दुधपोहे

Submitted by पाषाणभेद on 20 April, 2012 - 16:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुध
पोहे
चवीपुरती साखर

क्रमवार पाककृती: 

आंतरजालावर "दुधपोहे" (किंवा "दुध पोहे" ) असे शोधले असल्यास काहीच मिळाले नसल्याने ही पाककृती देत आहे.

तसे "दही पोहे" बनवतात पण त्यासाठी लागणारे जिन्नस जसे- दही, मसाला, कोथंबीर आदी बॅचलर असलेल्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही.

झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे.
(लहाणपणी 'मला काहीतरी खायला दे' असली माझी भुणभुण ऐकून माझी आई मला 'दुधपोहे' झटकन बनवून देत असे हे लख्ख आठवतेय! असो.)

जेव्हा तुम्ही घरी एकटे असतात व नाश्टा बनविण्याचा कंटाळा येतो तेव्हा दुधपोहे करणे फारच सोपे असते.

पाककृती:
१) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या.

२) मुठभर पातळ पोहे त्यात टाका.

३) वरील दुधपोह्यांत चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात.

दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत.
(फोटो आंतरजालावरून साभार)
पुर्वप्रकाशीत

वाढणी/प्रमाण: 
१ जणासाठी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणापासून दूधपोहे हे माझेही आवडते खाद्य आहे...आजही मी तेवढ्याच आवडीने ते खातो.
साखरेऐवजी गूळ घालण्याबद्दल charcha ह्यांनी म्हटलंय...त्याला माझंही अनुमोदन आहे.

माझ्या लहानपणी आई साखर-दुधात पोहे कालवुन त्यांना फक्त जि-याची फोडणी देऊन जो प्रकार करायची त्याची आठवण झाली. मस्त लागतात हे दुधपोहे.

Mast..
Saadhana ne mhanTlya pramane jiryachi phoDani devun chaan lagat asatil..
PhoDanisaathi tup vaaparave kaa ?