सोपे चॉकलेट वॉलनट फज - फोटोसहित

Submitted by स्वस्ति on 5 July, 2012 - 09:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

डार्क चॉकलेट : बारीक चिरुन १ कप.
दुध : १/२ कप
ब्रेड क्रम्ब्स : ७ स्लाईसचे
पीठी साखर : १टे.स्पू
बटर : २ टे.स्पू ( मी अमुल वापरल)
कन्डेन्सड मिल्क : १/२ कप
वॅनिला ईसेन्स : १/२ टी.स्पू ( मी घातला नव्हता)
अक्रोडाची ओबड्धोबड पूड : १/३ कप

क्रमवार पाककृती: 

प्रथम दूध आणि चॉकलेट एकत्र करून डबल बॉईलर मध्ये किंवा मावेत वितळवून घ्या
एका बाजूला पीठी साखर आणि बटर एकजीव करून घ्या .

चॉकलेटच्या मिश्रणात सगळ साहित्य हळुहळु एकजीव करून घ्या.

तुपाचा हात लावलेल्या भांड्यात ओता.

प्रेशर कूकरमध्ये स्टॅण्ड ठेवा.त्यावर जाळी , त्यावर हे भांडे.
दोन शिट्या काढा .लगेच शिट्टी उचलून वाफ घालवा.
थोडं थंड झाल की फ्रीजमध्ये ठेवा. (नाही ठेवलं तरी चालेलं Happy )

आणि मग गट्टम!!!

हा मी केलेला
IMG455.jpg

आणि हा मैत्रिणिने ... ब्राउनीच्या चुर्‍यासारखा

IMG459.jpg

वाढणी/प्रमाण: 
:) .वजनात सांगायच तर पाव किलोचा श्रीखंडाचा डबा भरून वर थोड उरलं
अधिक टिपा: 

मी मूळ मापात थोडे फेरफार केले .
साहित्य एकजीव करताना हलक्या हाताने करा नाहीतर ब्रेडचा लगदा होइल .
जे भांडे कूकरमध्ये ठेवणार त्यातच पीठी साखर आणि बटर एकजीव करून घ्या म्हणजे 'तुपाचा हात लावलेलं भांडं' आयतच मिळेलं.
तयार झाल्यावर फज थोड सरसरीत राहीलं तरी चालेल , थंड झाल्यावर जरा आळतं

माहितीचा स्रोत: 
तरला दलाल यान्च्या प्रेशर कूकर रेसिपीस
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.. नक्की करुन बघणार.. मस्त आणि सोप आहे करायला. डार्क चॉकलेट ऐवजी कॅडबरी चॉकलेट वापरल तर चालेल का? कारण ते सोडुन सगळ आहे घरात?

हो स्नेहश्री . मी पहिल्यांदा केलेलं तेन्व्हा कॅडबरी वपरलेलं .पण रंग इतका आला नव्हता आणि साखर कमी घातली तरी चालते .
पण चव मस्त असते .

स्वस्ति नक्की करते विकांताला.. बघते मोर्डेच चॉकोलेट मिळत आहे का?

घरात चॉकलेट फॅन असल्यामुळे रेसिपी करुन पाहण्यात येईल Happy

साहित्य एकजीव करताना हलक्या हाताने करा नाहीतर ब्रेडचा लगदा होइल .

ब्रेड स्लाइस वापरत नाहीयोत ना? क्रम्बमुळे लगदा कसा होईल??

ब्रेड स्लाइस वापरत नाहीयोत ना? क्रम्बमुळे लगदा कसा होईल?? >>>>

साधनाताई , मी पहिल्यांदा बनवले होते तेन्व्हा जवळपास गोळाच झाला होता , म्हणजे क्रम्ब दिसत होते पण तरिही ... म्हणून म्हटलं ...

वेगळाच प्रकार... ब्रेड आणि कुकर इंटरेस्टिंग !!! >>>

हो ना... मला वाटलेलं शीजवलेला ब्रेड कसा लागतोय कोणास ठाउक .. पण मी एकदम फॅन झाले रेसिपीची Happy

थोडा सॉगी झाल होत.. कळल नाही कश्यामुळे.. पण चव म्हणाल तर नंबर १.>>>>

स्नेहश्री , अगदी माझ्याच भावना ! मी केलेलं ते बरचसं चॉकलेट सॉससारखं झालेलं
मग त्यात आणखी एक ब्रेड स्लाईस घालून परत एक शिटी काढली .
पण 'ती' consistency नाही आली .

ह्याच मापात माझ्या मैत्रिणीने केलं तर तीचा ब्राउनीचा चुरा (थोडं ओलसर) व्हावा तसं झालं .
पण दोघांचीही चव मात्र फक्कड!!

(दोन्ही फोटोज आहेत पण आत्ता नाहीयेत ,नंतर upload करते )