माननिय खासदार सचिन र. तेंडुलकर

Submitted by उदयन. on 26 April, 2012 - 12:34

अभिनंदन .... माननिय नवनियुक्त खासदार सचिन रमेश तेंडुलकर
.
sachin.jpg
.
काल सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी "१० जनपथ" वर गेले होते. तिथे गेल्यावर सोनिया गांधींनी सचिन यांना काँग्रेस च्या तिकिटावर राज्यसभेचे खासदार पद देउ केले. ते सचिन ने स्विकारले. सचिन बरोबर अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनु आगा यांना सुध्दा खासदार पद देउ केले.
काही वेळेतच राष्ट्रपतींकडे यांची नावे खासदारकी साठी पाठवली गेली. आणि दिवस संपता संपता राष्ट्रपतींनी कडुन नावावर शिक्कामोर्तब केल्याचा पत्र प्रसिध्द झाले. सचिन याच अधिवेशनात खासदारकीची शपथ ग्रहन करणार आहे.
साहित्य, सिनेमा, समाजकारण, उद्योग आदी क्षेत्रातील नामांकित मंडळींची नियुक्ती राज्यसभेवर ' नामनियुक्त सदस्य ' म्हणून करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. त्या अधिकारा मार्फत क्रिकेट मधुन पहिला राज्यसभेचा खासदार होण्याचा मान सचिन ने पटकावला.. सर्वच पक्षांनी या महान खेळाडुचे स्वागत केले आहे.. जसे जगभराच्या खेळाडुंमधे सचिन बद्दल आदर आहे सचिन साठी सगळेच खेळाडु एकत्र येतात. तसेच काही चित्र काल राज्यसभेत आणि लोकसभेत दिसले... काँग्रेस, भाजपा, सपा, तृनमुल, जवळ जवळ सर्वच पक्षानी एकमताने सचिन च्या खासदार पदाला पाठिंबा दिला. सचिन ने राज्यसभेत पाउल टाकण्या आधीच सगळ्यांना एकत्र आणले..:)
.
सचिन ला राज्यसभेत किती वेळ देता येईल. राजकारणात काय उपयोग होईल, सचिनलाच कशाला, इत्यादी प्रश्न उपस्थित काही जणांनी केले..? यातले काही मुद्दे गौण आहेत तर काही नक्कीच महत्वाचे आहेत.
अंदाजे सचिन अजुन २-३ वर्ष तरी नक्कीच खेळणार आहे. त्यामुळे बहुदा त्याने निवृत्ती पत्करल्यावर "भारतरत्न" देण्याचा विचार सरकार चा आहे... तो पर्यंत त्याने केलेल्या कामगीरीचा सम्मान म्हणुन खासदार पद देण्यात आले आहे..
.
सचिन साठी TMC च्या एका खासदाराने अनोखी भेट देण्याचे आयोजले आहे....... हा खासदार राज्यसभेच्या १०० नंबर खुर्चीवर बसतो.. हाच नंबर सचिन साठी त्यांनी ठेवला आहे सचिन साठी त्यांनी या क्रमांक त्यागला आहे... सगळे सुरळीत झाल्यास सचिन राज्यसभेत आल्यावर १०० नंबर खुर्चीवर बसेल....(राजकारणात पहिल्यांदा होईल की एका नेत्याने दुसर्यासाठी खुर्ची सोडली.. Happy ).
.
माननिय खासदार सचिन रमेश तेंडुलकर यांना पुढील वाटचाली साठी मनपुर्वक शुभेच्छा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< अस्लम शेर खां लोकसभेत निवडून आले होते > > मयेकरजी, माहितीबद्दल धन्यवाद. [ फार पूर्वी स्पोर्ट्स स्टार [बहुतेक] मासिकाने भारतीय हॉकीचा पूर्वीचा दर्जा परत आणण्यासाठी काय करावं ,यावर जाणकारांची मत प्रसिद्ध केलीं होतीं; ' भारताच्या हॉकीचीं सर्व सूत्र मुसलमानांच्या हातात द्यावीं कारण त्यांच्या अस्मितेशीं हॉकी निगडीत आहे !', अशा आशयाचं अस्लाम यांचं मत त्यांत देण्यात आलं होतं. बचावफळीतील या अव्वल खेळाडूने अर्थात नंतर या मताला मुरड घातली असणारच , हें सांगणे नलगे ! विषयांतराबद्दल क्षमस्व.]

सचिनबद्दल जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते मनमोहनासही लागू पडतात. ममोही तोंड उघडत नाही. तोही राज्यसभा नामक मागील दारातून शिरलेला आहे. त्याच्या अनुभवाचा भारताला फुटक्या कवडीइतकाही फायदा होत नाहीये. उलट तोटाच होतो आहे.

जय लोकशाही.

-गा.पै.

जामोप्या - मला भाजपचे काही कौतुक नाही, पण या बातमीचा भाजपाशी काय संबंध?

बाकी सचिनचे सोनिया गांधींना भेटण्याचे औचित्य कोणी जाणकार सांगू शकतील का? की महाराष्ट्रात ठाकरेंना भेटावे लागते तसे? Happy

क्रिकेटर लोकांनी याबद्दल नापसंती दर्शविली आहे. त्यात संजय मांजरेकर ची कॉमेंट महत्त्वाची आहे - "भारतीय क्रिकेटमधल्या कोणत्याही प्रश्नावर सचिनने ठाम भूमिका घेतलेली नाही. राज्यसभेत तो तसेच करणार असेल तर काय फायदा" अशा काहीतरी अर्थाची. पण यात एक गडबड आहे - सचिनने ठाम भूमिका "जाहीरपणे" घेतलेली नाही. पण पडद्यामागे तो बरेच काही नक्की करत असणार यात शंका नाही. कधी कधी याबद्दल वाचलेले आहे. त्याने जाहीर काही बोलायचे नाही हा त्याच्या पीआरचा प्लॅन असणार. तो निवृत्त झाल्यानंतर जास्त उघडपणे बोलेल याची मला खात्री आहे. त्यामुळे क्रिकेटर म्हणून तो कसा आहे यावर खासदार म्हणून कसा वागेल हे ठरविणे अवघड आहे.

निवडून आलेले खेळाडू जे खासदार होते - कीर्ती आझाद, चेतन चौहान, अझर यांनी काय कामगिरी केली आहे याची काही माहिती उपलब्ध आहे का? अझर आधी मुळात निवडूनच कसा आला हा ही एक प्रश्न आहे.

आयपीएल च्या मधल्या कार्यक्रमात अजय जडेजा बरोबर गावस्कर पासून ते हर्ष भोगले पर्यंत लोक बसतात याचे आधी आश्चर्य वाटले मला. पण जडेजा शिक्षा भोगून आलेला आहे, त्याची खेळण्याची वर्षे संपली तेव्हाच. आता त्याला एक्सपर्ट म्हणून बोलावर असतील तर बोलावू दे. पण त्या भूमिकेत तो जेव्हा "I say it as I see it. I have no agenda" असे म्हणतो तेव्हा मग २००० मधे गांजा घेऊन खेळत होतास काय असे वाटल्याशिवाय राहवत नाही. चांगला खेळाडू होता नाहीतर.

"भारतरत्न"ला हलकेच "ग्लान्स" मारून सीमापार करायचा विचार दिसतोय यामागे !!! >> भाउ, परफेक्ट स्ट्रेट ड्राइव तुमचा. विचार कसला, तसेच दिसतय. गुगली म्हणा हव तर. शेनचा कळला, सोनिया चा नाही असच म्हणायला लागेल.
लतादीदी, जया, होतेच नेमलेले सदस्य. फारसा काही शोध लावला नाही कुणी. बघू साहेब काही करतायत का. अपेक्षा अर्थातच आहेत.

अमिताभ होतेच नेमलेले सदस्य. >>> अमिताभ कधी होता राज्यसभेवर? तो ८६ मधे राजीनामा दिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा त्या वाटेला गेलेला नाही.

बाकी सचिनचे सोनिया गांधींना भेटण्याचे औचित्य कोणी जाणकार सांगू शकतील का? <<< काँग्रेस ने नॉमिनेट केले आहे असे काही तरी आहे म्हणे

जिथे एका राज्याचा काँग्रेजी मुख्यमंत्री मागच्या दाराने विधान सभेत येतो, तिथे विरोधी पक्षाचा एकादा खासदार मागच्या दाराने लोकसभेत आला तर, इतका काय फरक पडतो काँगीना?
राच्याकने, सचिन कोणत्या लोकसभा मतदार संघातून "लोकशाही" मार्गाने निवडून आलेला, खाजदार झालाय!

काँग्रेस ने नॉमिनेट केले आहे असे काही तरी आहे म्हणे

तोच प्रश्न मी विचारला आहे, तर मला कुणी उत्तरच दिले नाही.

राज्यसभेचा स्वीकृत सदस्य नेमक्या कोणत्या पक्षाचा मानला जातो? शिफारशी कोण करतं? सत्ताधारी पक्ष की सगळेच पक्ष आपल्याला हवी ती नावं सुचवतात?

शिफारस जर काँग्रेसने केली आहे, आणि राष्ट्रपतीनी जर होकार दिला आहे, तर बाकीच्या पक्षानी आणि त्यांच्या लोकानी कशाला मध्ये पडायचं?

तर बाकीच्या पक्षानी आणि त्यांच्या लोकानी कशाला मध्ये पडायचं? <<< पोटशुल असावं बहुधा Wink

मी वरती लिहलेच आहे २०१४ चे निकालाची उत्सुकता आहे.

अमिताभ होतेच नेमलेले सदस्य. >>> अमिताभ कधी होता राज्यसभेवर? तो ८६ मधे राजीनामा दिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा त्या वाटेला गेलेला नाही.>> फारेण्डा, बरोब्बर आहे तुमचे. चूक दुरूस्त केली आहे.

<<पण जडेजा शिक्षा भोगून आलेला आहे, त्याची खेळण्याची वर्षे संपली तेव्हाच>>
जाडेजाने कोर्टात जाऊन बीसीसीआयने लादलेली बंदी रद्दबातल करून घेतली होती.

जाडेजाने कोर्टात जाऊन बीसीसीआयने लादलेली बंदी रद्दबातल करून घेतली होती.>>> ऊप्स! सॉरी हे माहीत नव्हते.

अर्थात त्याला पुन्हा घेतला नाहीच भारताच्या संघात. म्हणजे एका अर्थाने शिक्षा झालीच. रणजी बिणजी नंतर खेळला का ते माहीत नाही.

गोविंदाने तर लोकसभेला गोविंदाच केला कानात भिकबाळी घालुन
सगळे मताचे राजकारण आहे.
तेंडुलकरने सदस्य न होण्यात फायदा !

सगळे मताचे राजकारण आहे.<<< बरोबर आहे मुकु.

महाराष्ट्र हे काँग्रेस चे गढ मानलं जात होतं, नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुक पाहता मा. मुख्यमंत्र्यांचे मत असे होते की इथे महाराष्ट्रात काँग्रेस मराठी माणसांशी रिलेट नाही करु शकले, त्याचेच पडसाद असावेत बहुधा.

हेमा, रेखा जया और सुशमा.>>> सगळ्या मिळून देश धुवायला काढणार का मग? Proud
सचिनला त्याची बाजू मांडू तरी द्या मग काय तो उहापोह करा!
रच्याकने, संजय मांजरेकर सायबांची सचिनबद्दलची पोटदुखी प्रसिद्धच आहे.

संजय मांजरेकर >>>>>>>> ज्याची स्वतःची लायकी नाही आहे....जो स्वतः भारतीयांची आब्रु राखत नाही.. त्याच्या बद्द्ल काय बोलावे.... Happy

संजय मांजरेकर >>>>>>>> ज्याची स्वतःची लायकी नाही आहे <<< पण मला फार आवडत होता तो, फार तंत्रशुध्द फलंदाज होता तो.

अवांतर प्रतिसाद आहे माझी, विषयांतर नको..... Happy

अमिताभ होतेच नेमलेले सदस्य. >>> अमिताभ कधी होता राज्यसभेवर? तो ८६ मधे राजीनामा दिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा त्या वाटेला गेलेला नाही.
---- अमिताभ केवळ एकवेळा लोकसभेतुन गेले होते... त्यांनी निवडनुकीत हेमवतीनंदन बहुगणा सारख्या मातब्बराला हरवले होते.

मांजरेकराची लायकी कशाला काढतोय, तो चांगला होता निव्त्त झाला
तेंडुलकरला कंटाळलेली १०० त ७० निघतील. लोक बोलुन दाखवे नाहीत
त्याला गॉडफादर आहे म्हणुन टिकुन आहे.

सचिन, तु सोनिया मेडमला भेटायला गेलास ते ठिक आहे रे.... पण त्यांच्याकडून राज्यसभेची खासदारकी कशाला घ्यायचीस?
अरे आम्ही तुला लोकसभेत पाठवू..... पण त्या कॉग्रेस च्या मागे नको जाउस...

राज्यसभेत अथवा लोसभेत अनेक सेलिब्रिटी गेल्या अर्धशतकात बसल्या आहेत. लता मंगेशकर या त्यांच्यातील सर्वोच्च सेलिब्रिटी. लता मंगेशकर इतके दिवस गैरहजर राहिल्या की त्यांची सभागृहातील कामगिरी हा टीकेचा आणि चेष्टेचा विषय झाली. शबाना आझमींनी तर त्यांच्यावर जाहीर टीका केली. आता हा सचिन लोकसभेत जाऊन काय दिवे लावणार, आणि जायचच होते तर काँग्रेजच्या मेहरबानीवर कशाला, २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत तो अपक्ष म्हणून जरी उभा राहीला असता तरी लोकांनी त्याला निवडून दिला असता.

ह्या धाग्याची लिंक सचिनला ट्विट करा कोणीतरी..>>.
सेनापती, आपल्या आज्ञेची अंमलबजावणी झालेली आहे. फक्त त्याला वाचायला वेळ मिळेल का? Wink

Pages