वर्षले शुभ्र मोती

Submitted by उमेश वैद्य on 20 June, 2012 - 03:53

वर्षले शुभ्र मोती

अखेरीस उघडूनी मेघांचा पंख
वर्षले शुभ्र मोती चिंब आसमंत

मोत्यांचे सर वारा गुंफतो माळ
उंच पहाडातून ये चंदेरी ओघळ

मेघ येती जाती पिंजला कापूस
भरतो पाऊस पडे टिपूस टिपूस

विज म्हातारी करी दळण कांडण
सासू सुनेचे जणू लागले भांडण

भेटले नाले नदी भरून पावली
घेऊन मुलांना जशी पुरंध्री चालली

वाट पाहतो समुद्र ये कुटुंब-कबिला
स्वागतास त्याच्या तो शुभ्र फेसाळला

धरित्रीच्या अंगावर विखूरले पाचू
आलाच पाऊस चल आनंदे नाचू

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: