हत्ति ईले पळा पळा..

Submitted by गिरिश सावंत on 19 May, 2012 - 11:03

सिन्धुदुर्गात अधे मधे गजराज अवतरतच असतात..
गेल्या वर्षि अनंत चतुर्थिलाच कुडाळ नजिक हत्ती आले होते..
तलवात डुब्मणार्या हत्तीना पाहण्यासाठी एकच गर्दी ऊसळली आणि हत्ती बिथरले..कधि हत्तीच्या मागे माणंस त्र कधि माणंसामागे हत्ती..हे सारे क्षण तुमच्यासाठी ..लाईव्ह..

तलावातल्या गच्च झाडीत हत्ती लपले होते..झाडी एवढि गच्च होती की अजस्त्र हत्तीही शोधवा लागत होता

प्रचि १
DSC_9811 copy

तीन जंगली हत्ति झाडीत प्रथमच दिसले आणी अंगावर काटा आला
प्रचि २
DSC_9819 copy

हत्ती आक्रमक पणे अंगावर चालुन येत..
प्रचि ३
DSC_9808 copy

प्रचि ४
DSC_9822 copy

हत्ति चित्कारले की पळापळ होई !
प्रचि ६
DSC_9827 copy

प्रचि ७
DSC_9832 copy

पळा पळा हत्ती ईले..
प्रचि ८
DSC_9834 copy

प्रचि ९
DSC_9836 copy

दहा पंधरा फुटावरुन चित्कारणारे हत्ती पाहण्याचा थरार सांगता येणे शक्य नाही

प्रचि १०
DSC_9843 copy

तीन तासांनी हत्ति तलावातुन जंगलाच्या दिशेने गेले
प्रचि ११
DSC_9848 copy

प्रचि १२
DSC_9850 copy

माझि बातमी प्रहार पेपर मध्ये पहील्या पानावर प्रसिध्द झाली होती

hatti 11_11 copy

गुलमोहर: 

छान प्रकाशचित्रे आणि थरारक अनुभव...!
काही दिवसापूर्वी कोल्हापूरातही बघ्यांच्या गर्दीमुळे असाच एक हत्ती बिथरल्याची बातमी ऐकली होती...

छान!

मस्तच टिपलंय !
कांही प्रचि पाहून ' माणसां इलीं, पळा पळा !! ' किंवा ' माणसां इलीं, लपा लपा ' ,हें शीर्षक अधिक समर्पक झालं असतं असं वाटलं ! Wink

गिरिश, अरे कसले अफलातून फोटो काढलेस तू! नेमका तू कसा काय तिथे पोचलास कॅमेरासहीत ? हत्तीनी स्वप्नात येऊन सांगितलं की काय "लगेच कॅमेरा घेऊन ये' Wink

हत्ती इल्ले म्हणजे काय?<<

ते "इल्ले" नसुन "इले" असे आहे., मालवणीत 'इले' म्हणजे आले असा अर्थ होतो.
हत्ती आले पळा पळा

मस्त टिपलेत.

मी गोव्याला असताना म्हणजे ४/५ वर्षांपुर्वीच हत्तींचे अतिक्रमण सुरु झाले होते.
एरवी शहाणा असणारा हा प्राणी त्याची अन्नाची आणि पाण्याची गरज भागवण्यासाठी, असे धाडस करतो.

आह्हा!!नुसते फोटो पाहतानासुद्धा थरार अनुभवला..
काय अमेझिंग फोटो टिपलेत.. हत्तींच्या साईझ चे फोटोज..खूप मजा येतीये पाहताना..
प्रत्यक्षात घाबरायला होतं कि नाही असे जंगली हत्ती पाहताना ,तेही इतक्या जवळून??
पुन्हापुन्हा पाहातच राहावेतसे देखणे फोटोज..

मस्त

गिरिश भारी ४ वर्षामागे आमच्या पाड्व्याच्या यात्रेत हत्ती फटाक्यांमुळे बिथरला , माहुताला ही नाकी नऊ आणले पट्ठ्याने. वर सांगडीत माझा मित्र पराग ध्वज घेउन बसला होता फुल्टु तंतरला होता, खाली उतर्ल्यावर अगदी बा-चा बा-ची झाली होती कारण आमच्यातल्या एका शाण्याने त्याला ध्वज का रे फाट्ला म्हणुन टीचकी दीलती

गिरिश, कमाल आहे तुमची. येवढ्या पळापळीत फोटो काढलेत. ____/\____. Happy
मला ते जंगल, हिरवीगार झाडे, आणि नदीच गढूळ पाणी पाहून कोकणात आहे असच वाटलं. धन्यवाद!.

*** नदीच गढूळ पाणी ...**
हत्तिंच्या नाचण्याने पाणी गढुळ झाले आहे...

प्रचि ३
झाडित लपलेल्या हत्तीचे पहील्यांदा फोटो मिळतच नव्हते..
पण बातमीसाठि फोटो हवेच .कारण ईतर कुठल्याच दैनिकाचा फोटोग्राफर तिथे पोहचला नव्हता..
स्वतःला सिध्द करण्याचा क्षण...मनात भिति होती..पण "जुनुन छा गया था" ...खिशातील साहीत्य काढलं आणि तलावात ऊतरलो..लेन्स १८ - ५५ होती ..तीन चार फुट पाण्यात कंबरेईतका पोहचल्यावर हत्ती दिसले...अवघ्या १०-१५ फुटावर ३ अजस्त्र हत्ति..अबब....हत्ती मागे फीरले असते तर..(पण तेव्हा 'है जुनुन' अशिच स्थिती होती ) फोटो काढ्ला..परत कॅमेरा डोळ्यावर लावला आणि हत्ति फिरलाच..क्लिक झाले की नाही समजलेच नाही ..पाण्यात आणखिनच भिजलो..चिखलातुन धुम ठोकली..धडपडत भाहेर आलो..भितिने तहान लागल्याचि जाणिव तेव्हा झाली..

(दुसय्रा दिवशि जंगली हत्तींचे फोटो पाहील्यावर घरात हत्तिंपेक्शाही भयंकर अवतार पहायला मिळाले..८ दिवस कॅमेरा बंदी होती..)

प्रिन्ट मिडीयाही ब्रेकींग न्युज..

सह्हीच!!!

अप्रतिम फोटो Happy

एव्हढ्या जवळ जाऊन फोटो काढलेत त्यी हिम्मतीला सलाम Happy

बादवे, बायकोला प्रेमाबद्द्ल विचारलं तेव्हाही एवढी घालमेल झाली नसेल<<< ही प्रेमा कोण Wink

Pages