सहजच

Submitted by जैली on 13 May, 2012 - 03:06

सहजच
आयुश्यात बर्‍याच गोश्टी सहजच घडुन जतात्.अर्थात ईश्वराच्या ईछेनेच घड्तात अगदी सहजच,आपल्याही न कळत.आपण कर्म करत असतो,अगदी सवयी नुसार.मानवी जीवन हे कमा॑नी बान्धलेले असत.प्रत्येक क्षणी पावलो पावली आपण कर्म करत असतो.कर्मा पासून कोणाचीही सुटका नाही.कर्म करतच जीवनाचा प्रवास करायचा असतो. जन्म हा सुद्धा मागिल कर्माचा भाग आहे म्हणुनच प्राप्त होतो."कर्म योगे सकल मिळाले" असे समर्थ सान्गतात . आपले आप्त, स्वकिय्,मित्र, शेजार आपल्या कर्मा नुसारच मिळत असतात.समर्थ सान्गतात जीवन ही एक साधना आहे.ही साधना लक्षपुर्वक करुन सह्ज समाधि पर्यन्त गेल पाहिजे.जीवनातील साध्या प्रसन्गातुन सह्ज समाधि साधली पाहिजे . यासाठी विवेकाला फार महत्त्व आहे. एक प्रसन्ग येथे सन्गावा वाटतो ' पावस येथील स्वामी स्वरुपानन्द महाराज ह्यान्च्या अभन्गज्ञानेश्वरीतील चित्र श्री. विसुभाऊ गोलीवडेकर ह्यानी काढलेत १९६० ला. त्यान्चा एक प्रसन्ग - अभन्गज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा पावस येथे झाला त्या प्रसन्गी विसुभाऊ पावस येथे या सोहळ्या करिता तेथेच होते.स्वामीस्वरुपानन्दान्ना ते आप्पा म्हणायचे मुम्बईला निघतान्ना आप्पान्नी त्याना स्वतःचा फोतो दिला.मुम्बईला आल्यावर विसुभाऊन्नी तो स्वयम्पाक घरात लावला.त्यन्च्या कडुन ध्यान ,जप वगैरे काहिही होणार नाही असे स्वामीन्ना त्यान्नी आधिच सन्गितले होते.रोज जेवतानना मात्र स्वामीन्चे दर्शन व्हायचे.चित्र नगरीत काम करत असल्यामुळे अभक्ष खात असत्.परन्तु नन्तर मात्र स्वामीस्वरुपानन्दानच्या क्रुपेने सहजच ती सवय सुटली. आपल्या मनात कितीतरी आपल्याला बेचैन करणार्‍या गोशटी असतात पण स्वमीन्च्या सहज शब्दान्नी आपण त्यातुन मुक्त होतो. पावस येथिल समाधि मन्दीरात गेल की मनाला प्रसन्न वाटत. ह्रदयात आनन्द भरुन येतो.सहज श्रध्दा बसावी असच स्वामीन्च व्यक्तीमत्व होत्.समधि मन्दीरात आपल मन सहजच रमत.सहजच पुस्तक घेऊन वाचण्याची ईछा होते.सहजच मन तेथिल वातावरणात रममाण होत, आणि सहजच आयुश्याला नवी दिशा मिळते,सहजच आयुश्य बदलुन जात.सो ह्म साधनेने रामरुपात विलीन होतो आणि जिवनाचा अर्थ कळतो सहजच.

-जैली.

गुलमोहर: