बोगोर बुदुर .. भाग ५

Submitted by अविनाश जोशी on 25 March, 2012 - 05:30

रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १
http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २
http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३
http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4
http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर .. भाग ५
http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६
http://www.maayboli.com/node/33730

माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे, कथा “सवत माझी लाडकी”
http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास
http://www.maayboli.com/node/33369

--१०--

जाधवांना तीथेच सोडुन राणे ऑफिसला पोहोचले. कुणालला त्यांनी संध्याकाळी बोलावले होतेच.

" कुणाल काय म्हण्तीय सोनल ?"

कुणाल गोरामोरा.

" बर तुझ्याकडे आर्म लायसन्स आहे ?"

" हो."

" आणी रिव्हॉल्वर?"

" हे घ्या .?"

रिव्हॉल्वर नुकतेच साफ केलेले होते. स्मिथ वेसनचे होते

" तुम्ही हे का ठेवताय ?"

" काही कुलंगडी झाली की धमक्या येतात."

" वापरले आहे का?"

"अधुन मधुन प्रॅक्टीस करतो"

" मग काय न्युज.तु केस कव्हर करतोयस ना?"

" साहेब तुम्ही तर केसवर पांघरुणच घालुन ठेवलय."

" काही कळल तर कलवेन मी तुला. ये आता"
कुणाल गेला आणी थोड्या वेळाने गावडे आत आले

" साहेब. तारीकडचे रिव्हॉल्वर स्पेशल एडीशन आहे. शहाच्या वडीलांच्या नावावर होते. पण नंतर लायसन्स रिन्यु नाही. आणी फोरेन्सिकने शर्टावरचे रक्त आणी शहांचा ब्लडग्रुप एकच आहे हे सांगीतले. "

" ठीक आहे. मी जरा कमीशनर साहेबांकडे जाउन येतो. जाधवांच संपलेले असले तर ठाण्याला जाउन तारीला घेउन या आणी ३०२ खाली बुक करा. बुक करायच्या अगोदर मला फोन करा."

राणे कमीशनर ऒफीस मधे पोहोचले तेंव्हा संध्याकाळ झाली होती. राणेनी सर्व रिपोर्ट केला.

" साहेब सकृतदर्शनी पुरावा आहे पण मला मन सांगतेय की जरा थांबावे. "

" राणे आपण सी एम ना रिपोर्ट करु. ह्यात फार उलटे सुलटे कगोरे आहेत."

" साहेब होमला नको सांगायला"

" नाही. मी करतो हॅडल"

कमीशनर साहेबांनी सी एम ऑफीस्ला फोन लावला. त्याच्या पीए ने उचलला.

" काय वाघ ? साहेबांना वेळ आहे का ? जयंत शहाची केस आहे म्हणाव. "

" एक मीनीट.. साहेबानी वर्षावर बोलावले आहे ९ वाजता "

" ठीक आहे. राणे सी एम शी बोलेपर्यत तारीला बुक करु नका "

" साहेब मला हे राजकारण कळत नाही"

" काय करणार ? नाइलाज असतो. बर मला जरा ब्रीफ करा. आणी तुम्ही पण चला"

" साहेब मी कशाला ?"

" खड्ड्यात पडायला कोणी बकरा हवा ना?" कमीशनर हसुन म्हणाले " आणी बघा जरा ही लोक प्यादी कशी हलवतात ती "

गप्पा मारत दोघेही मलबार हीलवर पोहोचले. सुरक्षा व्यवस्थेतुन आत पोहोचले. साहेब अजुन यायचे होते. बाहेर लॉन मधे बऱ्याच खुर्च्या ठेवल्या होत्या.

थोड्याच वेळेत पी ए आला.

" दहा मीनीटात साहेब पोहोचत आहेत. "

" ही कसली तयारी? "

" पत्रकाराना बोलावलय. होम मीनीस्टर ही येतात अर्ध्या तासात ." पीए नीघुन गेला

" बघीतलत राणे एकेक खेळी. होमला आणी प्रेसला एकाच वेळी येतील अशी सोय आहेत. आणी आपल्याकडुन त्याच्या अगोदरच रिपोर्ट घेणार. वेळ अशी निवडली आहे की उद्या पेपरमधे हेड्लाइन्स आणी आज लेट न्युज ला चॅनेलस वर. "

" आपल्या कळण्या पलीकडचे आहे"

चॅनेल वाली मंडळी जमु लागली होती. त्यांची चहापाण्य़ाची सोय होत होती.

पीए नी थोड्याच वेळेत कमीशनर व राणेंना आत बोलावले. दोघांनीही आत जाउन सी एम ना सॅल्युट केला.

" बसा बसा आता दहा मीनीटात सांगा बर"

" साहेब हे राणे DCP crime "

" बोला राणे"

" साहेब शहाचा खुन झाला त्यावेळेस तारी हा त्याचा कर्मचारी तीथे गेला होता. चार्ज शीटर आहे. त्याची मैत्रीण गेली म्हणुन तो चीडुन तीथे गेला होता. त्याचे ठसे गाडीवर आहेत. आज रेड्मधे त्याच्याकडे हत्यार सापडले. पुरावा तर आहे. बॅलॅस्टीकचा रिपोर्ट यायचाय. "

" राणे बूक करा. आणी लवकरात लवकर सेशन कमीट करुन घ्या. "

" पण सर मला वाटते त्याला कुणीतरी फ्रेम करत असाव "

" जाउ द्या हो. सुटेल तीथुन. आज तर मीडीया शांत होइल. हे बघा आलेच होम. चला जरा आता पत्रकाराना तोंड देउ"

घाइघाइनी सर्व बाहेर गेले. पत्राकारांनी त्यांना गराडा घातला. ओबी व्हॅन्मुळे थेट प्रक्षेपण चालू होते. राणेंनी तेवढ्यात कुणालला फोन करुन त्या रात्रीची न्युज द्यायला सांगीतली.

" काय साहेब काय विशेष ?" संदीप टाइम्सचा क्राइम रिपोर्टर

" काही नाही जरा गप्प मारायचा मुड होता"

" इथे होम आहेत. कमीशनर आणी राणॆ आहेत. शहाच्या खुनाची काही न्युज आहे का ?" पत्रकार चलाख होते.

" हो. आज संशयीताला अटक झाली आहे. डीटेल्स तुम्हाला राणे देतीलच. पण न्युज जरा जपुन द्या. " मुख्यमंत्र्यांनी बॉल टोलवला.

" तपास चालु आहे. संशयीताचे नाव काशीनाथ तारी असुन त्याला नाला सोपारा मधे अटक केली आहे. " राणे

" काय पुरावे? "

" तारीच्या हाताचे ठसे, खुनी हत्यार इ. आणी हे बघा तपास चालु आहे. त्यामुळे मला जास्त सांगता येणार नाही."

पत्रकार पांगले.

" राणे तुम्ही राजकारणात येयला हरकत नाही " सी एम " काय होते आहे ते कळवा "
--१२--

दुसऱ्या दिवशी परत कुणालला भाव मिळाला कारण फक्त खबरमधेच सोनल आणी मेरी बद्दल न्युज होती.

अफवांचे पीक आले होते. काही मीडीयावाले शहाच्या सर्व जुन्या पुराण्या भानगडी उकरण्यात मग्न होते. सर्व आकडे गोळा केले तर शहाला पोरींकरता गिनीज बुक मधे नाहीतर लिम्का बुक मधे तरी स्थान मिळाले असते.

सोनल आणी मेरी एकदम प्रकाश झोतात आल्या होत्या. त्यात दोघीही फोटोजेनीक असल्याने आणी राणेंनी काहीही बाइटस न दिल्याने तर मीडीयावाले त्यां दोघींच्या मागेच लागले होते. माखानीने दोघीना आठ दिवस सुट्टी देउन गावाला जायला सागीतले होते. त्याला जशकडे लोकांचे लक्ष वेधुन घ्यायचे नव्हते.

राणे तर गडबडीतच होते. बॅलॅस्टीकने खुन कोल्टनेच झाल्याचा रिपोर्ट पाठवला होता. तारीकडे सापड्लेल्या रिव्हॉवरनेच खुन झाला होता. त्याच्या शर्टावरचे डागही शहाच्या ब्लडग्रुपशी जुळत होते. पुरावा तर भरपुर होता पण तरीही राणेंना काहीतरी खटकत होते. बराच विचार करुन त्यांनी शेवटी समीरला फोन लावला.

समीर. वय २८. समी"र पटेल हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. लहानपणीच आईवडीलाचा इस्ट आफ्रिकेत अपघाती मृत्यु झाल्यामुळे समीर मुंबईत काकांकडेच वाढला होता. त्यचे काका म्हणजे मुंबई शेअरबाजार आणी मेटलंमार्केट मधे एक मोठे प्रस्थ होते. लग्नाशिवायच होते आणी समीरचे पालन त्यांनी मुलासारखे केले होते. मलबारहील वर बंगला असल्याने उच्च्भ्रु आणी उच्चपदस्थ लोकात उठबस होती. पुणे, अलीबाग, सुरत अशा प्रॉपर्टीज होत्या. बऱ्याच कंपन्यात गुंतवणूक होती.

समीर तर हीरोच होता. गोरापान आणी राजबींडा तर होताच पण त्याचे डोके अफ़लातुन होते. IIT मधुन बी टेक झाल्यावर त्याने लॉची डिग्री पण घेतली होती. काका गेल्यावर प्रॉपर्टी संभाळणे, फास्ट गाड्या व मोटरबाईकस फीरवणे आणी उचापती करणे एवढाच त्याचा उद्योग होता. मेंदुला झीणझीण्या आणणारी कोडी त्याला फार आवडत. बरेच अवघड आणी नाजुक प्रसंग त्याने सोडवले होते. पोरींच्या बाबतीत तो शहाच्या एकदम विरुद्ध होता. म्हणजे पोरी त्याच्याभोवती फीरायच्या पण हा त्यांना कटवायचा. राणेंना काही खटकल की ते समीरला फोन करायचे.

" समीर राणे बोलतोय "

" बोला काय म्हणतोय कात्री.?"

" तुला सगळ्या जगाची खबर असते रे.."

" राणे तुम्ही फोन केला आहेत म्हणजे काहीतरी कोडे असणार. मग काय म्हणता ?"

" खर आहे तुझ. जरा भेटुया. पण तुझे ते हार्लेचे भुत घेउन नको येउस. सगल्या क्राइम ब्रॅंचला कळत. आणी तुझ्या त्या जांभळ्या पिवळ्या गाड्या पण नकोत. अख्खा मीडीया इथे गोळा होइल. "

" राणे तुम्हीच याना बंगल्यावर. छान लॉनवर स्कॉच घेउन बसु. वाट पहातो"

राणे फ्रेश होउन लालमहल वर पोहोचले. समीरच्या काकांना सगळे लाला म्हणायचे आणी बंगल्याला लालमहल. सध्यातरी त्या अवाढव्य वास्तुत समीर आणी त्याचा नोकर तानाजी एवढेच रहात होते. लॉनमधे समीर त्यांची वाटच पहात होता.

" काय राणे आज या गरीबाची आठवण काढलीत?"

" अशा गरीबीत राहायला मला पण आवडेल"

" बर काय विशेष ?"

" अरे त्या तारीला उचलेला आहे खरा पण माझी इंटुयशन वेगळेच सांगतीय"

" खर आहे कात्री हा भुरटा चोर. घोडा बाळगतो पण वापरतो धमकी साठी. "

राणेंना नेहमीच समीरच्या अंडरवर्ल्ड ज्ञानाचे आश्चर्य वाटे. त्याला कोण कुठुन बातम्या देतो हे कळत नसे.

" समीर हे प्रकरणात सी एम ना चटकन निर्णय हवा आहे. त्यामुळे माझ्या ईच्छेविरुद्ध खटला उभा राहील. मला जरा तपासालाही मर्यादा आहेत. तुला तसे काही नाही. खटला उभा राहील्यावर तु जरा उपस्थीत राहुन ह्या प्रकरणाच्या मुळाशी जावेस असे मला वाटते."

" म्हणजे लष्करच्या भाकरी भाजु तर ?"

" खर म्हणजे पोलीसांनी तुला असे सांगणे थोडे अवघड आहे. पण माझे हात बांधले गेल्यामुळे मी तुला वैयक्तीक विनंती करतोय. आणी लष्करच्या भाकरी म्हणलास तर प्रत्येक प्रकरणात तु फायदा करुन घेतोसच. "

" आता तुम्ही म्हणताय तर नाइलाज आहे. पण जरा मला ब्रीफ कराना"

" अरे त्या रात्री कंट्रोलला फोन आला. शहाचा मर्डर म्हणल्यावर तो डायरेक्ट क्राइमला हॅंडल करायला सांगीतला. फोन कुणाल नावाच्या त्याच इमारतीत रहाणाऱ्या वार्ताहराने केला होता. त्यालाच बॉडी सापडली असे तो म्हणतो. शहाच्या फ्लॅटमधे सोनल आणी मेरी ह्या दोघी तरुणी होत्या. सोनल ही माखानीची सेक्रेटरी आहे आणी ती काही कामानिमीत्त आली होती. मेरीला शहा मजा मारायला घेउन आला होता. फोन आल्यामुळे शहा खालीच थांबला आणी मेरीला त्याने पुढे जायला सांगीतले. मेरी पाठोपाठ तारी फ्लॅटवर पोहोचला. मेरी त्याची प्रेयसी होती आणी तो भडकुनच तीथे पोहोचला होता. मेरीचे आणी त्याचे जोरात भांडण झाले आणी तो तेथुन बाहेर पडला. त्या दोघी तीथेच शहाची वाट पहात थांबल्या. तो आला नाही म्हणून सोनलने त्याला मोबाइलवर फोन ही केले. कुणाल आला तेंव्हा अशाच फोनमुळे तो गाडीकडे गेला आणी त्याला बॉडी सापडली. "

" ओह असे झाले तर "

" गुरख्याकडे ह्या सगळ्या नोंदी आहेत वेळेसकट. आम्ही वर गेलो तेंव्हा सोनल आणी मेरी शहाची वाट पहात थांबल्या होत्या. त्यांना खुनाची बातमी मी दिली. "

" आम्ही वर गेलो ??"

" तो कुणाल मागे लागुन आला. वरती बहुधा त्याचे आणी सोनलचे साटेलोटे जुळले आणी सध्या ते एकमेकांना भेटत आहेत."

" इंटरेस्टींग"

" हो ना. म्हणजे damsel in distrait . तपास चालु असताना अचानक तारीचे प्रींट ओळखले गेले आणी रेडमधे खुनी हत्यार सापडले. "

" मला जरा वेळ द्या"

क्रमशः.....

गुलमोहर: 

कथा छान फुलत चालली आहे - स्पीडबद्दल तर काही म्हणायलाच नको! सलग वाचायला मिळते आहे म्हणून जास्तच मजा येतेय. पु.ले.शु. असेच पुढचे भाग चटाचट येउ द्या.

अमी