"रानवाटा" प्रस्तुत "आरंभ" - छायाचित्र प्रदर्शन (काही क्षणचित्रे)

Submitted by जिप्सी on 30 March, 2012 - 01:20

आरंभ

पहिले पाऊल, पहिले बोल; पहिली शाळा, पहिल्या बक्षिसाचे केवढेतरी मोल;
पहिले चित्र, पहिली शाबासकी; पहिले छायाचित्र, ‘क्लिक’ केल्यावर स्वतःशीच वाजलेली चुटकी;
असे म्हटले जाते की सुरूवात उत्तम झाली की अर्धी लढाई जिंकल्यात जमा असते.
पण ही सुरूवात जराशी अडखळत झाली तर...
‘क्लिक’ केल्यावर चुटकीऐवजी हळहळीने टाळी दिली तर...
तर, ‘There's always first time,’ असे म्हणत तो छायाचित्रकार स्वतःचे सांत्वन करू पाहतो. पण खरे म्हणजे तिथेच ‘काय करू नये म्हणजे लढाई जिंकता येईल’ हे त्याला समजलेले असते आणि तो अर्धी नाही, तर अर्धी-अधिक लढाई जिंकून जातो;
पहिल्या आणि दुसर्‍या ‘क्लिक’मधला हा आकलन-क्षणच महत्त्वाचा; आरंभसोहळा पूर्णत्त्वाला जातो तो तिथे...
त्या आकलन-क्षणापाशीच आज आपण काही काळ रेंगाळणार आहोत;
या सर्व छायाचित्रकारांसोबत आरंभसोहळा साजरा करणार आहोत;
त्यांच्या पुढील यशस्वी प्रवासगाथांची मुहूर्तमेढ मिळून रोवणार आहोत...!

चाकोरीबाहेरचे फोटो
माणसाचा बोलका चेहरा, बोलके डोळे अनेकदा बरेच काही सांगून जातात;
एखाद्या नाजूक, कोवळ्या पानावरची चकाकी, टपोर्‍या फुलाचा देखणा रंग, एखादे निष्पर्ण झाड देखील आपल्याशी बोलते, संवाद साधते.
बोलकेपण हे माणसांना, प्राण्यांना, झाडा-झुडपांना, फुला-पानांना मिळालेले वरदान आहे, नाही?
पण मग निर्जीव वस्तू बोलत नाहीत असे म्हणावे का? तर, नाही. निर्जीव वस्तू बोलतात. छायाचित्रांच्या माध्यमातून. त्यांना बोलतं करतो छायाचित्रकार, आपल्या संवेदनेने.
संवेदनशील मनाने टिपलेल्या अशा एक से एक छायाचित्रांचा मेळा आज इथे भरला आहे. ना त्यांची भाषा तुम्हाला कोड्यात टाकेल, ना तुमची दाद त्यांना....
ऐका तर मग, ही छायाचित्रे तुमच्याशी काय बोलतात...

मायबोलीकर ललिता-प्रीती यांनी लिहिलेल्या या प्रस्तावनेपासुन रानवाटाच्या प्रदर्शनाला सुरुवात झाली. नवोदित छायाचित्रकारंच्या छायाचित्रांचा हा कौतुक सोहळा होता. यावेळेसही दर्दी रसिक प्रेक्षकांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला. कॅमेरा उत्पादनात अग्रगण्य असलेली कॅनन कंपनी यंदा प्रायोजक होती. हौशी छायाचित्रकारांच्या मेहनतीने आणि स्वप्निल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सजलेला हा कौतुक सोहळा गुढिपाडव्याच्या मुहुर्तावर दणक्यात पार पाडला. याही प्रदर्शनाला ललिता-प्रीती, यो रॉक्स, रोहित एक मावळा, सुरश (सकुसप), आनंदयात्री, सेनापती (सपत्निक), प्रणव कवळे, रश्मी वाघ या मायबोलीकरांनी उपस्थित राहुन आम्हा हौशी कलाकारांच्या कलाकृतीला दाद दिली (अर्थात तीन मायबोलीकर आल्हादकाका, राहुल आणि जिप्सी आधीच हजर होते :-)). यंदा मराठी सिनेकलाकार उमेश कामत, प्रिया बापट आणि स्टार माझा यांनीही सदर प्रदर्शनाला भेट दिली. याच आनंद/कौतुक सोहळ्याची हि काहि क्षणचित्रे.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रदर्शनात मांडलेले काहि जुने कॅमेरे
प्रचि ०४

प्रचि ०५

कॅनन लेन्स
प्रचि ०६

मराठी सिनेकलाकार प्रिया बापट कामत आणि उमेश कामत
प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रदर्शनातील काहि वेगळी छायाचित्रे
प्रचि १०
पुष्कर प्रभू याची "आंब्याची गोष्ट" (यात आंब्याच्या मोहरापासुन पानात येणार्‍या आंब्याच्या पदार्थापर्यंतच्या ८ फोटोची स्टोरी होती Happy )

प्रचि ११

स्वप्निल पवारची "मल्हारवारी"
प्रचि १२

पूजा साखरे यांचा खेळताना रंग होळीचा
प्रचि १३

प्रचि १४
एकाच टबात दोघांना बसवून आईने घातला घोळ, सांगा आता कशी करू आम्ही मनासारखी आंघोळ

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

क्षण आनंदाचे
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

मायबोलीकर प्रतिसाद देताना
प्रचि २१

कॉपी करताना रोमा Proud
प्रचि २२

रोहन, शमिका, नचिकेत सोबत जिप्सी

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

बाल प्रेक्षक
प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४
रानवाटेवरचे वाटसरू
फक्त एका फोन कॉलवर "रानवाटा"साठी आरंभचा इन्ट्रो ललिता-प्रीती आणि बातमी नचिकेत जोशी या आपल्या माबोकरांनी तात्काळ लिहुन दिली. त्यांचे आभार मानत नाही पण उल्लेख जरूर करत आहे. Happy )

गुलमोहर: 

फक्त एका फोन कॉलवर "रानवाटा"साठी आरंभचा इन्ट्रो ललिता-प्रीती आणि बातमी नचिकेत जोशी या आपल्या माबोकरांनी तात्काळ लिहुन दिली. त्यांचे आभार मानत नाही पण उल्लेख जरूर करत आहे.

होय, पण त्या कात्रणामधली बातमी मी दिलेली नाहीए! कात्रणाचा फोटो आणि वरील वाक्य एकापाठोपाठ वाचून गैरसमज होऊ शकतात, म्हणून हा (आगाऊ) खुलासा Happy

मी मिसलं !!!

आता म्हणशील कुणाचं काय तर कुणाचं काय .

१६ क्रमांकातले जे लाल बिया असलेले त्रिकोणी केसाळ फळ आहे ते कुंकवाचे फळ.
त्यापासून खाद्यरंग करतात. हा रंग सौंदर्यप्रसाधनातही वापरतात. (बिक्सा अनोटा)
याची फुले पांढरी किंवा फिक्कट जांभळ्या रंगाची असतात. सुंदर असतात. पाने
पिंपळासारखी.
कोकणात रस्त्याच्या कडेने दिसते. गोव्यात पणजीला महावीर उद्यानात आहे.

सह्हीच रे जिप्सी. मस्त आहे ही ओळख. प्रदर्शन बघतानाचे प्रेक्षकांचे प्रचि सहीच. ३१ मधल्या आजींचा फोटो फारच आवडला. आणि ३२ तर अप्रतिम. ३३,३४ पण मस्त. Happy

सॅरी ......
प्रत्यक्षात भेटण्याची खूप छान संधी होती....
पण ऑफिसला गेलो नसतो...तर मेमो मिळाला असता....
त्यामुळे येऊ शकलो नाही........

फोटो तर काय प्रश्नच नाही...........

खप छान, सगळे फोटो आणि फोटोग्राफर अप्रतिम,
जिप्सि तुमच्याबद्द्ल किति वेळा लिहु, ग्रेट, तुमचे फोटो आणि तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी नशिबात आहे महित नाहि?
उमेश आणि प्रिया माझे all time Favourite couple.........
All the best to all..........

Pages