वाचनीय अमराठी कवितांचे दुवे वा काही ओळी

Submitted by हर्ट on 5 April, 2012 - 05:19

मी इंग्रजी वा इतर अमराठी भाषेतील कवितांचे फार असे वाचन केलेच नाही. मराठी अधिक वाचतो म्हणून कविता संग्रह विकत न घेता चांगल्या चांगल्या कविता संदर्भाने वाचतो. त्या इकडून तिकडून मिळतच जातात. पण ईंग्रजी कवितांचे वाचन मात्र नाहीचं. मी पुस्तकांच्या दुकानात आणि स्थानिक ग्रंथालयामधे जाऊन कैकदा ईंग्रजी कविता संग्रह घरी आणले होते पण त्यातून फार मौलिक असे काही हाती पडले नाही.

त्यामुळे माझ्या माबोच्या मित्रांना माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला जर चांगल्या चांगल्या ईंग्रजी कविता माहिती असतील तर त्याचे दुवे वा काही ओळी इथे द्याव्यात. प्रताधिकाराचा नियम इथे लक्षात असू द्यावा.

चांगल्या कविता हे सापेक्ष आहे तेंव्हा तुम्हाल्या ज्या कविता आवडल्यात त्या इथे द्या.

परत एकदा लिहितो की मायबोलीवर प्रताधिकाराच्या कायद्यापायी चांगले चांगले बातमी फलक धुळीस जाऊन मिळाले. तेंव्हा फक्त एक वा दोन ओळीतच कविता लिहा. दुवे देणे उत्तम.

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कविता लिहा म्हणजे एक वा दोन ओळी. तेवढ्या ओळी चालतात म्हणे. इतकेही घाबरायचे नसते रे मित्रा..

बी, एक खरच विचारतेय घाबरायचे नसते म्हणजे काय? जेव्हा प्रताधिकाराचा भंग होतो, तेव्हा कोणी त्याबद्दल अवेअर करणे म्हणजे घाबरवणे का?
इथमायबोलीवर प्रताधिकाराच्या कायद्यापायी चांगले चांगले बातमी फलक धुळीस जाऊन मिळाले. तेंव्हा फक्त एक वा दोन ओळीतच कविता लिहा. >> हे नाही पटले.

दुवे म्हणजे कोणाच्या तरी ब्लॉग चे का? की अजुन काही?

बी, एक खरच विचारतेय घाबरायचे नसते म्हणजे काय? जेव्हा प्रताधिकाराचा भंग होतो, तेव्हा कोणी त्याबद्दल अवेअर करणे म्हणजे घाबरवणे का?>> स्वाती, मी प्रताधिकाराच्या कायद्याला घाबरु नका असे म्हणत नाही तर कुणी इथे राडे करेन वाद घालेन त्याला घाबरु नका असे म्हणत आहे.

मी स्वतः कायदा पाळतो. म्हणून तर एक वा दोन ओळी आणि दुवे इतपतच कविता द्या अशी विनंती केलेली आहे.

वरदा, कवितेचे नाव पण लिहि ना.. आणि का आवडली वगैरे वगैरे लिहिलेस तर आणखी छान होईल.

वर मी वरदाने दिलेली लिंक पाहिली पण तिथे कवींची यादी आहे. त्या नावावर टिचकी मारुन कविता शोधावी लागेल. मला स्पेसिफिक अशी कविता हवी आहे. जी तुम्हाला आवडली.

वा! माधवी नयनीश ती कविता कळायला किती सोपी आणि अफाट आहे. माझ्या धाग्याचा उद्देश सफल होतो आहे. धन्स.

हो कर.

बी, लोकांना आवडलेल्या कवितांवर लिहा म्हणून परीक्षेला का बसवतोयस? Proud
त्या 'इन्टर्नल' वर असलेली कविंची यादी ही अभिजात कवींपैकींचीच आहे. तू त्यातल्या कशावरही टिचकी मार आणि वाच ना. तुला काय आवडतंय बघ. मला जी आवडेल तीच तुला आवडेल असं काही नाहीये..
मला कवितांमधलं (विशेषतः इंग्लिश) का ही ही कळत नाही. मी खूप रॅन्डम वाचते तेव्हा माझा याउप्पर तुला उपयोग नाही Proud

वरदा Happy माझही अगदी तुझ्याचसारख ईंग्रजी कवितांच्या बाबतीत आहे. शेक्सपिअर्सच्या सॉनेट्स वगैरे तर डोक्यावरुन जातात. पण काही पुस्तकात जेंव्हा त्यांच्या सॉनेट्सचे संदर्भ येतात तेंव्हा त्या आवडतात.. कळतात.. आणि आपल्याला का नाही हे आधी समजल म्हणून वाईटही वाटतं. म्हणून मग हा यत्न केला आहे की ज्यांच्या जवळ जे आहे ते विनंती करुन करुन मागायच Happy

तुला तो सिनेमा माहिती आहे का "36 Chowringhee Lane". त्या सिनेमाचा शेवट शेक्सपिअर्च्या सॉनेटनीच होतो. अतिशय तरल हळवा संवेदनशील असा तो क्षण असतो.

दुसरे म्हणजे गौरी देशपांडे ह्यांचे एक कुठले तरी पुस्तक आहे बहुतेक थांग त्या कथेचा शेवटही शेक्सपिअर्सच्या सॉनेट्सनीच होतो.

बी , उचलला हात अन लावला कीबोर्डला असं वाहत्या बाफवर ठीक आहे , पण एखाद्या बाफच्या शीर्षकात, त्याच्या पहिल्या पोस्टीत शुद्ध लेखन अन नेटकेपणा नको का ?

वाचनीय ( दीर्घ ) इंग्रजी ( र्‍हस्व इ ) कविता हव्या असतील तर शीर्षकात अमराठी कशाला ते ? इंग्रजी अन हिंदी सोडून इतर अमराठी भाषा तुला वाचता येतात ?

The Oxford Anthology of English Poetry किंवा The Norton Anthology of Poetry ही पुस्तके खरेदी कर. तुला गप्पांमधे संदर्भ देण्याइतपत तरी इंग्रजी कवितांची ओळख होईल.
जुन्या पुस्तकांच्या दुकानात स्वस्तात मिळावीत .

तू कुठले कविता संग्रह आणलेलेस ज्यातून तुला मौलिक असे काही मिळाले नाही ?

मेधा, माझं एकूणचं व्याकरण कच्च आहे. फार फार कच्च आहे अगदी. मलाच लाज वाटते. व्याकरण कधी कुणी शिकवले नाही. मी प्रयास करुन मला व्याकरणाचे नियम कळलेले नाही.

काव्य संग्रह खूप पुर्वी आणले होते. मग आणणेच बंद केले.

मी तू सांगितलेले बदल करतो आहे.

इतर भाषांसाठी नेटवर बर्‍याच जागा आहेत. मायबोलीच्या साधनांचा फायदा शक्यतोवर आपल्या मायमराठीला व्हावा असा प्रामाणिक प्रयत्न आहे. दर १-२ वर्षांनी हा असा धागा निघतो. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या धोरणाला अनुसरून हा धागा बंद करतो आहोत.