एप्रिल फूल -

Submitted by विदेश on 31 March, 2012 - 14:25

रंग नाही, रूप नाही,
सुगंध नाही
पान नाही, पाकळी नाही,
देठही नाही -

अजबसे फूल, देते हूल,
कुठे दिसेना
आकर्षण आहे तरी
तयाचे सर्वांना ;

फजितीत फसवते,
स्वत:लाच हसवते
एप्रिलमध्येच कसे
नेमके बघा उगवते -

एक तारखेचे "एप्रिल फूल"
भारी जीव जडवते,
मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली
पाहता पाहता उडवते !

गुलमोहर: