कसा राहू मी अभंग आता

Submitted by सुधाकर.. on 20 July, 2012 - 11:29

कसा राहू मी अभंग आता
तुझा सोसवेना संग आता.

दवांत नाहून पहाट आली
ग झाक फ़ूलांचे अंग आता.

कधीचा आहे निरंगीच मी
तुझा वेगळा दे रंग आता.

फ़ुलावयाची तू ठेव आशा
पाषाण पावते भंग आता.

मधूर बोल हे निष्प्रेमाचे
शब्दही झाले भणंग आता.

जगाचा नुरला ताल विठ्ठला
इथे बोलेना मृदंग आता.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मित्रवर्य ऑर्फीअस आपणाकडे खयाल अस्सल व चांगल्या दर्जाचे आहेत
कवित्व अजून थोडे बरवे करावे
आपला हा गझल प्रयत्न पाहून आम्हास एक जुनी रचना स्मरली तीची जोडवाट (लिंक) देत आहोत

http://www.maayboli.com/node/33625

पुनःप्रत्यय दिल्याबद्दल आभारी आहोत

धन्यवाद

http://www.maayboli.com/node/33625 .....

...... हा प्रयत्न छान होता वैभू तुझ्या परिने
तो अमॄत कुंभ होता दिधला तुला हरिने.

....................... धन्यवाद.