वैश्नोदेवी ला जान्यचि पुर्वतयरि काय करावि ?

Submitted by तेजु... on 5 May, 2012 - 09:18

आम्हि चार जोडपी वैश्नोदेवीला train नि जानार आहोत . माझि १.५ वर्शाचि मुलगि सोबत आहे.काय पुर्वतयरि करवि, क्रुपया सन्गवे तसेच तेथे जौन आले त्यन्चे अनुभव हि shair karave(sorry 4 mistakes)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

kiran,
I mean sorry for mistakes .
तुम्हालाहि काहि अनुभव अस्ल्यास लिहा.
(प्रवासाचा)

चालावे जास्त लागते तिथे... रिक्षा आहेत पण त्या अर्धकुमारी वरुन आहेत..लहान मुलांना उचलणारे आहेत पण ते काहीच्या काही भाव सांगतात.. जर हवे असतील ते तर योग्य भाव करुन घ्यावेत..

लहान मुलांना उचलणारे आहेत पण ते काहीच्या काही भाव सांगतात.. जर हवे असतील ते तर योग्य भाव करुन घ्यावेत...>>>>>> नको त्या कर्ता एक खन्दा गडि आहे माझ्याकदे .... तो जास्त भाव हि खात नाहि (नवरा माझा)
(smiley kashi dyayachi?)
एकुन्च प्रवास करतना काय कालजि घ्ययचि ? या वेळॅस तेथे खुप थन्दि असेल काय? गरम कपडे ई.

वैष्णोदेवीला जाताना जास्त सामान बरोबर घेऊ नका.
camera, mobile, other electronic वस्तू सुद्धा बरोबर घेऊन आत जाऊ देत नाहीत.
चमड्याच्या वस्तू जसे पाकिट, पट्टा, पर्स, चपला याला देखिल बंदी आहे.
बिड्या, पान, तंबाखु... .... No. No...No Happy
जे काही सामान असेल ते तुम्ही जेथे राहणार आहात(कटरा) तेथेच ठेवा मग देवीच्या दर्शनाला जा. भरपूर चालावे लागते. वाटेवर जेवणाची सोय असते.
कटरा बस स्टॉप जवळ Enquiry and Reservation Counter आहे तिथून यात्रा स्लिप घ्यावी.
घोडा देणारे, उचलून नेणारे यांच्याकडे त्याचे valid registration card असते. त्याचे rates ठरलेले असतात.
१९९६ साली मी गेले होते. संध्याकाळी ७ ला आम्ही चढायला सुरुवात केली. पहाटे १.३० ला दर्शन झाले, सकाळी ६.३० पर्यंत खाली आलो आणि सर्वात आधी घरच्या लोकांनी Pain Killer घेतली.
तुमचा प्रवास सुखाचा होवो!!

मी आता २ वर्षा पुर्वी जाउन आलेलो........एकटाच ...... रात्री चढणार होतो पण बहुतेक लोकांनी सकाळी चढा म्हणुन सांगितले...म्हणुन आरामात ८ ला सुरुवात केली चालतच गेलेलो..आता रस्ता चांगला मोठा बनवला गेला आहे...त्यामुळे जास्त त्रास होत नाही चढणाचा... १०-११ पोहचलो होतो वर... नंतर पुजा अर्चना करुन ५ पर्यंत खाली उतरलेलो..

As mentioned above be prepared to walk a lot. I think it is 8 to 10 km each way ( not sure may be 16km each way). There are peoples and horses available too.
If you decide to walk, not to worry as most of the road / path is well covered with roof, also has arrangments to stop / sit / relax. Also enough toilets and drinking water available throughout the way. From my experience it is better to walk in the evening after the sunset so that overall temperature will be pleasent to walk and cause less sweating and walk down during the dawn. No point in taking electronic itmes though they have lockers to keep it at the top. Take towels as you might have to take bath before entering in the temple. Take enough water bottles. When you start climbing there will be a check post and they make objection for water bottle. Insist to ahve it with you and they will allow. They just take preacutions so that some one can not take liquor etc. If your kid id just 1:5 yrs old, i think it might be better if you can carry the kid in kangaroo bag or have stroller.
Happy journy. Will post here if i come across anymore points.

I do not thing it will be too cold at this time not sure though as we went in the month of august. After walking 16km and lot of sweating i felt like my i am wearing t-shirt of 25kgs. Happy
Better to carry pain killers but take only if required. Do carry a bottle of zandu bam and iodex. It will be of a great help when you return to hotel. I mean it.

एखादा गरम कपड्यांचा जोड बरोबर ठेवलेला बरा. सध्या तिथे बर्‍यापैकी उन्हाळा आहे. पण मध्येच अचानक एखादा पाऊस जरी झाला तर २-३ दिवसांसाठी वातावरण बदलतं. गेल्या महिन्यात अचानक झालेल्या पावसामूळे भरपूर थंडी होती त्या भागात.

.

अता helicaptor चि सोय झालि आहे ७०० rs per head online booking hote मस्त आहे>>>>>हि सेवा बन्द केली बहुदा..

मी बहुदा ६ मे ला news मधे पाहील.
सोहम तुम्हि अगदि recently जाउन आलात , आता तेथे temp कसे असते दिवसाला?

भरपूर चालण्याची तयारी असेल तरच चालत जा, नाहीतर घोडा किंवा डोलीचा पर्याय स्वीकारा.
चालत जाणार असाल तर एंक महत्वाची सूचना : काही ठिकाणी पायरया लागतात, त्याने चालण्याचे अंतर कमी होते. त्या घेऊ नका.
हल्ली डोली वाल्यांसाठी एंक जवळचा रस्ता काढला आहे, पायी जाणारे त्यानेच जातात. घोडे दुसर्या रस्त्याने जातात. म्हणजे पूर्ण डोंगर चढून , वळसा घालून खाली उतरतात. आम्ही साधारण पणे ५ वर्षापूर्वी गेलो होतो. तेव्हा अंतर कमी होतंय म्हणून पायर्या चढल्या आणि जवळचा रस्ता आम्हाला लागलाच नाही. त्यामुळे घोड्यांच्या रस्त्याने पूर्ण चढण चढून पुन्हा खाली उतरावे लागले. मला वाटत संध्याकाळी 7 च्या सुमारास चढायला सुरुवात केली होती ते सकाळी ५ वाजता मंदिर स्थळी पोचलो. त्यानंतर मुख्य मादिरापर्यंत जायला देखील मोठी रांग असते. त्यातही २/३ तास किंवा जास्त उभं रहायची तयारी ठेवा.
वरती चढण्यासाठी कटारा गावात आधी नोंदणी करावी लागते आणि नंतर तो कागद ( परची ) वर मंदिरात जायच्या वेळेस दाखवावी लागते. हि प्रची ( रिसीट) नसेल तर रांगेत उभं राहता येत नाही. तेव्हा जर मोठा ग्रुप असेल तर सगळ्यांची एंक रिसीट घेऊ नका. चढताना पुढे मागे होते. सगळे जण एका वेळेस पोचू शकत नाहीत. घोडेवाले, डोलीवाले वेगवेगळे पोचतात. आमचा ४० जनाचा ग्रुप होता. प्रय्त्याक्षा त्यातले अर्धे लोक वरपर्यंत आलेच नाहीत. दर्शन घेऊन परत येतानाही पायपीट करायची तयारी ठेवा.
हेलिकॉप्टर वाल्यांना पूर्ण रांग लावावी लागत नाही. जवळ जवळ अर्धी रांग कमी होते. तसेच मिलिटरी आणि अपंग किंवा रांगेत जास्त वेळ उभं राहू ना शकणार्यांना सवलत मिळते. म्हणजे मुख्य दारापासून रांग लावावी लागत नाही. त्यासाठी तेथील ऑफिस मध्ये जाऊन तुमच्याकडचे कागदपत्र दाखवावे लागतात. तसाच मला वाटत सकाळी आणि काही ठराविक वेळेस दर्शन बंद असते. अशा वेळेस पोचलात तर रांगेत उभं राहण्याचा कालावधी वाढतो.
शक्यतो संध्याकाळी चढायला सुरुवात केली म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही. मी सांगितल्याप्रमाणे आम्ही रस्ता चुकून लांबच्या रस्त्याने गेलो, त्यात माझ्या नवर्याचा पाय अपघातात दुखावलेला आहे. आमच्याबरोबर एंक ६० वर्षाच्या पुढचे काका काकू होते. केवळ त्यांच्यामुळे आम्ही चढलो. कारण हा रस्ता हल्ली जास्त वापरत नाही त्यामुळे कितीदा तरी आम्ही चौघाच रस्त्यावर असायचो. आणि ते वृद्ध असून जाताहेत तर आम्ही कसे मागे येणार? प्रत्यक्ष दर्शन म्हणाल तर काही क्षण असते. म्हणजे निट काही बघायला पण मिळत नाही. आता गुहा उत्तम संगमरवरी बांधलेली आहे. देविवरची श्रद्धा मोठी आहे, वाटेत अनेक अपंग, वृद्ध लोक सुद्धा " जय मातादी" म्हणत पायी चढताना बघितले.
परत आल्यावर मात्र आणलेला सगळ उसनं अवसान संपल आणि जे झोपलो ते जेवायलाही उठलो नाही. तुम्ही फक्त वैष्णव देवी करणार असाल तर ठीक, अजून प्रवास असेल तर येताना देवीला जा, नाहीतर पुध्याच्या प्रवासाला दमून जाल. आम्ही काश्मीर आणि वैष्णोदेवी गेलो होतो. नशिबाने येताना वैष्णोदेवी होत. तसेच हे ठिकाण अतिरेक्यांच्या लिस्ट वर असल्याने सुरक्षा व्यवस्था आणि चेकिंग सगळीकडे असते.

माझा हा सगळा अनुभव ५ वर्षापूर्वीचा आहे, आता अजून सोई झाल्या असतील.

देवकु, माझे पालक कालच वैष्णोदेवीला हेलिकॉप्टरने गेले. ते केसरीतर्फे गेले होते. त्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरचं बुकिंग तेवढं करावं लागलं,बाकि सगळं केसरीतर्फे होतं.
आईला तिथे थंडी वाजत होती पण स्वेटरवर काम भागलं.

देवकु,

वैष्णोदेवीचा माझा अनुभव.

आम्ही संध्याकाळी साडेआठ नउ वाजता चढायला सुरुवात केली आणि परत येईपर्यंत दुपारचा १ वाजला होता. आम्हाला एवढा वेळ लागायच कारणः

१.खर तर वैष्णोदेवी च मंदीर जाऊन येऊन २६ किलोमिटर आहे. पण त्यापुढे १.५ किलोमिटरवर भैरो नाथाच देऊळ आहे. आम्हला सांगण्यात आल होत की वैष्णोदेवीच दर्शन घेतल्यावर भैरोनाथाच दर्शन घेऊन परत आलं की ती यात्रा पूर्ण होते. आम्ही ते सर्व करून खाली कतराला आलो.

२. आम्ही गेलो तेंव्हा नॉर्थ इंडियन्सचे नवरात्र होते. त्यावेळी प्रचंड गर्दी असते. हे मार्च च्या शेवटच्या आठवड्यात.

३. देवळात काही नेता येत नाही. त्यासाठी लॉकरची व्यवस्था असते. त्याला ते पैसे घेत नाहीत पण त्यामुळे रांग खूप मोठी असते. आमच्या जवळ कॅमेरा, घड्याळ वगरे गोष्टी होत्या ते ठेवण्यासाठी लॉकर घ्यावा लागला. त्या रांगेत दोन तास उभे होतो.

४. देवीच्या देवळासाठी रांग खूपच मोठी होती. सकाळी सहा वाजता आरती असते तेंव्हा दर्शन बंद असतं.

५. देवीच्या आरतीनंतर भैरोनाथाची आरती होते. त्यावेळी भैरोनाथाच देऊळ बंद असतं दर्शनाला. त्यामुळे तेह्थी दोन तास थांबावं लागल. खरं तर त्या देवळात एरव्ही गर्दी नसते. पण परत जाण होणार नाही म्हणून आम्ही सग्ळिकडे जाऊन आलो.

६. तुमच्याकडे ओळख, पास, किंवा तुम्ही कोणत्या टूरबरोबर नसाल तर रांगेत उभं रहाव लागतं. टूरच्या लोकांची काहीतरी देवळाशी अंडर्स्टँडिग आहे असं वाटतं.

७. खाण्यापिण्यासाठी काही न्यायची जरुरत नाही तेथे सर्व मिळते जर तुमच्या जास्त डायेटीक नीड्स नसल्या तर.

७. सर्व रस्ता लायटेड आणि स्वच्छ आहे. मी वापरलेली रेस्टरुम स्वच्छ होती.

८. जाण्याआधी स्लिप घेणे मस्ट आहे नाहितर जाता येत नाही. स्लीप घ्यायलापण रांगा असतात. ज्या होटेलमध्ये रहाणार असाल ते ह्या स्लिपची पैसे घेऊन व्यवस्था करतात. त्याबद्दल आधीच विचारावे.

९. संध्याकाळी चालायला सुरुवात केली तर उन्हाचा अजिबात त्रास होत नाही.

१०. मार्चमध्ये वरती गार होत.

११. कोठेही भिकारी दिसले नाहीत.

१२. कुठेही कोणीही पैसे मागितले नाहीत. वेगळाच अनुभव. ह्याविरुध्द पुरीच्या जगन्नाथाच्या देवळात सगळीकडे सगळेजण हात पसरत होते.

१३. वैष्णोदेवीच्या देवळात पिंडिच दर्शन घ्यायच असत. तेथे देवीची मूर्ती वैगेरे कुठे आहे वगैरे शोधत बसायच नाही. दर्शनाच्या जागी जेमेतेम २ मिनिटं मिळतात.

१४. आम्ही चुन्नी वगैरे चढवली नाही.

१५. वेगळाच अनुभव आहे.

तुम्ही दीड वर्षाच्या मुलीला घेऊन जात आहात तेव्हा हेलीकोप्तेरचा पर्याय घ्या असं वाटत. इतक्या लहान मुलीला अवधी दगदग झेपेल का, ती रडायला लागली तर तुमचीही चिडचिड होईल. आणि रात्री चढायला सुरुवात केलीत तर तिची झोपाय्चीही वेळ असेल. या सगळ्याचा विचार करा. लहान मुलांना दुध, खाण पिण बाहेरच देणार कि स्वताबरोबर नेणार तेही ठरवा. माझी मुलही आत्ता २ वर्षाची आहेत आणि त्यांना घेऊन कुठेही जायचं तरी बरीच तयारी घ्यावी लागते, आणि आपला सगळा वेळ त्यांच्याच मागे नाचण्यात जातो म्हणून सांगतेय.

.

वरचे वाचुन माझि helecoptor बाबत चि माहिति चुकिचि आहे असे वाटते.
भान, helecoptor चे reservation चि काय पधत आहे.तेथे गेल्यवर मिळेल काय?
mimarathi, helecoptor च्याच पर्याय बाबत विचार करित आहो.अर्थात मुलगि सोबत असल्यामुळे सर्वच कळजि घ्यवि लागेल. तुम्हि अशा वेळि काय तयारि केलि होति?
आर्च तुमचि post मला फार उपयोगि पडनार आहे धन्स . वर camara नेउ द देतात?

कटरा ला राहन्याचि सोय कशि असते? hotels ई. रेट कसे असतात?
भान तुमच्या पालकाना रान्गेत किति वेळ लागला?
तसेच यात्रा झ्याल्यावर कुलु मनालि जायचे असेल तर काय planning असावे?
( किती प्रश्न ते!!)

thanks manju.
aamhi 26 la pohochu.
फोटो मधे पर्वतावर ज्या इमारति दिसतात ते काय आहे? मधे राहन्याचि व्यवस्ता आहे काय?

???

साईटवर संपूर्ण माहिती आहे एक महिनाआधी बुकिंग करावं लागतं. हॉटेल्स आहेत. जरा गुग्लून पहा. त्यांच्या ऑनलाईन सेवा आहेत घरबस्ल्या करता येतात. मी घरुनच सगळं बुकिंग केलंय पर्ची पण घेतली.

आम्ही ४ जानेवारी ला एका ओळखीच्या ग्रुप बरोबर जाणार आहोत पण आता तिथे भयानक थंडी असणार आहे त्या द्श्टीने काय काय सामान बरोबर घ्यावे, कारण वर कोणीतरी लिहिलेय ना जास्त सामान बरोबर घेऊ नका असे.