माझे येणे

Submitted by सुग्रीव शिन्दे on 28 April, 2012 - 09:22

कधीपासून आई माझी वाटेकडे पाहत आहे |
सांगते आहे सर्वाना बाळ माझा येत आहे ||

राही उभी दाराशी आस सुटेना डोळ्याची |
नाही उरला त्राण तरीही आस पोटच्या गोळ्याची ||

मारुतीच्या देवलामधे सांजवात जळत होती |
डोळे माझ्या वाटेकडे अन आसवे तिची गळत होती ||

वर्षे झाली जावून तुला, वर्षे झाली पाहून तुला |
आठवनिचे उठते काहूर, फोटो मधे पाहून तुला ||

असेच एकदा येवून जा, मनाला आधार देवून जा |
एखादा दिवस राहून जा, मला एकदा पाहून जा ||

चटनी भाकरी खावुन जा, एकदा चेहरा दावून जा |
अवघा गांव वाट पाहतोय, इच्छा पूर्ण करून जा ||

पुन्हा येशील धावत, घाईत परत जाण्यासाठी |
पहावी लागेल परत वाट, तुझ्या परत येण्यासाठी ||

अतुरलेल्या आठवनिना उलगडायला वेळ दे |
माझ्या थकल्या पंखाना अधाराचे बळ दे ||

नाही घेणार वेळ तुझा, जास्त इथे राहण्यासाठी |
आहे अजुन डोळ्यात शक्ति वाट तुझी पाहण्यासाठी ||

आजही गांव आपला अंधारात बुडून जातो |
आजही जीव माझा तुला इथे शोधत राहतो ||

फक्त एकदा येवून जा, मला एकदा पाहून जा |
कोजागिरीच्या शुभ्र चांदण्यात, पुन्हा एकदा नाव्हून जा ||
पण एकदा येवून जा, येवून जा, येवून जा.....................

सुग्रीव शिन्दे
९८९०९५९६४५
पुने

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान

अप्रतिम. हृदयाला भिडणारी कविता.

काही आगांतुक दुरुस्त्या:-
देवलामधे: देवळामध्ये
आठवनिचे: आठवणींचे
अतुरलेल्या आठवनिना: आतुरलेल्या आठवणींना
अधाराचे: आधाराचे
पंखाना: पंखांना
नाव्हून: न्हाउन