बोगोर बुदुर .. भाग २

Submitted by अविनाश जोशी on 24 March, 2012 - 13:59

रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १
http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २
http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३
http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4
http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर .. भाग ५
http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६
http://www.maayboli.com/node/33730

माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे, कथा “सवत माझी लाडकी”
http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास
http://www.maayboli.com/node/33369

--३--
कुणाल आणी राणे सहाव्या मजल्यावर ६१ ला पोहोचले. दार एका अतीशय सुंदर मुलीने उघड्ले. बीझनेस सुटमधे होती पण चेहरा म्लान दिसत होता. तीला बघताच कुणालला कुछ कुछ होने लगा. राणेंनी आपला पोलीसीखाक्या सुरु केला.

" काय हो बाइ ? कोण तुम्ही ? आणी ह्या शहाच्या फ्लॅटमधे काय करताय? आयला आता धंदा करणाऱ्याही बिझनेस सुट घालायला लागल्यात. "

" मि. माईंड युवर लॅंन्गेज. मी सोनल गोखले. माखांनीची सेक्रेटरी. शहांनी बोलावले म्हणुन आले. ते अजुन आलेच नाही. गेल्या दोन तासात दहा तरी फोन केले असतील "

" तुम्ही शहांबरोबरच आलात ना?"

" नाही. त्यांच्याबरोबर मेरी आली. शहा खाली येउनही वर का येत नाहीत मला कळले नाही."

" कोण मेरी? कुठाय ती ?"

" मेरी. जरा इकडे ये"
एक चुणचुणीत स्कर्ट मधील पोरगी समोर आली. ती येताच मोजुमाचा वास सुटला.

" काय ग टवळे ? शहाबरोबर तुच आलीस ना?"

मेरीची मान खाली.

" धंदे करताना लाज नाही वाटत आणी आता सोंग आणतीय. रात्रीचे कीती पैसे घेते? "

" साहेब मी त्यातली नाही हो."

" गप. अजुन कोणकोण आत आहे. गावडे सर्वांची झडती घ्या"

" मि. अजुन शहा आले नाहीत. आणी घरात आम्ही दोघी स्त्रीयाच आहोत. आत कोणी नाही. "

" गावडे जरा कंट्रोलला फोन करुन स्त्री पोलीस मागवुन घ्या. आणी तुम्ही जागा तपासा. जर यांनी आडकाठी केली तर आज जरा हवा खाउ देत आतली."

" मि. तुमच्याकडे वॉरंट आहे का ?"

" हे बघा बाई खुनाचा तपास चालु आहे आणी स्त्री पोलीस नसताना सुद्धा संशयावरुन तुम्हाला अटक करु शकतो. गावडे तुम्ही तुमचे काम करा"

सोनलचा चेहरा पडला होता. कुणालला राणेंचा संताप आला. येवढया सुंदर पोरीला छळायच म्हणजे काय.

"खुनाचा ? कोणाचा खुन ? " राणेंनी दुर्लक्षच केले.

" आणी बाई शहा नसताना तुम्ही आत कशा आलात ? "

" मी येइपर्यंत नोकर थांबला होता."

" अजुन इथे कोण आले होते का ?"

मेरीचा चेहरा गोरामोरा झाला."

" होय साहेब. कात्री आला होता. " मेरी

" कात्री ? "

" काशीनाथ तारी. त्याचे टोपण नाव कात्री " मेरी खाली मान घालुन बोलली

" तो कशाला आला होता?"

मेरी बोलायला तयार नव्हती.

" भवाने आता काय थोबाड बंद झाले ? "

" साहेब आम्ही एकाच ऑफीसमधे काम करतो. तो माझा प्रियकर आहे. मी इथे आल्याच कळले म्हणून तो चीडुन इथे आला होता. शहांच्या बरोबर ईथे मुली कशाला येतात हे सगळ्यानाच माहीत आहे."

" मग तो शहावर चिडला असेल ना? का तुझ्यावर ? "

" दोघांवरही."

" पण हे माहीती असुनही तु इथे कशी आलीस?"

" शहांना नाही म्हणायची ताकद नव्हती. ऑफीसमधे बहुतेक मुलींना हा फ्लॅट माहीती आहे. आज त्यांची दृष्टी माझ्यावर पड्ली. ऑफीसमधुन आम्ही इथे आलो. पार्कींग मधे गाडी लावतानाच त्यांना फोन आला. मला किल्ली देउन फ्लॅटमधे पाठवले आणी दहा पंधरा मिनीटात येतो म्हणले"

" मग ?"

" साहेब मी तसली नाही हो. हवे तर माझी तपासणी करा. मी अजुन कुमारीकाच आहे. मी अतीशय भीतभीतच वर आले. किल्लीने दार उघडले तर सोनल मॅडम होत्या "

" त्यांना पाहुन काय वाटले "

" काही वाटण्याच्या आतच बेल वाजली. कात्री आला होता. आल्याआल्याच त्याने शिव्यांची घाण सुरु केली. सोनल मॅडमने आम्हाला आतल्या खोलीत ढकलले. शहा आले तर तमाशा नको म्हणली. दहा पंधरा मीनीटे तणतण करुन कात्री गेला. "

" मग शहा केव्हा आले "

" आम्ही दोघी त्यांची वाट बघत बसलो. मॅडमने त्यांना फोनही केले पण त्यांनी ते उचलले नाहीत."

" मुडदा कसा फोन उचलेल ? "

सोनल मटकन खालीच बसली. मेरीला कळायला थोडा उशीर लागला.

" शहा साहेबांचा खुन झालाय ? "

" होय. पत्रकार चला निघा तुम्ही. आणी खुनाची बातमी देउन टाका. पण ह्या दोघींचा उल्लेख नको. फोरेन्सीक्चे फोटो आजच देतो. तेवढाच तुम्हाला स्कुप. गावडे दुसऱ्या हवालदाराबरोबर ह्या दोघीना त्यांच्या घरी सोडा. फ्लॅट सील करा. बघु उद्या सकाळी"

--४--

दुसऱ्या दिवशी मुंबई शहर हादरले होते कींवा मीडीयाने हादरवले होते.

" मुंबईत खुनी मोकाट. उद्योगपतीचा खुन "

" खुन पडत असताना, गृहमंत्री प्रीमीयर मधे मग्न "

" मुंबई असुरक्षीत ? परप्रांतीयाना बाहेर काढा "

" सरकार झोपले आहे काय. पोलीस चॊकीपासुन २०० मीवर शहांचा खुन "

कुणालचा खबर पेपर सोडला तर कुणाकडेच फोटो नव्हते. शहाचे फाईल फोटो छापण्यावरच इतरानी समाधान मानले होते. साहजीकच खबरचा खप आणी कुणालचा भाव दोन्ही वर गेले होते. खबरने कुणालला ह्या केसचे कव्हरेज करायला सांगीतले होते.

चॅनेलनी मात्र हैदोस घातला होता. पहाटेपासुनच दांडेकरांनी सागर मंझील बाहेर फील्डींग लावली होती. शहाच्या भानगडी पुन्हा चघळल्या जात होत्या. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाईटस घेतल्या जात होत्या. कुणालला तर मीडीयाने हीरो केले होते. राणेंच्या मुलाखती मात्र कुणी घ्यायला गेले नाही. त्यांना हव असेल तेव्हाच ते बोलावतील हे मीडीयाला माहीत होते. राणेनी गुरख्याचे रजीस्टर आणी गुरखा ह्या दोघांनाही रात्रीच हलवल्यामुळे शहांच्या फ्लॅटमधे दोन मुली होत्या हे कुणालशिवाय कुणालाच माहीत नव्हते.

राणेंचा फोनही सकाळपासुन खण्खणत होता. गावडे वार्ताहरांना कटवायच काम करत होते. एक फोन मात्र त्यांनी राणेंच्या हातात ठेवला.

" साहेब. होम मधुन फोन आहे "

" आयला! झाली का सुरुवात. बर द्या ईकडे. हॅलो ई.राणे बोलतोय. "

" परब बोलतोय."

" बोला साहेब"

" अरे त्या शहाच सोडवा काहीतरी. आमच्या साहेबांना फोन वर फोन येतात"

" परब फोन करण सोप असत हो. पण फील्डच्या अडचणी कोण बघणार. ?" राणे कोणाला बधणारे नव्हते.

" अहो पण सेशन चालु आहे. प्रश्नांना पेव फुटेल आता "

" ते बघुतेक तुमच्या साहेबांना. माझ काम चालु आहे. लवकरात लवकर संपवीन "

" तेच तर आम्ही म्हणतोय" परब बचावात

" ठीक आहे. रिपोर्ट करीनच, "

फोन खाली ठेवुन राणे विचारात मग्न झाले.

" गावडे फोरेन्सिकचा काही रिपोर्ट ?"

" नाही साहेब"

" जरा फोन लावा पाहु. काही कळतय का बघु"

गावडेनी फोरेन्सिक लॅबला फोन लावला. प्रेत नुकतेच पोस्टमॉर्टेमला घेतले होते. बाकी शहानिशा चालु होती.

" गावडे चला गाडी काढा. जशच्या ऑफीसात चक्कर टाकु."

दोघेही जशच्या बांद्राकुर्ला कॉंप्ले़क्स मधे पोहोचले तेंव्हा दुपार उलटुन गेली होती. ऑफीसच्या वातावरणात एक वेगळेच टेंशन जाणवत होते.

" माखानी कुठे आहेत"

" थांबा सर. मी बघते. आपण काय घेणार. चहा कॉफी" रिसेप्शनीस्ट

"जरा लवकर . अरे ही तर सोनल. सोनल तुमचे बॉस कुठे आहेत ?"

" या ना ! इकडॆ या" सोनल दोघांना घेउन माखानींच्या केबीन मधे गेली.

माखानी कागद्पत्रांच्या ढीगाऱ्यात बसले होते.

" साहेब हे ई. राणे. आपल्याला भेटायला आले आहेत."

" या साहेब. सोनल जरा कॉफीच बघ"

"माखानी शहांचा खुन झाल्याच तुम्हाला केंव्हा समजल ?"

" काल रात्री दोनच्या सुमारास सोनलने फोन केला"

" Oh I see. मग तुम्ही काय केलेत?"

" काय करणार ? शहाला फॅमीली अशी नव्हतीच त्यामुळे तो भाग नव्हताच. मी फ़्रेश होउन पहाटे पाचलाच ऑफीसला पोहोचलो. सोनलही सात वाजता आली"

’ एवढ्या लवकर?"

" अहो शहा साहेंबांचे असे झाल्यामुळे येथे वरेच बदल करवे लागतील. शहा कंपनीचे एम डी व एक मुख्य शेअरहोल्डरही होते. सर्व डायरेक्टरस ना कळवणे. वर्तमानपत्रांना माहीती पाठवणे, सह्यात बदल करुन घेणे अशी सत्राशे साठ काम आहेत. आज सकाळी दहा वाजता शोक सभाही झाली. "

" माखानी काल इतक्या रात्री तुमची सेक्रेटरी शहांकडे कशाला गेली होती ?"

" शहांना दुबईच्या व्यापाराचे काही आकडे बघायचे होते आणी नवीन ब्रॅंचेस विषयी चर्चाही करायची होती. शहांनी मला १० वाजता घरी बोलावले होते पण संध्याकाळीच आईच्या छातीत दुखु लागल्याने तीला घेउन मी लीलावतीला गेलो आणी सोनलला माहीती घेउन शहांकडे पाठवले."

" पण तुम्ही शहांची ख्याती माहीती असुनही सोनलला पाठवलेत?"

" सोनलला शहा हात लावायचे धाडस करणे शक्य नव्हते. एकतर पोरगी चटपटीत आहे आणी पहील्यापासुन असल्यामुळे तीला कारभाराची इथंभुत माहीती आहे. "

" पण तुम्ही शहाला येत नाही असे का नाही सांगीतले ?"

" त्यांना दुबईला एक दोन दिवसातच जायचे होते. आणी मी इतका गोंधळुन गेलो होतो की त्यांना फोन करायच विसरलोच"

" सोनलने अजुन काय काय सांगीतले ?"

" मेरी व तारी हे प्रकरण ही सांगीतले. आज दोघेही आली नाहीत. "

" मला त्यांचे घरचे पत्ते , फोन नं ई डीटेल्स द्या "

" सोनल ! ह्यांना काय हव ते बघ. राणेसाहेब तुम्ही यादी द्या. तुम्हाला सर्व मिळेल"

" बर माखानी ह्या खुनाबद्दल तुम्हाला काय वाटते"

" फार वाइट झाल"

" नाही म्हणजे का झाला असावा ? "

" अवघड आहे. त्यांची पोरींची भानगड असु शकते. "

" कुणावर संशय ?"

" संशयीतात माझच पहील नाव असेल. "

" का?"

" जशचे कोट्यावधी रु चे शेअर्स आमच्या दोघांच्या नावावर होते आता शहा गेल्यावर ते सर्व माझ्याच मालकीचे झाले"

" बरोबर आहे तुमचे म्हणणे. अजुन कोणी? "

" पोरींची भानगड असली तर सांगण अवघड आहे. कारण त्याच्या सर्व भानगडी त्याला तरी आठवत असतील का ह्याची शंकाच आहे. रात गयी बात गयी असे त्याचे काम होते "

" माखानी मला ऑफीसमधे काही लोकांशी बोलायला लागेल. ते इथेच बोलले तर चांगले होइल."

" ठीक आहे. व्यवस्था होइल. उद्या बोर्ड मीटींग आहे. ती झाल्यावर मी करतो."

" मी उद्या मीटींगला हजर रहाणार आहे. मला सगळ्याच बोर्ड मेंबर्सना भेटायला आवडेल "

" पण तुम.." माखानी प्रथमच चांचरला
" माखानी सरळ काम होत नसेल तर मला वाकड्यात जावे लागेल. उद्या तुमच्या मीटींगला स्टे येईल आणी हाय कोर्टाच्या हुकुमाने मी हजर राहीन" राणेंनी उगीचच ढोस दिला.

" नाही तस काही नाही. उद्या या तुम्ही चार वाजता. पण सगळी बडी धेंड आहेत, उगीच कुणाच्या शेपटीवर पाय नको पडायला " माखीजाचा काउंटर

गुलमोहर: