विंबल्डन - २०१२

Submitted by Adm on 21 June, 2012 - 01:17

यंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)
फेडरर वि टिपसार्विच
मरे वि फेरर
राफा वि त्सोंगा
उपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.

महिला एकेरी:
शारापोव्हा वि कर्बर
राडाव्हान्सा वि स्टोसुर
सेरेना वि क्विटोवा
वोझनियाकी वि अझारेंका.

यंदा व्हिनस आणि किम ह्यांना मानांकन मिळालेले नाही. १९९७ नंतर पहिल्यांदाच व्हिनसचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे!

हा धागा ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राफा आहे ना दुसरा?....>>>>स्वाती,मला तरी एकच राफा माहित आहे दुसरा राफा कुठुन आणलास? Happy

लोक्सानु इथे जाऊन ड्रॉ पाहिलात का??
आपली घोडी चालवायला मज्जा येते......आणि कोण कोण कुठे अडेल याचा आधीज अंदाज येतो....:)

मी पण येणार आहे. फ्रेन्च ओपन चुकवले मी आता हि स्पर्धा नाही चुकवणार. Happy
पराग आणि सशल आठवण ठेवल्याबद्दल आभार! नेहमी प्रमाणे माझे वोट जोकोला.

विंबल्डन सुरु !!!!
फेडररची मॅच बोर झाली तशी.. पण ठिके पहिलाच राऊंड होता..

पोव्हा सरळ जिंकली.. आता किम वि जॅंकोविक आहे..

kim won.... 6-2 6-4 Happy

If everything goes well as per as her injuries are concern I would like to see how Kim and Maria does Happy

धाग्याच्या मालकांना फासे कसे पडलेत ते लिहायला उसंत नाही का?
बाप्यांमध्ये जोको वि. बर्डिच (गेला बिचारा!), फेडरर वि. टिपसर्व्हिच, फेरर वि मरे, त्सोंगा (की आणखी काही?) वि. राफा असे उपांत्यपूर्व फेरीचे सामने होऊ शकतील.
आमच्या बाळ्यासाठी याहीवेळी 'काट्याने काटा निघेल' अशी परिस्थिती आहे.

कृपया.................. प्रत्येकाने आपापला प्लेअर निवडा.............तर बोलायला अजुन मजा येईल..........
.
.
.
माझा खेळाडु :- राफा.......आणि ..मारिआ शारपोरव्ह..............
.
.
.
तुमचा..? Happy

>>व्हिनस विल्यम्स विंबल्डनबाहेर .........अरेरे
>>आता मारिआ जिंकणार.......

या दोन वाक्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? नाही ना?

>>मारिआ शारपोरव्ह
हा कोण?

Light 1

>>ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे
याला काय अर्थय का? Proud आपापले अंदाज सांगा तर मजा.

या दोन वाक्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? नाही ना? >>>>>>>> लोला .......नाही ना कळाला अर्थ...... जाउ द्या ना मग.........:हाहा:

My personal fav is Maria and then Ana/Wozniacki from Women's

Men I can only think of FedEx/Djoko Happy

ESPN2 ने सॉलीड सहकार्य दिलंय यावेळी Happy

Pages