परसदारातले पक्षी

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आमच्या घराच्या बाल्कनीमधून दिसलेले काही पक्षी....

काही फोटो जरा धूसर आलेले आहेत... नवीन कॅमेरा असल्याने अजून पूर्णपणे हात बसलेला नाही... अजून चांगले फोटो जसे काढले जातील तसे इथे येतीलच..

शशांक आणि भुंग्याने सगळ्यांची नावे सांगितल्या बद्दल धन्यवाद...

१. अ‍ॅशी व्रेन वॉर्बलर (वटवट्या)

२. अ‍ॅशी व्रेन वॉर्बलर (वटवट्या)

३. गोल्डन ओरिअल (आम्रपक्षी/हळद्या मादी)

४. गोल्डन ओरिअल (आम्रपक्षी/हळद्या मादी)

५. क्रिमसन ब्रेस्टेड बार्बेट (तांबट/पुकपुक्या)

६. क्रिमसन ब्रेस्टेड बार्बेट (तांबट/पुकपुक्या)

७. कोकिळ

८. कोकिळ

९. कोकिळ

१०. सूर्यपक्षी

११. अ‍ॅशी व्रेन वॉर्बलर (वटवट्या)

१२. व्हाईटब्रेस्टेड किंगफिशर (खंड्या)

१३. घार

१४. घार

१५. व्हाईटब्रेस्टेड किंगफिशर (खंड्या)

१६. व्हाईटब्रेस्टेड किंगफिशर (खंड्या)

१७. मैना

१८. हा आज सकाळी दिसला.. प्रचंड धावपळ करत होता.. तरी कसाबसा फोटोत सापडला...

पॅराडाईज फ्लायकॅचर (स्वर्गीय नर्तक)

शब्दखुणा: 

..

पहिला प्रयत्न वाटत नाही इतके सुंदर फोटो. पक्ष्यांचे फोटो काढणे एक दिव्य काम - लक पाहिजे व चिकाटीही खूप पाहिजे.

प्र चि १, २, ११ - अ‍ॅशी

प्र चि ३, ४ हळद्या म्हणजेच गोल्ड्न ओरिओल

प्र चि ७,८,९ कोकिळ (नर)

प्र चि ५, ६ तांबट (कॉपरस्मिथ बार्बेट)

प्र चि १२ १५, १६ खंड्या म्हणजेच किंगफिशर

धन्यवाद लोकहो..

श्या.. पक्ष्यांच्या फोटोंचाच छब्बू असेल तर दे की...

शशांक.. नवीन कॅमेर्‍यातून पहिलाच प्रयत्न आहे..

दिनेशदा... मला बाल्कनीला वेगळी शिडी लावावी लागेल अजून जवळ जाण्यासाठी..

प्रचि १, २ , ११ "अ‍ॅशी व्रेन वार्बलर" म्हणजे "वटवट्या"

प्रचि ३, ४ ही आम्रपक्षी / हळद्याची "मादी" आहे, "गोल्डन ओरिअल"

प्रचि ५, ६ हा "क्रिमसन ब्रेस्टेड बार्बेट" म्हणजे तांबट उर्फ पुकपुक्या (हे आवाजावरून ठेवलेले नाव आहे) आहे.

प्रचि ७,८,९ हा "कोकिळ" आहे

प्रचि १० हा "सूर्यपक्षी" आहे..... सनबर्ड (पण हा "शिंजीर (पर्पलरम्पड सनबर्ड)" नाही, वेगळा आहे)

प्रचि १२,१५,१६ खंड्या "व्हाईट्ब्रेस्टेड किंगफिशर"

प्रचि १३,१४ घार

प्रचि १७ मैना आहे.

हिम्स नवीन कॅमेर्‍याबद्दल अभिनंदन. Happy
लगेचच सुरवात केलीस हे चांगलय.
कॅमेरा कोणता घेतलास? लेन्स कोणती?
तुला टेली लेन्सची कमतरता जाणवेल पक्ष्यांचे फोटो काढताना,

फोटो चांगले आले आहेत पहिल्याच प्रयत्नाच्या मानाने.
कीप ईट अप. Happy

छान रे.. नि नविन कॅम घेतल्याबद्दल अभिनंदन... आता पक्ष्यांमागे झाडाझुडूपांतून काट्यांतून फिरताना कोणी तुला वेडयात काढले तरी लक्ष नको देउस.. Wink

धन्यवाद मंडळी..

झकासराव - canon SX40HS घेतला आहे.. तेव्हा एकच लेन्स असल्यामुळे टेलीलेन्सची कमतरता कायमच असणार..

योग्या - Happy

केपीकाका - एकदा तुमचा कॅमेरा घेऊन या सकाळ सकाळ.. मस्त फोटो मिळतील..

नवीन कॅमेर्‍याबद्दल अभिनंदन!!! Happy

छान आलेत फोटो.
पिकासा मधे एडीटलेस तर धुसरपणा कमी करता येइल प्लस बॉर्डर पण टाकता येइल.
प्रयत्न करुन बघ Happy

हिम्स नशिबवान आहेस. सुंदर परसदार... प्रचि ६ बार्बेट सहीच टिपलाय.

canon SX40HS घेतला आहे.. >>> शाब्बास... एकदम योग्य निर्णय Happy SX40चा Image Stabilizer एकदम सही आहे. डिजिटिल झूम वापरून काढलेले फोटो पण स्पष्ट दिसतात. 35X (Full Zoom) वापरून घेतलेले काही फोटो...

मस्त आलेत
खंड्या कित्तीदा दिसतो पण् अजुन क्यामेरात प़क्डता आला नाहिये. सगळेच फोटोस मस्त आलेत

खंड्या आणि मैना भारीच.

आमच्या परसदारी पण खूप पक्षी येतात. पण फोटो कसे घ्यायचे ते जमलं नाही अजून. बर्ड फीडरला लोंबकळतात सारखे. पण दारामागे जरा हालचाल जाणवली की उडून जातात Sad

Pages