जुना फ्रीज, कपाट वगैरे सामान मुंबईत कसं विकता येईल?

Submitted by स्वप्ना_राज on 6 April, 2012 - 11:04

मंडळी नमस्कार,

माझ्या एका मैत्रीणीची आजी तिच्या मुलीकडे कायमची रहायला जात आहे. त्यामुळे ती सध्या रहात असलेलं दादरचं घर मालकाच्या ताब्यात द्यायचं आहे. त्याआधी घरातलं जुनं सामान - गोदरेज फ्रीज, कपाट, गॅसची शेगडी, पंखे, टेबल-खुर्ची वगैरे वस्तू विकायच्या आहेत. तिने Quikr वर जाहिरात टाकली आहे. पण म्हणावा तसा रिस्पॉन्स नाही. हे सामान विकायचा आणखी काही उपाय आहे का? प्लीज काही माहिती असेल तर कळवा. धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप, सेनापती धन्यवाद....सुलेखा.कॉम पण आहे तसं. पण ऑनलाईन जाहिरात देऊन फारसा उपयोग होत नाहिये असं ती म्हणते कारण फोन उपनगरातल्या लोकांचे येताहेत आणि ते दादर म्हटलं की इन्टरेस्टेड नसतात Sad त्यामुळे दादर किंवा आसपासच्या एरियात अश्या सगळ्या घरातल्या वस्तू एकदम विकत घेणारे कोणी लोक माहित आहेत का कोणाला?

आमच्या सोसायटी मधे (कांदिवली मधे) असे बरेच लोक येऊन त्यांचे फोन नं चे स्टिकर वगैरे लावून जातात. सध्या मी भारतात नाहीये, पण घरी फोन करुन एखादा नंबर मिळाला तर देतो.