माननिय खासदार सचिन र. तेंडुलकर

Submitted by उदयन. on 26 April, 2012 - 12:34

अभिनंदन .... माननिय नवनियुक्त खासदार सचिन रमेश तेंडुलकर
.
sachin.jpg
.
काल सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी "१० जनपथ" वर गेले होते. तिथे गेल्यावर सोनिया गांधींनी सचिन यांना काँग्रेस च्या तिकिटावर राज्यसभेचे खासदार पद देउ केले. ते सचिन ने स्विकारले. सचिन बरोबर अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनु आगा यांना सुध्दा खासदार पद देउ केले.
काही वेळेतच राष्ट्रपतींकडे यांची नावे खासदारकी साठी पाठवली गेली. आणि दिवस संपता संपता राष्ट्रपतींनी कडुन नावावर शिक्कामोर्तब केल्याचा पत्र प्रसिध्द झाले. सचिन याच अधिवेशनात खासदारकीची शपथ ग्रहन करणार आहे.
साहित्य, सिनेमा, समाजकारण, उद्योग आदी क्षेत्रातील नामांकित मंडळींची नियुक्ती राज्यसभेवर ' नामनियुक्त सदस्य ' म्हणून करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. त्या अधिकारा मार्फत क्रिकेट मधुन पहिला राज्यसभेचा खासदार होण्याचा मान सचिन ने पटकावला.. सर्वच पक्षांनी या महान खेळाडुचे स्वागत केले आहे.. जसे जगभराच्या खेळाडुंमधे सचिन बद्दल आदर आहे सचिन साठी सगळेच खेळाडु एकत्र येतात. तसेच काही चित्र काल राज्यसभेत आणि लोकसभेत दिसले... काँग्रेस, भाजपा, सपा, तृनमुल, जवळ जवळ सर्वच पक्षानी एकमताने सचिन च्या खासदार पदाला पाठिंबा दिला. सचिन ने राज्यसभेत पाउल टाकण्या आधीच सगळ्यांना एकत्र आणले..:)
.
सचिन ला राज्यसभेत किती वेळ देता येईल. राजकारणात काय उपयोग होईल, सचिनलाच कशाला, इत्यादी प्रश्न उपस्थित काही जणांनी केले..? यातले काही मुद्दे गौण आहेत तर काही नक्कीच महत्वाचे आहेत.
अंदाजे सचिन अजुन २-३ वर्ष तरी नक्कीच खेळणार आहे. त्यामुळे बहुदा त्याने निवृत्ती पत्करल्यावर "भारतरत्न" देण्याचा विचार सरकार चा आहे... तो पर्यंत त्याने केलेल्या कामगीरीचा सम्मान म्हणुन खासदार पद देण्यात आले आहे..
.
सचिन साठी TMC च्या एका खासदाराने अनोखी भेट देण्याचे आयोजले आहे....... हा खासदार राज्यसभेच्या १०० नंबर खुर्चीवर बसतो.. हाच नंबर सचिन साठी त्यांनी ठेवला आहे सचिन साठी त्यांनी या क्रमांक त्यागला आहे... सगळे सुरळीत झाल्यास सचिन राज्यसभेत आल्यावर १०० नंबर खुर्चीवर बसेल....(राजकारणात पहिल्यांदा होईल की एका नेत्याने दुसर्यासाठी खुर्ची सोडली.. Happy ).
.
माननिय खासदार सचिन रमेश तेंडुलकर यांना पुढील वाटचाली साठी मनपुर्वक शुभेच्छा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन तेंव्हा खासदार असताच, तर बारावा गडी म्हणूनच पाणी घेऊन मैदानावर येताना दिसला असता>> भाउ उलटे झाले असते.. अझरुद्दीन पाणी देत बसला अस्ता. Happy

<< अझरुद्दीन पाणी देत बसला अस्ता. >> असं तुम्हाला, मला व लाखो लोकाना मनापासून वाटतंय; पण , ज्या कारणामुळे तो हांकलला गेला व त्यानंतर त्याने केलेली खोडसाळ विधानं हें सारं माहित असूनही अझरला आपल्या संघाचा कर्णधार करणार्‍या खासदारांना तसं वाटतंय का, एवढीच शंका !!

"गांगुली घेतला की", म्हणावं. ओह ते चुकून अशोक गांगुली घेतले गेले का? सॉरी, पण आता बदलू शकत नाही असे सांगावे. (नियुक्त सभासदांत एक डॉ अशोक गांगुली आहेत) Happy

जोक्स अपार्ट, पण गांगुलीबद्दलची ही मागणी राजकीय हेतूने केलेली असली तरी दादा नक्कीच लायक आहे राज्यसभेत जायला. तेथे काही प्रश्नांवर ठाम भूमिका तो घेण्याची शक्यता सचिनपेक्षा जास्त आहे. तो ज्यांचे प्रतिनिधीत्व करेल त्यांच्यासाठी इतरांपेक्षा वेगळे काही प्रयत्न करेल हे नक्की.

<< तरी दादा नक्कीच लायक आहे राज्यसभेत जायला. >> सहमत.
पण त्याचा कल 'डाव्यां'कडेच असेल असा मुद्दा काढून त्याला विरोध नाही झाला म्हणजे मिळवलं !! Wink

हो नक्कीच आहे. राजकारण करता येणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहेच. त्याचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी व्हावा हे महत्त्वाचे.

पण त्याचा कल 'डाव्यां'कडेच असेल >>> फार जबरी कॉमेंट आहे ही भाऊ Happy तुमच्या आगामी व्यंगचित्रासाठी अत्यंत चपखल Happy

सचिनचे अभिनंदन!!!

सध्यातरी काही तरी चांगले घडवण्याची अपेक्षा करु शकतो ......
मग बघु काय दिवे लावतो ते....

सचिनच्या खासदारकी विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली>>>

ही याचिका हाय कोर्टात सादर करण्यात यावी आणि ते या याचिकेवर काय निर्णय देतात हे आधी पाहावे , असे कोर्टाकडून सांगण्यात आहे . त्यामुळे याचिका फेटाळली असली तरी सुप्रीम कोर्टाने सचिन खासदार बनु शकतो किंवा नाहि यावर काहिहि टिपण्णी केली नाहि.

हायला ! अती महत्वाच्या केस शिवाय डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ नये हेही समजत नाही, असे लोक सचिनने खासदार बनणे लोकशाहीला कसे धरुन नाही, यावर बोलणार ! अजबच! असो.. त्यांच्या अधिकाराचाही आदरच ठेवायला हवा. मग आता हे कुठल्या राज्याच्या हायकोर्टात जाणार आहेत म्हणे?

>>लेखाचे नाव आधी बदला !
हे पद स्विकारून त्याची मान-हानी होण्याचीच जास्त शक्यता आहे ! कारण खासदाराच्या पुढे लावलेल्या मा. चा सामान्य जनतेतला अर्थ एक परिचित पाच अक्षरी शिवी आहे ! आणि तो योग्य असल्याचे सिद्ध करणे हे प्रथम कर्तव्य असल्यासारखे सगळे खासदार पहिल्या दिवसापासून कामाला लागतात <<

टवाळ जी.
सहमत.

मा. हे आणखी एका चार अक्षरी विशेषणाचे संक्षिप्त रूप आहे. अनेक खासदारांचे वर्तन त्याच्या माननीय पेक्षा या दुसर्‍या विशेषणानेच शोभून दिसते कि जे सचिनला सध्यातरी लागू पडणार नाही.

सचिनने राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता ( म्हणे!) हे कोलीत अजुन सचिन-काँग्रेस विरोधी लोकानी अजुन कसे पेटवले नाही? दासु, बघा, एखादा धागा काढताय का या विषयावर..?

Proud

>>लेखाचे नाव आधी बदला !>>>>>>>>>>>> मा. दामोदर सुत Wink धाग्याचे नाव २७ एप्रिलाच बदलले तरी तुमचे १५ मे मधे ही जुन्यापोस्टीवरुन गळा काढलातच.. Happy अपेक्षा दुसरी असुच शकत नाही तुमच्या कडुन...
.
.

सचिनने राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता ( म्हणे!) हे कोलीत अजुन सचिन-काँग्रेस विरोधी लोकानी अजुन कसे पेटवले नाही? दासु, बघा, एखादा धागा काढताय का या विषयावर..?

दासुनी यावर धागा काढला तर ते काय लिहितील?

पहिली ओळ सचिनवर
दुसरी ओळ झेंड्यावर.

आणि त्यानंतर,
मित्रानो, आपल्या देशाचा झेंडा सर्वप्रथम म्याडम कामा आणि सावरकर यानी तयार केला होता.
मग २० ओळी सावरकरांवर.

संपला लेख. Proud Light 1

Lol
मा.दामोदरसूत..... असे नाव लिहायचे...कारण आपल्याला "मा" म्हणजे माननिय वाचतो.. ते "मा" एक शिवी म्हणून वाचतात... Biggrin

Pages