व्हीट ग्रास्.....काय अनुभव...

Submitted by नाना फडणवीस on 12 April, 2012 - 10:09

माबोकर्स्.....मी आज काल wheat grass बद्दल बरंच ऐकून आहे......मला हे वापरून बघायचं आहे.....काही माहिती अथवा अनुभव असतील तर शेअर करू शकता काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हीट ग्रास >>> जपून जपून पावलं टाका.

पहिल्यानेच घेणार असेल तर रिस्की प्रकार आहे हा. ह्यातले बरेच न्यूट्रीएंट्स (खासकरून ग्लूटेन सारखी प्रथिनं) शरीरासाठी नवीन असतात, शरीर त्यांचं विघटन करू शकलं नाही तर वेगवेगळ्या अ‍ॅलर्जी (काही ईर्रिवर्सिबल डॅमेज घडवून आणणार्‍या सुद्धा) होऊ शकतात. आणि ग्रास म्हंटले की बॅक्टेरिआचा धोकाही आलाच. भारतासारख्या ऊष्ण प्रदेशात तर जास्तंच.
रोजच्या वापरातील गव्हातूनही मिळणारी काही प्रथिनं शरीरासाठी आजिबातव कामाची नसतात. शरीर त्यांचं विघटन करू न शकल्याने परस्पर विल्हेवाट लाऊन टाकते आणि अशी सवय करून घेते. पण व्हीट ग्रासमधनं हीच प्रथिनं अजून जास्त प्रमाणात मिळाली तर शरीर त्याचे काय परिणाम दाखवेल हे सांगता येत नाही.

ही पहिली अ‍ॅलर्जी टेस्ट ओके झाली की मग मात्र चांगले फायदे मिळू शकतात. पण हे ओके सर्टीफिकेट मिळवणं फारफार गरजेचं आहे आणि त्यासाठी किती वेळ जावा लागेल हे सांगणं महाकठीण.

पण हे कुठल्या आरोग्यसंस्थेने अजून रेग्यूलेटेड केलेलं नाहीये म्हणजे स्वतःचा गिनी पिग होऊ शकतो हे लक्शात ठेवा.

घाबरवण्याचा ऊद्देश नाही पण सावधगिरी बाळगा एवढंच सांगायचं आहे.

खरं तर हे सगळ्याच नवीन गोष्टी ज्या आपण नव्यानं अंगिकारू पहात आहोत त्याबाबतीत सत्य आहे.

पहिल्यांदा पिताना अगदी थोडा व्हीट ग्रास ज्यूस प्यावा. म्हणजे २ टेबल स्पून वगेरे, औषधासारखा. त्याने आपल्याला काही त्रास होत नाही ना ते बघून मग काही दिवसांनी वाढवावा. काही लोकांना अजिबात सूट होत नाही. चक्कर वगेरे येते.

एकदा का गव्हांकुराचा रस सूट झाला तर त्याचे फायदे पुष्कळ आहेत. त्वचेचे विकार खास करुन एक्झिमा मधे गव्हांकुराचा लेप लावा.. शिवाय उपाशी पोटी सकाळी अर्धा कप हा रस घ्या. खूप चांगले रिसल्ट आहेत माझ्या पेशट्स मध्ये.