट देतील" इतके बोलून भूतनाथाने आपले भाषण संपवले आणि ती सभाही संपली.
आता इतके ऐकल्यावर माझी उत्सुकता मला गप्प बसु देईना. मी पुढच्या अमावस्येची वाट पहात राहीलो. मधे एकदा असे वाटले की काही जणांना फ़ोन करुन विचारावे पण नेमक्या कोणत्या आय.ड़ी. कडे कोणते भूत गेलेय त्याचा मलाच पत्ता नव्हता त्यामुळे माझीच फ़जीती होण्याची शक्यता जास्त होती. म्हणुन मी आपला गप्प राहून पुढच्या आमावस्येची वाट पहात राहीलो. आलेल्या आमावस्येच्या दिवशी घरातल्या सगळ्या लोकांना बाहेर पाठवुन मी एकटाच राहीलो, रात्रीची वाट पहात. एकदाची रात्र झाली आणि मी लवकर जेउन गच्चीतल्या खुर्चीत ठाण मांडले. रात्री जागत बसण्यासाठी आज कॉफ़ीच्या साठ्यात वाढ केली होती. पुन्हा एकदा मागच्या वेळीसारखी पटकन झोप लागुन गेली. आणि आगदी मागच्या वेळीसारखीच थंडीमुळे जाग आली. आजुबाजुला तिच परीचीत शांतता पसरलेली होती. पुढे काय घडणार आणि कुठे घडणार हे माहीत असल्यामुळे मी गच्चीचा कोपरा पकडला आणि कान देउन खालचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत राहीलो. फ़ार वेळ वाट पहावी लागलीच नाही. तोच भूतनाथाचा आवाज पुन्हा कानावर पडला. किंचीत चिडलेला असल्यामुळे त्याचा आवाजही चढलेला होता त्यामुळे स्पष्ट ऐकु येत होता.
"गेल्यावेळी ठरल्याप्रमाणे आपण आज ईथे पुन्हा भेटत आहोत. पण आजची उपस्थिती इतकी कमी का आहे? आपण पाठवलेले आपले कार्यकर्ते कमी प्रमाणात उपस्थित दिसत आहेत. आता बाकी सर्व गोष्टी बाजुला ठेउन आपण त्यांच्या कामगिरी बद्दल त्यांच्याच कडून ऐकु या." भूतनाथाच्या शब्दात आता थोडा अभिमान भरल्यासारखा वाटत होता.
" तु आय. टी. क्षेत्रातला म्हणुन तुला `च्यायला' या आयड़ी कडे पाठवले होते ना? कशी काय हालत झाली त्याची घाबरल्यामुळे?" भूतनाथ कुणालातरी विचारत होता.
" तो कसला घाबरतो त्याच्या लॅपटॉप मधुन बाहेर येउन मी त्याला घाबरवायचा प्रयत्न करताच त्याने मलाच पुन्हा लॅपटॉपमधे कोंबले आणि अटॅचमेंट करुन चाफ़्फ़्याला ई- मेल केले वर असे पण लिहीले `तुला भूत हवे होते ना? हे घे !'म्हणुन. तरी बरा सर्वर मधुन जातानाच मी त्या इ-मेल मधुन पळ काढला. नाहीतर `इ-मेल वरचे भूत' असली काही कथा लिहून चाफ़्फ़्याने मलाच मायबोलीवर अडकवले असते." ते भूत घाबरत म्हणाले.
" अरे तो केदार१२३ कडे गेलेला अशी कवटी का लपवतो आहे?" भूतनाथ म्हणाला.
" ठरल्याप्रमाणे मी त्याच्याकडे गेलो पण त्याच्या आकाराकडे बघुन मीच बेशुध्द पडलो बहुतेक तो आपल्या वरच्या श्रेणीतला म्हणजे राक्षस असावा. चार दिवस स्मशानात उपचार घेत होतो." उतरलेल्या आवाजात तो म्हणाला.
" आणि झकासराव कडे गेलेल्याचे काय ?" भूतनाथ काळजीत.
" गेलो होतो, पण मला बघताच तो म्हणाला `आणखी येउ देत' बहुतेक तो घोस्ट इटर असावा आणि त्याचे पोट माझ्या एकट्याने भरणार नाही त्यामुळे मी जीव वाचवून पळून आलो म्हणुन आत्ता आपल्यासमोर उभा आहे."
" ते पाठीमागे विदुषकासारख्या चेहर्‍याचे कोण आहे? कुणी घुसखोर शिरलाय की काय भूतांच्या सभेत?" भूतनाथ खवळून बोलला.
" नाही, नाही , मी `मिल्या' या आयड़ी. कडे गेलो होतो. त्याने माझे सगळे अवयव असे इकडे तिकडे करुन माझे विडंबन करुन टाकलेय मी आता कुठल्याच भूताला तोंड दाखवण्यासारखा राहीलो नाही. सगळे मला घाबरतात. माणसातला कुणी आला असे समजुन"
"नंदीनी कडे पाठवलेल्या उच्च शिक्षीत हडळीचे काय?"
" मी पण आहे इथेच, तिला घाबरवायला गेले आणि तिने तिच्या कादंबर्‍या वाचायला दिल्या त्यात शेवट न सापडल्यामुळे पुढे काय होणार? या टेंन्शन मधे मी माझ्याच झिंज्या उपटून घेतल्याने आता फ़क्त कवटी बाकी राहीलीये. म्हणुन कदाचीत तुम्ही मला ओळखली नसेल,"
" त्या लिंबुटींबु कडे कोण गेला होता?"
" मी गेलो होतो भूतनाथ, पण त्याने मला जगण्याबद्दलच्या इतक्या गोष्टी सांगीतल्या की मला परत जिवंत व्हावेसे वाटले पण बहुधा तो आपल्याच जमातीचा असावा कारण सारखा म्हणत होता ` मला अनुल्लेखाने मारण्यात आले आहे म्हणुन' मग त्याला घाबरवले असते आणि त्याने तक्रार केली असती तर तुम्हीच मला आत म्हणजे एखाद्या कबरीत टाकले असते ना ! "
" बरं भुमिका या आयड़ी. चे काय? तिकडे गेलेली जखीण परत का आली नाहीये? "
"तिला भुमिकाने सांगितले की २०१२ साली जगाचा अंत होणार आहे त्यात फ़क्त १% लोक वाचणार आहेत त्यामुळे तीच्याकडे गेलेली जखीण आता त्या १% मधे येण्याच्या प्रयत्नात कुठेतरी जात असते"
" अरे आणि त्या झक्कींचे काय ते तर वयस्कर आहेत नक्कीच घाबरले असणार. कोणत्या हॉस्पिटल मधे आहेत ते?"
" ते कोणत्याही हॉस्पिटल मधे नाहीत त्यांना घाबरवायला पाठवलेल्या एन. आर. आय. भूताला काही बोलायची संधी न देता त्यांनी त्याला भारत हा कसा मागासलेला देश आहे याबद्दल व्याख्यान दिले. आणि जेंव्हा त्याने आपण एन. आर. आय. भूत असल्याचे सांगितले तेंव्हा भारतातल्या संपन्न संस्कृतीबद्दल व्याख्यान दिले. हे सगळे सहन न झाल्याने त्यांच्या कडे गेलेल्या भूताला डिप्रेशन आल्यामुळे तो कोमामधे गेला आहे त्याला स्मशानातल्या अतिदक्षता विभागात भरती केल्या गेला आहे, त्याच्याकडून इतकीच माहीती मिळते की त्यांचा असा समज झाला होता की त्यांच्याकडे आलेले भूत हे कुणा रॉबिनहूड या आयड़ी. चे असावे."
" मग त्या लालु या आयड़ी. कडे कोण गेले होते?"
" त्यांच्याकडे मी गेलो होतो भूतनाथ, पण मला त्यांनी आणखी कोणाकोणाकडे भूते गेली आहेत हे विचारले मी त्यांची नावे सांगताच त्यांनी माझ्यावर ` तुम्ही गृपबाजी करत आहात' असा आरोप करुन मला तिथुन हाकलुन दिले.
" आजुक्का चे काय? तिच्याकडे कोण गेले होते?"
" तिच्या कडे गेलेले भूत आज आलेले नाही भूतनाथ तिने त्याच्यावर केलेल्या कोकणी शिव्यांच्या भडीमाराने त्याला ब्रेन हॅमरेज झाले आहे.
" बरं आता त्या ऍडमीन कडे गेलेल्या भुताचे काय?"
" त्याचा पत्ताच नाही तो आजुन त्या आय.ड़ी. ला शोधत आहे."
" दाद या आयड़ी. कडे गेलेल्या भूताचा पत्ता नाही ते कुठे आहे?"
" तो तीन नंबर कबरीत बंद आहे, त्याला घाबरण्या ऐवजी दाद ने त्याला आपल्या कथा वाचायला दिल्या थोडावेळ जरा गंभीर राहील्यावर त्याने जी हसायला सुरुवात केली तो आजुन थांबला नाहीये. या गडबडीत त्याच्या जबड्याची हाडे मोडून पडली आहेत तरी त्याचे हसणे थांबत नाहीये.
" तुम्ही सारे नालायक आहात. इतक्या आयड़ी. कडे गेलात पण एकालाही न घाबरवता परत आलात" चीडलेल्या भुतनाथाच्या हातांची हाडे कडकडत होती. " दक्षीणा कडे गेलेल्या हडळीचे काय? तिला तरी घाबरवता आले का ?"
" मी गेले होते भूतनाथ पण तिने माझ्या दिसण्यावरुन, वागण्यावरुन आणि दात कडकडत बोलण्यावरुन मला ईतके टोमणे मारले. इतक्या चुका काढल्या की मी तिला घाबरवायला गेले होते हे विसरुन तिथुन रागाने निघुन आले. अहो अश्या जहाल स्त्रीच्या वाटेला कोण जाईल? आता ओठ नाहीत म्हणुन बोबड बोलल्या जातं यात माझी काय चुक? पण तीने चारचारदा माझ्या बोलण्याची नक्कल करुन दाखवली. ह्या असल्या आय.ड़ी. कडे मी नाही जाणार यापुढे."
" बस बस्स आता आणखी कारणे देण्यापेक्षा बाकीच्या आयड़ी. कडे गेलेल्या भूतांचे काय रिपोर्ट आलेत ते सांगा" भूतनाथाची कवटी सरकली बहूतेक.
" कसले रिपोर्ट आणि काय त्या आय.टी. गर्ल, चिन्या, रुनी , अल्टीमा , सिंड्रेला या आयड़ी. कडे गेलेली भूते नाहीशी झालेली आहेत.
इंद्रधनुष्य या आय.ड़ी. कडे गेलेल्या भूताचे तो आजुन मापं काढत बसला आहे. या वेळी फ़क्त इतकीच भूते आपण पाठवली होती. आणि खास मागणीवरून वेताळ महाराजांना ब्रम्हराक्षस पाठवण्यासाठी निरोप दिला आहे"
" ब्रम्हराक्षस? तो कशाला ?" भूतनाथ बहूतेक बावचळला असावा. त्याच्या बोटांची हाडे दातावर आपटण्याचा आवाज आला.
" त्याला चाफ़्फ़्याच्या मागे सोडण्याचा विचार आहे जर त्याच्या त्या न घाबरवणार्‍या भूतकथा बंद झाल्या तरच कदाचीत लोक आपल्याला परत घाबरायला सुरवात करतील."
" ठीक आहे सध्या तरी आपण असेच करु बाकीच्या आय.ड़ीं. कडे उरलेल्या भूतांनी नंतर जावे" असे म्हणुन भूतनाथाने सभा संपवली.

तर दोस्तलोक त्यांना माहीत नव्हतेच मी त्यांचे बोलणे ऐकले आहे म्हणुन, आता मी त्या ब्रम्हराक्षसाची वाट पहात आहे. आणि आता पर्यंत ज्या आय.ड़ीं. कडे भूते आलेली नाहीत त्यांनी जरा सावध असावे.
थोडक्यात मी एका मोठ्या कटाचा गौप्यस्फ़ोट केलाय आता ज्याची त्याने सावधगीरी बाळगावी.

गुलमोहर: 

>>कसले रिपोर्ट आणि काय त्या आय.टी. गर्ल, चिन्या, रुनी , अल्टीमा , सिंड्रेला या आयड़ी. कडे गेलेली भूते नाहीशी झालेली आहेत.

Lol

कामाला लावलय मी भूताला!! म्हण़जे मला मनासारखा टीपी करता येईल म्हणून!! Proud

Rofl Rofl Rofl

तरीच काल संध्याकाळी स्वयंपाक करत होते तेव्हा मागच्या अंगणात सावल्या हलत होत्या Wink

व्वा आता ह्यावर भारतातली आणि अमेरिकेतली भुतांची सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि आव्हान ह्यावर एक विश्व संमेलन घ्याव काय हो चाफा?? Biggrin

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

हुश्श! मी वाचले ! (कुजबुजत पळून जाणारी बाहुली )

मस्तच लिहिलंय....

चाफ्फ्या..... काय हे! कसलं जबरदस्तं लिहिलय.... तू नेहमी इतक्या अफलातून कल्पना कशा काय काढतोस रे?
बरं... ते जाऊदे.... तो कॉफीचा ब्रॅंड कोणता ते सांग Biggrin

मस्त लिहिलेस रे बाबा!!! मिल्या, केदार१२३, नंदिनी, लिं.टिं, दक्षिणा, लालू कडे गेलेल्या भुतांनी जाम हसवले .. झक्की, अजुका ह्यांनी अजून टोले मारायला हवे होते भुतांना. आता फारंड, श्रध्हा, दीपांजली , हवाई, टोणगा ह्यांच्याकडे पुढील टोळी जाऊ दे. Happy (आयड्यांनो मजेत घ्या बरं ).

चाफ्या एकदम खास Happy

काय खोटंनाटं रिपोर्टिंग रे!!
फक्त शिव्या आणि त्याही कोकणी?
ये बात कुछ हजम नही हुई!!
Happy

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

>>>>> तो आपल्याच जमातीचा असावा कारण सारखा म्हणत होता ` मला अनुल्लेखाने मारण्यात आले आहे म्हणुन'
(गम्भिर चेहर्‍याने) अगदी खर रे, अन त्या भूताला हे पण सान्गितल की "मारणारे खूनी अजुनही, दहशत पसरवित, उजळमाथ्याने सगळीकडे हिन्डत अस्तात!" अन हे ऐकल्यावर खर तर, ते भूत घाबरुन पळुन गेल! Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मला अनुल्लेखाने मारण्यात आले आहे >>> त्यांना मारायला अनुल्लेखच पु रे सा आहे Wink

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

Rofl
मस्तच
*********************
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

आत्ताच वाचल छान वाटल

चाफ्या जबरदस्त.. :p
मझ्याकडे कोणत्या भुताला पठवणारेत कळेल पुढच्या अमावस्येला बहुतेक.
पण आय्डींची वर्णन खास..

चाफ्फ्या.. एकदमच भारी...
आता पुढच्या अमावस्येला तूच भूतनाथला कोणत्या आयडींकडे जायचे त्याची यादी दे...
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

चाफ्या,
काय प्रतिक्रिया देऊ तेच कळत नाही.

.............................................................
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband! Sad Proud

चाफ्या पुढच्या वेळी त्या भुतनाथला एक उपसुचना दे रे.
ह्यावेळी केल त्याच्या उलट करुन पहा म्हणाव.
म्हणजे तरुण आयडींकडे सुंदर हडळी वै. Proud

हुश्श! मी वाचलो!
मस्त मजा आली वाचून..

म्हणजे तरुण आयडींकडे सुंदर हडळी >>झकास, आता हडळींचा अनुभव घेणार म्हणे Proud
****************************
Minds are like Parachutes, they only function when open

:)) जबरदस्त !!
तुमची फॅक्टरी आहे का हो ?

सर्वप्रथम धन्यवाद ! मला वाटलं होतं त्याप्रमाणे हलकेच घेतल्याबद्दल. ( उल्लेख केलेल्या आणि न केलेल्या आय.डी. ना सुध्दा { कारण आज नाही तर उद्या त्यांच्याकडे भूते जाणारच :)} )
अजुक्का : खरंतर तुझ्याबद्दल आणखी लिहू शकलो असतो पण तुला आवडेल न आवडेल म्हणुन थोडक्यात सटकलो आता दिलीच आहेस परवानगी तर :
*****************************
काल रात्री पुन्हा सहज गच्चीत गेलो तर दोन भूतांना कुजबुजताना ऐकले ( आजकाल असे ऐकायला येते )
भूत क्र. १ :- "काय रे तुला अजुक्काने फक्त झापला तर तु इतका घाबरला होतास? मला तरी नाही पटले.
भूत क्र.२ :- " अरे मी तिच्याकडे गेलो तर ती निघाली कॉस्च्युम डिझायनर, तिने मला वेगवेगळ्या कपड्यात लपेटून बघितल्यावर शेवटी त्या `श्वास' मधल्या आजोबांच्या कपड्यात म्हणे मी छान दिसतो. इतकेच नाही तर त्यांच्या सारखा अभिनय पण कर म्हणाली तिने बहूतेक नाट्यशिक्षण पण घेतलेय. अरे असा तरुण तडफदार भूत मी आणि म्हातार्‍याची नक्कल करु? नाही म्हणालो तर `चपलेने फोडुन काढायला पाहीजे' असे म्हणाली. भितीने मी अर्धजिवंत झालो रे आता माझी ही फजीती चारचौघात सांगण्या सारखी आहे का ?

या नंतर पुढे शांतता पसरली, बहूतेक ते निघुन गेले असावेत. आता ता़जी बातमी आहे म्हणुन पुरवणी लावतोय.

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

आता पुढचे काही प्रश्न : >>>>>>>बरं... ते जाऊदे.... तो कॉफीचा ब्रॅंड कोणता ते सांग.
पहील्यांदा हे सांगा की तुम्ही काय घेता? चहा की कॉफी ? ( मी तेच घ्यावे म्हणतो Happy )

>>>>>>तुमची फॅक्टरी आहे का हो ?
कसली हो ? Happy
लिंब्या मस्तच ! Lol
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

थांब मेल्या चाफ्य्या

आता तुला काही टीप देतच नाही...
--------------
नंदिनी
--------------

Pages