बेल्स पाल्सी

Submitted by अंकिता१२३ on 12 July, 2012 - 02:43

मला दोन वर्षांपूर्वी बेल्स पाल्सी चा एटॅक आला होता, १० दिवसात मी बरी ही झाले पण आता डावा डोळ्यावर त्याचा परीणाम जाणवतोय. हसताना डावा डोळा थोडा बारीक होतो.
यासाठी कुठच्या डॉक्टरांना विचारावे ? कुणाला बेल्स पाल्सी चा अनुभव आहे का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या एका मैत्रिणीला झाला होता हा आजार. औषधोपरांबरोबरच तिनं प्राणायम, योगासनं यांवर भर दिला. शिवाय पुण्यात ती एका डॉक्टरांकडे आठवड्यातून एकदा अ‍ॅक्युपंकचरसाठी मुंबईहून यायची. वर्षभरात ती ठणठणीत झाली. तिला विचारून मी तुम्हांला डॉक्टरांचं नाव संपर्कातून कळवतो.

*

बेल्स पाल्सी : फेशिअल पॅरालिसिस नावाचा हा आजार आहे. यात दोन प्रकार आहेत. 'बेल्स' लोअर मोटर न्यूरॉन डिसीज आहे, तो नक्की बरा होतो. व्यायामाने बरे लवकर वाटते थोडे. (अ‍ॅक्युपंक्चर = थोतांड.)
अप्पर मोटर न्यूरॉन प्रकारातला असेल, तर बरा होत नाही. (Palsy = partial paralysis.)

हसताना डोळा बारीक होणे अन २ वर्षापूर्वीच्या बेल्स पाल्सीचा काडीचाही संबंध नाही. अन हसताना डोळा बारीक होणे हा आजार नाही ती लकब आहे. नकळत होते ते.

दाखवायचेच असेल तर नेत्रतज्ञांना दाखवा.

डावा डोळा बारीक होतोय म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त बंद होतोय ना ?
बेल्स पॅल्सी मध्ये डोळा बंद होत नाही, जास्त उघडा राहतो. त्यामुळे कोरडा पडून इन्फेक्शन्स व्हायची शक्यता असते. तेही असं दोन वर्षांनी अचानक झाल्याचं ऐकीवात नाही.

इब्लिस म्हणतात त्याप्रमाणे लकब असू शकेल (कुठल्याही वयात नवीन लकबी लागू शकतात माणसाला!)
आणि फार शंका वाटत असेल तर नेत्ररोगतज्ञांना दाखवणे योग्य Happy

@ रुणुझुणू
एक मार्कस गन जॉ विंकिंग प्रकार असतो पण तो असा नंतर उद्भवत नाही.. जन्मतः असतो, हे हसताना डोळा बारिक होणे स्ब्जेक्टिव असणेच योग्य वाटते आहे.