नमस्कार दोस्तांनो,
कधीतरी, कुठेतरी, कोणत्यातरी, अशाच विषयाची वाचली - ऐकलेली चर्चा माबोवर का होऊ नये म्हणून हा धागा सूरू करतो आहे..
तर मुद्दा असा आहे की,
आपण केबल वा डिशचे दरमहा बील स्वतःच्या कमाईने भरतो (अपवाद क्षम्य)
बील याचा अर्थच असा आहे की आपण उपभोगलेल्या सुविधेची किंमत अदा करणे.
अपेक्षा निव्वळ मनोरंजनाची(?) असते मात्र कोणत्याही प्रसारणात मुख्य कार्यक्रमा इतक्याच जाहिराती बघणे आपल्याला बंधन कारक बनते..
खरे तर जाहिरात ही उत्पादक, ग्राहकापर्यंत स्वखर्चाने पोहचवत असला तरी ती पाहण्याचे अनौपचारीक बंधन ग्राहकावर का यावे?
यात उत्पादका ऐवजी ग्राहकाचा वेळ खर्ची का पडावा?
पॅकेजच्या नावाखाली अनावश्यक चॅनेल माथी मारणे आपण का स्विकारतो आहोत...
हे म्हणजे न खाल्लेल्या जेवणाचे बील भरल्या सारखे नाही आहे का ?
जगात सगळीकडे अशीच व्यवस्था आहे का?
याला काही पर्याय आहे की नाही?
........... आपली मते कदाचित भविष्याची क्रांतीकारक पाऊले असू शकतात.
.................................................शाम
शाम, केबलच्या बाबतीत नाही
शाम, केबलच्या बाबतीत नाही (म्हणजे माहित नाही) पण वर्तमानपत्राच्या बाबतीत, खर्चाचा बराचसा भाग जाहिरातदारच उचलतात. त्यामूळे तिथे आपल्याला तक्रार करायला जागा नाही.
टिव्हीच्या बाबतीत मात्र, तसे नसावे.
आणि मुद्दा पटलाच.
मी मागे चित्रलेखात वाचले होते. एका युरोपीयन देशात, ग्राहकाना टेलिफोनचे बिल भरावे लागत नाही, त्यासाठी फोन चालू असताना, काही ठराविक काळासाठी जाहिरात ऐकावी लागते. हि जाहिरात, फोन दरम्यान कधीही (सुरवातीला, मधेच !) वाजवली जाते. मला वाटतं हा चांगला पर्याय आहे.
मी उचलले पाउल..........
मी उचलले पाउल..........:)
मुद्दा विचार करण्यासारखा आहे
मुद्दा विचार करण्यासारखा आहे पण आपण भरतो त्या बिलातून चॅनेल्सना मिळणार्या रेव्हेन्यूचे आणि चॅनेल्सच्या खर्चाचे गणित अभ्यासल्याशिवाय मत मांडण्यात अर्थ नाही.
@ दिनेशदा....>> , केबलच्या
@ दिनेशदा....>> , केबलच्या बाबतीत नाही (म्हणजे माहित नाही) पण वर्तमानपत्राच्या बाबतीत, खर्चाचा बराचसा भाग जाहिरातदारच उचलतात. त्यामूळे तिथे आपल्याला तक्रार करायला जागा नाही.>>>>
पेपरची जाहिरात आपण दुर्लक्षीत करू शकतो.. हा ही मुद्दा आहेच की.
चॅनेल्सच्या खर्चाचे गणित
चॅनेल्सच्या खर्चाचे गणित अभ्यासल्याशिवाय मत मांडण्यात अर्थ नाही. >>
पण चॅनेल्स आपण विकत पाहतो आहोत. जर ते चॅनल त्यांना परवडवत नसेल तर बंद करा. कोणीच थांबविले नाही. दूरदर्शन सारखे नाही की जिथे चॅनेल ऑन एअर फुकटात मिळते. फुकट असल्यामुळे जाहिरात सहन करावी लागते. जिथे पैसे देऊन विकत घेतले जाते, तिथे सहन का करावे हा प्रश्न उरतोच.
ह्यातून मार्ग काढण्यासाठी (जाहिराती) काही रेडिओ चॅनेल विना जाहिरात प्रसारण करते. मात्र त्या सुविधा वापरण्यासाठी पैसे घेते. उदा सिरियस एक्स एम. पॅन्डोरा इत्यादी अनेक. व पिक्चर देखील विना जाहिरात पाहता यावा म्हणून त्या चॅनेलचे जास्त पैसे घेते. उदा HBO, Stars pack इत्यादी इत्यादी.
आपल्याकडे अजून ही जागरूकता आलेली नाही. तुरळक चॅनेलवर पिक्चर बघताना कमी जाहिराती लागतात ही स्वागतार्ह बाब आहे. मुद्दा असाकी लोक जाहिराती नसतील तर जास्त पैसे द्यायला तयार आहेत. तरीही पैसे देऊन जाहिराती माथी मारल्या जातात. म्हणून आर्थिक दृष्ट्या परवडत नसेल तर बंद करण्याशिवाय पर्याय नाही कारण हा बिझनेस आहे. कंटेंट चांगले असेल तर व्हॉल्युम बिझनेस आपोआप होतो. ग्राहक म्हणून आपल्या हक्कांविषयी जागरुकता नाही, त्यामुळे पैसे देऊन आपण जाहिराती पाहतो.
"Great TV just got better!
"Great TV just got better! Now you can automatically skip commercials in
prime time TV – on ABC, CBS, FOX and NBC in HD. Only with the Hopper.
Only by DISH."
अशी जाहिरात आजकाल दिसते इकडे.
म्हणजे आधी पैसे देऊन जाहिराती बघायच्या नि नंतर जाहिराती न बघण्यासाठी आणखी पैसे द्यायचे!
आम्ही डीव्ही आर च्या आधी टिव्हो, नि त्याच्याहि आधी टेप्स वर कार्यक्रम रेकॉर्ड करून नंतर बघायचो. म्हणजे एक तासाचा कार्यक्रम ४५ मिनिटात बघून होत असे, जाहिराती आल्या की फास्ट फॉरवर्ड!
आता फक्त फुटबॉल. टेनिस, बेसबॉल बघतो. त्यात जाहिराती येतात म्हणून बरे असते, कारण त्यावेळी उठून चहा करून आणता येतो, पाय मोकळे करता येतात.
नीधप+१ HD चॅनेल्सवर जाहिराती
नीधप+१
HD चॅनेल्सवर जाहिराती नसतात का?
http://www.livemint.com/2012/04/12232340/HD-viewers-may-soon-see-the-en....
नवे चॅनेल सुरुवातीला
नवे चॅनेल सुरुवातीला फ्रीटूएअर ठेवतात. व त्यात जाहिराती आपण दुर्लक्षित करतो, कारण ते फ्री टू एअर आहे. नंतर हळूहळू त्या चॅनेलचे अॅडिक्शन झाले, की लोक ते पहातच रहातात, अन पैसे देऊनही जाहिरातीसह चॅनेल पहावे लागते. जेणेकरून फ्रीटूएअर कालाचा पैसाच नव्हे तर कित्येकपट जास्त वसूली झाली पाहिजे.
डीस्कव्हरी सारखी काही चॅनेल्स तर दिवसाचे काही तास शुद्ध जाहिरात अन जाहिरातच फक्त दाखवतात. टेलेशॉपी अश्या नावाखाली.
पॅकेज बंडल्सच्या नावाखाली एक्स्ट्रा चॅनेल गळ्यात मारून त्यात २४ तास जाहिराती अन विक्री करणारे एक स्टारचे नवे चॅनेल निघालेले आहे.
२४तास न्यूजवाले २२ तास भूतप्रेत अन तंत्रमंत्र भविष्य सांगत उरलेले २३ तास त्यासाठीचे गंडे दोरे ताईत विकत असतात...
अन हे सगळे दाखवण्यासाठी जाहिरातदार चॅनलवाल्याला पैसे देतो, अन आपण पहाण्यासाठी.
केबल स्वस्तात पहाता येत होती. आता 'रेव्हेन्यु' बुडतो या लेबलखाली सरकारी नियम आणून सर्रास सग्ळ्यांच्या गळ्यात सेटटॉप बॉक्ष घालणे सुरू आहे..
बाकी भारतात काय, सगळेच
बाकी भारतात काय, सगळेच श्रीमंत! किती का पैसे पडेनात, आम्हाला बघायचे म्हणजे आम्ही बघणार! लोकांना कळायला नको का आम्ही किती श्रीमंत! ते जास्त महत्वाचे!!
मी काही वर्षांपूर्वी सहा महिन्यासाठी पुण्यात रहात होतो, तेंव्हा बोललो होतो की आमच्याकडे कसे सेल असतात, डिस्काऊंट असतात, गाडी विकत घेताना कशी घासाघीस करतात तेंव्हा तिथल्या लोकांनी मला सांगितले, छे छे, आम्ही नाही असे काही करत, आम्हाला डिग्निटि आहे, आम्ही मागतील तेव्हढे पैसे देतो, घासाघीस करत नाही, स्वस्तात मिळालेले काही घेत नाही!
तर तुम्हाला डिग्निटी असेल तर पेट्रोलचा भाव वाढला, केबल चॅनेलचा भाव वाढला, म्हणून उगाच तक्रार करू नका!
बिचार्या मल्ल्याची एअरलाइन बुडीत चालली आहे, तेंव्हा आता त्याच्याच एअरलाईनने जा, मग चौपट भाडे पडले तरी चालेल. त्याचे खर्च त्याच्या रेव्हेन्यू पेक्षा जास्त आहेत, तेंव्हा साहजिकच आहे, की त्याची भाडी जास्त असणार! त्यात तक्रार काय करायची! उलट ते चौपट भाडे देऊन जा नि लोकांसमोर प्रौढी मिरवा, आम्हाला डिग्निटि आहे, आम्ही फक्त मल्ल्याच्या महाग एअरलाईनने प्रवास करतो.
फॉरवर्ड करायच्या. नको असेल
फॉरवर्ड करायच्या. नको असेल तर. जाहिरातींशिवाय नेट्वर्क चालवणे शक्य नाही. प्रॉडक्क्षन व्हॅल्यूज कमी होतील.
एच डीवर कमी जाहिराती असतात
आपण भरतो त्या बिलातून
आपण भरतो त्या बिलातून चॅनेल्सना मिळणार्या रेव्हेन्यूचे आणि चॅनेल्सच्या खर्चाचे गणित अभ्यासल्याशिवाय मत मांडण्यात अर्थ नाही.
हेच म्हणतो.
मला वाटते आपण जे पैसे देतो, ते चॅनल आपल्या घरापर्यंत पोचवण्याचे भाडे असते. आपल्या पैशातून चॅनल्सचा सगळा कारभार चालत नाही. दूरदर्शनची गोष्ट वेगळी आहे. खाजगी चॅनल चालवणे हा खर्चिक प्रकार असावा, जो जाहिरातीशिवाय शक्य होणार नाही.
(मी इथे (बहुधा) ऑड मॅन आऊट होईल, पण व्यक्तिशः मला जाहिराती पहायला आवडतात. केवळ ३०-४० सेकंदात उभे केलेले ते विश्व कित्येकदा कल्पकतेचा आणि अभिनयाचा सुरेख आविष्कार असतो. कित्येकदा मला मालिका आणि न्यूजपेक्षाही नवनवीन जाहिरातीच पडद्यासमोर गुंगवून ठेवतात ! शिवाय मॅच वगैरे पाहतांना जाहिरातीमुळे आवश्यक तो ब्रेक मिळतो.
अर्थात, हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. इतरांना जाहिराती न आवडणे शक्य आहे, हे समजू शकतो.)
हे घ्या गणित. उदाहरणादाखल झी
हे घ्या गणित. उदाहरणादाखल झी टिव्ही. ही गणितं मनीकंट्रोलवर दर तिमाहीत प्रसिद्ध होतात.
http://vidz.zeecdn.com/zeetele/pdfs/zeear2011-12spreadviewnavigational-e...
झी ला फायदा झाला तर बरंच आहे की. माझे खूप शेअर्स आहेत.
केतन मेहताचा काळात झी टेलिफिल्म इतकी प्रसिद्ध झाली होती की ज्याच नाव ते. इथे जे १५-१७ वर्षांपासून झीला शेअर म्हणून फॉलो करतात त्यांना कळेल ते.
ज्ञानेश,
ज्यांना जाहिराती बघायच्या आहेत त्यांनी त्या नक्कीच स्टॅन्डर्ड टिव्हीवर बघाव्यात. ज्यांना बघायच्या नाहीत, त्यांनी जास्त पैसे देऊन ते वेगळे चॅनेल, ज्यावर तेच कार्यक्रम असतात, ते घ्यावे असे काहीसे म्हणणे आहे. जाहिराती चांगल्याच असतात, पण कंटाळा देखील येतो.
ज्ञानेश +१ दिवाळी अंक (काही
ज्ञानेश +१
दिवाळी अंक (काही उजव्या बाजूची पानेही जाहिरातींना देणारे), कॉलेज मॅगॅझिन्स, अगदी सार्वजनिक गणेशोत्सवांनाही जाहिराती चुकलेल्या नाहीत.
सेट टॉप बॉक्समुळे आपण प्रत्येक चॅनेलसाठी वेगवेगळे पैसे भरू लागलो असलो तरी जाहिरातींशिवाय कार्यक्रम बघायला आणखी पैसे मोजावे लागतील.
मयेकर तुम्ही उत्तर दिलेले
मयेकर तुम्ही उत्तर दिलेले मुद्देही परत परत मांडता आहात. गणिताचेही उदाहरण दिलेच.
दिवाळी अंक, मॅगझिन्स, पेपर इ इ इथे जाहिराती "टाळून" पुढे जाता येत.
जाहिरातींशिवाय कार्यक्रम बघायला आणखी पैसे मोजावे लागतील. >> तेच तर वर लिहिले की! "ज्यांना जाहिराती बघायच्या आहेत त्यांनी त्या नक्कीच स्टॅन्डर्ड टिव्हीवर बघाव्यात. ज्यांना बघायच्या नाहीत, त्यांनी जास्त पैसे देऊन ते वेगळे चॅनेल, ज्यावर तेच कार्यक्रम असतात, ते घ्यावे असे काहीसे म्हणणे आहे".
फार फार पूर्वी म्हणजे सहा महिन्यांपूर्वी भारतात मोबाईलवर देखील जाहिरातीचे समस यायचे. गरज नसताना! मग तसा कायदाच आला, अन आता यु कॅन ऑप्ट आउट! म्हणजे मी पैसे (मोबाईलचे ) देणार, नंबर घेणार, आणि जाहिराती वाचणार. ह्याला काही अर्थ नाही. जागरूकतेमुळे हे बंद झाले. ज्याला अजूनही मोबाईलवर समस हवे आहेत, ते जरूर ऑप्ट ऑट न करता वाचू शकतात.
अनेक सोयी, सुविधा मोबाईल कंपन्या केवळ तुमचा नं आहे म्हणून तुमच्या माथी मारत होत्या. आता ते ही बंद झाले.
केदार, दिवाळी अंकाचे उदाहरण
केदार, दिवाळी अंकाचे उदाहरण पुन्हा अपरिहार्य गणित समजवण्यासाठीच दिले होते. तसेच कुणाला टीव्हीवरच्या जाहिराती वैताग देत असतील तर कुणाला दिवाळी अंकांतली जाहिरातीची पाने उलटणेही वैताग वाटू शकते.
आता तर मायबोलीवरच्याही जाहिराती सहज टाळता येत नाहीत.
काही माध्यमांतल्या जाहिराती टाळता येण्यासारख्या असतात आणि टीव्हीवरच्या नसतात हेही आता आधुनिक तंत्रामुळे मागे पडले आहे. आता हवा तो कार्यक्रम रेकॉर्ड करून हवा तेव्हा बघायची सोय झाली आहे. पैसे मोजायची तयारी हवी.
माझ्यापुरते बोलायचे तर समोर ध्यान लावून बसून बघावेत असे कार्यक्रम टीव्हीवर मोजकेच असतात. तेव्हा टीव्ही बघताना मल्टिटास्किंग (बरेचदा वाचन) चालू असते. जाहिराती आल्या की टीव्ही आपसूक म्यूट होतो किंवा चॅनेल सर्फिंग केले जाते.
गणित प्रत्येक ठिकाणीच असते.
गणित प्रत्येक ठिकाणीच असते. दिवाळी अंक असो वा टिव्ही चॅनेल. तो बिझनेस आहे. आणि एकदा बिझनेस म्हणले की पर्यायाने उत्पन्न आलेच. त्यांनी जाहिराती, स्पॉन्सर्स जमवावेतच, त्याला नाही म्हणणे नाहीच. इथे मुद्द्यात गल्लत होते. सर्वसकट जाहिराती वाईट, पूर्ण बंद करा असे म्हणणे नाही, तर मला ठरवू दे, जाहिरात बघायची की नाही ते. हा मुद्दा आहे. प्रिंट मिडिया मध्ये जाहिराती टाळता येतात व पुढे जाता येते. टिव्हीवर तो पर्याय अजून भारतात उपलब्धच नाही. तो उपलब्ध झाला की खूप लोक जाहिराती टाळण्याकडे कल देणार.
मायबोलीवर जाहिराती येतात, पण फायरफॉक्स ची अॅड ब्लॉ़क सुविधा वापरा. एकही जाहिरात दिसणार नाही.
कारण "चॉईस आपला जन्मसिद्ध हक्क आहे."
उद्या जर मायबोली प्रशासनाने प्रत्येक पोस्ट नंतर एक जाहिरात टाकणे, पोस्ट सारखीच असे सुरू केले. (म्हणजे तुमच्या वरील व माझ्या ह्या पोस्ट मध्ये एक जाहिरात पोस्ट) तर मी मायबोलीला देखील रामराम म्हणेल.
HD चॅनेल्सवर जाहिराती नसतात
HD चॅनेल्सवर जाहिराती नसतात का?- फक्त त्या चॅनेलच्या कार्यक्रमाच्या जाहिराती असतात. १ मिन. पेक्षा जास्त नसतात.
<टिव्हीवर तो पर्याय अजून
<टिव्हीवर तो पर्याय अजून भारतात उपलब्धच नाही. तो उपलब्ध झाला की खूप लोक जाहिराती टाळण्याकडे कल देणार>
भारतातल्याच HD चॅनेल्सवर जाहिराती नसतात, असल्या तर टाळता येतात असे ऐकले आहे. अनुभव नाही.
दिवाळी अंक, मॅगझिन्स, पेपर इ
दिवाळी अंक, मॅगझिन्स, पेपर इ इ इथे जाहिराती "टाळून" पुढे जाता येत.>> कश्या टाळाव्यात या जाहिराती?
धागा आवडला व चर्चाही धन्यवाद
धागा आवडला व चर्चाही
धन्यवाद
नीधप + १ जगात सगळीकडे अशीच
नीधप + १
जगात सगळीकडे अशीच व्यवस्था आहे का?>>>>>
जगात माहित नाही पण अमेरिकेतः
१. फ्री टु एअर चॅनेल्स वर बर्याच जाहिराती असतात.(फुकट जर अँटेना असेल तर)
२. जी केबल चॅनेल्स आहेत (पेड - नॉट फ्री टु एअर) त्यावर तुलनेने कमी जाहिराती असतात.(केबल क्नेक्शन हवे)
३.एच बी ओ, सिनेमॅक्स, शो टाईम वगैरे जी प्रीमीयम चॅनेल्स आहेत त्यावर अजिबात जाहिराती नसतात. (महाग पॅकेजेस)
दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतर देशात (अमेरिकेत तरी) टीव्ही चॅनेल्स बरीच महाग आहेत. भारतात बहुतेक जाहिरातींमुळे आपले टीव्हीचे चार्जेस बरेच तुलनेने कमी आहेत (सबसिडाईझ्ड). जर जाहिराती कमी केल्या तर आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतील. आहे का तयारी आपली जास्त पैसे द्यायची?
धन्यवाद
धन्यवाद दोस्तांनो......
जाहीरात अनिवार्यच असेल तर...
पेपर वा तत्सप पेपर पब्लिशर्स जाहिरातींचे स्वतंत्र एडीशन्स काढतात... जी विनासायास दुर्लक्षीत करता येतात...
इथेही दोन प्रोग्रॅम मधली स्पेस वापरून असे करता येऊ शकते ..... मग जाहिराती आणि प्रोग्रॅम ज्याला हवे तसे स्वतंत्र बघता येईल .. हो ना?
जे हवे ते निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकाला असायलाच हवे.. पण तसे का होत नाही आहे?
कोणीतरी म्हणाले की चॅनेल्स घरापर्यंत पोहचवण्याचेच भाडे आपण देतो आहोत... असे असेल तर हा खर्च वेगवेगळ्या कंपण्यांना वेगवेगळा का यावा? हा ही विचार व्हावा...
सहभागा बद्दल सर्वांचे आभार... केदार यांच्याशी बर्याच अंशी सहमत.
मला वाटते आपले पैसे आणि
मला वाटते आपले पैसे आणि जाहिरातदारांचे पैसे असे दोन्ही मिळून चालतात चॅनेल्स.
मिडिया हे जाहिरातींचे सगळ्यात चांगले माध्यम आहे. जे ते कधीच सोडणार नाहीत. तुम्ही जाहिराती पहायला नकार दिलात तर त्या डायरेक्ट कार्यक्रमातच येऊ लागतील. त्याऐवजी आपला खर्च कमी होतोय हे पहावे.
हां ते गणित समजाऊन घेऊन आपले बिल अजून कसे कमी होईल ते पहाता येईल म्हणा.
पण मिळणार्या सुविधांच्या प्रॉडक्शन कॉस्टशी ग्राहकाला मोजाव्या लागणार्या किंमतीचा भारतात मेळ कुठे घातला जातो? तो घातला जातो तुमच्या भावना कुठे गुंतल्यात याच्याशी.. आणि जास्तीत जास्त फायदा घेतला जातो त्याचा. टीव्ही शिवाय रहावत नाही? लहान मुलांसाठी खर्च करायचाय? स्वतःच्या घराचे स्वप्न आहे? जवळच्या माणसाला चांगल्या वैद्यकीय सुविधा हव्यात? दर्जाची ग्यारंटी नाही. पण पैसे अफाट मोजा.
तुम्ही म्हणा ये दिल है हिंदुस्तानी!
ते म्हणतात ये डील है हिंदुस्तानी!
केदार अॅड ब्लॉक्च्या
केदार अॅड ब्लॉक्च्या 'आय्डीया' साठी धन्यवाद.... एवढ महागाच ३ जी वापरायच आणि साधं सकाळच्या हेड्लाइन्स बघताना व्हिडीओ स्ट्रिमींग व्हायच...
पण सगळ्यांनीच अशा जाहिराती बंद केल्या तर मग रेव्हेन्यु कसा जनरेट होणार ?
पण मला वाटत नाही कि अशा कोण्त्यातरी जाहिरातीचा मझ्याकडुन जाहिरातदाराला फायदा झाला असेल.
पण मिळणार्या सुविधांच्या
पण मिळणार्या सुविधांच्या प्रॉडक्शन कॉस्टशी ग्राहकाला मोजाव्या लागणार्या किंमतीचा भारतात मेळ कुठे घातला जातो? तो घातला जातो तुमच्या भावना कुठे गुंतल्यात याच्याशी>>> एक्झॅक्टली....
व्यवसाय करायचा म्हंटला तर
व्यवसाय करायचा म्हंटला तर आतबट्ट्याच्या व्यवहार कुणीच करणार नाही.
त्यामूळे आहे त्या परिस्थितीत, चॅनेल, जाहिरातदार, मालिका निर्माते, लेखक, कलाकार आणि टि आर पी मोजणार्या संस्था, सगळेच फायद्यात आहेत.
ग्राहकाला जे मिळतेय, त्यालाही त्याने फायदा म्ह्णायला शिकले पाहिजे.
कोणीतरी म्हणाले की चॅनेल्स
कोणीतरी म्हणाले की चॅनेल्स घरापर्यंत पोहचवण्याचेच भाडे आपण देतो आहोत... असे असेल तर हा खर्च वेगवेगळ्या कंपण्यांना वेगवेगळा का यावा? हा ही विचार व्हावा...
ते मीच म्हटलो होतो शाम.
मला हे वाक्य समजले नाही. कोणत्या कंपन्यांबद्दल बोलत आहात? केबलसेवा /डिश कंपन्या की जाहिराती करणार्या कंपन्या?
जाहिराती न पाहण्याची निवड करता यायला हवी, हा केदारचा मुद्दा तत्वतः मला मान्य आहे. अशी सोय झाली तर उत्तमच ! मात्र त्यासाठी जास्त पैसे देण्याची माझी तयारी नाही, अशी माझी भूमिका आहे.
एकंदर चर्चेतून असे अनुमान निघते आहे, की आपण पैसे देऊन जाहिराती बघत नाही, तर पैसे द्यावे लागू नयेत, म्हणून जाहिराती बघतो.
केबल काढून टाका आणि फक्त
केबल काढून टाका आणि फक्त सीडीज पहा..
ह्म्म इथे जरा तुलनेमधे घोळ
ह्म्म
इथे जरा तुलनेमधे घोळ होतो आहे. प्रिंट मीडीया आणि ईलेक्ट्रॉनिक मीडीयामधील जाहीरातींची तुलना होऊ शकत नाही. कारण दोन्ही मीडीयम वेगवेगळे आहेत.
टीव्ही या माध्यमाची गंमत अशी आहे की हे जवळ जवळ फुकट (ऑल्मोस्ट फ्री) माध्यम गणले जाते. एका दूरदर्शन संचाचा खर्च्/केबलअथवा डिश इन्स्टॉलेशन खर्च आणि महिन्याला ठराविक भाडे यांचे पैसे बघता रीटर्नमधे मिळणारे कार्यक्रम आणि त्यांची व्हॅल्यु यांचे गुणोत्तर लक्षात घ्या. साधा केबलवाला १०० चॅनल्स देतो आणि महिन्याला ५०० रू. घेतो असे मानले तर एक चॅनल ५ रूपयामधे तीस दिवसाचे चोवीस तास अमर्यादित स्वरूपात बघता येते. दिवसाला ५००/३०= १२ पैसे इतका हा खर्च आहे. फक्त एका चॅनलसाठीचा. डिशसेवेमधे ग्ग्राहकाने चॅनल्स स्वतःहून निवडलेली असतात त्यामुळे हा खर्च थोडाफार बदलेल. पण तरी फारसा फरक पडत नाही. म्हणजे आपण टीव्ही हे माध्यम जवळ्जवळ फ्रीमधे वापरतो. हे माध्यम वापरण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडावे लागत नाही. स्जिवाय टीव्हीमधे चॅनल बदलण्याचे अथवा बंद करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य वापरणार्ञाकडेच असते.
यामधे एवढे सर्व चॅनल्स आपण २४ तास बघत नाही वगैरे मुद्दे अर्थात येतात, त्यान्चा इथे विचार केलेला नाही. तुलनेसाठी चित्रपट हे माध्यम घेऊन बघा. तीन तासासाठी किमान दोनशे रूपये खर्च. शिवाय येण्याजाण्याचा खर्च. तिथे मधेच कंटाळा आला म्हणून सिनेमा बदलता येत नाही. असो. तो विषय नाही.
आता चॅनलवर जाहिराती का येतात? तर असे की चॅनलचे हार्डवेअर मेंटेन करणे हा कॉस्टचा एक भाग झाला. त्यामधे केबलवाल्याची केबल, टेक्निशीयन्स हे सर्व आले. पण सॉफ्टवेअरचे काय? कार्यक्रम बनवण्यासाठी खर्च भरपूर येतो. बरं हा सगळाच खर्च काही अभिनेत्यावर, त्यांच्या कपड्यांवर अथवा लोकेशनवर खर्च होत नाही. इतर तंत्रज्ञ चिक्कार लागतात. शूटिंगला सामान लागते. युनिटला जेवण लागते. हा सर्व इतर खर्च निर्मात्याला पेलावा लागतो. शिवाय निर्मात्याला फायदासुद्धा होणे अपेक्षित असते. त्यामुळे कार्यक्रमामधले स्पॉट जाहिरातदाराना देऊन तो हा खर्च वसूल करू शकतात. त्यामुळे खरंतर एक ग्राहक म्हणून आपला फायदा होतो. उद्या सर्वच चॅनल्सनी नो कमर्शियल्स ही पॉलिसी स्विकारली तर आपले डिश अथवा केबलचे पॅकेज कितीपर्यंत जाईल याचा विचार करा. एवढे पॅकेज देऊन भारतामधे चॅनल्स चालवणे सध्यातरी शक्य होइल असे वाटत नाही. त्यामुळे स्टँडर्ड चॅनल्सवर जाहिराती येत राहणार. बघणे, न बघणे हा तुमचा चॉइस आहे. रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असतो.
@नंदिनी- +१. अगदी नेमकेपणाने
@नंदिनी- +१.
अगदी नेमकेपणाने सांगीतलेत. मी हेच म्हणू पाहत होतो.
Pages