कलावंताची अद्-भूत दुनिया

Submitted by अवल on 23 March, 2012 - 11:42

कृपया प्रत्येक फोटो सावकाश बघावा ही आग्रहाची विनंती !

१.
1_12.jpg
२.
2_13.jpg
३.
3_13.jpg
४.
4_7.jpg
५.
8_3.jpg
६.
9_2.jpg
७.
10_1.jpg
८.
11_1.jpg
९.
12_1.jpg
१०.
13_1.jpg
११.
14.jpg
१२.
15_0.jpg
१३.
16.jpg
१४.
17.jpg
१५.
18.jpg
१६.
19.jpg
१७.
20_0.jpg
१८.
22.jpg
१९.
23.jpg
२०.
24.jpg
२१.
25.jpg
२२.
26.jpg
२३.
27.jpg
२४.
28.jpg
२५.
30.jpg
२६.
31_0.jpg२७.
32.jpg
२८.
33.jpg
२९.
34.jpg
३०.
35.jpg
३१.
36.jpg
३२.
37.jpg
३३.
5_3.jpg
३४.
6_5.jpg
३५.
7_4.jpg
३६.
38.jpg
३७.
39.jpg
३८.
40.jpg
३९.
41.jpg
४०.
42.jpg
४१.
43.jpg
४२.
44.jpg
४३.
45.jpg

काय, नक्की काय आहे हे ? प्रश्न पडला ना मनात ? या अशा वेगवेगळ्या कलाकारांचे काढलेले फोटो मी असे एकत्र का केले? त्या सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध ? असे खुप प्रश्न पडलेत ना ? Happy

मग त्याचं उत्तर त्या फोटोंमध्येच आहे. नाही लक्षात येते ? मग आता शेवटचा फोटो पहा.
नीट पहा. हाच तो कलाकार ज्याने ही अद्-भूत दुनिया उभी केलीय , साकारलेय. हो हो, ही खरी माणसं नाहीत. हे आहेत मेणाचे पुतळे !

सुनील कंडल्लूर ( Sunil Kandalloor ) असे या कलाकाराचे नाव आहे. लोणावळ्यामध्ये त्यांनी हे "सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम" उभे केले आहे. पुणे-मुंबई जुन्या रस्त्याने गेलो तर लोणावळ्याच्या टोलनाक्या पुढे डावी कडे लगेचच हे म्युझियम आहे.
ते किती अप्रतिम आहे हे तुम्ही अनुभवलच. पण माझे इथल्या प्रत्येकाला आवर्जून सांगणे आहे , की तुम्ही प्रत्येकाने ते प्रत्यक्ष अनुभवाच ! खरोखर फार वेगळा अनुभव आहे हा. सध्या ३१ शिल्प त्यांनी तिथे ठेवली आहेत. एक से एक !

त्यातले श्री श्री रवीशंकर यांचे शिल्प तर अप्रतिम खरे जमलेय. मी काही अध्यात्मवाली नाही. पण श्री श्रींबद्दल ऐकून आहे, त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आहे हे ऐकलय. या शिल्पाचा फोटो काढताना- चेहर्‍याचा क्लोजप काढताना एक क्षण मी गुंगल्यासारखी झाले. क्लिक करायला सेकंदभर वेळ लागला. इतके हे शिल्प हुबेहुब जमलेय.
खरच नेहमी एक्स्प्रेस हायवे ने जातो आपण त्यामुळे या म्युझियमला हुकतो आपण ! मी सुद्धा कधीची जायचे म्हणत होते. पण आज मुहूर्त लागला. माझी नवीन वर्षाची सुरुवात फार अप्रतिम झाली एव्हढे खरे Happy
बाहेर स्वतः सुनीलजी भेटले. कित्ती साधेपणा, कित्ती विनम्रपणा, कित्ती छान, आपलेपणाने बोलले. खरा कलाकार ! सुनील कंडल्लूर यांचे करावे तितके कौतुक कमीच ! मायबोलीवर लिहू का, फोटो टाकू का म्हटल्यावर लगेच हो म्हणाले. धन्यवाद सुनीलजी !
(सुनील कंडल्लूर यांची ही वेबसाईट : www.celebritywaxmuseun.com )

गुलमोहर: 

छान

अगदी हुबेहुब!!... पहिले चार प्रचि पाहेपर्यंत काही कळलच नाही. वरच्या सुचनेनुसार वाटलं , कदाचित सारख्या चेहर्याची दुसरी माणसं (डुप्लिकेट्स ) असतील, मेणाची असतील अस वाटलच नाही.....
जबरदस्त काम......
धन्यवाद प्रचिंसाठी....
(मागे त्या माधुरी दिक्षितचा मेणाच्या पुतळ्याचा प्रचि पाहिला, ती माधुरी दी. आहे हे कळायलाच कितीतरी वेळ गेला.... त्यामानाने हे काम फारच छान....)

अप्रतिम Happy
श्री श्री रवीशंकर यांचे शिल्प तर अप्रतिम खरे जमलेय.<<<<<+१
हरिहरन, रेहमान. अण्णा हजारे, सुब्बलक्ष्मी यांचे पुतळे पण छान जमलेत.

छान...

>>पहिले चार प्रचि पाहेपर्यंत काही कळलच नाही. वरच्या सुचनेनुसार वाटलं , कदाचित सारख्या चेहर्याची दुसरी माणसं (डुप्लिकेट्स ) असतील, मेणाची असतील अस वाटलच नाही....>>>>>अगदी अगदी.

आण्णा हजारे अगदी हूबेहूब. काही पुतळे आहेत असं समजतंय. पण काम अफलातून आहे.
कलाकाराला __/\__ ऑफ!!

वा छान! काही फोटो वाटतात. तर काही मेणाचे पुतळे आहेत ते कळते. काम खुप चांगले केले. आपल्याकडेही असे कलाकार आहेत. हे बघुन आनंद झाला.

लेखात मुद्दाहून नावे दिली नाहीत. कारण मग हे काही वेगळे आहे असे वाटणार नाही Happy
आता इथे देते नावे.
१,२ अण्णा हजारे, ३,४ म. गांधी, ५ सत्यसाईबाबा, ६ साईबाबा, ७,८ माता अमृतानंदमायी देवी (अम्मा),९ श्री नारायण गुरु,१ ० हिटलस, ११ सद्दाम हुसेन, १२ बेनझीर, १३ -----------, १४------------, १५ मायकेल जॅक्सन, १६ स्वामी विवेकानंद, १७ मदर टेरेसा, १८,१९ डॉ. बालाजी तांबे, २०,२१ वेल्लपल्ली नातेसन (एस एन पी डी योगम चे जनरल सेक्रेटरी, केरळ ), २२ छगन भुजबळ, २३,२४ श्री श्री रवीशंकर, २५ कपिलदेव २६,२७ जॅकी श्रॉफ, २८, २९ अ‍ॅन्जोलिना जोली , ३० ऑस्करची बाहुली, ३१, ३२ रसूल पूकुट्टी (स्लमडॉग मिलेनिअर चा साऊंड मिक्सर ), ३३ जवाहरलाल नेहरू, ३४,३५ राजीव गांधी, ३६ ए आर रेहेमान, ३७,३८ पं. सुब्बलक्ष्मी, ३९,४० ओम्मेन कँडी ( केरळचे माजी मुख्यमंत्री ), ४१,४२ हरिहरन, ४३ अद्-भूत कलाकार - सुनील कंडल्लूर

फोटो मस्त काढले आहेत.

भारतीय लोकांचे पुतळे बनवण्यात मादाम तुसांचे कलाकार कमी पडतात पण हा सुनील मात्र एक्सपर्ट आहे. Happy

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे की तिथे. त्याचा फोटो? तो अप्रतिम बनवलाय त्याने.
आता १०० रु तिकिट असेल. मी पाहिल तेव्हा ७५ रु होतं. पैसा वसुल ठिकाण आहे हे.
मी तर तिथल्या पुस्तकात लिहुन आलो होतो की सचिन तेन्डुलकरांचा पुतळा हवाच.

झकासराव, हो शिवाजीचाही पुतळा आहे. कसा कोणजाणे पण फोटो काढायला विसरलेत्याचा Sad हो आता तिकीट १०० आहे पण वसूल Happy थोडं थांबा तुमची इच्छा पूर्ण होतेय, पुढच्या काही महिन्यात ते करणार आहेत तेंडूलकरचाही पुतळा Happy सुनीलजी म्हणाले तेंडूलकर बरोबर गाठीभेटी चालू आहेत यासंदर्भात !

मुंबईहून पुण्याला येताना दृतगतीमार्गावर नेहमी या संग्रहालयाची जाहिरात दिसते; कधी जायचा योग नाही आला. ही अद्भूत दुनिया दाखवल्याबद्दल खूप आभारी. मॅडम ट्यूसाडच्या पुतळ्यांचे प्रचि अनेकदा पाहिलेत. 'आपलं' मॅडम ट्यूसाड नक्कीच उजवं आहे असं वाटतंय Happy

जबरदस्त!!!!

काही पूतळे खरच अगदी हुबेहूब....

सलाम श्री सुनील यांच्या कलाकारीला !!!!

धन्स अवल, इथे फोटो टाकल्याबद्दल. आता पुढच्या भारतवारीत नक्की बघणार हे म्युझीयम Happy

व्वा... मस्त! अण्णा, सुब्बलक्ष्मी...अप्रतिम जमलेत.

कित्ती वेळेस लोणावळ्यावरुन जातांना पाटी दिसली होती. पण जाउन पहाण्याइतका वेळ नव्हता. Sad

आता नक्की बघेन!

अण्णा हजारे अगदी हुबेहूब Happy
मस्तच अवल, आतापर्यंत मी नेहमी पाटी पाहत होते पण पुढच्यावेळी नक्की भेट देईन म्युझियमला.

Pages