येत जा देऊन थोडी कल्पना - तरही गझल

Submitted by बेफ़िकीर on 13 June, 2012 - 05:27

नवीन तरहीत माझा विनम्र सहभाग, तरही पंक्तीसाठी व धाग्यासाठी डॉ. कैलास गायकवाड यांचे आभार

-'बेफिकीर'!

=============================================

एक तर येऊ नको ... वा यौवना
येत जा देऊन थोडी कल्पना

काय हा पाऊस आकाशा तुझा
ही जणू विधवा मुलीची सांत्वना

भेटुनी आलो तिला नुकताच मी
घे तुला हा गंध माझा चंदना

माणसांशी व्यर्थ स्पर्धा ठेवली
आपला तर आपल्याशी सामना

सोबती असुदे मरेपर्यंततर
मी तुझा कोणीतरी ही वल्गना

या समाजाने ठरवले शेवटी
आमच्या शुभकामनांना वासना

प्रेषितांनो देव कसला आणता
या ठिकाणी साध्य ठरली साधना

फार नटते ती म्हणे आधीहुनी
जाणवत असणार माझी वंचना

घेतल्यावर जास्त आठवतोस तू
मी न घेता का करावी प्रार्थना

मन तपासावे स्वतःचे एकदा
कोणती आहे कुणाची वेदना

आजही आहेत पांचाली इथे
केवढा तू 'बेफिकिर' मनमोहना

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

एक तर येऊ नको ... वा यौवना
येत जा देऊन थोडी कल्पना

काय हा पाऊस आकाशा तुझा
ही जणू विधवा मुलीची सांत्वना

भेटुनी आलो तिला नुकताच मी
घे तुला हा गंध माझा चंदना

माणसांशी व्यर्थ स्पर्धा ठेवली
आपला तर आपल्याशी सामना

फार नटते ती म्हणे आधीहुनी
जाणवत असणार माझी वंचना

मन तपासावे स्वतःचे एकदा
कोणती आहे कुणाची वेदना

आजही आहेत पांचाली इथे
केवढा तू 'बेफिकिर' मनमोहना

हे सर्व शेर अतिशय आवडले !

मस्स्त गझल!