"सत्यमेव जयते" भाग ८ (Poison On Our Plate?)

Submitted by आनंदयात्री on 24 June, 2012 - 03:35

आज, २४ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा -

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकार बदला............................देश बदला.............. नाही बदलला तर............... जुन्याकडे वळा

खुपच माहितीपुर्ण भाग.....
माहित नसलेल्या बर्‍याच गोष्टी माहित झाल्या...
आमच्या शेतात ह्याचा कसा उपयोग करता येइल हे नक्की बघणार Happy
मायबोलीकरांनी अजुनही ह्या विषयाबद्द्ल काही माहिती दिली तर फार बरे होइल Happy

आजचा भाग मला खूप महत्वाचा वाटला. याआधी नाही लिहीलं कधी स.ज. च्या बाफवर पण हा इश्श्यु मुलांच्या पालकांना आणि सर्वांनाच काळजी करायला लावणारा आहे. याआधी एकदा कोक आणि पेप्सीच्या संदर्भात जेव्हां बातम्या आलेल्या तेव्हापासून कोल्ड्रींक्स बंदच केले , अगदी त्यांचे पान भरून खुलासे आले तरी. पण अन्नधान्य आणि भाज्यांचं काय करायचं ?

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅन्ड एन्व्हायराँमेंट चा रिपोर्ट
http://www.cseindia.org/node/527
सीएसईच्या रिपोर्टला देण्यात आलेले कायदेशीर आव्हान
http://www.culanth.org/files/CAN.2007.22.4.659.pdf

सीएसई च्या या रिपोर्टनंतर कोक आणि पेप्सीविरुद्ध जनमत तयार झालं होतं. जेपीसीच्या अहवालाचाही याला दुजोराच मिळाला. त्यामुळे कोर्टातली बाजू कमकुवत पडलेल्या या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी "जनजागृती" केली होती. त्यात त्यांनी इतर देशांमधे त्यांच्या उत्पादनांमधे कीटकनाशकांचे अवशेष नगण्य असल्याचं दाखवून दिलं होतं. भारतातच असं घडण्याचं कारण म्हणजे भारतातले जवळजवळ सगळे जलस्त्रोत आणि माती हे कीटकनाशकांनी युक्त असल्याचे सरकार दरबारी पडून राहीलेल्या अहवालांद्वारे दाखवून दिले. फक्त शीतपेयेच नाही तर बाटलीयुक्त पाणी देखील याला अपवाद नाही आणि रोजच्या उपयोगाचे अन्नधान्यादि उत्पादने यामधील पेस्टीसाईड्सचे प्रमाण हे शीतपेयांपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी सप्रमाण दाखवून दिलं होतं.

अर्थात त्यांची ही मजबुरी कितीही जेन्युइन असली तरी त्या बिचा-यांवर दया दाखवत कीटकनाशकांसहीत ही शीतपेयं वापरायची कुणाचीही तयारी नसणार. एक तर गरज नसलेलं प्रॉडक्ट आणि वरून विकतचं विषारी दुखणं !

पण अन्नधान्यांच्या बाबतीत त्या वेळी चर्चा झाली नाही. माती, पाणी आणि अन्न हे सगळंच दूषित असल्याचे कित्येक अहवाल त्या दरम्यान नेटवर सापडले होते. पण सीएसई ने देखील त्यावर काम केल्याचं ऐकिवात नाही. कारण कळत नाही.

या पार्श्वभूमीवर आमीरने केलेलं आजचं प्रेझेंटेशन हे मनापासून दाद देणारं ठरलं. आमीरच्या आजच्या कामगिरीला सलाम !

सांजसंध्या, सध्यातरी फक्त हवा खाणे हाच पर्याय आहे ती पण सिलींदरमधली. अन्यथा गावात काय शहरात काय हवाही पोल्युटेड आहेच.
दुसरा उपाय सिक्कीमला जाउन राहाणे!

नदीच्या पाण्यात सांडपाणी सोडणारे आपण कधी खालच्या लोकांच्या आरोग्याचा विचार करत नाही, तर आपल्या आरोग्याचा विचार कसा कोण करील ?

विषारी कीटक-नाशकांनी युक्त कोका-कोला ची जाहिरात करणाऱ्या आमीर ने अन्न-धान्या तील विषारी कीटक-नाशका बद्दल कार्यक्रम करावा/? मला तरी हा ढोंगीपणा वाटतो

Proud

मंदारजी
आमीरखान च्या जाहिरातींना प्रतिसाद म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही कोक प्राशन केले असेल कआचित. पण जाहिरात पाहूनही कोक न पिण्याचं करता येतं तसं अन्नधान्याच्या बाबत जमतंय का ते पहा. अन्नधान्याच्या जाहिराती पाहून कुणी खात असेल असं वाटत नाही.

आमीर खानं कोकची शेवटची जाहिरात २००९ साली केली. सध्या त्याचा आणि या कंपनीचा संबंध नाही. कोक जे पाणी वापरतं, त्या पाण्यात कीटकनाशकं असतात. कोक मुद्दाम कीटकनाशकं घालत नाही, चव वाढवण्यासाठी. कोक पिऊन होणारे गैरफायदे वेगळे.

आजच्या भागातला विषय फार महत्त्वाचा होता. अनेक संशोधन संस्था या विषयावर गेली काही वर्षं संशोधन करत आहेत. विशेषतः कॅन्सरच्या वेगानं वाढत्या प्रमाणावर, आणि या वेगाचा संबंध आपण जे काही खातोपितो, त्याच्याशी नक्की आहे. नंतर सविस्तर लिहीन.

कामावर असल्याने सध्या प्रोग्रॅम बघता येत नाहिये पण आजच्या कर्यक्रमात सिक्किमचा उल्लेख झाल्याचे कळले. नुकताच सिक्किमला जाउन आलो. तिथेच राहावे असेच वाटत होते. Happy

हा प्रतिसाद अवांतर आहे @ चिनुक्स
>>कोक पिऊन होणारे गैरफायदे वेगळे. <<
तोटा या अर्थाने, किंवा फायदाच्या विरुद्धार्थी म्हणून 'गैर फायदा' हा शब्द कसा काय योजिता येतो :दिवे:

आजच्या भागातला बराच वेळ वेगवेगळ्या व्यक्तींना/समूहांना सामील करून त्यांचे आभार मानण्यातच गेला असे वाटले. कमी व्यक्ती/समूहांना बोलवून त्यांच्या कामाविषयी अधिक माहिती देता आली असती.
कीटकनाशकांचा विषय असताना वंदना शिवा हरित क्रांतीवर घसरल्या. अधिक उत्पन्न देणारी बियाणे, खतांचा वापर, सिंचनाच्या अधिक चांगल्या सोयी या सगळ्या गोष्टींचा हरित क्रांतीमधे समावेश होता. केवळ एका (डाळी)पिकाखालचे क्षेत्र दुसर्‍या (गहू) पिकाखाली आल्याने उत्पादन वाढले असे त्या म्हणाल्या. हरित क्रांतीने प्रति -एकर उत्पन्न वाढलेच नाही असा याचा अर्थ होतो. गव्हाच्या बाबतीत जितके प्रयत्न झाले तितके डाळींच्या बाबतीत झाले नाहीत असे फार तर म्हणता येईल.

'हानीकारक' कीटकांच्या बंदोबस्ताच्या नैसर्गिक/कोणताही धोका नसलेल्या पद्धतींची आणखी माहिती बघायला आवडली असती. (बहुपीक पद्धतीनेही रोगकारक कीटकांना आळा बसतो.)

किरण आणि चिनूक्स, हेच लिहायला आले होते. पेप्सित किटकनाशके का तर आपल्या पाण्यात आहेत म्हणून ! ़कंपनि मुद्दामहून टाकत नाही.

मला आजच्या भागात सगळ्यात मजेशीर वाटलेला भाग कीटकनाशकांच्या कंपनीवाल्या श्रॉफ यांच्या भावाचाच ऑर्गॅनिक कापसाचा सर्वात मोठा एक्सपोर्‍ट आहे.

सेनापती, सिक्कीमच्या राज्यकर्त्यानी अ‍ॅज अ पॉलिसी ऑर्गॅनिक फार्मिंग स्विकारलंय त्याबद्दल आज माहिती दिली.
नुसत्या पेस्टिसाईड्स आणि खत्तांमुळेच नव्हे तर भाज्या, फळे पिकवणे आणि टिकवने या प्रक्रियेत तसेच कुक्कुटपालन , डेअरी इथे वापरले जाणारे वेगवेगळे हार्मोन्स आणि केमिकल यांच्या परिणामाबाबतही चर्चा व्हायला हवि होती. भरमसाठ उत्पादनासाठी जेनेटिक मॉडिफिकेशन केलं जातं ते ही काहीवेळेस रिस्की ठरू शकते.

मागच्या दोन एपिसोड्पेक्षा या भागाच्या शेवटीचे गाणे आवडले.

<<पेप्सित किटकनाशके का तर आपल्या पाण्यात आहेत म्हणून ! ़कंपनि मुद्दामहून टाकत नाही.>> मग त्याबद्दलही ओरड करा कि कार्यक्रमातून !

<< आपल्या पाण्यात ?>> हा काय प्रकार आहे? आणि पाण्यात आहे म्हणून कंपनीला गुन्हे माफ? व्वा व्वा ! फारच छान!

भले कीटक-नाशकांच्या अति-वापरामुळे अन्न-धान्ये विषारी आहेत ,आणि त्यावर उपाय-योजना ही व्हायला हव्यातच ! पण हरित क्रांती आणि अधिकाधिक धान्य उत्पादन केल्यानेचं {विषारी का होईना }धान्य तरी मिळतेय,पण शेतकऱ्यांनी जर धान्य पिकवले नाही, तर आज वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला उपाशी मारायची पाळी येईल .

ग्रामीण भागात शेती करणे दिवसेंदिवस अशक्य होत असून कित्येक शेतकरी शेती सोडून देऊ लागले आहेत ....

तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याला ३ प्रश्न विचारा ---

१. तुमच्या मुलाला तुम्ही शेतकरी बनवणार का?
२. तुमची मुलगी शेतकरी मुलाला देणार का?
३.तुम्ही शेतीत समाधानी आहात का?

तिन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतील

शेतीचे भवितव्य अतिशय अंधारमय आहे ............आणि अन्नासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या भारतीयांचे भवितव्य?

जरा विचार करा

मंदार, सध्या शेतकर्‍यांचे भवितव्य अंधारमय आहे हे अगदीच खरे आहे. पण ऑर्गेनिक फार्मिंंगमध्ये ते उज्ज्वल करायची ताकद आहे. इच्छाशक्ती हवी. राजकीय आणि शेतकर्याची स्वत:ची सुद्धा.
आमच्या राज्यात उल्लेखनीय सेंद्रीय शेती करणार्याना प्रोत्साहन म्हणून मुख्यमंत्री स्वतः एक दिवस त्यांच्याकडे जेवायला येतात Happy
बाकी आम्ही सध्या मायक्रो का होईना शेती करतो जी अधिकाधिक वाढवून लवकरच ऑर्गॅनिक्न्फार्मिंग चालू करणार आहोत. त्या हिशोबाने मी शेतकरी आहेच. तुमच्या वरिल दोन प्रश्नांची उत्तरे त्यामुळे 'हो, मुलांची इच्छा असेल तर नक्कीच . '
अर्थात आजच्या माझ्या दृष्टित आणि केवळ शेतीवरच उदरनिर्वाहासाठी अवलंबून असणार्याच्या दृष्टित फरक असणारच . सध्या शेती हे काही आमच्या उत्पन्नाचे एकमेव साधन नव्हे. त्यामुळे आपण म्हणता त्या प्रमाणे खर्या शेतकर्‍याची उत्तरे खचितच नकारार्थी असतील.
आपण असा विचार करू की शेतकर्याकडे असणार्या एका पॉजिटिव आस्पेक्टबद्दल म्ह णजे ऑप्शन टू अ‍ॅडॉप्ट ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल या निमित्ताने चर्चा झाली.

तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याला ३ प्रश्न विचारा ---

१. तुमच्या मुलाला तुम्ही शेतकरी बनवणार का?
२. तुमची मुलगी शेतकरी मुलाला देणार का?
३.तुम्ही शेतीत समाधानी आहात का?

तिन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतील

मी या भावना समजू शकतो पण या बाफवर ही चर्चा अप्रस्तुत आहे. वेगळ्या बाफवर चर्चेचा प्रस्ताव ठेवता आला तर पहावा.

मंदार, आपल्या पाण्यात म्हणजे भारतात सर्वसाधारणतः पिण्यासाठी वापरण्यात येणार्या कुठल्याही नैसर्गिक स्त्रोतातून मिळणार्या पाण्यात . अगदी पावसाच्या पाण्यातही. तुमच्या आमच्या घरात नेहमी पिण्यासाठि वापरण्यात येणार्या पाण्यातही.

चिनूक्स, तुम्ही याबद्दल आणखी योग्य माहिती द्याल का?

कार्यक्रम पाहिला नाही. पण आता त्यांच्या साइटवर जाऊन बघते.

<< तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याला ३ प्रश्न विचारा ---
१. तुमच्या मुलाला तुम्ही शेतकरी बनवणार का?
२. तुमची मुलगी शेतकरी मुलाला देणार का?
३.तुम्ही शेतीत समाधानी आहात का?
तिन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतील >>

ह्या वाक्यांमध्ये शेतकर्‍याच्या जागी डॉक्टर घातलं तरी तिन्हीची उत्तरे नकारार्थी येण्याची शक्यता रग्गड आहे Happy

(हा अतिशयच अवांतर प्रतिसाद आहे. पण राहवलं नाही.सॉरी.)

मला आजच्या भागात सगळ्यात मजेशीर वाटलेला भाग कीटकनाशकांच्या कंपनीवाल्या श्रॉफ यांच्या भावाचाच ऑर्गॅनिक कापसाचा सर्वात मोठा एक्सपोर्‍ट आहे.
<<<
मलाही :).
ते श्रॉफ कसले बिंधास्त बोलत होते , सगळ्यांना हसु येत होतं !
गाणं आजचही मस्तं , मला खरच सगळ्या एपिसोड्स मधली गाणी आवडली , ग्रेट जॉब रस्म संपत !

मला प्रश्न पडला एव्हढ्या ८,००० कोटी ची उलाढाल असलेल्या कंपनी च्या चीफ (?) एक्झेक्युटीव्ह ला कोणी पी आर् अ‍ॅड्व्हायजर नाही का? त्याने स्वतःला असं रिडीक्युल कसं काय होऊ दिलं?

Pages