पेन चे निब

Submitted by avi.appa on 4 April, 2012 - 20:14

पेन चे निब

९२-९३ सालातील गोष्ट आहे .नुकतेच मुक्त धोरण सुरु झाले होते.नव नवीन प्रोजेक्ट्स भारतात येत होते
मी कारखान्यात बसलो होतो व एक रेव्हेलोन पेन कंपनीचा सेल्स मन आला ..
हाय हॅलो झाले..तो मुंबईहून मधून आला होता..त्याने २ मशीन चे पार्टस दाखवले व ते डेव्हलप करायचे आहेत असे सांगितले...
मी ते पाहिले ..पार्टस व त्याचे ड्राइंग ठेवून घेतले व म्हणालो अभ्यास करतो व कोटेशन देतो..
"सर जरा घाई आहे ,तुम्ही कारखान्यात चर्चा करायला आला तर बरे होईल." तो म्हणाला .ठीक आहे..म्हणत मुंबईला फोन लावला व सोमवारची भेट नक्की केली ..
सेल्स मन गेला अन आमच्या कुशल कामगाराला बोलावले व चर्चा सुरु केली.
ती एक स्पिंडल असेंब्ली होती..३० मिलीमीटर डायामितर होता व एक मिलीमीटर चे मेल व फिमेल थ्रेडिंग होते.
मात्र असेंब्ली काम खूप अक्युरेट करावे लागणार होते ..ल्याटरल प्ले +/- १० मायक्रोन इतका सूक्ष्म होता. ..
दणकून किंमत लावली ..कोटेशन टाईप केले...माझा डेक्कन चा पास होताच. सोमवारी मुंबईला कुच केले.
रेव्हेलोन पेन कंपनीचा दादर ला भवानी शंकर रोड वर कारखाना होता. व ति कंपनी बॉल पेन्स बनवत होति.
मीटिंग सुरू झाली..मीटिंगला मी.अब्बास भाई,,प्रॉडक्शन मॅनेजर केळकर व डिझानइचा चा भट [कर्म धर्म संयोगाने तो माझ्या बॅच चा होता] व चेअर परसन श्री म्हात्रे एक्झे.डिरेक्टर...
थ्रेडिंग मधे आमची मस्टरी असल्याने चिंता नव्हती..अब्बस भाईने टर्निंग मशिनिंग ग्राईंडीग करायचे व ते पार्ट्स पुण्याला पाठवायचे व आम्हि त्यावर थ्रेडिंग व असेंब्ली करायची असे ठरले व थोडेफार वर खाली झाली मला पण मनाजोगती प्राइस मिळाली आम्ही लघु उद्योजक असल्याने पैशाच्या अडचणी..बॅंक मदत करीत नाही अश्या अडचणीचा पाढा वाचत भोकाड पसरले. व श्री म्हात्रे यांनी २५००० रु चा अ‍ॅडव्हांस मंजूर केला..अ‍ॅडव्हांस चा चेक व ऑर्डर हातात पडली...
नंतर मी मशीन शॉप वर ते रिफिल्स च्या टिप्स बनवण्याचे मशीन बघायला गेलो.ज्याचा पार्ट आम्ही बनवणार होतो
ते मशीनं कंपनीने स्विस वरून आयात केले होते..मशीन म्हणजे स्विस ऍक्युरसीच चमत्कार होता..
बॉल पेन्स चे रिफिल्सच्या ज्या टिप्स असतात.त्या वरुन जरी साध्या दिसल्या तरी त्याची आतली रचना खुप क्लिष्ट असते.
आतल्या बाजूस शाई वहाण्या साठी अती सूक्ष्म अशी छिद्रे असतात. व वरच्या बेचक्यात स्टील /कारबाइडचा छोटा चेंडू आतल्या बेचक्यांत क्र्याम्प केला असतो व तो त्या बेचक्यांत फिरत असतो..आतली शाई त्याला चिकटते व आपण लिहिताना अक्षरे उमटतात..
व ह्या सा~या ऑपरेशन्स त्या मशीन वर वेगाने होत टिप्स बाहेर पडत होत्या..ते बघणे म्हणजे पर्वणीच
शॉप फ्लोअर वर हिंडताना व कारखाना दाखवणा~या जुन्या कामगाराशी गप्पा मारताना समजले.कि
भारतीय बनावटीचा पेन बनवायचा या जिद्देने मूळ पुरुष श्री म्हात्रे यांनी हा कारखाना सुरू केला.
प्लॅटो पेन जुन्या पिढीतील सभासदाना परिचित असतील.
पेन चे बाकीचे पार्ट्स तर तयार झाले पण निब तयार घोडे करताना अडले ..
निब बाकी तयार होती..पण निबेला चित्रातल्या प्रमाणे होल पाडून टिपे पर्यंत कसे स्लिट करायचे या ठिकाणी अडले होते.
तंत्रज्ञान नव्हते व त्याला लागणारे मशीन पण...
पण श्री म्हात्रे यांनी जिद्द सोडली नाही व कारखान्यातच मशीन बनवले व ग्राईंडींग व्हील च्या साहाय्याने इतकी सूक्ष्म व बरोबर रीतीने निब स्लिट केली व पेन बाजारात आला..
पुढे कारखान्यात स्पर्धा .कामगार संघटनांचा आडमुठे पणा..संप व खास करून निबेला जे सोन्याचे प्लेटिंग करतात त्या धातुच्या चो~या वाढल्या या व अश्या अनेक कारण मुले त्यांनी पेन बनवणे बंद केले...
त्यांच्या जिद्दीला सलाम व असे मशीन बनवून निब चे उत्पादन सफल करणा~या श्री म्हात्रे व त्यांच्या कुशल कामगारांना सलाम

stock-illustration-10676863-fountain-pen.jpg

गुलमोहर: 

वा! मस्त. आणि स्फुर्तीदायक.
असे अजुन अनुभव असतील तर नक्की लिहा. वाचायला आवडेल.

मस्त आणि वेगळाच लेख.. बराच प्रॅक्टिकल, बराचसा जुन्या आठवणीत नेणारा..आणि खूपसा विचार करायला लावणारा.. सकारात्मक

आवडला.. छानच.
बराचसा जुन्या आठवणीत नेणारा..>+१

एक सुचना: 'र्‍य' लिहायसाठी (R)कॅपिटल आर +य वापरा.

'म्हात्रें'च्या पेनांशिवाय, विशेषतः 'प्लेटो', इतर पेनं असतात हेच आम्हाला खूप उशीरापर्यंत माहित नव्हतं ! आतां हें वाचल्या वर तर आदर दुणावला !!
छान महितीपूर्ण लेखाबदल धन्यवाद.