गझलची तोंडओळख -२ (वृत्त विचार)

Submitted by kaaryashaaLaa on 16 September, 2008 - 09:48

काय दोस्तांनो, व्याकरणातसुद्धा मजा येऊ शकते हे पटतंय ना? Happy

आता लघु आणि गुरू हे तर आपले दोस्त झाले. यांचा हात धरून आता वृत म्हणजे काय ते बघू या.
हा लघु आणि गुरू अक्षरांचा एखाद्या अनुक्रमाची जेव्हा कवितेत पुनरावृत्ती होते, तेव्हा त्या कवितेला वृत्तबद्ध कविता म्हणतात. (अबब!)

म्हणजे काय? आता गेल्या कार्यशाळेत आपण भुजंगप्रयात वृत्तात गझल लिहीली होती.

ऋतू ये | त होते | ऋतू जा | त होते
ल गा गा | ल गा गा | ल गा गा | ल गा गा

इथे 'ल गा गा' हा अनुक्रम (pattern) ४ वेळा आला.

सुन्या सुन्या मै | फिलीत माझ्या | तुझेच मी गी | त गात आहे
ल गा ल गा गा | ल गा ल गा गा | ल गा ल गा गा | ल गा ल गा गा

इथे 'ल गा ल गा गा' हा अनुक्रम ४ वेळा आला.

तुमच्या लक्षात आलं का, की या पुनरावृत्तीमुळेच हे काव्य लयीत वाचता येतं?

हे लक्षात आलं, की वृत्त म्हणजे काय हे समजलंच की तुम्हाला! Happy

जसं गाणं सुरात गाण्यासाठी रागाचं नाव माहीत असणं आवश्यक नसतं, तसंच वृत्तबद्ध लिहीता येण्यासाठी वृत्तांची नावं पाठ करणंही गरजेचं नाही.
हा अनुक्रम ओळखता यायला लागला, की झालं! Happy

(गंमत म्हणून तुम्हाला आवडणार्‍या गाण्यातली एखादी ओळ लिहून बघून त्यातला पुनरावृत्त होणारा अनुक्रम ओळखायचा खेळ खेळून बघायला हरकत नाही, काय?)

आता हे उदाहरण बघा :

हिरवे हिरवे गार गालिचे
(ल ल गा ल ल गा गा ल गा ल गा)

हरित तृणांच्या मखमालीचे
(ल ल ल ल गा गा ल ल गा गा गा)

अरेच्च्या! हे लयीत तर वाचता येतंय. पण मग अनुक्रमाचं काय झालं?

तर अश्या प्रकारच्या वृत्ताला 'मात्रावृत्त' असं म्हणतात. लघु अक्षराची १ मात्रा आणि गुरू अक्षराच्या २.
अश्या कवितेच्या प्रत्येक ओळीतल्या मात्रांची संख्या मोजतात, आणि त्या संख्यांचा एक अनुक्रम पुनरावृत्त होतो.
जसं वरच्या उदाहरणात दोन्ही ओळी प्रत्येकी १६ मात्रांच्या आहेत. (नाही पटत? मोजून बघा! Happy )

वर सांगितलेल्या, लघु गुरूंचा क्रम सांभाळणार्‍या वृत्तांना 'अक्षरगणवृत्त' म्हणतात.

मग आता वृत्ताची भानगड आली ना लक्षात? Happy
पुढच्या पोस्टमधे माहिती करून घेऊ गझलच्या व्याकरणाची.
रदीफ, काफिया, अलामत ही कुठल्या पदार्थांची नावं आहेत ते तरी बघू! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Happy लघु गुरु चा अनुक्रम पाळून pattern repeat करत लिहिणे म्हणजे अक्षरगणवृत्त. प्रत्येक ओळीत समान मात्रा मोजून लिहिणे म्हणजे मात्रावॄत्त. अरे वा!

मनी वादळे आर्त झाली सुनामी
कशी ही जिव्हारी दुधारी सुनामी!

केव्हांतरी पहाटे उलटून रात्र गेली
गागालगा लगागा ललगाल गागा गागा

बरोबर का? असेल तर पूर्ण गोंधळ! सॉरी... Sad

तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्व दिशे झळकती
गागा गागालल गागालगागा गागा लगा लललगा

अजूनच गोंधळ! काहीतरी चुकतय का?

ता. क. - फक्त गझल किंवा गझलसदृश कवितेची ओळ घ्यायची का?

केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली

गागालगा लगागा गागालगा लगागा Happy

तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्व दिशे उमलती

लगा गागागा गालगागा गाल लगा गालगा?

केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली
गागालगा लगागा * २

तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्व दिशी झळकती
अरुण उगवला, पहाट झाली, ऊठ महागणपती

प्रत्येकी २५ मात्रांच्या ओळी. Happy

चिन्नु, स्पष्टीकरण कोण देणार?? Happy

उलटून/ गागालगा कसं आणि का? तसच रात्र मधे त्र साठी ल का? जोडाक्षर आहे ना ते? त्याचा उच्चार र्‍हस्व आहे म्हणून? मग 'उलटून' चं काय?

तसच, तुझ्या /लगा ? तु हे जोडाक्षराच्या आधीचं अक्षर ना? ती सगळी ओळच समजावा प्लीज..

शैलजा, जोडाक्षर नव्हे, जोडाक्षराआधी जर लघु अक्षर आलं असेल तर ते गुरू होतं. म्हणून 'रात्र' ही 'गाल' आणि 'छत्र' पण 'गा ल' च. Happy

ITgirl,

अक्षरगण वृत्तात लिहिताना क्वचित एका 'गा' ऐवजी दोन 'ल' वापरले जातात. तुम्ही दिलेल्या उदाहरणात 'उलटून' मधला 'उल' हा 'गा' पकडला जाईल. पण असे करताना लयबद्धता अबाधित राहिली पाहिजे. उदा. भुजंगप्रयातातील (ल गा गा ४ वेळा) खालील ओळी पहा:

मजण्या मला लागला वेळ थोडा

इथे 'मज' = एक गा आहे. हीच ओळ मी:

मला समजण्या लागला वेळ थोडा अशी 'सम' = एक गा केली व वृत्ताच्या दृष्टीने ते बरोबर असले तरी लय लयाला जाते आहे हे लक्षात येईल.

आयटी, अग मी पण शिकत्येय ना म्हणून जाणकारांसाठी थांबले होते.
उलटून = ललगाल किंवा गागाल
रात्र = गाल. त्र र्‍हस्व म्हणून लघु.

धन्यवाद Happy समजतय थोडंथोडं.

चिन्नु, धन्यवाद Happy हळूहळू समजतय गं.

जोडाक्षराविषयी:

जोडाक्षर लघु की गुरू हे त्याच्या स्वरावरून ठरते.
उदा. स्त, ज्ज, प्रि, ऋ ही जोडाक्षरे र्‍हस्व (लघू) आहेत.
श्मा, र्‍या, ग्नी, स्थू, त्वे, श्री ही जोडाक्षरे दीर्घ (गुरू) आहेत.

काही शब्दांमधील जोडाक्षरामुळे त्या जोडाक्षराआधी येणार्‍या लघु अक्षरावर जोर किंवा आघात येतो. अशावेळी ते लघु अक्षर गुरू गणले जाते.
उदा. पुस्तक - 'पु' लघु असला तरी 'स्त' मुळे त्यावर जोर येतो. म्हणून इथे 'पु' दीर्घ समजावा. सज्जन, सुस्त, कर्म, मित्र, स्वस्त, स्वरबद्ध ही अजून काही उदाहरणे आहेत.

पण जोडाक्षरामुळे आधीच्या लघू अक्षरावर जोर वा आघात येत नसेल तर ते अक्षर लघूच समजावे. उदा. तुझ्या मधे 'तु' चा उच्चार करताना आघात येत नाही. म्हणून 'तु' लघूच आहे. काचर्‍या, फळ्या ही अजून काही उदाहरणे.

आयी बात ध्यानमें! थँक यू! Happy

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता

गा गागा गागा लललल गालल लगालल गागा
गागाल लललगा ललगा गा गा ल गालल गागा

हे काय झालं? नक्किच कहितरी गडबड करुन ठेवलीय मी..

आणि मागे एक प्रयत्न केला होता "चाहूल" नावाच्या कवितेत, तिथेही घोर चुक करुन ठेवलेली दिसतेय मी...

आज का काही कळेना, अडखळते पाऊल आहे
शांत सार्या सागरामध्ये, वादळाची चाहूल आहे

गालगागा गालगागा ललललगा गागालगागा
गालगागा गालगागा गागालगागा गागालगागा

"गालगागा गालगागा गागालगागा गागालगागा" असं कुठलं व्रुत्त आहे का हो? म्हणजे त्या मध्ये बाकीचं ऍडजस्ट करता येइल... Happy

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
लगा गालगा गा लगागा लगागा

तुझे केस पाठीवरी मोकळे
लगा गाल गागालगा गालगा

बरोबर का?

अविकुमार,

ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता - २८ मात्रा
मेघांत अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता - २८ मात्रा

तुम्ही विचारलेला अनुक्रम लयीत म्हणता येतो का बघा बरं. तसा येत नसेल तर केवळ पुनरावृत्तीमुळे ते वृत्त होत नाही.

नकुल, बरोबर आहे. Happy

अविकुमार,

आज का काही कळेना, अडखळते पाऊल आहे
शांत सार्या सागरामध्ये, वादळाची चाहूल आहे

"आज का काही कळे ना ठेचते पाऊल आहे
शांत संगर सागरी वा वादळी चाहूल आहे"

असं जमेल का पहा ?

अविकुमार, अज्ञात,
'ठेचते' च्या जागी 'संभ्रमी' कसं वाटेल?
आणि दुसरी ओळ 'शांत सागर भासतो, पण वादळी चाहूल आहे' अशी केली तर अधिक सहज होईल का?

हा 'सहजते'चा मुद्दा मुद्दाम मांडत आहे. कारण गझल मधले शेर शक्यतो 'समोरासमोर बसून संभाषण केल्यासारखे' सहज असावेत असा संकेत आहे.

अविकुमार, अज्ञात यांनी तुमच्या ओळी वृत्तबद्ध केल्या बघा. आता याचं वृत्त काय झालं सांगा पाहू. Happy

==
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
shama1_0.jpg

तू तेव्हा तशी
गा गागा लगा

तू तेव्हा अशी
गा गागा लगा

म्हणजे दोन्ही ओळीत ९ मात्रा असंच ना?

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

मधुरा,

जमले की. Happy
==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा
गागागा गागाल गागा गाल गागा गालगा
हे बरोबर की
गागागा लगाल गागा गाल गागा गालगा (रंगात मधल्या रं चा उच्चार र्‍ह्स्व होतो म्हणुन ल)

गुंतूनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा
गागागा लगाल गागा गाल गागा गालगा

हे मात्रावृत्त होईल का? २६ मात्रा दोन्ही ओळींत??

गुंत्यात मधला 'गुं' दीर्घ धरायला हवा ना गं? त्यानंतर जोडाक्षर आलंय त्यामुळे ..

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

अरे होकी. चुकलच. वर सुधारणा करते..

रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा
गागागा गागाल गागा गाल गागा गालगा
गुंतूनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा
गागागा गागाल गागा गाल गागा गालगा

आता २७ मात्रा होतील दोन्ही ओळींत.. हे बरोबर का?

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
गालगागा गागागागा गालगागा गालगा

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा
गालगागागा ल गागा गालगागा गालगा

ईथे मध्यरात्री तला म ल धरायचा का? पुढे जोडाक्षर आल्याने मी गा धरला पण मग वृत्तात बसत नाहिये..

काही काही गझल वृत्तात बसत नाही असे का वाटते आहे.. जसे की वर
रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा
गागागा गागाल गागा गाल गागा गालगा

इथे कुठे वृत्तांचा अनुक्रम दिसत नाही.

सरिविना, बी
इथे तुम्ही मात्रा मोजण्यात आणि ह्रस्व दीर्घ ह्या दोन्ही मध्ये चूक करत आहात...

रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा

गालगा गा| गालगा गा| गालगागा | गालगा
असे वृत्त आहे हे...

बी ही भटांची गझल आहे.. तेव्हा 'इथे कुठे वृत्तांचा अनुक्रम दिसत नाही' हे विधान धाडसाचे ठरेल असे नाही वाटत तुम्हाला... हे म्हणजे लता मंगेश्कर सुरात गात नाही असे म्हटल्यासारखे होईल Happy

वृत्त आहेच ते तुम्हाला दिसत नाहीये एवढेच Happy

==
एका जन्माच्या पाठी दुसर्‍या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

सरिविना कृपया http://www.maayboli.com/node/3607 ह्या बीबी वरील चर्चा परत वाचाल का पूर्ण.. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील..

अनुस्वार हा दीर्घ असतो..

मध्यरात्री मधला म 'गा' पण 'य' लघु झाला ना.. त्यामुळे तेपण बरोबर वृत्तात बसेल.. (आणि बसणारच ते भटांनी लिहिले आहे Happy )

==
एका जन्माच्या पाठी दुसर्‍या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

Pages