मदत कुठे मिळेल ?

Submitted by सामी on 21 March, 2012 - 09:55

नुकतीच मी शिमग्यातील पालखी साठी रत्नागिरी मधील आमच्या गावात जाऊन आले. एका परिचितांकडे गेल्यावर असे कळले कि त्यांच्या घरात अजून वीज नाही. त्यांनी MSEB च्या नियमा प्रमाणे पैसे deposit केले आणि त्यांच्याकडे पावती पण आहे. त्यांना विजे साठी नुसती आश्वासने मिळत आहेत पण पैसे भरून हि अजून घरात वीज नाही . इथे मुंबईत हॉटेल्स आणि रेस्तौरंत च्या बाहेर दिव्यांचा झगझगीत माळा आठवल्या आणि कसेसेस झाले.
नवरा , बायको, तरुण मुलगा आणि म्हातारी आई असा परिवार आहे. वरच्या बाजूला घर घेणे त्यांना परवडणार नाही. गावातील घरे आधी खालीच होती पण रस्त्याची सोय झाल्यामुळे आणि कोकण रेल्वे मुळे जवळ जवळ सगळेच वरच्या बाजूला शिफ्ट झाले. संध्याकाळ झाली कि घरात फक्त अंधार आणि मिणमिणता दिवा. मुलगा शिक्षणासाठी मुंबईला होता पण त्याचे हि accident झाल्यामुळे आई वडील गावी घेऊन आले. मुलाची अशी अवस्था आहे की घरी वीज असणे अत्यावश्यक आहे . आम्ही त्यांना सल्ला दिला कि जास्तीचे पैसे देऊन बघूया का वीज मिळते ते पण यावर त्यांचे उत्तर असे कि मी कायद्यानेच जाईन. एकही पैसा जास्त देणार नाही माझ्याकडे अर्जाची कॉपी आणि पैसे भरल्याची पावती आहे.
हे सगळे ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली. इथे आपण सगळ्या घरातले दिवे लावून ठेऊन वीज फुकट घालवतो आणि या बिचाऱ्या लोकांना हक्काची वीज पण मिळू नये.
रत्नागिरी जिल्ह्यात फक्त एखाद्या घरात वीज नसणे खरोखर पटत नाही . गावकरी पण यावर काहीच action घेत नाहीत . कलेक्टर चे म्हणणे असे कि वरून खाली वीज नेण्यासाठी पोल लावावे लागतील वगैरे पण MSEB ने अर्ज भरून घेतला म्हणजे हे त्यांचे काम आहे.
वर गावात सगळ्यांकडे सगळ्या सोयी सुविधा आहेत पण त्यांना एका कुटुंबाकडे वीज नाही याचे काहीच वाटत नाही. काकी पाट्यावर वाटून जेवण करतात . मिक्सर विजेच्या अभावी घेऊ शकत नाही.
त्यांच्या कडून हे ऐकल्यावर पहिल्यांदा ठरवले कि मायबोली वर हे पोस्ट करूया म्हणजे कुठूनतरी काही दिशा मिळेल .
- आभारी आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण २० -२२ वर्षांपूर्वी याच परिस्थितीत आम्ही नाशिकमध्ये अंबड भागात राहिलो आहोत. तेव्हा ३-४ वर्षे अर्ज पडून राहिले पण काही झाले नाही, मग बाबांनी पदरमोड करून ते पोल्स बसवून घेतले. आजही ते अभिमानाने सांगतात - हे ३ पोल्स आम्ही बसवले बरं का. Wink बाकी ते पाट्यावर वाटणं, रात्री कंदिलाच्या प्रकाशात जेवण/अभ्यास करणं, सगळं आम्ही(आई-बाबा-३ मुलं) अनुभवलंय - ते ही आसपासच्या सगळ्यांकडे लाईट दिसत असताना. आता वाटतं कसं केलं असेल, पण आम्ही सगळे तेव्हा खूप मज्जा करायचो. त्रास नाही झाला कधी.
अर्थात तुम्ही सांगताहात त्या कुटुंबात आजारी आणि वृद्ध व्यक्ती असल्याने त्यांना त्रास होत असणार. ओळख वगैरे काढून काम करणार्‍यातले पण नसावेत हे काका. लवकरात लवकर त्यांच्याकडे वीज येवो, अशा शुभेच्छा. अजून काय? Sad

खूप कठीण आहे ग असे राहणे. तुमचे खरोखर कौतुक . या काकांना पण तीन पोल बसवून घ्यायला लागतील असे ते म्हणाले, पण त्यांच्या आवाक्या बाहेर आहे आणि ते कुणाकडूनही पैसे घ्यायला तयार नाहीत .

सामी मिडियात जाणे हा सर्वात फास्ट उपाय आहे. गोष्ट ताबडतोब घराघरात पोहोचते आणि अ‍ॅक्शनही ताबडतोबीने घेतली जाते. इथे त्यासाठी मदत मिळेल बहुतेक करून.

सामी, माझ्या एका पत्रकार मैत्रिणीला ही माहिती कळवली आहे.तिच्याकडून उत्तर आले कि सांगते.

>>कलेक्टर चे म्हणणे असे कि वरून खाली वीज नेण्यासाठी पोल लावावे लागतील वगैरे पण MSEB ने अर्ज भरून घेतला म्हणजे हे त्यांचे काम आहे.<<

जर तुमच्या परिचितां व्यतिरीक्त आणखी पाच ते सहा घरे बाजूला असतील तरच MSEB तिथे पोल उभा करेल अन्यथा तुमच्या एकट्या साठी ते करणार नाहीत. तो तुम्हाला स्वत:ला(परिचितांला) त्या पोलचे पैसे भरावे लागतील. किंव्हा वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे दुसरा एकादा पोल जवळच म्हणजे ८०-९० मीटरच्या आतमध्ये असेल तर पोल उभा करायची गरज नसते. तात्पुरते आधार उभे करून त्यावरून सर्विस वायर टाकता येते. पण यासाठी त्या लाइनमनला चिरीमिरी द्यायची तयारी ठेवा.

>>आम्ही त्यांना सल्ला दिला कि जास्तीचे पैसे देऊन बघूया का वीज मिळते ते पण यावर त्यांचे उत्तर असे कि मी कायद्यानेच जाईन.<<

त्याने काही एक होणार नाही. उगाच मनस्तापच होईल.

Thanks दक्षिणा, पूर्वा, वेताळ_२५, युरी गागारीन
पूर्वा मैत्रिणीला कळवल्याबद्दल आभारी आहे, तिला हवी असल्यास अजून माहिती किंवा त्या काकांचा mobile नंबर देऊ शकते...

इथे आठवण काढलीत का माझी? Proud

सामी. गावाचे नाव सांगशील का? माझे घर पोमेंडीत आहे. जरा अजून माहिती दिलीस तर बरे होइल. मी सध्या रत्नागिरीमधे नसते. पण तिथल्या बर्‍याच "नेत्याना" ओळखते. त्यामुळे माझ्याकडून जमेल तितके मी नक्कीच करू शकेन.

कोकणामधे वाड्यामधे कित्येक घरे अशीच दूर अंतरावरती असतात पण तरीही एमएसीबीकडून त्याना वीज मिळालेली आहे. म्हणून तुझ्या काकांच्या घराविषयी वाचून वाईट वाटले.

Thanks शिव, वत्सला....मला खूप वाटते कि त्यांच्या कडे लवकरात लवकर वीज यावी...खूप साधी आणि भोळी माणसे आहेत..त्यांच्या पत्नी तर एकदम गोड आहेत स्वभावाने.......
सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचे आयुष्य मुंबईत गेले आहे.....लग्न करून त्या रत्नागिरीला गेल्या..

सामी. प्लीज मला संपर्कमधून काकाचे नाव व फोन नंबर व इतर माहिती पाठवशील का?

मी सध्या आठवडाभरासाठी रत्नास्गिरीत आहे. काहीतरी प्रयत्न करून बघेन.