लंडन ऑलिम्पिक्स २०१२ - मुलांसाठी माहिती आणि कलाकुसर

Submitted by रुणुझुणू on 22 July, 2012 - 07:45

"तू एक दिवस ऑलिम्पिक्सबद्दल चर्चा करशील" हे जर कधीकाळी कुणी मला सांगितलं असतं तर मी असं सांगणार्‍याची मनसोक्त चेष्टा केली असती.
कारण माझी खेळातील गती म्हणजे विषामृत, लगोरी, लंगडी, शिवणापाणी, लपाछपी आणि कबड्डी....तेही शालेय जीवनापुरतंच.

काही गोष्टी स्वतःला जमत नसल्या तरी कायम खुणावत राहतात. बीजे पडलेली असतात, अंकुरत मात्र नाहीत.
तसंच ऑलिम्पिक सामन्यांबद्दल झालंय. ह्यातल्या खेळांमध्ये गती नसल्याने चर्चेत किंवा बातम्या वाचण्यातही कधी फार रस घेता आला नाही. पण ह्या गोष्टीचं वैषम्य मात्र कायमच वाटत राहिलं.

यंदाच्या ऑलिम्पिक्सबद्दल चर्चा करणारा धागा मायबोलीवर आधीच आहे.
तिथली चर्चा आवडणार्‍या पण कळण्याइतकं ज्ञान नसलेल्या जीवांपैकी मी एक.
कधीनाकधी लेकाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी माहिती मिळवावी लागणार आहे. शिवाय खेळाबाबतीत त्याने आमच्याइतकं अडाणी राहू नये, अशीही इच्छा आहे.

मला जेवढी झेपली तेवढी माहिती इथे सोप्पी करून लिहिली आहे. त्यात गंभीर चुका असण्याची घनघोर शक्यता आहे. Blush
जाणकारांना कळकळीची विनंती आहे की हक्काने चुका दाखवून द्याव्या आणि जमेल त्या पद्धतीने आमचे अज्ञान दूर करण्यास हातभार लावावा Happy
मुलांना (आणि माझ्यासारख्या अज्ञ जीवांना) सांगण्यासाठी लिहिलं असल्याने माहिती अगदीच वरवरची आहे.
पण ह्यातून आणखी माहितीचा साठा वाढत जाईल अशी अपेक्षा.

**********************************************************************************************************************

यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा लंडन येथे भरवल्या जाणार आहेत.
उद्घाटन सोहळा २७ जुलै २०१२ आणि समारोप १२ ऑगस्ट २०१२ ह्यादिवशी असणार आहे.

ह्या ऑलिम्पिक्सचे ध्येयवाक्य (Motto)
: Inspire the generation !

(ऑलिम्पिक्सचे नेहमीचे ध्येयवाक्य (Motto) : Citius, Altius, Fortius म्हणजेच Swifter, Higher, Stronger)

ऑलिम्पिक्सचा झेंडा :

olympic flag.jpg

ह्या झेंड्यामध्ये पांढर्‍या पार्श्वभूमीवर निळा, काळा, लाल, पिवळा आणि हिरवा ह्या पाच रंगाच्या वर्तुळाकार कड्या दाखवलेल्या असतात.
हे रंग आशिया, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप ह्या पाच खंडांचे प्रतिक आहेत.
स्पर्धांमध्ये सामील होणार्‍या प्रत्येक देशाच्या झेंड्यामध्ये ह्या सहा रंगांपैकी (पाच कड्या आणि पांढरी पार्श्वभूमी)
एका तरी रंगाचा समावेश आहे.

ऑलिम्पिक्सची ज्योत :

olympic-torch-300x300.jpg

उद्घाटन सोहळ्याच्या कित्येक महिने आधी ग्रीस देशातील ऑलिम्पिया ह्या ठिकाणी पॅराबोलिक आरशावर सूर्यकिरण पाडून ज्योत प्रज्वलित केली जाते.
संपूर्ण ग्रीस देशभर ही ज्योत फिरवली जाते.
मग ही ज्योत ज्या देशात स्पर्धा भरणार आहेत तिथे (बर्‍याचदा) विमानाने आणली जाते.
तिथे ही ज्योत वेगवेगळ्या पद्धतीने (चालत, पळत, स्कुबा डायविंग, उंट, घोडे, सायकल) देशभर फिरवली जाते.
स्पर्धांच्या उद्घाटनाच्या दिवशी ही ज्योत मैदानावर आणली जाते आणि मग ह्या ज्योतीने मैदानात असलेल्या Cauldron मधील ज्योत प्रज्वलित केली जाते.
मैदानातील ज्योत स्पर्धांच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रज्वलित ठेवली जाते.
(ऐनवेळी ही ज्योत विझलीच तर ती पुन्हा प्रज्वलित करता यावी ह्यासाठी ग्रीस देशातून आणखी काही ज्योती बॅक-अप म्हणून आणून ठेवलेल्या असतात.)

ऑलिम्पिक्सची पदके :

प्रथम विजेत्याला सुवर्ण पदक, द्वितीय विजेत्याला रौप्य पदक आणि तृतीय विजेत्याला कांस्य पदक दिले जाते.
प्राचीन ऑलिम्पिक्समध्ये विजेत्याला ऑलिव्हच्या पानांनी बनवलेला मुकुट प्रदान केला जात असे.

olympic medals.jpgolive wreath.jpgऑलिम्पिक्सचे मॅस्कॉटस :

यंदाच्या ऑलिम्पिक्सचा मॅस्कॉट आहे - 'वेनलॉक - Wenlock' आणि पॅरालिम्पिक्सचा मॅस्कॉट आहे - 'मॅण्डेविल - Mandeville'

(पॅरालिम्पिक्स म्हणजे शारीरिक व्यंग असणार्‍या खेळाडूंसाठी भरवल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धा. ज्या देशात ऑलिम्पिक्स होतात तिथेच पॅरालिम्पिक्सच्या स्पर्धाही भरवल्या जातात.
यंदाच्या स्पर्धा लंडनमध्येच २९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०१२ ह्या काळात होणार आहेत)

वेनलॉक आणि मॅण्डेविलबद्दल जरा विस्तारात :

त्यांची जन्मकथा -
ऑलिम्पिक्ससाठी बोल्टन येथे स्टेडियम बांधण्याचे काम चालू असते. शेवटच्या खांबासाठी पोलाद वितळवत असताना त्याचे दोन थेंब खाली सांडतात.
खाली पडलेले थेंब थंड झाल्यावर जॉर्ज नावाचा माणूस ते थेंब उचलतो. तो जॉर्जच्या सेवानिवृत्तीचा दिवस असतो.
घरी आल्यावर जॉर्जची पत्नी आणि नातवंड केक वगैरे देऊन जॉर्जची सेवानिवृत्ती साजरी करतात.
सगळे जण झोपी गेल्यावर नातवंडांना भेट देण्यासाठी जॉर्ज त्या पोलादाच्या थेंबांपासून दोन बाहुले बनवतो.
सकाळ झाल्यावर बाहुले पाहून आनंदी झालेली मुले त्या बाहुल्यांना खिडकीत ठेवतात. त्याचवेळी खिडकीतून इंद्रधनुष्याचे रंग आत डोकावून बाहुल्यांवर पडतात आणि ते दोन बाहुले रंगीबेरंगी आणि सजीव होतात....त्यांचंच नाव वेनलॉक आणि मॅण्डेविल.

वेनलॉक आणि मॅण्डेविल मुलांसोबत रमतात, वेगवेगळे खेळ शिकतात.....मग अचानक एक दिवस इंद्रधनुष्य परत येतं, त्यावर बसून वेनलॉक आणि मॅण्डेविल त्यांच्या निर्धारित कामासाठी निघतात....जगभरात फिरून वेगवेगळ्या खेळाडूंना उत्साहित करायला, ऑलिम्पिक्सची बातमी पोहोचवायला....
उद्घाटनाच्या दिवशी वेनलॉक आणि मॅण्डेविल पुन्हा एकदा लंडनमध्ये जल्लोषात दाखल होणार....जगभरातील खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांसोबत !

Wenlock & Mandville.jpgरंग : वेनलॉक - केशरी-पिवळा, मॅण्डेविल - निळा

डोक्याचा आकार : वेनलॉक - स्पर्धेत जिंकल्या जाणार्‍या तीन पदकांचे प्रतीक (काहींच्या मते स्टेडियममधील तीन जागांचे प्रतीक),
मॅण्डेविल - हेल्मेटच्या आकाराच्या डोक्यावर पॅरालिम्पिक्सच्या तीन रंगांचे पट्टे आहेत.

डोक्यावरील पिवळा दिवा : लंडनच्या टॅक्सीवर असतो तसा पिवळा दिवा वेनलॉक आणि मॅण्डेविलच्या डोक्यावर आहे.

एक डोळा : दोघांच्या चेहर्‍यावरील एक डोळा हा कॅमेर्‍याचे काम करतो. भेटलेले लोक, पाहिलेले खेळ सगळं ह्या कॅमेर्‍याच्या मदतीने हे दोघे टिपून ठेवतात.

हातातील दागिने : वेनलॉकच्या उजव्या हातात निळा आणि पिवळा , तर डाव्या हातात लाल, हिरवा आणि काळा ह्या रंगाचे फ्रेंडशिप कडे आहेत (ऑलिम्पिक्सच्या कड्यांचे रंग)
मॅण्डेविलच्या उजव्या हातात गुलाबी रंगाचे अचूक वेळ मोजणारं घड्याळ आहे (Personal best timer)

यंदाच्या ऑलिम्पिक्समध्ये समावेश असलेले खेळ :

१. जलविभाग : Aquatics

- Diving
- Swimming
- Synchronized Swimming
- Water polo

२. धनुर्विद्या : Archery
३. अ‍ॅथलेटिक्स : Athletics
४. बॅडमिंटन : Badminton
५. बास्केटबॉल : Basketball
६. बॉक्सिंग :Boxing
७. Canoe kayak

- Slalom
- Sprint

८. सायकलिंग :Cycling

- Cycling BMX
- Cycling Road
- Cycling Track
- Mountain Bike

९. घोडेस्वारी : Equestrian

- Dressage
- Eventing
- Jumping

१०. Fencing
११. फुटबॉल : Football
१२. गोल्फ : Golf
१३. जिम्नॅस्टिक्स : Gymnastics

- Artistic Gymnastics
- Rhythmic Gymnastics
- Trampoline

१४. हँडबॉल : Handball
१५. हॉकी : Hockey
१६. ज्युडो : Judo
१७. मॉडर्न पेन्टॅथलॉन ?? : Modern pentathlon
१८. नौकानयन : Rowing
१९. रग्बी : Rugby
२०. Sailing
२१. नेमबाजी : Shooting
२२. टेबल टेनिस : Table tennis
२३. तायक्वोंदो : Taekwondo
२४. टेनिस : Tennis
२५. ट्रायॅथलॉन : Triathlon
२६. व्हॉलीबॉल : Volleyball

- Beach volleyball
- Volleyball

२७. वजन उचलणे : Weightlifting
२८. कुस्ती : Wrestling

- Greco-Roman
- Freestyle

********************************************************************************************************************
- सर्व चित्रे जालावरून साभार.
- वर यादी केलेल्या अनेक खेळांची मराठी नावे आणि अर्थ माहीत नाही. ज्यांना माहीत आहे त्यांनी ती सांगावी अशी विनंती.
- ह्या साइटवर वेनलॉक आणि मॅण्डेविलची गोष्ट, खेळ वगैरे आहेत.

सध्या आमच्याकडे मुलाच्या कानावर हे शब्द अधूनमधून पडत राहतील अशा पद्धतीने फक्त चर्चा करत आहोत (त्यात आम्हा दोघांनाही अनेक नवीन गोष्टी कळत आहेत.)
हळुहळू त्याच्याकडून प्रश्नांना सुरूवात झाली की मग माहिती, गोष्टी सांगायच्या असा विचार आहे.
त्याला रूची वाटेल अशा पद्धतीने काही क्राफ्ट्स बनवायची योजनाही आहे.
त्यात ऑलिम्पिकचा झेंडा, ज्योत, ऑलिव्हचा मुकुट, पदके आणि मॅस्कॉटस बनवावे असं वाटतंय.
खेळाडूंची नावे आणि खेळ ह्याविषयी लगेच तो विचारेल किंवा आम्ही सांगू शकू की नाही ह्याचा अंदाज येत नाहीये.
पण सुरूवात तर करतोय.

तुमच्याकडे ह्यासंबंधित क्राफ्टसच्या काही कल्पना असतील तर इथे लिहाल का ?
तुम्ही किंवा तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी बनवलेले क्राफ्टस, चित्रेसुद्धा आपण शेअर करू शकू.

उदा. - लाजोकडून ऑलिम्पिकच्या कड्यांचे आयसिंग असलेला केक, रचनाशिल्पकडून एखादी ओरिगामी वस्तू (झेंडयाच्या कड्या, मॅस्कॉटस वगैरे), जागूसारख्या निसर्गप्रेमींकडून रंगीत फुलांपासून बनवलेला झेंडा.

सगळ्यांच्याच छोट्यामोठ्या कल्पनांचे स्वागत Happy

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमची मँडेविल आणि ऑलिम्पिक्सच्या रिन्ग्ज....
मोठ्या रिन्ग्जपासून प्रेरणा घेऊन लेकाने क्लेपासून छोट्या रिन्ग्ज बनवल्या आहेत.

Mnadeville.JPGWenlock & Mandeville at home.JPG

रुणु, मस्त धागा गं. सहीच माहिती दिली आहेस. यापासुन प्रेरणा घेवुन सोसायटीतल्या लहान मुलांसाठी ऑलिम्पिकची माहिती आणि अशी कलाकुसर यावर एक वर्कशॉप घेता येइल. Happy पावसाच्या दिवसांमधे तसंही बोअरच होतात. एक शनि/रविवारी हे करता येइल.

मनिमाऊ, वर्कशॉपची कल्पना भारीये. गो अहेड.
लाजोतै __/\__
आल्यातून वेनलॉक घडवला, आता लसणाच्या पाकळीतून मँडेविल बनव बघू Proud
पण खरंच भारी दिसतोय वेनलॉक. चेहर्‍यावर कॅमेर्‍यासाठी एक ठिपका देऊन टाक. मग एकदम परफेक्ट !

क्लेच्या रिंग्ज्स मस्त बनविल्या आहेत.
दिनेशदा नादिया १९७६ अगदी अगदी.
व स्विमिन्ग बघत आहेच. मुलगी पहिल्या पासून मेक इट ऑर ब्रेक इट सिरिएल झी कॅफे वर बघते. त्यात ऑलिंपिक ला जाऊ बघणार्‍या मुलींचे स्ट्रगल दाखविले आहे.

फेल्ट च्या कापडापासून पण रिंग्ज बनविता येतील. किंवा क्रोशे मध्ये उच्च कलाकार आहेत ते बनवू शकतील. पाच प्लेन डोनट्स आणून. रॉयल आयसिंग मध्ये कलर्स घालून रिंग्ज्स बनविता येतील
मधल्यावेळच्या खाण्यासाठी.

अगदी छोट्या मुलांचे एक खेळणे येते प्लास्टिकच्या रिंग्ज्स एकावर एक घालायच्या असतात ते ही घेऊन रिंग्ज चे डेकोरेशन मुलांच्या बाथरूम मध्ये लावता येइल. जाता येता उड्या मारून हात लावायचा. ( अर्थात पाय घसरला नाही पाहिजे.)

रुणु Happy

आल्यातून वेनलॉक घडवला, आता लसणाच्या पाकळीतून मँडेविल बनव बघू<< ते काम त्या निसर्गदेवतेचे गं बाई Happy

मी दुकानात आले घेतले तेव्हा लक्षात पण नाही आला शेप. पण घरी आल्यावर फ्रिज मधे ठेवायच्या आधी ओट्यावर ठेवले आणि एकदम स्ट्राईक झाले की हा तर वेनलॉक Happy

@अमा, आयडियाज छान आहेत Happy

Pages