बदल....

Submitted by स्वरुप on 14 September, 2008 - 13:05

स्फुर्ती : आसावरी काकडे यांची "समज" ही कविता....

आताश्या हे असं का होतय?
तसा दिसतोस रोजच...
पण भेटतोस क्वचितच...

माझा नवा शर्ट
कधीमधी बदललेली हेअरस्टाइल
चष्म्याची नवी फ्रेम
काही म्हणजे काहीच तुझ्या लक्षात येत नाही...
कधीकाळी माझा बदललेला हातरुमालही
तुझ्या नजरेतुन सुटायचा नाही...

माझ्या प्रमोशनची बातमी
माझा नवा फ्लॅट
माझी एंगेजमेंट
या सगळ्यात
तुला विशेष काहीच वाटत नाही?
कोरडं अभिनंदन... फॉर्मल बुके!
बस एव्हढच?
शाळेत असताना माझ्या वक्तृत्वाच्या ट्रॉफीची
तू मिरवणूक काढली होतीस...
तू विसरलायस सगळं की......?

माझ्या वाढदिवसाला
अजुनही तुझाच पहिला फोन येतो..
पण कर्तव्य केल्यासारखा
किंवा सवयीचं झाल्यासारखा
ते स्वतः बनवलेल
"for a very very very special friend"
आणि "फक्त तुझाच"
असं लिहलेल ग्रिटिंग नाही
की पार्टीचा लाडि़क हट्ट नाही
तिकडुन best wishes आणि इकडुन thank you
बस्स इतकच...

कदाचित मीही असाच वागतो का रे?
बहुतेक.... हो!
तुझ्या वाढदिवसाचा आजकाल
reminder लावायला लागतो...
तुझा फोन नंबरही डायरीत
बघायला लागतो....
sms तर कित्येक दिवसात
केलेला नाहिये मी तुला...

कधी घेतला होता रे एकत्र चहा आपण?
कधी भेटलो होतो टपरीवर?
कधी शेअर केली होती आपण सिगरेट
शेवटची?
न आठवण्याएव्हढ जुनं झालय सगळं...

हे असं का झालय रे सगळं?
तुटकतुटक वरवरचं...

प्रत्येक सरता उन्हाळा
संपवत चाललाय नात्यातली ओल...
की आपण so called "मॅच्युअर" झालोय?

-स्वरूप

गुलमोहर: 

आक्षी सोळा आणं खरं लिवलयस बघ!
पैयले न्हाय र्‍हात आपुन मोठ्ठ झाल्यावर Sad

.हे असं का होतं कळत नाही.. पण
असं होतय मात्र खरं..
सुभाष