शेगाव बद्दल जरा माहिती हवी आहे.

Submitted by आसना on 18 March, 2012 - 18:57

मला कुटुम्बियान बरोबर शेगाव ला जायचे आहे. तिकडे कश्या सोयी आहेत ते काहि माहीत नाही. जर कोणास माहीती असेल तर शेअर करावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्राच्या कुठल्याही भागांतुन शेगांव पर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे सर्वात उत्तम साधन आहे. मुंबई (पोत्याने गाड्या आहेत) , पुणे (महाराष्ट्र एक्प्रेस), नागपुर (?) तसेच राज्याच्या कानकोपर्‍यातुंन लाल डब्ब्याची गाडी (एस टी बस) पण पोहोचते. आजच्या काळांत भुसावळ वरुन सुटणारी पॅसेंजर सवारी गाडी पण काटेकोर वेळेवर पोहोचते.

गजानन महाराजांच्या मंदिरांत जाणार असाल तर तेथे भक्तनिवासांत (?) रहाण्याची अत्यंत उत्तम व्यावस्था होते. त्यांचे दिवसाचे दरही खुप माफक आहेत. मंदिरांत तसेच भक्तनिवासांत जेवण, खाणे चांगले मिळते. भेट देणार्‍या लोकांची संख्या, आणि आंतमधे असणारी स्वच्छता तसेच शिस्त यामुळे मी प्रभावित झालो आहे. अत्यंत निस्वार्थी भावनेने स्वयंसेवक काम करत असतांत, त्यांचा काम करण्यातला निस्वार्थ भाव खुप काही शिकवतो. पण बाहेर पडल्यावर शहरांतली अस्वच्छता खटकते.

आम्ही लहांन असतांना स्टेशन वरची कचोरी विशेष प्रसिद्ध होती (आजही आहेच). त्याकाळांत तिचा आकारही मोठा असायचा. आजकाल 'शेगांवची कचोरी' (रेसिपी सारखी असावी) म्हणुन आसपासच्या शहरांतही मिळते. थोडा धिर धरला तर कढईमधुन गरमा-गरम तळलेली खायला खुप मजा यायची...

जवळच छोट्यां मुलांसाठी आनंद सागर नावाचे अप्रतिम असे पार्क आहे. रोषणाई पहाण्यासारखी आहे असे म्हणतांत (मी वेळे अभावी बघितली नाही).

९० नंतर शहरांत असणार्‍या इंजिनियरिंग कॉलेज मुळे शहर अजुन प्रसिद्धीच्या झोतांत येत आहे.

भक्तनिवासाबद्दल उदय यांना १००% अनुमोदन!!!
दुसरीकडे कुठेही रहाण्याचा विचारही करु नका.
आनंदसागरसाठी भरपुर वेळ आणि स्टॅमिना घेऊन जा! अप्रतिम आहे तो प्रकल्प!

मी महाराष्ट्र एक्स्प्रेस ने गेले होते... स्टेशन वरुन भक्त निवास व मंदिरापर्यंत जान्यासाठी संस्थान च्या गाड्या आहेत... कोणत्याहि शुल्का शिवाय.... भक्तनिवास सोय चांगलि आहे आनि दर हि खुप जास्त नाहित... ( ४ वर्षा पुर्वि १०-२० रु.) पन तिथे जागा नाहि मिळालि तर मंदिराच्या जवळ अजुन काहि भक्तनिवास(?) आहेत तिथे दर थोडा जास्त (५० रु ?) आहे... सोय सगळि कडे उत्तम..... मंदिर पाहाण्या सारखे आहे तसेच आनंद सागर तर अजिबात miss करु नका... मंदिरातुनच संस्थानच्या गाड्या आहेत जान्या साठि... संपुर्ण एक दिवस राखुन ठेवा त्यासाठि.... तिथले स्वामि विवेकानंदांचे स्मारक पाहान्यासारखे आहे.....

maajhe aai wadil agadi hallich (2 weeks purvi ) Shegaw la jaun ale ahet. Tyannihi changlach sangitla ahe tithalya soyinbaddal.

tyamule Uday+1

शेगाव ला जायला रेल्वे सर्वात उत्तम साधन आहे, संपुर्ण एक दिवस राखुन ठेव...
दर्शनाला गर्दी नसेल तर सह्ज १ तासात दर्शन होइल... प्रसादाच्या पन्क्ती मध्ये जेवाय्चे नसेल... रांगेत लागाय्चे नसेल... तर देवळासमोर च स्नेहांजली म्हणुन होट्ल आहे त्यात जेवण अप्रतिम मिळ्ते......तिथे राहाण्याची पण उत्तम सोय होइल... कारण भक्तनिवास सदैव ... गर्दी असते... आता साधारण तिथ्ल्या चांग्ल्या हॉटेल चे रेट .. ५००/ ६०० पर्यंत गेले आहे......संस्थाना ची वेब्साइट आहे....... तिथे तुला जवळ्पास सग्ळीच माहीती मिळेल.. .... हॉटेल शेगाव अस गुगल वर टाइप केले तर... नं सकट लिस्ट मिळेल.... एजंट्ला संपर्क करु नका ... हॉटेल आरामात मिळतात....... आनंद्सागरला जरुर जा. सर्वत्र जायला संस्थाना ची मोफत बससेवा आहे....
आणी मुख्य म्हणजे... गजानन महाराजांना माझा नमस्कार पोचव..

तर देवळासमोर च स्नेहांजली म्हणुन होट्ल आहे त्यात जेवण अप्रतिम मिळ्ते......तिथे राहाण्याची पण उत्तम सोय होइल... कारण भक्तनिवास सदैव ... गर्दी असते..>>> पण आधि चौकशी अथवा बुकिंग केले तर जागा मिळेल. बहुद भक्त निवास एका वेळी ३ दिवसांसाठीच देतात. कधि कधि फुल आहे असे उगाच सांगतात असे ऐकले (जेणे करुन बाकी हॉटेलचा बिझनेस चालावा)

http://www.gajanan-shegaon.com/homepage.asp - येथे सर्व माहिती मिळेल.

आजुबाजुला फिरायला तेथे गाडी बुक करावी. मिळते.

<कधि कधि फुल आहे असे उगाच सांगतात असे ऐकले (जेणे करुन बाकी हॉटेलचा बिझनेस चालावा)> - असं काहीही नाही. जागा असेल तर मिळते.
भक्तनिवासांमध्ये जेवणाचीही सोय आहे. तिथे राहिला नाहीत तरी जेवता येतं.

पण आधि चौकशी अथवा बुकिंग केले >>.. बुकिंग १००% ट्क्के होत नाही... मी वर्षातुन ४ ते ५ वेळा जाते... म्हणुन बोलले.. ..हॉटेल सोयी सुवीधा बघुन बुक केले तर जास्त उत्तम....

जवळच गोमाजी महाराज समाधी संस्थानही आहे. वेळ असल्यास तिथेही भेट देता येईल.

हल्ली आजूबाजूला बरेचसे लॉज मिळतात. पण सगळेच स्वच्छ नाहीत. Sad स्नेहांजलीचा ही अनुभव काही खास आला नाहीये. भक्तनिवासात मात्र उत्तम सोय होते. पण फॅमिली सोबत असाल तरच भक्त निवासात सेल्फ कंटेन्ड टॉयलेट + बाथरूम असलेल्या रूम्स मिळतात. मित्र - मित्र असे गेल्यास कॉमन रूम मध्ये जागा देतात. पती-पत्नी दोघांना रूम हवी असल्यास दोघांना वेगवेगळ्या खोल्यांत बसवून एक एक फॉर्म भरून घेतात. पतीस पत्नीच्या नातेवाईकांबद्दल आणि पत्नीस पतीच्या नातेवाईकांबद्दल प्रश्न विचारलेले असतात. (एकदा अनुभव घेतला आहे. ज्यांना माहीत नाही त्यांची गैरसोय होऊ शकते, म्हणून सांगितलं).

नुकतेच "आनंद विहार" म्हणून नवीन भक्ति निवास चालू झाले आहे व अतिशय छान व्यवस्था असते असे कळले. Happy

बंकटलाल यांचा वाडा, महाराजांनी जिथे शिते वेचून खाल्ली ते झाड इ. पण एका ट्रिप मध्ये पाहिल्याचे आठवतेय.

शेगांव अकोल्यापासुन ४७ कि.मी.
मंदीरात सर्व सोई आहेत.
शिवाय निस्वार्थ सेवेकरी आहेत.
काहीही कमी पडणार नाही, माफक दर , खाण्या पिण्यासह,
रेल्वे, बस ट्रॅक्स कशानेही येता येईल
आनंद सागर, गोमाजी महाराज संस्थानला भेट देला येईल.

भक्तनिवासांत रहाण्याची सोय होते, भक्तनिवास फुल झाले असेल तर थोडी वाटबघावी रूम खाली होत असतात.
आणी जर लहान मुले असतील तर पिण्याच्या पाण्याची सोय करून ठेवावी तिथल्या पाण्याची चव जरा वेगळी असते.

श्री गजानन महाराज की जय ! तुम्हा सर्वान्चे खुप खुप आभार, ह्या मदतीमुळे तुमचा नमस्कार तर महाराजां पर्यन्त पोहचलाच असेल.

भक्तनिवासातच जावे.. भक्तनिवास फुल आहे असं मलाही ३-४दा सांगितलं गेलं होतं पण ते संस्थानच्या लोकांनी नाही, तर प्रवेशद्वारापाशी उभ्या असलेल्या रिक्षावाल्यांनी. ते रिक्षावाले आपण बावरलो तर तुमची सोय करुन देतो म्हणतात आणि कुठलेसे गलिच्छ लॉज फिरवतात. मी, माझा नवरा आणि सासूबाई असेल तिघंजण उजाडलं पण नव्हतं तेव्हा अश्या लॉजवर फिरवले गेलो होतो. नंतर आम्ही त्याला नकार देऊन भक्तनिवासात येऊन बसलो. त्यांच्या ऑफिसमध्ये नंबर लावून बसायचे. सकाळी रुमचा ताबा द्यायला लोकं येत असतात आणि रांगेप्रमाणे आपल्याला रुम मिळून जाते. भक्तनिवासातलं कोपर्‍यातलं भोजनालय उत्तम आहे. तिथे प्रसादाची भाकरीही एक घास दिली जाते. नाश्ताही उत्तम मिळतो. पुन्हा संध्याकाळी निघताना रात्रीच्या जेवणासाठी इडल्या चटणी पार्सल बांधून घ्यावी आणि ट्रेनमध्ये खावी.

रिक्षा करुन चार धाम पाहून यावे. एकेक स्थानं पाहिली की पोथीतल्या कथा डोळ्यासमोर उभ्या राहतात. गर्दी नसेल तर गाभार्‍यात परत परत जाऊन आले आहे. खूप आठवणी आहेत शेगावच्या. २३-२४ ऑक्टोबर २००७ नंतर महाराजांचं बोलावणं आलंच नाही अजून.

>>नुकतेच "आनंद विहार" म्हणून नवीन भक्ति निवास चालू झाले आहे व अतिशय छान व्यवस्था असते असे कळले.

अगदी बरोबर ...

शेगावी किती हि गर्दी असुदे भक्त निवासात सर्वांची सोय होते असा आमचा अनुभव आहे.

>>लहान मुले असतील तर पिण्याच्या पाण्याची सोय करून ठेवावी तिथल्या पाण्याची चव जरा वेगळी असते.

८ रु १ लिटर पाण्याची बाटली मिळते (सवलतीत) आणी चव पण बेस्ट.

शेगाव खरोखरच अप्रतिम आहे. मुख्य तेथील शिस्त महाराश्ट्रातील कोणत्याहि देवस्थानात अभावानेच दिसेल.
तसेच यात्रेकरू साठी गजानन महाराज सन्स्थानाने केलेल्या सुविधा इतर देवस्थानानाही अनुकरणीय आहेत.

पती-पत्नी दोघांना रूम हवी असल्यास दोघांना वेगवेगळ्या खोल्यांत बसवून एक एक फॉर्म भरून घेतात. पतीस पत्नीच्या नातेवाईकांबद्दल आणि पत्नीस पतीच्या नातेवाईकांबद्दल प्रश्न विचारलेले असतात. (एकदा अनुभव घेतला आहे. ज्यांना माहीत नाही त्यांची गैरसोय होऊ शकते, म्हणून सांगितलं). >> हो. आम्हीही अनुभव घेतला आहे याचा. पण भक्तनिवासातील व्यवस्था आणी जेवण फारच छान होते.

आनंदसागरही चुकवू नका. अतिशय सुंदर जागा आहे.