बोगोर बुदुर .. भाग ४

Submitted by अविनाश जोशी on 25 March, 2012 - 05:13

रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १
http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २
http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३
http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4
http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर .. भाग ५
http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६
http://www.maayboli.com/node/33730

माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे, कथा “सवत माझी लाडकी”
http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास
http://www.maayboli.com/node/33369

-७-

राणे इमारतीच्या बाहेर पडले व त्यांनी कमीशनर ऑफीसला फोन लावला.

" राणे बोलतोय . साहेब आहेत का ? "

" एक मिनीट "

" हं राणे. काय म्हणतोय तपास ? "

" साहेब थोडी मदत हवी होती. "

" काय?"

" साहेब. एक संशयीत. नाला सोपाऱ्यात आहे. त्याला उचलायचा आहे. "

" हं"

" साहेब टेरीटरी ठाणे ग्रामीण आहे. त्यांचे स्क्वाड असले तर सोपे होईल"

" ठीक आहे. करतो व्यवस्था. "

" साहेब आर्मड स्क्वाड पाहीजे. आणी हवालदार मुख्य असला तर बर होइल. इं असला तर इगो प्रोब्लेमस होतात "

" राणे तुम्ही DCP CRIME आहात.ब पण सगळ्याना तुम्ही ई.न्स्पेक्टर असे सांगता. आज जरा DCP व्हा. "

" साहेब DCP पेक्षा इन्सपेक्टर म्हण्ल्यावर जास्त काम होतात."

" बर. आणी तुम्ही त्या होमला काय डीवचले. राज्यमंत्रीचा फोन होता, रिपोर्टस मिळत नाहीत म्हणुन. "

" तुम्हाला माहीतच आहे. दर तासाला माहीती द्यायला हे काय हवामानखाते आहे"

" स्क्वाड कार दहीसर नाक्यावर असेल. ई. जाधव आहेत. चांगला माणूस आहे. त्यांना सांगीतले आहे वॉरंट ही तयार ठेवायला "

गावडे गाडी घेउन पोहोचतच होते. बरोबर दोन कॉन्स्टेबल होते. एक वायरलेस सेट हॅंडल करत होता.
राणे निघाले तेम्व्हा अकरा वाजुन गेले होते.

--८--

राणे बाहेर पडायची कूणाल वाटच बघत होता. सोनल समोरच उभी होती

" मिस. मला जरा तुमचाशी बोलायचे होते"

" सॉरी. मला आता बोर्ड मीटींग आहे "

" आपण दोन वाजता लंच घेउया का ? म्हणजे मीटींग नंतर तुम्हाला वेळ असेलच ना ?"
सोनलच्या चेहऱ्यावर भीतीची छटा स्पष्ट दिसत होती.

" बर. "

" मी कॉपर चिमनी, ऍनी बेझंट रोडवर वाट पहातो"

" तुम्ही निघा येथुन माखानी चिडतील."

" OK. बाय"

कुणाल कॉपर चिमनी मधे सोनलची वाट पहात थांबला होता. सोनल अडीच वाजता धावत पळत आली.

" काय ग ! काय वाघ मागे लागला का " कुणाल एकेरीवरच आला.

" नाही. उशीर झाला न म्हणुन "

" चल अगोदर ऑर्डर देउ. तुला माहीती आहे का हे रुमाली रोटीचे जनकस्थान आहे "

" बर का बोलावलत ?"

" तु का आलीस ? "

" ऑफीस मधे तमाशा नको म्हणून"

" हे बघ सोनल. मला तु पहील्या दिवसापासुनच आवडली आहेस. म्हणजे कालपासुन. आपला परिचय वाढावा अशी माझी इच्छा आहे" कुणाल डायरेक्ट

" मला जरासा वेळ हवा "

" दिला. जेवण संपेपर्यंत" सोनल खुदकन हसली

" बर काय म्हणतीय मीटींग ? "

" हे बघ तुला माहीतीकरता ओळख वाढवायची हाहे का?"

"सोनल. ही माहीती सर्वांकडे उद्यापर्यंत असेल. "

" काही विशेष नाही. माखानी चेअरमन झाले. याकुब CEO माखानीच्या जागी. शहा मेल्यामुळे आता माखानी २५% भागीदार झाले आहेत. फार कडक माणुस आहे. "

" तु किती दिवस तीथे आहेस ?"

" सुरुवातीपासुन. म्हणजे सहा वर्ष. मी पण सी ए आहे आणी फायनान्स मधे एम बी ए केले आहे. "

" मी कुणाल . खबरचा वार्ताहर. शहांच्या बिल्डींगमधेच रहात असल्याने आणी मलाच बॉडी सापडल्याने मी इनव्हॉल्व झालो"

" हो ना त्या दिवशी आम्ही काय घाबरलो होतो. "

दोघांनी बऱ्याच गप्प मारल्या. टेलीफोन आदान प्रदान केले.

" काय ग ? मी कुठे राहतो ते तुला माहीती आहे. पण तु कुठे राहतेस ?"

" बोरीवली इस्ट्ला. वडील नेव्हीत होते तेंव्हा आम्ही जगभर भटकत होतो. आता मात्र इथेच. वडील जाउनही सात वर्षे झाली. आता मी आणी छोटी बहीण राहतो."

" माझ्या वडीलांचा कापडाचा होलसेल व्यवसाय. आता माझा मोठा भाउही ते बघतो. वरळीला आम्ही एकत्रच राहातो. "

गप्पात वेळ कसा गेला हे दोघांनाही कळले नाही. शेवटी परत भेटायचे ठरवुन दोघेही आपाअपल्या दिशेने निघुन गेले.

--९--

राणे आणी गावडे नाला सोपाराकडे निघाले.

" साहेब आज तुम्ही DCP चा ड्रेस घातलाय"

" दुसऱ्या टेरीटेरीमधे जायचे आहे ना ? हे एक तारीचा चांगलाच क्ल्यु मिळाला आहे. "

" बघु आता तो जागेवर आहे का ? "

" जरा इ जाधवांना वायरलेसवर घ्या "

" हे घ्या साहेब"

" जाधव ! राणे बोलतोय. "
" बोला! आम्ही पोचतोय दहीसरला."

" नको, तुम्ही नाला सोपाराला जा आणी लक्ष ठेवा. जर तारी पळायला लागला तर उचला. "

"बर"

वायरलेस बंद करुन राणे गावडेकडे वळले.

" गावडे अजुन काय फोरेन्सिक कडुन ?"

" गाडीतल्या वस्तुंची यादी आली आहे. मयताच्या अंगावरील यादी आली आहे."

" हं"

" आणी साहेब एक गोळी सीट्मधे सापड्ली"

" कुठे?"

" बॅक हेड रेस्ट मधे"

" अजुन काही"

" पुंगळ्या सापडल्या. चारही आहेत. फेडरल कंपनीच्या आहेत"

" आर्म लायसन्स कुणाकडे ?"

" कुणालच्या नावावर आहे. गेल्या वर्षीच. कोल्ट आहे त्याच्याकडे ०.३८ कॅलिबेर"

" कुणालकडे?"

"हो. अजुन मोदींकडे आहे. त्यांच्याकडे ९ मिमि लुगर आहे"

" माखानींकडे लायसन्स आहे. बाकीं तपास चालु आहे. "

" पोस्ट मधे अजुन विशेष काही नाही. "

नालासोपाराला पोहोचल्यावर पत्त्ता विचारुन गाडी भावडेचाळीत गेली. गावडे व राणे उतरले.

जाधव जवळ आले व DCP लेव्हलचा अधीकारी पाहुन दचकले. एक कचकचीत सॅल्युट टाकला.

" साहेब आपण. ई. राणे येणार होते ना?"

" साहेबांना ई. म्हणुन घेणे बरे वाटते" गावडे

" जाधव काय स्थीती आहे? "

" तारी पहील्या मजल्यावर रहातो. दोन रुम्स आहेत. घरातच आहे"

" चला."

सर्व लवाजमा तारीच्या खोलीजवळ पोहोचला. दरवाजा लोटलेला होता. सात आठ्जण आत घुसले. तारी आत खुर्चीवर पेपर वाचत बीडी फुंकत होता.

एका हवालदाराने त्याच्या तोंडातील बीडी काढुन फेकुन दिली. पेपर हिसकावुन घेतला व एक सणसणीत लगावली

" भोसडीच्या नसते धंदे करायला हवेत आणी वर बीड्या फुंकत बसतो."

" हे बघ तारी एकतर तुझ्या घराची झडती घ्यायचीय. आणी जरा तुझ्याशी बोलायचय"

" साहेब मी काही नाही केल"

" तु काल शहांच्या घरी कशाला गेला होतास ?"

" मी साहेब?"

" जाधव जरा घराची झडती घ्या बर. "

" तारी तुला इथे बोलायचय का स्टेशनमधे यायचय? तु काल शहांच्या घरी कशाला गेला होतास ?"

" मेरी तीथे गेली म्हणुन"

"तुला मेरी तीथे गेल्याचे कसे कळले ?"

" फोन आला होता"

" काय?"

" कोणीतरी सांगीतले की शहा तुझ्या पाखराला घेउन प्रभादेवीला कोहीनुरमधे बसलाय"

" मी तीथे पोहोचलो तर शहा आणी मेरी हसतखेळत जेवत होते. रांड साली"

" मग?"

"मी बाहेरच बाइकवर थांबलो. साडेदहानंतर दोघे बाहेर आले आणी गाडीत बसुन निघुन गेले. मी पण त्यांचा पाठलाग केला."

" बर"

" शहाची गाडी आत गेली. पण गुरख्याने मला आडवुन चॊकशी केली. मी आत गेलो तेंव्हा शहा दिसला नाही पण मेरी घाईघईने लिफ्ट मधे गेलेली दिसली. मी पण दोनतीन मीनीटात वर गेलो."

" आणी तमाशा केलास"

" आपल डोक पॅक झालेल साहेब. सालीचा जीवच घेतला असता. मॅडम मधे पडल्या आणी त्यांनी आम्हाला शेजारच्या खोलीत ढकलले."

" कीती वेळ होतास तीथे?"

" काही कल्पना नाही पण १५/२० मीनीटे तरी होतो. "

" शहांवर चिडला होतास ना ? आणी खाली जाउन खुन केलास न"

" चिडुन मी खाली गेलो आणी.."

तेवढ्यात जाधव बाहेर आले. त्यांच्या हातात रक्त लागलेला शर्ट आणी रुमालात धरलेले रिव्हॉल्वर होते.

" हे काय जाधव?"

" साहेब आत सापडले."

रिव्हॉल्वर कोल्ट पायथॉन ०.३८ होते. जाधवांनी रिव्हॉल्वर उघडुन पाहीले. चार चेंबर्स रिकामी होती. आणी बुलेटस फेडरलच्याच होत्या.

" तारी You are under arrest. हव तर तुझ्या वकीलांना बोलावुन घे. आता देवच तुला वाचवेल"

"राणे साहेब. काय करायचे?"

" जाधव त्याला ठाणे कोर्टातुन रिमांड घ्या. खोली सील करा आणी पींजुन काढा. फायर आर्म्स खाली बूक करा. गावडे ह्यांच संपल्यावर शर्ट फोरेन्सिकला जाउदेत आणी रिव्हॉल्वर बॅलीस्टीकला. "

" सर त्याला इथेच ठेवायचय"

" हो सध्या तरी. मीडीयाच्या भुतांपासुन जरा दुरच राहुदेत. शर्ट तर पुराव्यात घेउच नका तो गावड्यांनाच द्या. गावडे रिव्हॉल्वरचा नंबर घ्या आणी ट्रेस करा. "

गुलमोहर: 

आज चारही भाग एकदम वाचले.. मस्त जमलीये कादंबरी..
बोगोर आणी बोरोबुदूर बद्दल माहित आहे.. बोगोर बुदूर नाव देण्याचं प्रयोजन सांगाल काय??