उपवासाचे बटाटे वडे --

Submitted by निवा on 29 June, 2012 - 23:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एकादशी दुप्पट खाशी ---

साहित्य :-
उकडलेले बटाटे ३ ते ४,
चार - पाच हिरव्या मिरच्या ,
थोडे लाल तिखट,
एक छोटा आल्याचा तुकडा,
वरई पिठ एक वाटी,
शाबूदाणा पिठ पाव वाटी,
बेकिंग सोडा,
चवीनुसार मीठ,
तळणीसाठी रीफ़ाईंड तेल किंवा तूप.

क्रमवार पाककृती: 

कृती:-
प्रथम उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घ्यावेत. हिरवी मिरची, आलं मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. तेलावर हे वाटलेलं आलं, मिरची थोडसं परतून घ्यावं. मॅश केलेला बटाटा घालावा व लगेचच आच बंद करावी. नंतर हे सर्व एकत्र करुन या मिश्रणाचा छान गोळा करून घ्यावा
मग वरई पिठ व शाबूदाणा पिठ व
लाल तिखट, सोडा,व मीठ हे सर्व एकत्र करावं. थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे थोडं दाटसर पीठ बनवून घ्यावं. बटाट्याच्या मिश्रणाचे लहान मोठ्या आकाराचे गोळे करून घ्यावेत. एका कढईमध्ये तेल तापवून घ्यावं. आच माध्यमच ठेवावी. बटाट्याचा एक गोळा पिठाच्या मिश्रणात घोळवून तेलात सोडवा व छान खुसखुशीत वडे तळून घ्यावेत. नारळाच्या चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करावेत.

वाढणी/प्रमाण: 
चार
अधिक टिपा: 

मंद आचेवर तळावेत.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ माई........तनीक फुटवा तो लगाई...कैसन बनवा हम...इ जो भी तुम बनाई हो... Happy
.
.छान आहे.... मी बाजुच्या होटेल वाल्या मावशी ला सांगुन बनवुन घेतला Happy

ए एकदम मस्त आणि झटपट होणारा पदार्थ दिलास....... पण उपवासाला लाल तिखट आणि सोडा चालतो का.......... माझी आई नेहमी तिखटासाठी हिरवी मिरची वापरते, लाल तिखट उपवासात कधी नाही वापरले....... जमल्यास फोटो पण टाक ग..... त्याने पदार्थ झाल्यावर कसा दिसेल त्याचा जरा अंदाज येइल.....

सोडा चालतो का उपासाला?>>>>>

सोडियम क्लोराईड चालते तर त्या सोडियम बाय कार्बोनेट ने काय घोडे मारले??

बाकी आज ट्राय करायला हवा!

@ क्रुष्णा

सोडा चालतो का उपासाला?>>>>>

सोडियम क्लोराईड चालते तर त्या सोडियम बाय कार्बोनेट ने काय घोडे मारले??
<<<<<<<<<<
वा वा अभिमान वाटला आधुनिक महिलांचा (त्यात मी देखिल आहेच हो Happy ) उपवासाला काय चालते याचे मस्त रासायनिक प्रुथ्थकरण दिले आहे

बाकी क्रुष्णा तुझे नाव तु जसे लिहीले आहे तसेच कसे लिहायचे म्हणजे क्रु / प्रु हे कसे लिहायचे...... अवांतर पण मला खरेच हे कसे टाइप करायचे माहीत नाही

@ निवेदिता वाळिंबे

फोटो काढेपर्यंत वडे शिल्लकच राहिले नाहीत हो

एकादशी अन दुप्पट खाशी.......... एकही दिवस सोडू नका चटपटीत खायचा........उपवासाच्या नावाखाली पोटभरीचे पदार्थ खाउन पुन्हा लोक साग्रसंगीत जेवण करुन उपवास सोडायला मोकळे , कसे Rofl

नाही नाही फक्त तुझ्यासाठी नाही बोलत मी, त्यात मी देखील सहभागी आहे Wink

मस्त.