एन्काऊंटर

Submitted by रावण on 15 May, 2012 - 08:31

बिल्डींगच्या चवथ्या मजल्यावरील गालरीत संध्याकाळी आराम खुर्चीवर बसुन मुम्बईच्या समुद्राची गार हवा खात मस्त ड्रींक्स घेत आरामात कबाब चघळत थकवा घालवण्याचा आनंदच काही और असतो. तो पण आठवडाभराच्या चौकितल्या कटकटी, कामाचा बोजा, रात्री अपरात्रीच्या गस्ती धाडी करुन करुन दमल्यावर सुट्टीच्या दिवशी बायकापोरांबरोबर दिवस घालवुन रात्री असा शांत ड्रिंक्स घेण्याची मजा मस्तच. असा विचार करत करत एक मालबोरो शिलगावली आणी पहीला झुरका मरल्या बरोबर फोनची रींग वाजली. रात्रीचे ११:३० झाले होते जराश्या वैतागानच मी सेलफोनच्या स्रिन वरच नाव वाचल."कमीशनर चौधरी साहेब"

आमच्या पोलीसी खात्यात रात्रीच बोलावण येत असतच कूठ बंदोबस्त तरी असतो किंवा कोणी मंत्रीतरी येणार असतो. आम्हाला निवांत वेळ असा नसतोच. साहेबांचा फोन म्हटल्यावर दुसरा पर्याय न्हवताच. लगेच फोन उचलुन कानाला लावला. आणी खास पोलीशी अभिवादन दिल
"हॅलो"जय हिंद साहेब"
"हा चव्हाण झोपला होतात का?"
"नाही साहेब जागाच होतो"
"ठिक आहे लगेच निघा आणी मुम्बईपुणे हायवेला या"
"ठिकाय साहेब"
"सिव्हील मध्ये या आणी सर्व्हीस रिव्हॉलवर सोबत घेउन या"
"ओके साहेब"
"तुम्हाला राऊत भेटतील ते पुढच सांगतील"
"ओके साहेब"
फोन कट झाला तसा हा प्रकार नवीन न्हवता मला पण साहेबांचा फोन येण म्हणजे प्रकरण थोड महत्वाच असणार. लगेच ग्लासात उरलेला पॅक घश्यात रिकामा केला आणि अर्धी सिगारेट अ‍ॅश र्टे मध्ये विझवली. बाथरुममध्ये जाऊन तोंडावर पाण्याचा सपकारा मारला आणी रुमालान तोंड पुसून बेडरुन मध्ये शिरलो.

अनघा माझी बायको आणी तनिष्का माझी तिन वर्षांची मुलगी दोघी शांत पणे झोपल्या होत्या. बेडरुम मधल्या अंधुक प्रकाशात त्यांच्याकडे पाहीले. आणी त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आंधारातच कपडे बदलायला सुरवात केली. आकाशी रंगाचा हाफशर्ट आणी राखाडी रंगाची पॅन्ट चढवून बेल्ट, घड्याळ, रूमाल, ईत्यादी गोष्टी घेतल्या. पण कपाटातून सर्व्हीस रिव्हॉलवर काढताना मात्र अनघाची झोप मोड झालीच. उठून ती आश्चर्यान माझ्याकडे बघायला लागली. मलाच वाइट वाटल तिची झोप मोडल्याच.
"आता कुठे" तिन विचारल तस पाहील तर बाहेर जाणार्‍या माणसाला असा पश्न विचारायचा नसतो
पण सुट्टीच्या दिवशी रात्री अचानक आपला नवरा कुठे निघाला हा प्रश्न तीला पडण साहजीकच
कसनुस हसुन मी म्हणालो "काही नाहीग थोड काम निघाल जाउन येतो. तु झोपुन घे माझ्या जवळ दाराच्या किल्ल्या आहेत काम झाल कि मी येईन घरी.
तरीपण बेडवरून उठत म्हणाली "कॉफी करुन देऊ का."
आता तसा हा प्रसंग तिच्या साठी नवीन नाहीये. सुरवातीला लग्नझाल्यावर माझ्या अशा रात्री अपरात्री बाहेर निघण्याला खुप घाबरायची पण नंतर नंतर हे सवयीच होत गेल.
पण तरीही तिला जास्त काळजी वाटू नये म्हणून ठिक आहे म्हंटल.
तिन बनवलेली कॉफी पिऊन जरा तरतरी आली.
एकदा बेडरुम मध्ये जाउन दोन बोट चोखत झोपलेल्या तनिष्काला पाहील आणी हॉलमध्ये येउन शुज घातले आणी बाहेर पडलो.
गाडीला किक मारली आणी सुसाट वेगान मुम्बईपुणे हायवेला पोहोचलो. तिथ एक टपरी रात्रीचालू होती. एक कप चहा आणी मालबोरो मारत वाट पहात थांबलो.
थोड्याच वेळात एक टाटासूमो गाडी येऊन माझ्या समोर थांबली गाडी राऊत चालवत होता आणी शेजारी अजून एकजण होता. पण मी त्याला ओळखत न्हवतो.
"चव्हाण गाडीत बस" राऊत माझ्याकडे बघत बोलला राऊत माझा सिनीयर नेहेमी चेष्टा मस्करीच्या मुड मध्ये असणारा. पण आज तो जरा सिरीयस वाटत होता. म्हनजे काहीतरी खूप महत्वाच काम असणार हे मनोमन नोंदवल आणी गाडीत मागे बसलो.
"हे देशपांडे स्पेशल ब्रांचचे." गाडी स्टार्ट करत राऊतने सांगीतल.
मि हॅलो सर म्हणून अभिवादन केल. त्यांनी ही हॅलो म्हणून प्रतिसाद दीला

देशपांडे अंगाने दणकट आणी रुबाबदार मिशा असणारे साधारण चाळीसच्या आसपास असावेत. हा पोलिसखात्याचा माणुस आहे अशी स्पष्ट कल्पना त्यांच्याकडे पाहून येत होती.

गाडी वळून सरळ छत्रपती शिवाजी स्टेशन कडे निघाली ते पाहून जरा आश्चर्य वाटल नोरमली रात्रीच्या या गस्ती हायवेवर जास्त असतात. थोडा वेळ असाच गेला अचानक देशपांडे म्हणाले "राऊत गाडी जरा बाजूला घ्या मी मागे चव्हाण बरोबर बसतो."गाडी थांबल्यावर देशपांडे मागे शेजारी बसले.गाडी पुन्हा छत्रपती शिवाजी स्टेशन कडे निघाली

प्रथम त्यांनी माझ्याशी बोलायला सुरवात केली गप्पा मारत साधारण माहीती विचारत होते. माझी माहिती का काढत होते ते कळत न्हवत पण सिनीयर असल्यामूळे मी सर्व प्रश्णांची उत्तरे निमूटपणे देत होते.
अचानक त्यांनी मला विचारल "चव्हाण गडचीरोलीत पोस्टींग असताना तुम्ही आणी स्टाफने फायरींग केली होती. काय झाल होत?"

भितीने गोळाच ऊठला पोटात दोन वर्षापुर्वीची गोष्ट पोस्टींग सबइंस्पेक्टर म्हणून गडचीरोलीत झाली होती .
नक्शलाईट एरीया म्हणून घरच्यांनी विरोध केला पण मि घाबरायच काही कारण नाही म्हणून सांगीतल आणी हट्टान अनघाला आणी तनिष्काला घेउन गेलो होतो.
एक वर्ष साधारणपणे गेल पण अचानक तो दिवस आला भयानक अवस्था झालि होती. मि, एक पोलीस नाईक आणी सात हवालदार असा नऊ जणांचा स्टाफ होता चौकीवर आणि अचानक वायरलेसचा मेसेज आला एक दिडशे दोनशे आदीवाशींचा जमाव हत्यार लाठ्या काठ्या घेऊन येतोय. बॅकअप सपोर्ट निघालाय पण वेळ लागणार आहे.
आमच्या चौकी च्या पाठीमागेच एक छोटी नदी होती. आणी त्याच्या मागे पोलीस कॉलनी आमच्या सर्वांचे हात पाय थंड पडले.

हा आदीवासींचा जमाव एकतर गांजा, खोपडी, बंटा, अफू असली नशा करून आलेले आणी आम्हाला मारुन हे सरळ कॉलनीत घूसणार एक वेळ फक्त आमच्या पुरत असत तर समजून घेतल असत पण आमची बायका पोर त्यांच्या हाताला लागली तर ठेचून मारतील. नशेच्या भरात काय बाई आनी काय लहान लेकरु कळणार त्यांना. माझ बापाच काळीज भयानक कळवळल. स्टाफला लगेच ओर्डर दिली पोजीशन घेण्याची.
त्या सर्वांना माहीत होत की या लोकांना काहीही करून थांबवाव लागणार.

जमाव जवळ येत होता खुप नशा केली होती त्यांनी फावडे कूदळ, कोयता कूर्‍हाड लाठ्या काठ्या घेऊन आरडा ओरड करत येत होते.
मि रिव्हॉलवर हातात घेउन त्यांना तिनवेळा जावा जावा करून स्पिकर वरून सांगीतल पण तो जमाव पूढ येतच राहीला. मि त्यांना घाबरवण्या साठी तिन वेळा हवेत फायर केल. पण त्या जमावाला कशाचीच शूध्द न्हवती ऊलट आक्रमकपणे दगड भिरकावत आमच्याकडे धावत सुटला. लगेच लक्षात आल की हे लोक आता काही एकण्याच्या परीस्थीतीत नाही. सगळा स्टाफ गनस घेऊन माझ्या ओर्डरची वाट पहात होता. मग मात्र माझा धिर संपला सरळ फायरची ऑर्डर दिली दोन राऊंड फायर केल्या. तेव्हा कुठ तो जमाव पांगला. आठजण मारले गेले आणी पाच जखमी झाले. इन्कायरी झाली पण वरच्या साहेब लोकांनी सांभाळून घेतल कारण पर्यायच न्हवता आमच्या जवळ.पण माझी बदली झाली मुंबईला

आता परत ईनक्वायरी सुरू होणार अस वाटल म्हणुन सर्वकाही देशपांडे साहेबांना सांगून मी सरळ विचारल "सर माझ्या विरोधात काही एक्शन घेतेली जाणार आहे का ?"

त्यांनी काही उत्तर न देता गाडी साईडला घ्यायला सांगीतली. मग त्यांनी एक सिगारेट पेटवली आणी मला दुसरी ऑफर केली. थोडा वेळ शांतीतच गेला. मी एकदा ड्रायव्हर सिट वरच्या राऊत कडे आणी देशपांडे कडे बघत होतो.
राऊत खिडकीतुन बाहेर पाहत होता. देशपांडे माझ्याकडे रोखून पहात म्हणाले

"आम्ही तुला छत्रपती शिवाजी स्टेशन पासून थोडस लांब सोडतो तेथे तुला पिंजरा गाडी येईल त्या गाडीत एक पोचलेला गुन्हेगार आहे. त्याला कामाठीपुरा एरीयात नेऊन ऊडवायच पण फक्त त्या एरीयातच दुसरी कडे कुठही नाही. नसेल जमत तर सोडून दे आम्ही दुसर्‍या कडून हे काम करून घेउ"

मि ओके संर म्हणालो काय बोलणार डायरेक्ट ऑर्डर होती.
देशपांडेंनी एक पॅकेट माझ्या हातात दील
"ऊघडा"देशपांडे माझ्या कड पहात म्हणाले
मि ते उघडून पाहील त्यात एक जर्मन बनावटीची गन होती

"हि अन रेजिस्टर्ड गन आहे हिचा ट्राकींग नंबर नाहीये या गन नी ऊडवायच तुमच रेजिस्टर्ड ओफिशीयल वेपन राऊतांना द्या ते जमा असल्याच दाखवतील. काम झाल्या झाल्या तुमच्या बरोबर मेल्वीन थोमस नावचे कॉनस्टेबल असेल त्यच्याकडे द्या तो ती डिस्पोज करेल. समजल सर्व"

"येस सर" मी उत्तर दील.

मला त्यांनी छत्रपती शिवाजी स्टेशन जवळ एका गल्ली जवळ सोडल आणी गाडी नीघून गेली रात्रीचे २ वाजत आले होते. आणी मि त्या पोलिस व्हॅनची वाट पहात थांबलो.

जास्तवेळ नाही थांबावलागल कारण लगेच एक पोलिस व्हॅन जिला चारी बाजून जाळी असल्यान पिंजरा म्हणतात ती येताना दिसली.

क्रमशः

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान.

कथेच्या नावात भ नाही.. कथा पूर्ण होईल ही अपेक्षा करायला हरकत नाही... ( भयानक, भुक्कड, भैराळे .. सगळ्या कथा तशाच क्रमशः पडल्या आहेत. )

झोकदार कथा! पण बोट ठेवायचंच म्हंटलं तर मुंबई-पुणे महामार्ग मुंछशिटच्या जवळपासही नाही. एव्हढंच काय ते.
-गा.पै.