मराठीमधून इंग्रजी मधे अनुवादीत झालेली काही पुस्तके आहेत का ?

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 June, 2012 - 06:39

मला अशा पुस्तकांची नावं हवी आहेत जी मराठी मधून इंग्रजी मधे अनुवादीत झाली आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन कुंडलकरचं 'कोबाल्ट ब्लू' - अनुवाद ओंकार कुलकर्णी
सुनीताबाईंचं 'आहे मनोहर तरी' - गौरी देशपांडे
बनगरवाडी - मनोहर माळगावकर
प्रकाशवाटा
स्मृतिचित्रे

सध्या इतकीच आठवत आहेत.

धन्यवाद भरत. भारी लिंक आहे.

मृत्युंजय, राधेय, ययाती इंग्रजीत अनुवादित झालेली आहेत. विंदा च्या कविताही रुपांतरित झाल्यात असे आठवते.

वाघ सिंह माझे सखे सोबती हे दामू धोत्रे यांचे आत्मचरित्र वाइल्ड अ‍ॅनिमल मॅन या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
माझ्या ९ वर्षाच्या भाच्याने अगदी पारायणं केली होती त्या पुस्तकाची.

'अस्वस्थ दशकाची डायरी' या अविनाश धर्माधिकारींच्या पुस्तकाचं पण भाषांतर गौरी देशपांडेंनी केलं आहे. Dairy of a dacade of agony नाव आहे मला वाटतं

धन्यवाद सगळ्यांना, माझ्या मुलीच्या इथल्या - मेलबर्न - शाळेतल्या शिक्षिका आहेत त्यांना वाचायला एखादं पुस्तक देता येईल का बघत होते.