माझे कुडत्यावरील भरत काम ..

Submitted by सुलेखा on 21 March, 2012 - 04:56

baheeche design.JPG"वारली चित्र " ग्रामीण आदिवासी जीवनाची ओळख करुन देतात..मी या माध्यमाचा वापर भेटकार्ड ,भित्तीचित्र्,हँडमेड पेपर्, लाकडाची पट्टी,फेब्रिक पेंटिंग मधे साडी,कुडत्यावर्,हातरुमालांचे कोपरे,टेबलक्लॉथ्,चादर वगेरे वर केला आहे.इथे मी कुडत्यावर साधा धावदोरा घालुन वारली डिझाईन केले आहे.पण मला माणसांची चित्रं नको होती त्यामुळे इतर चित्रांचा वापर केला आहे.तसेच "उरलेल्या" दोर्‍यांचाच उपयोग करायचा होता. .
१]हे भरतकाम चालु असताना--
warali2.JPG

२]साधारण असे दिसते.हा एक भाग पुन्हा -पुन्हा ट्रेस केला आहे
warali full figure.JPGwarali 1 mayboli 2.JPG
३] बाह्यांवरचे भरतकाम--
baheeche design_0.JPGwarali-1 010mayboli3.JPG
४] मागील गळ्याखाली हे लहानसे डिझाईन घेतले आहे-warali333.JPG-waralimayboli4.JPG
असे हे कुडत्यावरील भरतकाम आता पुर्ण झाले आहे..warali 111.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लीना,मी डिझाईन स्वताच तयार करते.एका कागदावर हवा तसा आराखडा तयार करायचा अन कार्बन पेपरच्या सहाय्याने कापडावर छापायचा.

सुलेखा, काय त्या ६४ कला आणि किती ते गुण असं काही असायचं पुर्वीच्या राजकन्यांकडे. तुझा काय पुनर्जन्म आहे का काय? सगळंच येतं तुला. Happy

मस्त !

मनिमाऊ,अ गं कित्तीतरी गोष्टी अजुन शिकायच्या राहिल्यात्.काही वेळेअभावी तर काही अजुन काहीबाही कारणानी..प्रयत्न चालु आहेत्.काय काय जमेल ते पहायचं...
कविन्,पेशन्स आणावा लागतो.एकदा करायचे ठरवले कि तो आपसुक येतो .पण हाती घेतलेले कार्य आपल्यालाच पुर्ण करावे लागते हे लक्षात असु दे.

सुंदर.

एकदा करायचे ठरवले कि तो आपसुक येतो .>>>१००%+ उलट आता हाती घेतलं कि वाटतं कधी एकदा पूर्ण करेन.. वाचन त्यामुळे पूर्णपणे बंद झालंय.. Happy

किती नाजुक आणि सुबक झालंय भरतकाम Happy
झब्बु पण एकदम झकास Happy
स्वतः विणलेला ड्रेस घालायला किती छान वाटतं ना Happy

प्रित ,झब्बु तर खरंच खुप मस्त..
कुडत्याचे भरतकाम पुर्ण झाले आहे.शिवून तयार झाल्यावर फोटो टाकीन.सध्या भरतकामावर जोर आहे त्यामुळे शिवणकाम नंतर एकसाथ करीन.
जयश्री,अगदी खरं.खुप समाधान मिळते.लाख टकेकी बात...

Pages