छायाचित्र बघा आणि कविता करा......क्रमांक १

Submitted by उदयन. on 18 March, 2012 - 05:18

एक नविन प्रकार सुरु करतोय..
आपण एक छायाचित्र निवडायचे.. आणि त्यावर कविता, गझल, चारोळी काव्य प्रकार निर्माण करायचे..
आपल्या मायबोलीवर उत्कृष्ट छायाचित्रकार आणि सुरेख कवी आणि कवियत्री आहेत..
.
.
.
दर रविवारी नविन आशयघन छायाचित्र आपल्या आणण्याचा प्रयत्न राहील..

पहिले छायाचित्र

dddd.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चित्र हिरवाइचे का कुणी खोडले?
तापलेली मृदा झाड ही तोडले

वीज तारांतुनी,आग धमन्यांतुनी
रोपट्याला कसे मोकळे सोडले?

--डॉ.कैलास गायकवाड

विसाव्याचे झाड होते
थांबायाचे वाटसरू
तोडल्या हो शाखा आता
विकासाची वाट धरू..
आल्या तारा वीज आली
माळराने उजाडली
कोमेजल्या हिरवाईचे
अंकुरले एक तरू..

अस्मानातून येतील जेव्हा
सरसर सरसर पाऊसधारा
सरेल माझे दु:खच तेव्हा
भिजेल धरणी, भिजतील तारा!

तुझ्यासारखीच माझ्यावरती
पानफुलांची चढेल हिरवळ
आसमंती या भरून राहिल
ओल मातीचा सुगंध दरवळ!

डॉ.साहेब, युरी व टोकूरिका - तिघांच्याही कविता आवडल्या - खूपच सुंदरप्रकारे विचार व्यक्त केलेत.
उदयवन - कल्पना सुरेखच.

धन्यवाद युरी, नेहा.... कविता छान अनूरूप आहेत...
.
.
.
जो ...मला ते माहीत नव्हते....हे झाड कापलेले नाही आहे.... वाळून गेले आहे.... Happy

अरे वा मस्त उपक्रम !
सर्वांच्याच कविता मस्त Happy
जणु ते सुकलेले झाड त्या नव्या नव्हाळितल्या छोट्या झाडाला म्हणतेय,

सोसल्या तुझ्यासाठी, या उन्हाच्या झळा
वेगळा तू वेगळा मी, तरीही लागला लळा

नमलो मी अता, पुढती या कळीकाळा
फळो-फुलो तुझे आयुष्य, बाळा

अरे मित्रा
कशाला एव्हढा हिरवाइचा सोस धरतो
मि तुला अनुभवाचे बोल सांगतो
ह्या माणसांचि फिरलिय मति
पाहिलिस कशि केलि त्यांनि माझि गति
इथल्या गर्द रानाचि आता राहिलिय फक्त लाल गरम माति

नाहि मित्रा
मि अंकुरत होतो तेव्हा पाहिलिय तुझ्यावर चालवताना करवत
पण मग तुझेच लाकुड त्यांनि नेले होते मिरवत
त्या बघितल्यास वरिल विजेच्या तारा
अरे आता वाढतोय इथे आधुनिकतेचा पसारा
त्याचि प्रत्येक गोष्ट वाइट हे विचार तुझ्या मनातुन झडुदे
आता फक्त तुला नवि पालवि फुटुदे

धग तुला कधी ना जाणवावी
त्याचसाठी झटलो रे,
आकांक्षा तुझी बहरावी
म्हणुनच मी पोळलो रे

घे उंच भरारी आकाशी
कर पादाक्रांत ती शिखरे,
पण.... उधळुन दे दुसर्‍यासाठी
कारण तुही आहेस नश्वर रे

मी तुझ्याचसाठी झुरलो रे
म्हणुनच मी पोळलो रे

ओसरला बहर,
कधीचाच..!!
उभा आहे मात्र आजही,
पापण्यांत अंकुरण्याची स्वप्ने घेऊन...

हल्ली श्रावणाही, येतो
फक्त जाण्यासाठीच!

अंकुरण्याची, फुलारुन येण्याची
क्षमता संपली की,
की निष्कामाचा काळा ठप्पा उमटवण्यास
दैवही सज्ज!

मी संपल्याचाही उपयोग,
घ्यालच तुम्ही करून,
पण-
श्रावण सरल्यानंतरच या,
आसही मावळते तेव्हा!

छानच कल्पना..
सगळ्यांच्या कविताही छान Happy

जमीनीत रुतलेलं
एक खोड सुकलेलं
आस एक निळाईची
हिरव्याश्या झिळाईची
संपेल का उगा भास?
पूरी होवो त्याची आस
दरवळो त्याचा श्वास
वसंताचा येवो मास..
नको असा सुकू पुन्हा
बहरुदे तनमना..

उदय, झकास कल्पना आहे. कविता तर एकसे एक बढकर आहेत.
किरणच्या रिक्षा स्टँडवर जावुन ये रे एकदा, म्हणजे अजुन अजुन कवि/कवियत्री येतील इकडे. आम्हाला काय रे, छान छान वाचायला मिळालं तर मजाच.

छान, सुंदर कविता.....
.
.
.
एकाच आयडी ने 2-3 कविता केल्यात तर चालेल... Wink
.
...
.

वाळलेला वृक्ष मानवाला म्हणतो:

माझ्या आयुष्याचा एकच ध्यास आहे.......
सदैव तुझ्या उपयोगी पडायचा....
तुझं मला अप्रूप वाटायचं

काल बहरलेला होतो
तेव्हा अनेक मनं मोहरली
माझ्या फुलांना नुसतं पाहून......!

न जाणो किती प्रेमीयुगुलांनी
प्रेमाच्या आणाभाका घेतल्या
इथेच माझ्या सावलीत बसून......!

प्राण्यांचा रात्रीचा निवारा झालो मी अन
पक्षीमित्र पण करायचे किलबिलाट
माझ्या कुशीत आपली छोटी छोटी घरटी रचून...!

अचानक एक दिवस
पानगळती आली
माझं अंग अंग सुकलं रे
जेव्हा वरूणराज बसला रूसून....!

शुजात खान .. राग पहाडी ...

http://www.youtube.com/watch?v=Sqw0P_eKXoE&feature=related

पत्ता बोला वृक्ष से सुनो वृक्ष बन गाये

अब के पतझड मे दूर पडेंगे जाये ( ??? )

वृक्ष बोला पत्ते से सुनो पत्ते मेरे भाई

यही जगत की रीत है एक आये एक जाये

( दुसर्‍या ओळीतले शब्द काय आहेत?)

धन्यवाद जामोप्या................
.
.

पाहतो नभाशी जोडू
मी नवे अनामिक नाते
परि दशा जाहली जैसे
मातीशीही तुटले नाते

खंत नुरली मनात कसली
हे भोग असती प्राक्तनाचे
नकळत सरली नाती सगळी
आता आकर्षण मोक्षाचे

मी मलाच सांगतो सारी
कहाणी त्या गतवैभवाची
पायाशी अंकुर नवा मम
जाणिव मग पुनरागमनाची

सुक्ष्म बीजातून रोप उगवले
जल, तेज, धरीत्रीने वाढवले
आधार खगा, सावली पांथंस्था
परोपकारे जीवन वेचले

खडतर कोरड्या भवतालामध्ये
हिरवाईचा ओलावा
खोलवर शोधूनी पाणी
मातीशी हे नाते जुळले

दुष्ट कुणाची नजर लागली
मतलबाची भावना जागली
होरपळूनी स्वार्थाच्या वन्हीत
उगा बिचारे जळून गेले

मनुष्य धर्म हा अपकाराचा
उपकारकर्त्याच्या घाताचा
कृपण कृतघ्न प्रवृत्तीचा
पुन्हा जगा दावून गेले

फोटो काही दिवसातच बदलतो............... सध्या दुसर्‍या ठिकाणी नोकरीनिमित्ताने आल्या मुळे....... फोटो टाकता आले नाही

Pages