खोबर्‍याची वडी

Submitted by धनश्री गानु on 23 May, 2012 - 04:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी खोवलेले खोबरे.
१.५ वाटी साखर.
वेलदोदोडा पावडर चवीपुरती

क्रमवार पाककृती: 

१. खोवलेले खोबरे व साखर तासभर एकत्र करुन ठेवा.
२. यात वेलदोडा पावडर घालून मंद आचेवर शिजवत ठेवा.
३. साधारण कोरडे होईपर्यंत शिजवा.
४. एक किंवा दोन ताटांना तूप लावून हे मिश्रण त्यावर पसरवा.
५. थोडे गार झाल्यावर सुरीने वड्या पाडा.

वाढणी/प्रमाण: 
आवडली तर लगेच फस्त होईल.
अधिक टिपा: 

मिश्रण शिजवताना त्यात रंग येण्यासाठी गाजर, बीट किसून घालता येईल किंवा आमरस घालून सुद्धा छान चव येते.
आई काहीच न घालता या वड्या इतक्या सुंदर करते, आजपर्यंत मी एकदाही विकतची वडीची चव इतकी छान बघितलेली नाही. साधी आणि चवदार

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, मिश्रण फारच कोरडं झालं तर दूध घालयचं, म्हणजे वड्या पडायला त्रास होत नाही. अन्यथा नाही घातलं तरी चालतं. असा माझा अंदाज.

माझ्या आईचा पण हातखंडा प्रकार. वाचायला सोपा वाटत असला तरी तंत्र जमायला मात्र, सरावच लागतो.

धनश्री, खोबर्‍याची वडी माझी पण आवडती.

ही बघ काही दिवसांपुर्वी केलेली वडी

naral amba vadi.jpg

रेसिपी जवळ जवळ तश्शीच, पण ह्या वड्यांची एक चंमत ग आहे. सारण एका गोष्टी साठी केलं मग वेळच नाही झाला. ठेवलं गेलं फ्रिज मधे. दुसर्‍या दिवशी हाफिसातून आल्यावर घाट घालावा लागणार नाही असा काही पदार्थ करुन संपवूयात सारण म्हणून तेच सारण थोडं गरम करुन त्याच्या वड्या थापल्या थाळीला तूप लावून. आंबा+नारळ्+साखर मग टेस्टी तर होणारच होत्या. संपल्या पटापट Proud

हे मिश्रण मी मावेत केलय. मावेत पटकन आळतं.

मी काचेच्या बोल मधे हाय वर अंदाज घेत घेत केलं. आधी २ मि. मग चमच्याने हलवून पुन्हा २ मि. असं करत करत केलं आळेपर्यंत (१ मध्यम नारळ+ आपल्या चवी नुसार साखर+वाटी दिड वाटी आमरस असं मिश्रण घेतलं तर ८-९ मि. तरी लागतात पुर्ण आळायला) एकदम ५-७ मि. सेट केली तर मला वाटतं लागेल मिश्रण.

आई काहीच न घालता या वड्या इतक्या सुंदर करते>>>>>>
हे कसं शक्य आहे ब्बॉ? निदान साखर खोबरं तरी लागेलच ना?(दिवे!!)