२२ जून १८९७: आज स्मृतीदिन

Submitted by मंदार-जोशी on 22 June, 2012 - 03:23

22June1897.jpg

आज २२ जून. १८९७ साली याच दिवशी घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेचा आज स्मृतिदिन. वासुदेव हरी चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात झाला. कालांतराने ते चिंचवड येथे स्थायिक झाले. पुण्यात प्लेगची साथ आटोक्यात आणण्याच्या हेतूने भारतात पाचारण केल्या गेलेल्या वॉल्टर चार्ल्स रॅडने रोग नियंत्रणाच्या नावाखाली अत्याचाराचे सत्र सुरु केले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे अनेकांसारखाच चाफेकर बंधूच्या (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) मनात ब्रिटिशांविरुद्ध आणि प्रामुख्याने रँडविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला.

रँडचा सूड घेण्याची योजना तयार करुन त्याची अंमलबजावणीही केली. यात आधी दामोदरांच्या "गोंद्या आला रे आला" या आरोळी ऐकून बाळकृष्ण चाफेकरांनी रॅंड आहे अशा समजाने बग्गीत शिरून चुकून लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. नंतर रँडची बग्गी आल्यावर दामोदर चाफेकरांनी रँडवर गोळीबार केला.

यात लेफ्टनंट आयरिस्ट जागीच ठार झाला तर रॅड याने ३ जुलै १८९७ रोजी इस्पितळात प्राण सोडले. चाफेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही पकडण्यात आले. दामोदर चाफेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेव चाफेकर यांना ८ मे १८९९ तसेच बाळकृष्ण चाफेकर यांना १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले.

१८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दानंतर निर्माण झालेल्या क्रांतिकारकांमधे चाफेकर बंधु यांना आद्य क्रांतिकारकांचे स्थान आहे. लाला लजपत राय यांनी चाफेकर बंधूंचे गौरव "भारतातील क्रांतीचे जनक" असा केला आहे.

अशा या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीदिनी या पुण्यात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करुया.

गुलमोहर: 

मी २२ जून १८९७ हा रँडच्या वधावर आधारीत सिनेमा १९९७ साली फिल्म इन्स्टिट्यूट इथे श्रीयुत दिलिप प्रभावळकर यांच्या शेजारच्या खुर्चित बसून पाहिला होता. हिच काय ती आठवण माझ्यावतीने. Happy

चाफेकर बंधुना आदरांजली.
आजच पुण्यात गणेशखिंड रस्त्याने जाताना आठवण आली होती. एरंडवणे (एरंडवन) इथे ते बंदुकीची प्रॅक्टीस करायचे.

काल नचिकेत आणि जयु पटवर्धन दिग्दर्शित "२२ जुन १८९७" पाहिला. लहानपणी ऐकलेले त्यातले गाणे जसेच्या तसे आठवत होते.
"आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे"
"रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे"

हा चित्रपट खूप पूर्वी पाहिला होता. प्रिंट किती चांगली राहिली आहे माहित नाही आता, पण जसा तुकाराम बनला तसाच हाही चित्रपट पुन्हा बनवण्याचा (रिमेक) चित्रपट निर्मात्यांनी विचार करावा. Happy

चापेकर स्मारकाची उपेक्षा!

http://marathi.yahoo.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E...

लोकमत – बुध, १८ एप्रिल २०१२
पिंपरी । दि. १७ (प्रतिनिधी)

चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर यांचे स्मारक उभारणीचे काम रेंगाळले असून, कामात दिरंगाई करणार्‍या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी व हे काम जून २0१२ पूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेकडून क्रांतिवीरांच्या स्मारकाची उपेक्षा केली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर पुतळा पुलाचे कामामध्ये अडचण निर्माण होत असल्यामुळे नवीन जागेत स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. चिंचवड ग्रामस्थ, चापेकर स्मारक समिती, लोकप्रतिनिधी व विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी सहकार्याची भूमिका घेऊन विकासकामे होण्याच्या दृष्टीने पुतळा स्थलांतर करण्याच्या निर्णयाबाबत सामंजस्याने सहकार्य केले.

त्यामुळे २५ ऑगस्ट २०१० रोजी भूमिपूजन तत्कालिन महापौरांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्वरित काम पूर्ण होईल, असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. परंतु, आज जवळपास ६00 दिवस उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. गेले अनेक दिवस काम बंद आहे. त्यास जबाबदार अधिकारी, ठेकेदार तपासणे गरजेचे असून, त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. १८ एप्रिल १८९८ ला हुतात्मा दामोदर हरी चापेकर, ८ मे १८९९ हुतात्मा वासुदेव हरी चापेकर, १२ मे १८९९ हुतात्मा बाळकृष्ण हरी चापेकर या तीनही भावंडांना फाशी देण्यात आली. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त क्रांतीवीर चापेकर स्मृतीदिन समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच वेळी चिंचवडमधील बहुसंख्य इतिहासप्रेमी नागरिक पुतळा स्थलांतर कामात दिरंगाई होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.

२२ जून १८९७ रोजी रॅण्डला गोळ्या घालून यमसदनी पाठविले. त्याचा स्फूर्तिदायक दिवस व २५ जून १८६९ रोजी हुतात्मा दामोदर हरी चापेकर यांचा जन्म चिंचवड येथे झाला. त्या स्मृतीनिमित्त जून महिन्यापर्यंत हे काम करण्याच्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना सूचना द्याव्यात.

वास्तविक पाहता चिंचवड उड्डाणपुलाचे रेंगाळलेले काम पूर्ण झाले. हे काम देखील पुलाच्या कामाबरोबर पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, स्मारकाचे काम मात्र, कासवगतीने सुरू आहे. चिंचवडमधील बहुसंख्य इतिहास प्रेमी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत व कामात दिरंगाई झाल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांनी केली आहे.

छान,आजचा दिन समस्त मराठीजनांना अगदी तोंडपाठ आहे .खरे तर या दिनी निदान महाराष्ट्रात तरी सार्वजनिक सुट्टी जाहिर करावी.

<हा चित्रपट खूप पूर्वी पाहिला होता. प्रिंट किती चांगली राहिली आहे माहित नाही आता, पण जसा तुकाराम बनला तसाच हाही चित्रपट पुन्हा बनवण्याचा (रिमेक) चित्रपट निर्मात्यांनी विचार करावा.>> + १

हुतात्मा चाफेकर बंधूंना आदरांजली! त्यांच्यासारख्या अनेकांनी स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व व प्राण अर्पण केल्यामुळेच आपण आज स्वातंत्र्यात आहोत.

२२ जून १८९७ हा चित्रपट आजपर्यंत अनेकवेळा पाहिलेला आहे. हा माझा अतिशय आवडता चित्रपट. त्या काळचे पुण्यातले वातावरण कसे होते हे चित्रपट पाहून लक्षात येते. यातले "आई अंबे जगंदबे जातो सत्कर्मी वर दे, रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे"हे हअतिशय वीरश्रीपूर्ण जोरकस गीत आहे. हे गीत अजूनही लक्षात आहे. सर्व अंगांनी हा चित्रपट सुरेख आहे.

ज्यान्चे जीवावर आज आम्ही स्वधर्माने अन स्वकष्टाने मानाने जगू शकतोय त्या क्रान्तीकारकान्ना मनोमन दन्डवत Happy
>>> त्यामुळे २५ ऑगस्ट २०१० रोजी भूमिपूजन तत्कालिन महापौरांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्वरित काम पूर्ण होईल, असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. <<<
याचबरोबर, हा पुतळा वेळेत सन्मानाने नियोजित जागेवर न बसविल्याबद्दल पिम्परी चिन्चवड महानगरपालिका प्रशासन व सत्ताधार्‍यान्चा जाहीर निषेध करतो. (कुठे असे न होवो की पुण्यनगरीतील दादोजीन्च्या पुतळ्यासारखे चाफेकरान्च्या पुतळ्याची कुठल्या उद्यानात नैतर साफसफाई खात्याच्या कोठीमधे वासलात लावली जावो)

आजच्या दिवसाची आठवण करुन दिल्याबद्दल मन्दार, धन्यवाद Happy

आज सकाळीच या चित्रपटाची आठवण झाली.दूरदर्शनवर नेहेमी लागायचा.
चित्रपटगीतेही छान आहेत त्यातली. अतिशय परिणामकारक असे याचे चित्रण आहे. तरी मनावर किती दिवस याची छाप रहाते.आजही लख्ख आठवतो.
चाफेकर बंधुंना आदरांजली.

चाफेकर बंधुना आदरांजली.

२२ जून १८९७ - माझा अतिशय आवडता चित्रपट.

मध्यंतरी पेपर मध्ये वाचले की गणेश खिंडीत चाफेकरांचे स्मारक होते पण रस्तारुंदीकरणाच्या कामात निष्काळजीपणामुळे गायब झाले. Sad

हा चित्रपट खूप पूर्वी पाहिला होता. प्रिंट किती चांगली राहिली आहे माहित नाही आता,>>>

मंदार -- अरे सीडी आहे ना त्याची. माझ्या कडे आहे. आम्ही आज रात्री बघणार आहोत. हा दिवस चांगलाच लक्षात आहे. रीदम हाउस, प्लॅनेट एम. मध्ये सीडी/डी.व्ही.डी आहेत. ठाण्याला तळ्यावर माझा जुना दोस्त आहे "जय गणेश मुझीक हाउस" तो तर जगातुन कुठुनही पैदा करतो माझ्या साठी सीडीज!!!!!

मी पुण्याला विजय टॉकीज च्या आधी जिथे लक्श्मी रोड सुरु होतो तिकडे एक सी.डी. चं दुकान आहे मोठ्ठ, तिकडुन घेतली होती. पण खुप पुर्वी.

आजच सकाळी घरात चर्चा झाली आणि रात्री पहायचं ठरवलं.

छान माहिती.

चित्रपट अनेक वेळेस बघितलेला आहे. माझ्याकडे व्हीसीडीही होती. शोधायला पाहिजे.

२२ जून १९९७ साली गणेशखिंड रस्ता (युनिव्हर्सिटी रोड) व जवळपासच्या भागात याची Re-enactment झाली होती. मी तेव्हा पुण्यात नसल्याने पाहिली नव्हती पण इतरांकडून ऐकले होते.

>>> मध्यंतरी पेपर मध्ये वाचले की गणेश खिंडीत चाफेकरांचे स्मारक होते पण रस्तारुंदीकरणाच्या कामात निष्काळजीपणामुळे गायब झाले. <<<
तिथे "स्मारक" असे काही कधीच नव्हते.
मूळात, शेतकी कॉलेजच्या शेतीला पाणी पुरविणाला लहानसा कॅनॉल होता, त्याचे शेजारी काळा दगडाचे एक स्मृतिचिन्ह रॅन्डच्या स्मरणार्थ रोवलेले होते.
नन्तर १९७५ ते १९७८ चे दरम्यान कधीतरी त्याचेच शेजारी चाफेकरान्चा एक अर्धपुतळा बसविण्यात आला.
मध्यन्तरी झालेल्या रस्तारुन्दीमधे दोन्ही गोष्टी रस्त्याकडेला पुन्हा बसविल्या गेल्या. Happy
जो अर्धपुतळा बसविला आहे त्यास "स्मारक" म्हणणे मला अशक्य आहे. असो.

बहुधा दहा/बारा वर्षान्पूर्वी, महाराष्ट्रात गावगन्ना "स्वातन्त्र्यवीरान्ची स्मारके" नामक खोल्या/बगिचे बनविण्याचे घाऊकरित्या घडले होते, त्यातिल किती स्मारके शिल्लक आहेत अन सामान्य जनताजनार्दनाचेच नि:ष्काळजी/कृतघ्न कृपेने किती भुईसपाट झाली आहेत हा स्वतन्त्र संशोधनाचा विषय आहे.
तेव्हा, अशा क्रान्तिकारकाचे स्मरण आठवणपूर्वक आम्हा नालायक, कृतघ्न, स्वार्थी, नतद्रष्टा कुलघ्नान्ना करुन दिल्याबद्दल खरे तर मन्दारचेच मी पुन्हा आभार मानतो. Happy

हुतात्मा चाफेकर बंधुना आदरांजली!

त्यांच्या हौतात्म्यातूनच सावरकरांच्या स्वातंत्र्याकांक्षेचा अग्नी आणखी प्रज्वलीत झाला आणि त्यांनी त्यांच्या घरातील अष्टभुजादेवीसमोर सर्वज्ञात शपथ घेतली!
चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच सोलापुरात पाहिला होता. फार फार कष्ट घेऊन तो सर्व काळ उभा केला होता. उत्तम होता.
त्याची सीडी आता पुढील पिढीसाठी घेऊन ठेवली पाहिजे. स्वातंत्र्याच्या संग्रामात एका घरातील तीन तीन मुलगे ऐन तारुण्यात फासावर चढले हे पुढील पिढ्यांना माहीत असायला हवे.
१९७६-७८ या काळात गणेशखिंड मार्गावर हुतात्मा दामोदरपंत चाफेकरांचा अर्धपुतळा होता.

स्मरण दिल्याबद्दल, मंदार जी धन्यवाद!

मंदार.....तारखेच्या निमित्ताने का होईना पण अशा हुतात्म्यांचे आपण आदरपूर्वक स्मरण करतो ही त्यांच्या कर्तृत्वाला वंदन करणारीच बाब असते. एका विलक्षण योगायोगाने मी २२ जून २०१२ रोजीच चिंचवडच्या 'चापेकर चौका'तील एका दवाखान्यात होतो आणि औषधाच्या निमित्ताने याच चौकात येणेही घडले. बोर्ड पाहाताच त्यांचे स्मरण लख्खकन झाले.

जायू आणि नचिकेत पटवर्धन यांचा "२२ जून १८९७" मी प्रथम प्रदर्शनात तर पाहिलाच होता शिवाय चित्रपट रसग्रहण वा चर्चा माध्यमांच्या द्वारे हाच चित्रपट कित्येक वेळा ठिकठिकाणाच्या महोत्सवात प्रदर्शित गेला होता. खुद्द पटवर्धन दांपत्यासमवेतदेखील चित्रपट निर्मितीसंदर्भात चर्चा करण्याची संधीही आमच्या ग्रुपला लाभली होती. (दोन तासातील दीड तास अधिकारवाणीने एकट्या जायूताईच बोलत होत्या. त्या संग्रामाचा खूप अभ्यास केल्याचे क्षणोक्षणी जाणवत होते.)

एकाच घरातील तीन कर्ते पुत्र या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत कामी येतात आणि तेही हसतमुखाने, ही बाब कमालीची आगळी तर आहेच शिवाय त्यांच्या निघून जाण्याचा धक्का सहन करणारे चापेकर कुटुंबियही तितकेच वंदनीय मानावेत इतक्या योग्यतेचे ते लोक होते.

विनम्र आदरांजली.

अशोक पाटील

महाराष्ट्रातील चापेकर ,फडके, गोखले ,घाटे, अष्टपुत्रे,विद्वांस, पंचपात्रे यासर्व विस्मृतीत जात असलेल्या महापुरुषांच्यावर चित्रपट बनवले गेले पाहीजेत, त्यांची भव्य स्मारके उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबिवली गेली पाहिजे.

अशोकमामा, घरातले तीन कर्ते पुरुष फाशी गेल्यानंतर चाफेकर कुटुंबाचे पुढे काय झाले, त्यांचे वंशज अजूनही आहेत का, असले तर कुठे आहेत वगैरे माहिती कुठे मिळू शकेल?

तात्या टोपे यांच्या वंशजांनी लिहिलेले Operation Red Lotus हे पुस्तक माझ्या संग्रही आहे. त्यात त्यांच्या हयात असलेल्या बर्‍याच वंशजांची माहिती व प्रकाशचित्रे आहेत. चाफेकरांच्या कुटुंबियांबद्दल एखाद्या छोट्या पुस्तिकेत, किंवा इतर एखाद्या वेगळ्या पुस्तकात माहिती आहे का?

इतरांनीही अशी माहिती कुणाला असल्यास जरूर इथे सांगावे.

चाफेकर बंधुना आदरांजली!
दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर यांना मुंबईतून आणि हैद्राबाद येथुन पकडल्यावर, ब्रिटीश अधिकार्‍यानी त्यांना गुन्हाची कुबली दिल्यास फाशी ऐवजी जन्मठेप तीही फक्त चार वर्षाची अशी शिक्षा होईल असे खोटेच सांगुन त्यांच्याकडुन गुन्हा कबुल करुन घेतला. आणि तरिही त्यांना न्यायालयाने? फाशीचीच शिक्षा दिली हे दामोदर चाफेकरांना कळल्यावर, फाशीची शिक्षा टाळण्यासाठी ज्या भ्याडपणे इंग्रजी सत्तेसमोर ते शरण गेले (म्हणजेच स्वत: दिलेला गुन्हाचा कबुलीजबाब बदलने वगैरे) ही अगदिच लाजिरवाणी गोष्ट होती. त्याऐवजी वासुदेव चाफेकर यांनी ज्या तडफदारपणे ब्रिटीश अधिकार्‍यांना सांगितले की "की आम्ही तुम्हाला (इंग्रजांना) कधीही या देशाचे शासक म्हणून स्विकारणार नाही. आणि तुम्हाला गोळ्या घालने हेच आम्ही आमचे कर्तव्य/धर्म समजतो" असे सांगुन ते आणि "महादेव विनायक रानडे" हे हसत हसत फाशी गेले.

विजय_आंग्रे | 23 June, 2012 - 16:16 नवीन
चाफेकर बंधुना आदरांजली!
दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर यांना मुंबईतून आणि हैद्राबाद येथुन पकडल्यावर, ब्रिटीश अधिकार्‍यानी त्यांना गुन्हाची कुबली दिल्यास फाशी ऐवजी जन्मठेप तीही फक्त चार वर्षाची अशी शिक्षा होईल असे खोटेच सांगुन त्यांच्याकडुन गुन्हा कबुल करुन घेतला. आणि तरिही त्यांना न्यायालयाने? फाशीचीच शिक्षा दिली हे दामोदर चाफेकरांना कळल्यावर, फाशीची शिक्षा टाळण्यासाठीज्या भ्याडपणे इंग्रजी सत्तेसमोर ते शरण गेले (म्हणजेच स्वत: दिलेला गुन्हाचा कबुलीजबाब बदलने वगैरे) ही अगदिच लाजिरवाणी गोष्ट होती. त्याऐवजी वासुदेव चाफेकर यांनी ज्या तडफदारपणे ब्रिटीश अधिकार्‍यांना सांगितले की"की आम्ही तुम्हाला (इंग्रजांना) कधीही या देशाचे शासक म्हणून स्विकारणार नाही. आणि तुम्हाला गोळ्या घालने हेच आम्ही आमचे कर्तव्य/धर्म समजतो" असे सांगुन ते आणि"महादेव गोविन्द विनायक रानडे" हे हसत हसत फाशी गेले.>>>महादेव गोविन्द विनायक रानडे??आंग्रे इतिहास फारच पक्का आहे की तुमचा Proud बायदवे हे न्यायमुर्ती आणि हे रानडे सेमच का? पुर्ण नाव तीन शब्दी असते, हे चारशब्दी कसे.

Pages