The Dark Knight Rises

Submitted by लोला on 21 July, 2012 - 10:56

ज्यांनी पाहिलेला नाही..
त्यांनी अवश्य पहा. IMAX मध्येच पहा. तिकिटे मिळत नसतील(इतके दिवस काय केले?) तर थोड्या दिवसांनी पहा. थांबवत नसेल तर साध्या पडद्यावर पहा मग नंतर पुन्हा IMAX पहा. IMAX मध्ये कितीही वेळा पाहू शकता. दृश्य अंगावर आले पाहिजे. खुर्ची हादरली पाहिजे. Go big or go home!

पुढचे वाचू नका.

---------

बॅटमॅन trilogy मधला हा शेवटचा सिनेमा. दुसर्‍या सिनेमाच्या शेवटी डेन्टला हीरो ठरवण्यासाठी आळ स्वतःवर घेऊन तो संन्यासात गेला आहे..

'बेन' नावाचा अतिरेकी लीडरने Gotham city ला वेठीला धरलेले आहे त्याचा बीमोड करण्यासाठी बॅटमॅन संन्यासातून बाहेर येतो. त्याच्या मदतीला आणि घोळ घालायला कॅट्वुमन ज्युवेल थीफ सेलीना (अ‍ॅन हॅथावे) आहे. चांगली आहे, बघवते. हिचे नाव ऐकून 'काय करते देव जाणे' असे वाटले होते, पण सुखद आश्चर्य. Marion Cotillard सुद्धा थोडक्यात पण ठीक आहे. दुसरी कोणीही चालली असती.

Joseph Gordon-Levitt चा पोलीस ऑफिसर "ब्लेक" मस्त! ख्रिश्चन बेल, मॉर्गन फ्रीमन, गॅरी ओल्ड्मन आणि मायकेल केन आपपल्या जागी चोख आहेत. व्हिलन 'बेन' (टॉम हार्डी) कडून थोडी निराशा झाली. त्याला घातलेल्या मास्कमुळे त्याचा पूर्ण चेहरा कधीच दिसत नाही आणि मास्कमधून येणारा आवाज रोबोसारखा वाटतो. फक्त बॉडी लॅन्ग्वेज आणि अ‍ॅक्शन सीन्स एवढंच मर्यादित राहिल्यामुळे आणि नकळत 'जोकर'शी तुलना झाल्यामुळे तो कमी पडला असं वाटलं. जोकरच बेस्ट होता.

२ तास ४५ मिनिटे लांबीचा असून कुठे कंटाळा येत नाही. cinematography, action scenes, sound इ. चा पूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर IMAX ला पर्याय नाही असे वाटले.

"बेस्ट पिक्चर" वगैरे माहीत नाही, पण निखळ मनोरंजनात चित्रपट कुठे कमी पडत नाही.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथे आयमॅक्सच माहीत नाही, पण नेहमीच स्क्रीनपण मोठेच असतात तसे. इथले लहान वाटतात.

>>डार्क नाइट भाग दोन
म्हणजे नुसता 'डार्क नाईट' का? की हा कुठला रज्जनीचा आहे? Happy

काल एकट्यानेच पाहिला "बॅटमॅन". हा अ‍ॅक्शनपट कमी आणि भावनाप्रधान चित्रपट जास्त वाटला. संपुर्ण गॉथम शहर वेठीस धरणे, त्यातही वेन फाऊंडेशनने मदत केलेल्या अनाथलयाचा खास भाग, ज्वेल थीफ Wink .. रच्याकने काही सीन्स मधले स्पेशल इफेक्ट्स जबरदस्त. बॅटमॅन एंट्री खास. त्या विहीरीच्या शिक्षेची आयडीया बहुदा आशियायी किंवा आखाती देशातलीच असावी असं वाटलं. अल्फ्रेडचे काही डायलॉग्स मस्तच. नया दौर चं गोडबंगाल काही कळंलच नाही. Happy

लहान मुलांच्या सुपरहिरोंच्या षिणेमात दाखवण्यात येणा-या चुंबनदृश्यांची तक्रार करण्यासाठी ओबामांना पत्र लिहायला घेतलंय.

लहान मुलांच्या सुपरहिरोंच्या षिणेमात दाखवण्यात येणा-या चुंबनदृश्यांची तक्रार करण्यासाठी ओबामांना पत्र लिहायला घेतलंय.>>>>>>>>>>>>>> तु कशाचा निषेध करतोय..?....दाखवली म्हणुन की कमी दाखवली म्हणुन ;).. Happy
.
.
.
अत्यंत संथ चित्रपट... फक्त गाणे गात होते एवढेच काय दाखवायचे बाकी होते..:हाहा: ... इतका हलाखीची परिस्थिती झालेला सुपरहिरो आणि नंतर एकदम पावरफुल झालेला बघणे हे फक्त रजनिकांत च्या बाबतीतच आम्ही विश्वास ठेवु शकतो . हे बहुदा दिग्दर्शक विसरतो वाटते.... किमान कैदखान्यात बॅटमॅन ला ते कैदी काही चमत्कारी औषधी काढा पाजतात त्यामुळे त्याला ३ महिन्यात सुपरपावर येते असे तरी दाखवायचे ..३८-४२ वर्षाच्या माणसाला हे झेपत नाही हो.. Wink ..... बहुदा सचिन तेंडुलकर पासुन प्रेरणा घेतली आणि या वयात अचाट करुन दाखवण्याचे मनावर घेतले असे तरी दाखवा..........
.
.
१५० पैकी ३५ रुपये वसुल झाले..............कशात विचारु नका Wink

हा लहान मुलांचा सिनेमा नाही. Happy

>>३८-४२ वर्षाच्या माणसाला हे झेपत नाही हो
अमेरिकन लोकांना झेपते. Proud

शूम्पी, नुसता रिझल्ट नाही लिहायचा.

Heath Ledger ने आधीच्या 'द डार्क नाईट' मध्ये अप्रतिमपणे जोकर वठवुन ज्या पातळीवर तो सिनेमा पोहोचवला होता, त्या मानाने 'द डार्क नाईट राईझेस' एकदमच मुळमुळीत वाटला. काहीही म्हणा पण ‎"The Dark Knight will never rises without The Joker's legendary performance!

वैद्यबुवा, मी सिनेमा आवडत नाही असं नाही हो म्हंटलं. मला बॅटमॅनच फारसा आवडत नाही म्हणुन अजुन त्याचे सिनेमे पण मी पाहिले नाही आहेत.

हायला, हे कसं वाचायच राहिलं Uhoh
लोला पुर्ण लेखाला +१००
जुन्या बॅटमॅन सिनेमांच्या पापकर्मांची शिक्षा 'नोलान-बेलच्या' बॅटमॅनला देऊ नका..
पहिले दोन्ही आणि नवीन आलेला तिसरा सिनेमा अवश्य अवश्य बघाच. !!!>>> +१
अर्थात काही रजनीकांत गोष्टी आहेत, पण बॅटमॅनच्या प्रेमापुढे काहीच नाही. Wink
मी सकाळी आणि परत रात्री असा एका दिवसात दोनदा पाहिला. Happy

बॅटमॅनचे सगळे भाग क्रमानेच बघणे आवश्यक आहे (निदान ३ रा बघण्याआधी १ ला तरी बघायलाच हवा, ३ र्‍याची सुरवातही २ र्‍या भागाच्या पार्श्वभूमीनेच होते) नाहीतर ते रास-अल-गुल, लीग ऑफ शॅडोज आणि त्यांची मानसिकता आणि हेतू, हार्वी डेंट, बॅटमॅनचा सन्यास ह्यांची लि़ंक लागणार नाही.
नुसता 'सुपरहीरोचा अ‍ॅक्शन सिनेमा' म्हणून बॅटमॅन बघायला जाणार असाल तर मनोरंजन होणार नाही. त्यापेक्षा रजनीकांतचा (सलमानचासुद्धा) सिनेमा जास्त मनोरंजक असेल.
कारण बॅटमॅन सुपरहीरो नाही, त्याच्याकडे कुठलीही सुपरपावर नाही तो फक्त विजिलांटी म्हणता येईल.
अ‍ॅक्शन त्यात गौण आहे असे म्हणणे नाही पण फक्त अ‍ॅक्शनच ह्या सिनेमाचा गाभा नाही.
अजूनही बरेच लिहिता येईल पण राहूदेत.
V for Vendetta त्यातल्या अ‍ॅक्शन सिक्वेन्ससाठी बघणार की त्याच्या प्लॉट, स्क्रीप्ट व त्यामागचा मुख्य विचार आणि एकंदर सिनेमाचे एक्झीक्यूशन ह्यासाठी?

मला गॅरी ओल्डमनचा गॉर्डन तिन्ही भागांमध्ये बेलच्या बॅटमॅनपेक्षाही जास्त आवडून गेला. आतून अतिशय स्ट्राँग पण दर्शनीय अविर्भाव भिडस्त असल्यासारखा आणि हे बेअरिंग त्याने तिन्ही भागात कमालीचे सातत्य राखत सांभाळले आहे.
गॉर्डन्-लेवीटचा ऑफिसर ब्लेकही चांगलाच ऊठून दिसला.

****स्पॉईलर वॉर्निंग

३र्‍या भागाच्या मला वाटलेल्या काही पडत्या बाजू
१) कोटिलार्डचा टर्न-द-कोट फार प्रेडिक्टीव
२) बेन-बॅटमॅनची फार जास्त वन-टू-वन, मॅन-टू-मॅन फाईट.
३) विहिरितून पहिल्याने बाहेर आलेला नक्की कोण ह्याबाबतीतच्या कंफ्यूजनचा ऊलगडा (ह्यात जयपूर कश्याला दाखवले?)
४) पहिल्या दोन भागांशी (आणि ईन्सेप्शन) ईमान राखणारे टाईट पॅक्ड प्रेझेंटेशन नोलानच्या हातून निसटल्यासारखे वाटले.

बॅटमॅन आणि बेल नेहमीप्रमाणे अनसंग हीरोच राहतील. Happy

म्या गरीबानं पण पाहिला एकदाचा. आपल्यापेक्षा मुलं बिझी होण्याचं एक वय असतं ते झाल्याचं फील येत होतं. होली बॅट मिडल एज! बाईला क्लास मधून घरी घेऊन जायचं आणि ऑफिस संपल्यावर काय करायचं नक्की अश्या गोंधळात असताना जाऊन बसले. आइस्क्रीम घेइपरेन्त व इंटरवहल नसल्याने एक कार्य करून येइपरेन्त सिनेमा सुरू झाला.

खरे तर ते अमेरिकेतील हत्याकांड जेव्हा झाले त्या क्षणाला मला सिनेमा गृहात बसायचे होते. बहुतेक मिस झाले. त्याला विहीरीत टाकतात तेव्हा पासून पाहिले. सरप्राइज पॅकेज जोजफ गॉर्डन लेव्हिट आहे सिनेमात. तो इन्सेप्सन पेक्षा जास्त छान व मोठा दिसतो. ( मी ह्यामुलग्यास थर्ड रॉक फ्रॉम द सन सिरीअल पासून बघत आहे. ) विहिरीतला मायकेल केन आहे का? कुठे ही दिसला नाही. गोथॅम सिटी म्हणजे जेनेरिक वेस्टर्न सिटी आहे का? कॉमिक मध्ये जास्त छान वाटते. पोलिस लोकांना गटारांमधे
अडकवून ठेवायची आयडिया मस्त आहे. होली क्लीन बॅट टनेल्स.

ते सिटीभर अ‍ॅटॅक्स होतात तो सीन मस्त आहे. मॅच च्या आधी एक मुलगा राष्ट्रगीत म्हणतो ते कोणत्या देशाचे आहे? छान आहे. हार्डी ला काहीच काम नाही. इन्सेप्शन मध्ये त्याने सुरेख काम केले आहे.
कॅट वुमन एकदम चिल्लर वाटते. उगीचच पाठ केलेले डायलॉग म्हणते असे वाटते. क्लायमॅक्स मध्ये
ती तू पण निघून चल वगैरे म्हणते तेव्हा चक्क तिचे लिपस्टिक रन झाले आहे. इतक्या मोठ्या सिनेमात
अशी चूक कशी होते. ते अगदी नवशिक्या मुलीने लावल्यासारखे लाल भडक व एजेस ठीक नसलेले आहे. होली बॅड बॅट लिप्स्टिक! तिची बाईक बरी आहे पण आपल्या ट्रिनिटीच्या डुकाटीची सर नाही त्यास. बॅक ग्राउंड स्कोअर मस्त आहे.

कोटिलार्ड बाईचा रोल बोर आणि प्रेडिक्टेबल आहे. शेवटाला राडा करायची इन्सेप्शनची सवय दुसरे काय. तो बेन राजस्थानात कधी बरे आला असेल? एवढा किला सोडून त्याला विहीरच कशी सापडली?
बरे राजस्थानात स्टेप विहीर असते. ( संदर्भ : पहेली शाहरूख राणी भूत?)

क्लायमॅक्स छान आहे. मारिआन बरोबरचा काळा म्हातारा पण हरएक सिनेमात असतो. आपल्याकडील इफ्तेकार/ एके हनगल सारखा वाट्तो. कायम तोच एक रोल. गुड टाइम पास. आमच्या थिएट्रात
इंग्रजी संवाद खाली येत होते. इन केस आपण काही मिस केले तर. पण ती हातोहाती मारामारी बघताना रजनी ची आठवण येतेच. बॅट्म्यानाचे एक वाक्य फार मस्त आहे. व्हेन यू आर
ऑपरेटिंग अलोन यू शूड वेअर अ मास्क. टू प्रोटेक्ट युअर लव्हड वन्स. होली गुड बॅट टीपी मुव्ही.

आता फक्त कॉमिक्सबुक मधे सर्वाधिक खपाचा फँटम यायचा राहीलाय... !>>>

किरण, फँटमही आलाय कधीच पडद्यावर. बिली झेनने केला होता साकार.
http://www.imdb.com/title/tt0117331/

the_phantom_new_movie_poster.jpg

Pages