ओढ लाविती अशी जिवाला गावाकडची माती...

Submitted by संत्या on 22 May, 2012 - 13:55

नुकताच गावाला जाऊन आलो. दोनच दिवस होतो त्यामुळे कुठे फिरता नाही आले. पण टोमॅटो, ऊसाच्या शेतात आणि धरणावर मात्र जाऊन आलो. त्यावेळी काढलेले काही प्रचि इथे देत आहे.

१) धरणाचा दरवाजा

२) २ ते ८ धरणाच्या पाण्यात पोहोणारी गावकरी मंडळी...

३)

४)

५)

६)

७)

८)

९) धरण

१०)

११) गुलमोहोर

१२) टोमॅटोचे शेत

१३) बेबी टोमॅटो

१४) टोमॅटोच्या फुलाची कळी

१५)

१६)

१७) टोमॅटोच्या फुलाची कळी

१८) जी.एम.आर्.टी.

१९) कांदा

२०) टोमॅटोचे शेत

२१) ऊसाचे शेत

गुलमोहर: 

छान आहेत सर्व प्रकाशचित्रे...:स्मित:
कोनत गाव म्हनायच तुमच..!

अवं गावं कोणच्च म्हणायच तुमचं? भरुन पावलो. मस्त फोटो आहेत. इथे आमच्या पुण्याच्या धरणात पाण्याचा खडखडाट आणी तुमच्याकडे अमृतधारा.

धन्यवाद लोकहो!

हम्म, विसरलोच माझ्या गावाचे नाव लिहायला...

मु. पो. येडगाव (गणेशनगर) Happy
ता. जुन्नर, जि. पुणे.
नारायणगावपासुन अंदाजे ५ किमी

जबरी. सहावा फोटो काय सूर मारता मारता घेतलाय काय?>>> साधा कॅमेरा आहे रे बाबा, वॉटप्रुफ नाहीये. तो ४ प्रचि मध्ये तो मुलगा सुर मारतोय ना तिथुन घेतला आहे...

इथे आमच्या पुण्याच्या धरणात पाण्याचा खडखडाट आणी तुमच्याकडे अमृतधारा.>>> अरे ह्या धरणाचे पाणी खाली शिरुर, पारनेर, करमाळा तालुक्याला सोडतात. त्यामुळे धरणात बर्‍यापैकी पाणी असतं

खुप छान गाव.. मुख्य म्हणजे ते धरणातलं पाणी.. अन डुंबणारी लोकं.. मज्जाच मजा Happy
कांदा असा खुपसा प्रथमच पाहिला.. अन टोमॅटोच शेत मस्तच हा.. Happy

मस्त प्रचि, एकदम गारेगार वाटलं!!! Happy

मु. पो. येडगाव>>>>>>वाटलंच मला Happy

रच्याकने आजच्या वर्तमानपत्रातली बातमी वाचली का?
येडगाव धरणाच्या स्टिलिंग बेसिनच्या पाण्यात बुडुन युवकाचा मृत्यु. Sad
"उन्हाळ्याच्या सुटीमुळे येडगाव धरणाच्या स्टिलिंग बेसिनमध्ये अनेक तरूण येथे मोठ्या प्रमाणात येतात. धरण परिसरात मज्जाव असल्याने सगळे स्टिलिंग बेसिन मध्येच पोहत असतत. सध्या येडगाव धरणाच्या सांडव्यातुन नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे या पाण्याच्या तीव्र वेगामुळे येथे भोवरा निर्माण होत असतो तरी देखील हे तरूण कुठलीही काळजी न घेता येथे पोहत असतात. Sad

मज्जा करा लेकांनो पण जीव सांभाळुन.

धन्यवाद मित्रांनो,

एवढ छान गाव, शेती, धरण सोडून शहरात काय करता राव ?>>> मला काहिही समजत नाही रे शेतीतलं.... Sad

हो ना, जिप्स्या... आम्ही जाऊन आलो त्याच्या दुसर्‍याच दिवशी ही घटना घडली रे... Sad

आम्ही ही तिथलेच..पण मित्रा शिर्षकानेच तु मार डाला..

खरे तर श्रीमंतीची व्याख्याच ती कि जेथे १२ माही भरपूर पानी आसते.