कुणी पाहील का आता कशी आक्रोशते माती

Submitted by बेफ़िकीर on 26 March, 2012 - 04:57

जिथे ते गायचे गीते जगाला द्यायला स्फुर्ती
तिथे करतात आता देशभक्ती लोक तात्पुरती
कुणी शीलापरी नाचे कुणी मुन्नीपरी गाती
कुणी पाहील का आता कशी आक्रोशते माती

अम्हाला वाडवडिलांनी शिकवले एक सारे हे
असो कोणी कुणाचाही असावे सर्व प्यारे हे
तरी निघतात जितके लोक येथे तेवढ्या जाती
कुणी पाहील का आता कशी आक्रोशते माती

स्वतःची तुंबडी भरतो कुणी क्रीडांगणावरती
कुणी जाऊन स्वित्झर्लंडला पैसा करे भरती
अशांची धिंडा काढा अन अशांची गोठवा खाती
कुणी पाहील का आता कशी आक्रोशते माती

निनादे फौज गोर्‍यांची, मुक्याने ठेचली होती
अहिंसेतून सत्यातून मुक्ती खेचली होती
अता देतात नुसती भाषणे छक्के घणाघाती
कुणी पाहील का आता कशी आक्रोशते माती

तिच्या प्रत्येक सीमेवर नवा शत्रू दिसत आहे
तिच्या वंशास करुनी भ्रष्ट तो येथे घुसत आहे
बघत नादान पुत्रांना स्वतःची बडवते छाती
कुणी पाहील का आता कशी आक्रोशते माती

============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

बेफिकीर, कवितेतल्या जाणीवा प्रखर आहेत. खरंतर आपल्या सर्व लेखनातून त्या वेळोवेळी जाणवतातंच. पण तीच त्यांची प्रखरता भारतमातेप्रति एकवटली की वेगळाच अंगार घेऊन येते, नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

बेफिकीर:
आपल्या गझला वाचायला मिळतातच, पण त्यातील काही कळत नसल्यामुळे कवितेच्या अंगानेच गझलेतील रस घ्यायला जातो आणि फसतो. केव्हा केव्हा आपल्या कविता येतात आणि आपली प्रतिभा पाचएक टक्के वाट्याला येते. (कारण आपण तेवढ्याच कविता लिहिता). पण त्या पाच टक्क्यांनीच दिपून जातो.
आजची ही प्रखर कविता जाळून काढणारी आहे. ती वाचून ’कृपया कवितांची टक्केवारी वाढवून मिळावी’ अशी नम्र विनंती करावीशी वाटली.

शब्दाशब्दातून सद्यपरिस्थितीबाबतची उद्विग्नता जाणवतेय.

खास!

अस्चिग यांचा प्रतिसाद पटला फक्त

यात काय काव्य?

ही नुसती यमकगिरी

यमके, लय, वृत्तं वगैरे आलं की मस्त वाटतंच

सर्व प्रतिसादकांची 'मी माझ्याकडून स्पष्ट बोलल्याबद्दल' माफी

मायबोली प्रशासनाच्या औदार्याचा गैरफायदा घेण्याची कमाल करत एक गझल रचत आहे Happy

रिक्षा समजा

बेफि,

स्पष्ट मत : काही ठिकाणी निव्वळ यमकं जुळवली आहेत असं वाटलं. कविता मुक्त छंदातही नाही, लयीतही वाटली नाही. व्रुत्ताबाबत मी तुम्हाला सांगयची गरज नाही. ते तुम्ही जाणताच. एकुण , भावना पोचल्या. कविता तितकिशी नाही.
चु भू द्या घ्या!

कविता मुक्त छंदातही नाही, लयीतही वाटली नाही. >>

Proud

अक्षरगणवृत्तात आहे, वियदगंगा

सुहानी चांदनी राते हे गाणे किंवा

बहारो फूल बरसाओ हे गाणे

ज्या वृत्तात आहे त्या

या कवितेला काही अर्थ नाही हो आद्या

Happy

दखल घेतल्याबद्दल धन्यवाद Happy