सेल्युलर जेल - अंदमान द्विपकल्प....

Submitted by गिरीविहार on 9 April, 2012 - 04:03

नुकत्याच झालेल्या अंदमान भेटीत प्रसिद्ध सेल्युलर जेलला भेट देण्याची संधी मिळाली.. या वास्तुचे काढ्लेले काही प्रची...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....मनोरा...
Celular Jail -1

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....मुख्य प्रवेशद्वार...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....स्वतंत्रता ज्योत...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....पुर्ण मॉडेल...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....अंतर्भाग...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....अंतर्भाग...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....टेहाळणी मनोरा...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....अंतर्भाग...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....अंतर्भाग...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....जीवनचर्या...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....जीवनचर्या...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....जीवनचर्या...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....जीवनचर्या...

कुप्रसिद्ध कोलू...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....अंतर्भाग...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....अंतर्भाग...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....अंतर्भाग...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....स्वा. सावरकर कोठडी...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....स्वा. सावरकर कोठडी...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....स्वा. सावरकर कोठडी...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....वधस्तंभ...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....सागर द्रूष्य...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....सुर्यास्त...

सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर...

गुलमोहर: 

छान फोटो. मला जायचय.
प्रवासाबद्दल पण लिहिणार ना ?

अंदमान जेल ... कोठडी, अंतर्भाग सगळं श्वास गुदमरतोय..
फोटो चांगले आलेत, पूर्ण कल्पना आली..
तुम्हाला तिकडे प्रत्यक्ष फिरताना काय वाटलं???
प्रवासवर्णन मस्टच !!!

सगळी छायाचित्रे अगदी स्पष्ट आली आहेत. मी ते पर्यटक नजरेनी पाहिलेत पण तिथे तेंव्हा कारावास सहन करण्यार्‍यांना अंदमान कसे वाटले असेल!

मस्त... मला जायचंय एकदा.. माझे आई-वडील यंदा २७ फेब्रुवारी रोजी गेले होते. तिथे कार्यक्रम असतो ना दरवर्षी. आपणही तेंव्हाच गेला होतात का?

यो, फक्त देशभक्त लोकांना प्रचि दिसतात....
जोक्स अपार्ट, हे प्रचि पिकासा वरुन लिंक केलेले आहेत....

सुंदर प्रकाशचित्रे! केवळ पर्यटनासाठी जाणार्‍यांना आजची ती बागबगिच्याची (पर्यटनस्थळाची) चित्रे पाहून वाटेल काय प्रसन्न परिसर आहे! बाकीचे अंदमान सुंदर आहेच. ते सौंदर्य पाहाणे ज्यांच्यामुळे आपल्याला आज शक्य झाले त्यांची माहिती असणेही आवश्यक आहे.
पण सेल्युलर जेल हे कांही पर्यटनस्थळ नाही. कृतज्ञता भावनेने दर्शन घेण्याचे ते एक वेगळ्या प्रकारचे तीर्थक्षेत्र आहे.मी त्याला माझ्या 'अष्टविनायकां'पैकी सहावे विनायक म्हणत असतो.
ज्यांना (खरे तर प्रत्येक भारतीय माणसाने) या भावनेने जायचे आहे त्यांनी स्वा. सावरकरांचे 'माझी जन्मठेप' वाचून मग जावे. म्हणजे मी असे का म्हणतो ते ध्यानात येईल. थोडी माहितीही या चित्रांबरोबर हवी होती. उदा. जीवनचर्या अशा शीर्शकाच्या चित्रात जो 'पनिशमेंट ड्रेस' आहे तो पोत्याच्या कापडाचा आहे. त्या कोठडीत भयानक उकाड्यात वा काम करीत असतांना घालणे हे काय दिव्य असेल त्याची कल्पना करवणार नाही. संपादन करून माहिती द्यावी.

पण सेल्युलर जेल हे कांही पर्यटनस्थळ नाही. कृतज्ञता भावनेने दर्शन घेण्याचे ते एक वेगळ्या प्रकारचे तीर्थक्षेत्र आहे.>>>

प्रचंड अनुमोदन !
गिरी, आवश्यक ती सर्व माहितीही देना. म्हणजे कसे जायचे, कुठे उतरायचे? वगैरे...
अंदमान मध्ये अजुनही काय काय आहे पाहण्यासारखे?

आभार्स Happy

चित्रांचा आकार कमी करुन मायबोलीच्याच तुमच्या खाजगी जागेत चढवल्यास, इथे सगळ्यांना दिसू शकतील.
Photoshop मधे File > Save for Web वापरून हे करता येईल.

आता प्रचि दिसत आहेत. प्रचि टाकल्याबद्दल शतशः धन्यवाद! कैद्यांच्या छळाची प्रचि बघून अंगावर काटा आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्य कोठडीच्या प्रचिने मनात आदर दाटून आला.

दामोदरसुत यांच्याशी सहमत.
हे स्थळ प्रत्यक्ष पहायचच आहे एकदा... पण प्रचितुन दर्शन घडवलत त्याबद्दल आभार.
चित्रांबरोबर थोडी माहिती दिली असती तर अधिक बरं झालं असतं.

खरच माहितिहि हवि होति. पण फोटो मस्तच. त्यावेळ्च्या परिस्थिचि कल्पना केलि तरि अंगावर शहारे येतात.

सगळी छायाचित्रे अगदी स्पष्ट आली आहेत. मी ते पर्यटक नजरेनी पाहिलेत पण तिथे तेंव्हा कारावास सहन करण्यार्‍यांना अंदमान कसे वाटले असेल!>>>>> ++१

त्यावेळ्च्या परिस्थिचि कल्पना केलि तरि अंगावर शहारे येतात.>>>.++१

गिरिविहार यांना आता माहितीची भर टाकण्यात कांहितरी अडचण असावी. पण अनेकांनी अशी माहिती असावी अशी इच्छा प्रकट केलेली दिसते याकरिता मला असलेली माहिती प्र.चिंच्या क्रमाने देत आहे.
सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....मुख्य प्रवेशद्वार: ही त्या छळछावणीची प्रशासकीय इमारत. याच्या मागे विस्तीर्ण भागावर सात विंग्ज असलेले तीन मजली सर्व बाजूंनी बंदिस्त कारागृह होते. आता फक्त ३ विंग्ज शिल्लक. मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे उदघाटनाची कोनशिला व त्यावर वर्तुळात बाबाराव सावरकर रचित काव्यपंक्ति आहेत. इमारतीच्या डाव्या भागात संग्रहालय आहे. यात तेथे शिक्षा भोगलेल्या क्रांतिकारकांचे (गुन्हेगारांचे नव्हेत) केस-निहाय फोटो आहेत. तसेच प्रचिंमधील अनेक प्रतिकृति, जेलचे मॉडेल वगैरे आहेत. पुढे आत गेल्यावर डावीकडे ज्योत आहे व समोर दोन वींग्ज व त्यामधील भाग दिसतो.
सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....टेहाळणी मनोरा...: मनोर्‍याच्या या मजल्याचे खालचे मजलेच टेहळणीसाठी मुख्यतः वापरले जायचे. त्याचे वैशिष्ट्य असे कि त्याच्या मधून सातही विंग्जचे कॉरिडॉरवर एकच वॉर्डर नजर ठेऊ शके. म्हणजे तीन वॉर्डन संपूर्ण जेलचे कॉरिडॉरवर नजर ठेवू शकत असत. परिसराच्या टेहळणिसाठी तो मुख्यतः नव्हताच.
सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....अंतर्भाग...: यात जी मधली शेड आहे तिथेच तो 'कुप्रसिद्ध कोलू' आहे.
(त्याचे प्रचि घेणारे प्रमोद देवसाहेब आहेत काय?)
सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....अंतर्भाग: कोलुच्या नंतर च्या या प्रचित विंगचा कॉरिडॉर दिसतो आहे. अशाच कॉरिडॉरच्या अगदी शेवटच्या कोठडीच्या अलिकडे कॉरिडॉरच बंदिस्त करून सावरकर सेल निर्माण केले होते. त्यांच्यासाठी आणखी एक अडथळा असावा म्हणून.
सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....स्वा. सावरकर कोठडी...: दर्शनी दिसतो आहे तो बदिस्त केलेला कॉरिडोरचा भाग आहे. कोठडीचे दार लहान गेटमधून आत गेल्यावर डावीकडे आहे. त्यामुळे या प्रचित कोठडी दिसत नाही.
सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....स्वा. सावरकर कोठडी..: हे प्रचि कोठडीत लावलेल्या फ्रेमचे आहे..
सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....स्वा. सावरकर कोठडी...: कोठडीच्या आतून प्रवेशद्वाराचे घेतलेले हे प्रचि दिसते. त्यावरून कोठडीच्या आतील भाग वाईट अवस्थेत दिसतो. प्रचि घेणार्‍याच्या मागच्या बाजूच्या भिंतिवर सावरकरांचे बंदिवेशातील एक चित्र व त्यावरच सोनचाफ्याला उद्देशून लिहिलेल्या काव्याच्या थोड्या ओळी होत्या (मार्च १९१०).त्याचे प्रचि येथे टाकलेले दिसत नाही. ते काढून टाकले कि काय?
सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....वधस्तंभ...: ही छोटी इमारत सावरकर सेलच्या कॉरइडॉरमधून खाली दिसते.
सेल्युलर जेल - राष्ट्रीय स्मारक....स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर: हा पुतळा आणि आणखी कांही क्रांतिकारकांचे पुतळे मुख्य प्रवेश्द्वारासमोरील उद्यानात आहेत.

पण सेल्युलर जेल हे कांही पर्यटनस्थळ नाही. कृतज्ञता भावनेने दर्शन घेण्याचे ते एक वेगळ्या प्रकारचे तीर्थक्षेत्र आहे.>>>>> संपूर्ण अनुमोदन......
ईथे दर्शन घडविल्याबद्दल धन्यवाद.

गिरि... सुंदर प्रचि

सेल्युलर जेल मधे संध्याकाळी दाखविल्या जाणार्‍या लाईट अ‍ॅन्ड साउंड शो मधे स्वातंत्र्यपुर्व काळाचे वर्णन ओम पुरीच्या आवाजात ऐकताना अंगावर काटा येतो.

सावरकरांना ज्या १२३ क्रमांकच्या बरॅक मधे ठेवले होते त्याच्या भिंतीवर त्यांनी सरस्वतीचे चित्र काढले होते आणि काही कविता लिहुन ठेवल्या होत्या... मात्र तो ऐवज आता शिल्लक नाही. Sad

रॉस आणि हॅवलॉकचे प्रचि पण टाक रे...