वाहवा !

Submitted by कौतुक शिरोडकर on 2 April, 2012 - 05:24

तप्त ओला गारवा
अंग चोरी चांदवा

अधर दुमडे हासता
गौर गाली ताटवा

बावरी नजरानजर
कावरा मनपारवा

लुकलुके वेडापिसा
काळजाचा काजवा

उसळला धमन्यातुनी
आर्जवांचा कालवा

जाणवे 'द्वी'अंतरा
अंतराची वानवा

स्पर्श बोले दीडदा
देह गाई मारवा

ये समेवर प्रणयलय
तृप्त चित्ती वाहवा

गुलमोहर: 

उसळला धमन्यातुनी
आर्जवांचा कालवा

जाणवे द्विअंतरा
अंतराची वानवा
>>

वा वा

'द्वी'अंतरा असे करा:-)

(इतर शेर गझलेपेक्षा कवितेच्या ओळींसारखे वाटत आहेत) Happy

शुभेच्छा

उसळला धमन्यातुनी
आर्जवांचा कालवा >>>> मस्त कौतुक... बरेच दिवसांनी गझल केलीस?

छोट्या बहर मुळे मर्यादा आल्या असे वाटले...